Friday, 10 November 2023

"दुष्काळ सदृश्य की दुष्काळ शब्दच्छल नको" - जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे संकट मोचक म्हणून भूमिका निभवावी..कॉ. अमृत महाजन

"दुष्काळ सदृश्य की दुष्काळ शब्दच्छल नको" - जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे संकट मोचक म्हणून भूमिका निभवावी..कॉ. अमृत महाजन 

चोपडा, प्रतिनिधी... महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील एकूण 179 तालुक्यातील 959 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. *दुष्काळ सदृश* या शब्दातच खरी गोम आहे दुष्काळ सदृश शब्द म्हटला की, दुष्काळी भागासाठी सरकारला रोजगार हमीचे काम काढणे, शेतकऱ्याला मदत देणे, विहिरींचे खोलीकरण तलावांचे खोलीकरण, कर्ज हप्ते वसुली तहकुबी, कर्ज पुनर्गठन जलसंधारण आणि इतर काम करावी लागतात म्हणून गेल्या साठ वर्षांमध्ये केंद्र सरकारने दुष्काळ म्हणून शेतकऱ्यांचे कामगारांच्या प्रती असलेली जबाबदारी झटकण्यासाठीच दुष्काळ सदृश म्हटले जाते व म्हणून दुष्काळी जनतेसाठी करावयाची उपायोजनेपासून सुटका करून घेतली आहे. ती झटकण्यासाठीच मोदी सरकारलाही सुद्धा आनंद वाटतो. म्हणून भाजप प्रणित ना शिंदे सरकारने दुष्काळ ऐवजी *दुष्काळसदृश* हा शब्द आपली जबाबदारी झटकण्या साठी.शब्द वापरला आहे. असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अमृत महाजन यांनी जाहीर केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. म्हणून दुष्काळ साठी महसुलीमंडल हा पाया धरून त्या ठिकाणी दुष्काळी जनतेला अन्नसुरक्षा रोजगार, कर्जमाफी , सारा माफी .कर्ज हप्ता वसुली स्थगिती, ही सर्व काम करायला पाहिजे.

जळगाव जिल्ह्यात तर रावेर तालुका वगळता सर्व तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त महसूल मंडळात 75 टक्के पेक्षा कमी किंवा साडेसातशे मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. चोपडा येथे तर रत्नावती नदिला एकही पूर आलेला नाही. हतनुर, गुली गिरणा धरण शेजारच्या राज्यात/ जिल्ह्यात/ पर्वत रांगात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे बऱ्यापैकी भरली आहेत. तरीपण उन्हाळ्यात पाणीटंचाई बसू शकते. उदाहरणार्थ.. चोपडे तालुक्यात आठ पैकी सहा परिमंडले दुष्काळी आहेत याचाच अर्थ असा की, संपूर्ण चोपडा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे त्यातच अमळनेर तालुका हा परंपरागत पंचावन्न तालुक्यात सदैव दुष्काळ असणारा तालुका आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण 67 महसुली सर्व दुष्काळ सदृश नसून दुष्काळी च आहेत तेव्हा जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा. पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील राज्यमंत्री ना अनिल पाटील व भाजपाचे संकट मोचन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कामगारांवर दुष्काळी परिस्थिती मुळे निर्माण झालेले शेतकरी शेतमजुर यांचेवरील  अस्मानी संकट निवारणासाठी संकटमोचक म्हणून कार्य करावे अशीही मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अमृत महाजन यांनी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...