बेस्ट कर्मचारी वर्गाला २९००० रु दिवाळी बोनस देण्यास बेस्ट महाव्यवस्थापकांची मान्यता !!
** राष्ट्रीय कर्मचारी सेनाचे मा.आ.श्री. किरण पावसकर यांच्या प्रयत्नाला यश
मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आणि मा.आ.श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०४/११/२०२४ रोजी बेस्ट भवन कुलाबा येथे बैठक पार पडली. या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक मा. श्री.अनिल डिग्गीकर यांच्यासोबत दिवाळी बोनस संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेत बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस २९०००/- हजार रुपये देण्यास मान्यता दिली. तसेच कोविड भत्ता या संदर्भातही चर्चा झाली कोविड भत्ता वन टाइम मध्ये न देता (Installments) स्वरूपात देण्यास मान्य केले आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्यामुळे बेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांची आज दिवाळी खरंच गोड झाली आहे. या बैठकीला राष्ट्रीय कर्मचारी सेना बेस्ट युनिट सरचिटणीस श्री. किरण साळुंखे, उपाध्यक्ष श्री. किसन वाळुंज कमिटी मेंबर्स आणि कर्मचारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment