Friday, 4 August 2023

स्मार्ट सिटी विकास कामांसाठी वाहतूकीचे नियोजन व बदलाबाबत पाहणी !

स्मार्ट सिटी विकास कामांसाठी वाहतूकीचे नियोजन व बदलाबाबत पाहणी !

लवकरच अधिकारी व मान्यवरांची घेणार संयुक्त बैठक - वपोनि गिरीश बने

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील वलीपीर रोड ते महात्मा फुले चौक परिसरात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकल्प उभे राहत आहेत. ही सर्व कामे प्रगतीपथावर असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी स्टँड इन गेट ते रेल्वे रिझर्व्हेशन समोरील रस्ता रहदारी साठी बंद करण्यात येणार आहे, या विकास कामांना एक वर्ष कालावधी लागणार या वेळी आणखीन काही रस्ते बंद तर काही एक दिशा करणे आवश्यक असल्याने सदर वाहतूकीचे नियोजन पण करणे आवश्यक आहे.

या संदर्भात गुरुवारी (०३/०८/२३) रोजी पोलिस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांच्याशी विचार विनिमय करून सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक)  मंदार धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग, कल्याण) गिरीश बने, स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवली (एस. के. डी. सी. एल) चे अधिकारी नितीन काटोरे, असिस्टंट प्रॉजेक्ट मॅनेजर व अभियंता सागर गंभीरे, प्रशांत बनकर व इतर, तसेच ऑटो रिक्षा, टॅक्सी चे पदाधिकारी प्रणव पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, एम. ए. आतिशखान व इतर यांच्या उपस्थितीत  कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील विकास कामांची पाहणी केली, स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे वाहतूकीसाठी करण्यात येणारे बदल व पर्यायी रस्त्याबाबत रिक्षा टॅक्सी चालक व मालकांच्या अडचणी समजून घेतल्या.

त्याअनुषंगाने पोलिस अधिकारी, सर्व पदाधिकारी, स्मार्ट सिटीचे इंजिनिअर, केडीएमसी तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी, रिक्षा टॅक्सी युनियनचे पदाधिकारी व इतर मान्यवर यांची संयुक्त बैठक आयोजित करून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेले प्रकल्प होणारी विकासकामे त्यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग, कल्याण) गिरीश बने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...