Wednesday, 8 November 2023

मानपाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, उत्तरप्रदेश येथुन आरोपीला घेतले ताब्यात !!

मानपाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, उत्तरप्रदेश येथुन आरोपीला घेतले ताब्यात !!


डोंबिवली , नारायण सुरोशी : मुंबईतून अनेक घरफोड्या करून उत्तर प्रदेशमध्ये पळून गेलेल्या एका सराईत घरफोड्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी आझमगडमध्ये जाऊन वीटभट्टी कामगारांचा वेश परिधान केला आणि गुन्हेगार समोर येताच त्याला अटक केली. राजेश अरविंद राजभर असे या सराईत गुन्हेगाराचं नाव असून त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 22 गुन्ह्यांची नोंद आहे.


सदर आरोपीच्या शोधासाठी एक पोलीस पथक तयार करून आजमगड, उत्तरप्रदेशमध्ये पाठवण्यात आलं होतं. सदर पथकाने आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गाची माहिती काढून त्या मार्गावर असलेल्या विटभट्टी कारखान्यावर थांबून कामगारांप्रमाणे पेहराव करून सापळा लावला.

सदर पोलीस पथकाने आरोपीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यास उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले.त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्या त्याच्याकडून पोलिसांनी 21 लाख 26 हजार रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. या आरोपीवर 22 गुन्हे दाखल असून मनापाडा पोलिस ठाणे, महात्मा फुले, पनवेल, अर्नाळा सागरी, अंबरनाथ, कोळसेवाडी, बदलापूर, शिवाजीनगर, डोंबिवली, डायघर या ठिकाणी हे सर्व गुन्हे दाखल आहेत.



No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...