डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !!
डोंबिवली, सचिन बुटाला : शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील शिवसेना (ठाकरे गट) गटाच्या अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
रोज उठून शिव्या, शाप देणे, टीका करणे हे जे राजकारण सुरू आहे, त्याला कंटाळून लोकांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. विकासाचे राजकारण पाहून विविध पक्षांतले कार्यकर्ते, तरुण-तरुणी शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सांगत शिंदेंनी ठाकरे, राऊतांना टोला लगावला.
"शिवसेनेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं आहे. लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, रोज उठून एकमेकांना शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं, लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला आहे, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेशी जोडत राहतील," असे टीका शिंदे यांनी केले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment