कल्याण पंचायत समिती मध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी !
कल्याण (संजय कांबळे) : इंग्रजाना सळो की पळो करून सोडणारा आणि जुलमी सावकारशाही विरोधात बंड पुकारणारा आद्यक्रांतीकारक राघोजी रामजी भांगरे यांची जयंती आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहाने पार पडली.
८ नोव्हेंबर १८०५ च्या आसपास अकोले तालुक्यातील देवगाव या गावात राघोजी रामजी भांगरे यांचा जन्म झाला, जन्मापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी अकोले नगर जिल्ह्यातील इंग्रज व त्यांच्या आशिर्वादाने जुलूम करणा-या सावकारशाही विरोधक आक्रमक बंड सुरू केले, नगर, पुणे ठाणे आदी जिल्ह्यात त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, कित्येक वर्षे त्यांचा हा लढा सुरू होता, त्यामुळे काहीही करून राघोजी भांगरे यांचा बंदोबस्त करावा असे इंग्रज अधिकां-याना आदेश देण्यात आले होते, अखेर पंढरपूर येथे राघोजीला पकडण्यात इंग्रजी सत्तेला यश आले, पुढे त्यांना ठाणे कारागृहात २ मे १८४८ मध्ये फाशी देण्यात आली, व शहापूर तालुक्यातील उभंरई या गावात त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तेव्हापासून त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या हस्ते आद्यक्रांतीकारक रोघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुले वाहून प्रतिमेचे दर्शन घेतले.
यावेळी विस्तार विक्रम चव्हाण, कुंडलिक हरड, अनिस तडवी, संजना मुकणे, पत्रकार संजय कांबळे, ग्रामविकास अधिकारी, व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment