Sunday, 17 December 2023

रात्र शाळेतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्टुडन्ट पोर्टलवर २००० पूर्वी जन्मलेल्या विद्यार्थ्यांची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध !!!

मुंबई प्रतिनिधी ता. 16, सर्वांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक यांचा जिव्हाळ्याचा विषय शाळेची संचमान्यता व संचमान्यतेसाठी असलेल्या स्टुडन्ट पोर्टलवर २००० पूर्वी जन्मलेल्या विद्यार्थ्यांची नोंद करण्याची सुविधा बंद करण्यात आलेली होती. स्टुडन्ट प्रोटलला नवीन विद्यार्थ्यांची नोंद करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर असताना 2000 पूर्वीची जन्मतारीख असलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी स्टुडन्ट प्रोटलला होत नसल्याने विद्यार्थी  शिक्षणापासून वंचित राहतात की काय अशी चिंता मुख्याध्यापकांना वाटत होती.
2000 पूर्वी जन्मलेल्या विद्यार्थ्यांच्या अटीतून रात्र शाळेला वगळण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने सर्वश्री सुनील सुसरे सर, अविनाश ताकवले सर, नंदकुमार सातपुते सर, सुनील पाटील सर दत्तात्रेय सोनवणे सर, गजेंद्र गाडगीळ सर, देवका लबडे सर, शंकर सानप सर व इतर मुख्याध्यापक यांनी पाठपुरावा केल्याने व यामध्ये मासूम संस्थेच्या श्रीमती निकिता केतकर यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात आले. 
स्टुडन्ट पोर्टलवर फक्त रात्र शाळांसाठी २००० पूर्वीचे विद्यार्थी नोंद करण्याची सुविधा सुरू झालेली आहे. ही सुविधा फक्त रात्र शाळेसाठीच आहे. सर्व रात्र शाळांमधील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील २००० पूर्वी जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचे अपडेशन करून घ्यावे. अशी विनंती सुनील सुसरे सर यांनी रात्र शाळेतील मुख्याध्यापकांना केली आहे.
ही सुविधा उपलब्ध करून देणारे श्री. राजेश शिंदे साहेब अधीक्षक, आयुक्त कार्यालय यांचे आभार व धन्यवाद मान्यता आले.
तसेच माननीय आयुक्त श्री सुरज मांढरे साहेब, माननीय शिक्षण संचालक श्री संपतराव सूर्यवंशी साहेब यांचे संघटनेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
रात्र शाळांच्या विकासासाठी व रात्र शाळा कर्मचाऱ्यांचे 
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणारे सन्मा. सुसरे सर यांचे रात्र शाळांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...