Sunday, 16 July 2023

अजित पवारांनी सर्व मंत्र्यांसह अचानक घेतली शरद पवारांची भेट !!

अजित पवारांनी सर्व मंत्र्यांसह अचानक घेतली शरद पवारांची भेट !!

भिवंडी, दि.,१७, अरुण पाटील, (कोपर) :
          उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव निर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये जाऊन अचानक भेट घेतली. जवळपास पाऊन तास चर्चा झाल्यानंतर हे सर्व नेते बाहेर पडले. पण यात शरद पवारांनी मौन बाळगल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बंडानंतर प्रथमच शरद पवारांच्या भेटीला गेल्यानंतर काही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट पवारांचे पाय धरत विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, अशी विनवणी केली.तर शरद पवार साहेब आमचे दैवत म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी पाया पडून आशिर्वाद घेतले.तर या भेटी बाबत काही विशेष नसल्याचे उप मुखयमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

.                     शरद पवार साहेब आमचे दैवत --प्रफुल्ल‌ पटेल

            अजित पवारांसह नवनिर्वाचित मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी सर्वच नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. शरद पवारांना वाय.बी. चव्हाण सेंटरवर अजित पवारांचा गट भेटला. यावेळी छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले. त्यानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडत आम्हाला माफ करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, अशी भूमिका मांडत विनंती केली.

.                    विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला ,-- छगन भुजबळ

            विठ्ठला सांभाळून घे रे असे उद्गार काढत छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया पडले. याभेटी दरम्यान जवळपास सर्वच मंत्र्यांनी शरद पवारांच्या पाया पडत हात जोडले. मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजतेय. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी दिली.

.                   तर या भेटीत काही विशेष नाही - देवेंद्र फडणवीस 

            शरद पवार यांच्या सोबतच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीविषयी माहिती दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचं समजलं. त्यामुळे वेळ न मागता आम्ही इथे आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात मार्गदर्शन करावा अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे.
          अजित पवार गटातल्या मंत्र्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनीच सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार यावर काय निर्णय घेणार हे येत्या काळातच समजणार आहे.
         अजित पवार आणि नेत्यांनी शरद पवार यांची वेळ घेतली नव्हती. अजित पवारांनी मात्र, अचानक भेट घेत शरद पवारांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. तर मार्ग काढण्याची काढावा म्हणत पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 
             अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची मला कल्पना नाही. मात्र, वर्षानुवर्षे शरद पवार त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे भेट घेतली, तर त्यात काही वावगं आहे असं मला मुळीच वाटत नाही. यातून काही राजकीय समीकरणं तयार होतील का याची मला आत्ता कल्पना नाही. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
         अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची वेळ न घेता संधी साधत अजित पवार गटाने त्यांची वायबी चव्हाण सेंटरवर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे, त्यांचे पायपडून आशीर्वाद घेतले असे म्हटले आहे

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...