मुंबई सत्र न्यायालयाने बनावट नोटा प्रकरणी एकाला दहा तर दुसऱ्याला सात वर्षाची ठोठावली शिक्षा !!
भिवंडी, दिं,१०, अरुण पाटील (कोपर) :
मुंबईमध्ये ३ लाख ७५ हजारांच्या बनावट नोटा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने एका आरोपीला दहा वर्षांचा सश्रम कारावास तर दुसऱ्या आरोपीला सात वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबईमध्ये डिसेंबर २०१८ या काळात खंडणी विरोधी पथक पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली की, काही व्यक्ती मुंबईत बनावट नोटा वितरित करीत आहेत. हे व्यक्ती पश्चिम बंगालमधील आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि मस्जिद बंदर मुंबई येथे पश्चिम बंगाल येथील एक इसम १८ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नाझीर हुसेन शेख आणि सिद्धेश्वर पंडित कबाडे उर्फ पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण रक्कम ३ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले होते.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून जो मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये २००० हजारांच्या १७८ नोटा आणि पाचशे रुपयांच्या ३८ नोटा होत्या. याची एकूण रक्कम ३ लाख ७५ हजार रुपये इतकी होती. सरकारी वकिलांनी आरोपींच्या गंभीर गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयांमध्ये बाजू मांडली की, भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा यांच्याकडून २०१८ या काळामध्ये जप्त केल्या गेल्या. उपलब्ध तथ्य पुराव्यांच्या आधारे त्यांना कडक तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे असा युक्तिवाद मांडला.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए सुब्रमण्यम यांनी आरोपी नाझीर हुसेन शेख यास १० हजार रुपये दंड आणि १० वर्षांचा तुरुंगवास तसेच आरोपी सिद्धेश्वर पंडित कवाडे उर्फ पाटील यास ५ हजार रुपये दंड आणि ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली .
No comments:
Post a Comment