ग्रा.प.सदस्यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
तालुक्यातील शिवसेना (शिंदे गटाच्या) बूथ प्रमुख व शिवदूत यांचा संयुक्त मेळावा जव्हार तालुकाप्रमुख विनायक राऊत यांच्या नेतृत्वात व पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत पार पडला.या मेळाव्यात तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश करून भगवा आपल्या हाती घेतला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना निकम यांनी नव्याने नेमणुका झालेल्या बुथ प्रमुख व शिवदूत यांना आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्याचे ही आश्वासनही त्यांनी या तालुकास्तरीय मेळाव्यात बोलतांना केले. या वेळी शिवसेना युवासेना तालुका प्रमुख राजु भोये, उपतालुका प्रमुख गणपत भोये, तालुक्यातील सरपंच, सदस्य, बूथ व शिवदूत तसेच शेकडो शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थित लावली होती.
No comments:
Post a Comment