प्रदीप वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
मोखाडा पंचायत समिती चे उपसभापती यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. किनिस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तसेच महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश दाते, प्रकाश मडके, बाळकृष्ण शिंदे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी केले होते.
शिरसगाव थाळेकर वाडी येथील दोन शाळकरी मुलांचे दप्तर नदीच्या पात्रात पुरामध्ये वाहुन गेले होते त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तर भेट दिले.यावेळी शिरसगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. जांभूळमाथा येथील ग्रामस्थ दिपक वाघ यांना देखील मदत केली.
यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती मंगेश दाते, विष्णू हमरे, संजय वाघ, रमेश बोटे, विठ्ठल गोडे, सरपंच नरेंद्र येले,गीता पाटील,लता वारे, गौरी बोटे,, उपसरपंच नंदकुमार वाघ, परशुराम अगिवले, निलेश ठोमरे, गणेश खादे, पत्रकार गणेश वाघ,मनोज कडाळी, अशोक वाघ,भारत बुधर, संजय हमरे, दशरथ पाटील,देवचंद जाधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment