Wednesday, 8 November 2023

कल्याण पश्चिमेच्या पारनाका येथील गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !

कल्याण पश्चिमेच्या पारनाका येथील गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !

कल्याण , सचिन बुटाला : कल्याण पश्चिमेतील सुप्रसिद्ध पारनाक्याच्या पारावर असलेल्या श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आमदार विश्वनाथ भोईर  यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारनाका येथील पिंपळखरे यांचे हे श्री गणेश मंदिर असून या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमदार निधीतून निधी उपलब्ध करुन दिला.

अश्विन कृष्ण नवमीच्या मुहूर्तावर या श्रीगणेश मंदिराचा सोहळा संपन्न झाला. यावेळी टिळक चौक ते पारनाका अशी श्रीगणेशाची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर श्रीगणेश मूर्तीला अभिषेक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. पारनाका येथील पिंपळखरे यांच्या या श्रीगणेश मंदिराचे केवळ स्थानिकांमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान आहे. त्यामुळे त्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले.

ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच हा परिसर सुशोभिकरण करणे याशिवाय विविध कामे होणे बाकी आहेत व लवकरच ती मार्गी लागतील, अशी शाश्वती यावेळी आमदारांनी उपस्थितांना दिली. यावेळी दिनेश शेटे, माधव काका, रवी पवार, दाजी हरदास, सारंग केळकर, हे देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...