Thursday, 9 November 2023

म्हारळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुगृह अनुदान वाटपाचा कार्यक्रम सपन्न !!

म्हारळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुगृह अनुदान वाटपाचा कार्यक्रम सपन्न !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे वरीष्ठ, कनिष्ठ लिपिकासह विविध विभागात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्तानं सानुगृह अनुदानाचे वाटप सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे, उपसरपंच योगेश देशमुख  आणि ग्रामसेवक नितीन साहेबराव चव्हाण यांच्या हस्ते व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यामुळे या वर्षी या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड झाली आहे.

कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व अधिक उत्पन्न असणारी ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायत ओळखली जाते, उल्हासनगर शहराला लागुन व कल्याण मुरबाड महामार्गावर वसलेल्या या ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे, १ ते दिड लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीला सोईसुविधा पुरविताना पुरती दमछाक होते. एकूण ६५ कर्मचारी असलेल्या या  ग्रामपंचायतीला कचऱ्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे, असे असूनही कर्मचारी आप आपल्या इमानेइतबारे काम करत असतात. साफसफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, प्लंबर, वाँल आँफरेटर, विद्युत कर्मचारी, वसुली कर्मचारी, या सर्वाची दिपावली गोड होण्यासाठी सरपंच निलिमा म्हात्रे, उपसरपंच योगेश देशमुख, सदस्य अमृता देशमुख, बेबीताई सांगळे,प्रमोद देशमुख, विकास पवार, मंगला इंगळे, नंदा म्हात्रे, मोनिका गायकवाड, अनिता देशमुख, किशोर वाढेकर, वेदिका गंभीरराव, लक्ष्मण कोंगिरे, दिपक अहिरे, अश्विनी देशमुख, प्रगती कोंगिरे आदी सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला व कर्मचाऱ्यांना स्नेह भेट व सानुगृह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

आज या स्नेह भेट व सानुगृह  अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन म्हारळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी सरपंच निलिमा म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मला माझ्या कर्मचाऱ्यांची दिपावली गोड झाल्याने आनंद झाला असून ही संविधानातील तरतूद असून आम्ही कर्मचा-यावर मेहरबानी केली नाही असे ही त्यांनी सांगितले. तर उपसरपंच योगेश देशमुख यांनी आता तूमची दिवाळी गोड झाली आहे तशीच ग्रामस्थांकडे लक्ष द्यावे करदात्यांची गैरसोय होणार नाही असे पहावे अशा सूचना केल्या, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कर्मचारी हे ग्रामपंचायतीचा कणा आहे, कर्मचाऱ्यांवरच ग्रामपंचायत अवलंबून असते, म्हारळ गावाचे शहरीकरण झाल्याने अडचणी येतात. परंतु पदाधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वय असल्याने त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो. असे सांगून घरपट्टी, पाणी पट्टी ची शंभर टक्के वसुली झाल्यास पुढील वर्षी अजून जोमाने दिपावली गोड करु असे सांगितले. हे सानुगृह अनुदान म्हणजे तुमच्या कामाचा सन्मान आहे असे ही श्री चव्हाण यांनी बोलून कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

यावेळी सरपंच निलीमा म्हात्रे, उपसरपंच योगेश देशमुख, सर्व सदस्य ग्रामसेवक नितीन साहेबराव चव्हाण यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना स्नेह भेट आणि सानुगृह अनुदान वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...