Tuesday, 19 December 2023

महापालिकेचा सोपारा हॉस्पिटलला हायफ्लो ऑक्सीजन मशीन भेट....

महापालिकेचा सोपारा हॉस्पिटलला हायफ्लो ऑक्सीजन मशीन भेट....

वसई , प्रतिनिधी : जिजाऊ संस्था व शिवसेना पदाधिकारी  यांच्या सहकार्याने व कातकर कुटूबांच्या  यांच्या विशेष प्रयत्नातून वसई विरार महानगरपालिकेच्या सोपारा हॉस्पिटल साठी हायफ्लो ऑक्सीजन मशीन भेट देण्यात आली आहे.

या मशीन व्दारे अत्यवस्थ रुग्णाला नेहमीच्या ऑक्सिजन पेक्षा जलद वेगाने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उपयोग होतो. ही बहुमूल्य अशी मशीनची भेट हॉस्पिटलला मिळाली त्यामुळे हॉस्पिटलच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. 

शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी एक्स रे मशिनची ची मागणी आयुक्तांकडे केली होती ती मागणी पुर्ण झाली असुन सोपारा हॉस्पिटल मध्ये एक्स रे मशिन बसवण्यात आली आहे येत्या महिनाभरात एक्स रे मशिन सुरू करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल चे व्यवस्थापक डॉ गौरव वाघ यांनी सांगितले.

हॉस्पिटल मध्ये कॅन्टीन ची व्यवस्था करून ती महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू केली तर महिलांच्या हाताला काम मिळेल तसेच स्तनदा मातांना दुध जास्त येते अशावेळेस त्यांचे दुध कुठे हि वाया न घालवता दुध बँकेत स्टोरेज केल्यास नवजात बाळांसाठी उपयुक्त ठरेल दुध बँक सुरू करण्थाची  मागणी रूचिता नाईक यांनी केली.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख दानिश करारी, जिजाऊ संस्थेचे  अमित नाईक, प्रशांत सपताल व कातकर कुटूंब उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...