मोखाडा तहसीलदार मा. मयूर खेंगले यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे स्पर्धा परीक्षा केंद्र उदघाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक मा.मयूर खेंगले (तहसीलदार, मोखाडा) यांनी मोखाडा तालुक्याची पार्श्वभूमी सांगत असताना आपली शेती ही डोंगर उतारावर आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न हे तुटपुंज्या स्वरूपात मिळते. तीन वर्षात आपण पदवीधर होणार त्यामुळे आपण आताच ध्येय निश्चित केले पाहिजे. नुसते ध्येय निश्चित करून चालणार नाही तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. कारण आपण जर पहिल्या पिढीतील विद्यार्थी असणार तर आपल्याला संघर्ष हा अटळ आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर हे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, आपले महाविद्यालय हे गुणवत्तेकडे जाणारे आहे. त्यामुळे आपल्या महाविद्यालयातील सोयी सुविधांचा आपण पुरेपुर फायदा घेऊन आपण पदवीधर होऊन चांगला नागरिक ,चांगले अधिकारी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. मोबाईलचा कमीत कमी वापर करून आपण जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत हे देखील ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार मा. ठाकरे साहेब व कामडी साहेब आणि इतर महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख प्रा. डॉ. संतोष जाधव सर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. यशवंत उलवेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment