Thursday, 9 November 2023

कल्याण येथे रोमहर्षक दिवाळीची सुरुवात ; आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या भगवा तलाव येथील दीपोत्सवाचे आयोजन !!

कल्याण येथे रोमहर्षक दिवाळीची सुरुवात ; आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या भगवा तलाव येथील दीपोत्सवाचे आयोजन !!

कल्याण , सचिन बुटाला : कल्याण करांसाठी यंदाच्या दिवाळीची सुरुवात अत्यंत रोमहर्षक अशी झाल्याचे दिसून आले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे भगवा तलाव परिसरात आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे. यावेळी १ हजार ५०० दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती ही या दिपोत्सवाची केंद्रबिंदू आणि विशेष आकर्षण ठरली.

कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.

या दिपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची 10×10 फुटांची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले.

महाराष्ट्रातील बहुधा हा पहिल्याच प्रकारचा प्रयत्न होता. त्यासोबत भगवा तलाव परिसरातही उपस्थित मान्यवर आणि कल्याणकर नागरिकांच्या हस्ते या तलाव परिसरात 1 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. हा दिपोत्सव डोळ्यात साठवण्यासाठी आणि याचा साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.



No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...