Wednesday, 13 November 2024

आदित्य ठाकरे यांची घाटकोपर पश्चिम मध्ये जाहिर सभा !!

आदित्य ठाकरे यांची घाटकोपर पश्चिम मध्ये जाहिर सभा !!

घाटकोपर, (केतन भोज) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. याचाच भाग म्हणून घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय भालेराव यांच्या निवडणुक प्राचारार्थ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर घाटकोपर पश्चिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या जाहीर सभेला सर्व शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना घाटकोपर पश्चिम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...