Thursday, 3 August 2023

शिव आरोग्य सेनातर्फे ऐरोली आणि बेलापूर विधानसभा विभाग नियुक्ती जाहीर !!

शिव आरोग्य सेनातर्फे ऐरोली आणि बेलापूर विधानसभा विभाग नियुक्ती जाहीर !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नवी मुंबई (एरोली विधानसभा) जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख विठ्ठल  मोरे, नवी मुंबई जिल्हा संघटिका रंजना ताई शिंत्रें, नवी मुंबई संपर्क संघटिका रंजना नेवाळकर, उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्षा शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र समन्वयक जितेन्द्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वाशी येथे जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे नवी मुंबई समन्वयक प्रविण वागराळकर, अलिबाग तालुका आरोग्य संघटक साक्षत म्हात्रे, एरोली विधानसभा आरोग्य संघटक अक्षय गोरे, बेलापूर विधानसभा समन्वयक श्रीकांत साळवी, समन्वय सचिव युगांतर लोखंडे, संकेत मोरे, मनोज राऊत, मंजुळा म्हात्रे, रोहित शिरसट, राजेश काळे, अनिरुद्ध नरुटे, संतोष पांचाळ, युवासेना बेलापूर चिटणीस  सनथ साळवी, आशिष गव्हाणे, विनायक धनावडे युवासेना उप विधानसभा अधिकारी हे पदाधिकारी उपस्थित होते. 

नियुक्तीमध्ये ऐरोली विधानसभा-ऐरोली विभाग समन्वय सचिव पदी आशा अनंत शिंदे, ऐरोली विभाग समन्वय सह सचिव पदी ज्योती विजय पवार, कोपरखैरणे विभाग समन्वय सह सचिव पदी अर्चना सोपान कंक, घणसोली-रबाळे विभाग समन्वय सचिव पदी नितेश गोविंद बेर्डे, बोनकोडे गाव समन्वय सचिव पदी योगेश चंदर खुटवड, कोपरखैरणे विभाग समन्वय सचिव पदी वैजयंती निलेश म्हात्रे, कोपरखैरणे विभाग सह-समनव्य सचिव पुनम रामदास पांगुळ, कोपरखैरणे विभाग समन्वय सह सचिव पदी रत्नप्रभा शिवाजी जाधव यांची तर बेलापूर विधानसभा करिता जुईनगर विभाग समन्वय सचिव पदी साईश प्रशांत तोरसकर, वाशी APMC विभाग समन्वय सचिव पदी ओंकार सुभाष कोळपकर, वाशी विभाग समन्वय सह सचिव पदी प्रणय प्रफुल्ल म्हात्रे, तुर्भे विभाग समन्वय सचिव पदी राजेंद्र मारुती गोळे, सानपाडा विभाग समन्वय सचिव पदी नलिनी महेंद्र डवले, नेरुळ विभाग समन्वय सचिव पदी मंगेश्री मंगेश पोटले, नेरुळ-जुईनगर विभाग समन्वय सचिव पदी समृद्धी संजय मोरे, नेरुळ विभाग समनव्य सचिव पदी विनिता विनायक नाईक, नेरुळ विभाग सह- समनव्य सचिव पदी स्वाती युगांतर लोखंडे यांच्या नियुक्ती पत्र देऊन नेमणूका करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी  हार्दिक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...