Thursday, 14 March 2024

कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मतदारसंघात आमदार निधी व विशेष निधी यातून अनेक विकासकामे !!

कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मतदारसंघात आमदार निधी व विशेष निधी यातून अनेक विकासकामे !!

**** कार्यतत्पर मा. नगरसेवक, विधानसभा संघटक (शिवसेना) मयूर पाटील विकासात अग्रेसर 

कल्याण, प्रतिनिधी : आपल्या कल्याण पश्चिम मतदारसंघात विशेष निधी व आमदार निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल १९ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

गतीमान सरकार चे नेतृत्व करणारे राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतूनच मा. नगरसेवक मयूर पाटील यांनी अनेक विकासकामे आपल्या प्रभागात मार्गी लावून त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.

त्यांच्या प्रभागात रस्ता कॉंक्रिटीकरण, अंतर्गत गटारे (बंदिस्त), पदपथ, शेड बांधणे, पोहोच रस्ता, शाळा दुरुस्ती, पथदिवे, लादीकरण, पाणी योजना अशी अनेक कामांचे भूमिपूजन या तीन दिवसांत करण्यात आले असेच मोहली गावात गुरवारी पथदिवे - निधी २५ लाख, रस्ता दुरुस्ती - २५ लाख तर अंतर्गत गटारे - २५ लाख यांचे भूमिपूजन मा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलताना मयूर पाटील म्हणाले की माझ्या प्रभागातील प्रत्येक समस्येचे निराकरण करणे यासाठी मी प्रयत्नशील असतो यात मला आमदारांनी निधी उपलब्ध करून दिला यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो

या भूमिपूजन समारंभाप्रसंगी विधानसभा संघटक मयूर पाटील, मा. नगरसेवक जयवंत भोईर, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, युवासेना शहर अधिकारी दिनेश निकम, तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...