कुर्ला बस अपघात प्रकरण ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे घटनास्थळी जाऊन मदत कार्य !
मुंबई, (केतन भोज) : मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बेस्ट बसने नागरिकांना चिरडल्याची दुर्देवी घटना घडली. या भीषण अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.अपघातानंतर तात्काळ तिघांचा मृत्यू झाला होता, तर उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी या घटनेची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी नागरिकांसाठी मदत कार्य सुरू केले, जखमींवर भाभा रुग्णालय, कुर्ला (प), हबीब रुग्णालय, कुर्ला (प), कोहिनूर रुग्णालय, कुर्ला (प) आणि सायन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. यावेळी रुग्णसेवक मंगेश चिवटे यांनी भाभा हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली व त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. सदर दुर्घटनेनंतर प्रसंगावधान दाखवून आमदार कुडाळकर आणि समस्त शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. तसेच या घटनेमध्ये जे कोणीही व्यक्ती जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या सर्व उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेणार असल्याची माहिती रुग्णसेवक मंगेश चिवटे यांनी दिली. सदर घटनेची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment