गालेगाव तेथे जिजाऊ संस्थेचे मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीर संपन्न !!
*माजी सभापती नगरसेवक दहा शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन*
मोहोने, संदीप शेंडगे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे गाळेगाव येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यालय येथे मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन माजी सभापती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित यांच्या सहकार्याने गालेगाव येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यालय येथे एक दिवसीय मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये 170 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली तसेच 163 रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली 130 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर 15 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिर यशस्वी करण्याकरिता जिजाऊ संस्थेचे अ प्रभाग क्षेत्र विभागप्रमुख संदीप शेंडगे जिजाऊ सदस्य क प्रभात क्षेत्र विभाग प्रमुख रुपेश पाटील दीपमाला साळवे, विनोद शिंदे अमीर बेग संतोष देवरुखकर यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment