Tuesday, 19 December 2023

चेंबूर येथील अझीझ बाग, आझाद नगर येथील महानगरपालिकेच्या शाळेजवळ असलेले गार्डन सद्यस्थितीत बनले आहे दारूचा आणि गर्दूल्यांचा अड्डा !!

चेंबूर येथील अझीझ बाग, आझाद नगर येथील महानगरपालिकेच्या शाळेजवळ असलेले गार्डन सद्यस्थितीत बनले आहे दारूचा आणि गर्दूल्यांचा अड्डा !!

चेंबूर, (शांताराम गुडेकर) :
            चेंबूर येथील अझीझ बाग, आझाद नगर येथे महानगरपालिकेची शाळा आहे. या शाळेचा बाजूला मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. मात्र खेळण्यासाठी असलेले हे गार्डन सद्यस्थितीत बनले आहे दारुचा आणि गर्दूल्यांचा अड्डा बनले आहे. येथे रोज सकाळी जेष्ठ नागरिक सकाळीच व्यायाम करण्यासाठी येतात. शिवाय येथे शाळेची मुलेही खेळण्यासाठी येत असतात. पण दारुडे दारू पिऊन तिथे बाटल्या फोडुन टाकतात, त्यामुळे मुलांना आणि जेष्ठ नागरीकाना चालण्यासाठी मोठी अडचण होत आहे. गार्डनमध्ये तर नाही वॉचमन दिसत किंवा नाही सफाई कामगार दिसत. त्यामुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य दिसत असून सुरक्षाही वाऱ्यावर आहे. काही जागृत नागरिकांनी जवळ असलेल्या आर.सी.एफ पोलीस स्टेशनला  तक्रार केली तरी सुद्धा परिस्थिती आहे तशीच आहे. तरी संबंधित पालिका अधिकारी, नगरसेवक, आमदार यांनी या समस्याकडे गांभीर्याने पहावे. आवश्यकता असलेल्या सर्वं सुविधा उपलब्ध कराव्यात असे मत तेथील जेष्ठ नागरिक अमोल कदम यांनी बोलताना व्यक्त केले. आर.सी.एफ पोलीस यांनी याकडे लक्ष देऊन दारुडे, गर्दूले यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जेष्ठ नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...