नालासोपारा येथे मोफत आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड व इ श्रम कार्ड शिबीरात 200 नागरीकांनी घेतला लाभ....
वसई , प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना, शिवसक्ती मित्र मंडळ यांच्या वतिने मोफत आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड शिबीराचे समेळपाडा येथे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सर्व नागरीकांना आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड आवश्यक आहे.
आयुष्यमान भारत कार्ड चा माध्यमातून नागरीकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहे आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठवली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठवली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आभा कार्ड’ हे ‘डिजिटल कार्ड’ असून त्यावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्याने संबंधित व्यक्तीची सर्व वैद्यकीय माहिती त्वरित उपलब्ध होते. भविष्यात आपल्या फॅमिली डॉक्टर, पॅथॉलॉजि व रुग्णालयात कुठेही आपण गेलात, तर ‘आभा कार्ड’ अनिवार्य मागितले जाईल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झालेला हा प्रकल्प अतिशय उपयुक्त आणि संयुक्तिक आहे,”
या शिबीरात एकुण 200 नागरीकांनी सहभाग घेऊन आपले मोफत कार्ड बनवले. सामाजिक कार्यकर्ते व दत्त मंदिराचे ट्रस्टी यांनी रूचिता नाईक यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, मंदिराचे ट्रस्टी हेमंत कर्णिक शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment