Thursday, 9 November 2023

ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांना दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार प्रदान !!

ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांना दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार प्रदान !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान मुंबईचा सन २०२३ चा प्रज्ञावंत दिलीप पायगुडे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर यांना मा.ना. मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री तथा पालक मंत्री मुंबई , महाराष्ट्र शासन यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा मुंबईत भायखळा-राणीबाग येथील आण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडला. या वेळी उद्योजक किरण शेठ झोडगे यांना गुणवंत नागरिक पुरस्कार, श्री .जितेंद्र पराते यांना बाळू वाळके कार्यकर्ता पुरस्कार तर कु. सोहम साळगावकर याला राष्ट्रीय बालश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कामगार आयुक्त रविराज इवळे , विविध मान्यवर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
       श्री.लोटणकर यांची कथा, कविता, ललित गद्य, बाल वाङमय, ब्रेल लिपी इ. स्वरूपाची २० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अलिकडेच त्यांना कोकण साहित्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...