Friday, 15 March 2024

तनिष्का वेल्हाळची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी !!

तनिष्का वेल्हाळची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             मुंबईतील सिद्धकला तायक्वांदो अकादमीतील यूएसए येथील ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड शहरामधील, कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केलेल्या यूएस वर्ल्ड तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पूमसे आणि कुरोगी स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूलची तनिष्का जयेश वेल्हाळ हिने भारतीय संघाचं नेतृत्व केले. ह्या स्पर्धेत तनिष्का वेल्हाळने पुमसे, क्युरोगी आणि ग्योप- का या तिन्ही प्रकारात चमकदार कामगिरी केली. पुमसे या प्रकारात तिला सुवर्ण पदक, क्यूरोगी या प्रकारात रौप्य तर फ्लाईंग किक बोर्ड ब्रेकिंग या प्रकारात कांस्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जयेश वेल्हाळ, विक्रांत देसाई आणि यश दळवी यांच्याकडून तनिष्काला तायक्वादो खेळासाठी प्रशिक्षण मिळत आहे. ८ मार्च २०२४ ते ९ मार्च २०२४ दोन दिवस युएस वर्ल्ड तायक्वादो आंतरराष्ट्रीय पूमसे आणि क्युरोगी स्पर्धा पार पडली जगभरातून या  स्पर्धेत १२०० ते १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...