Tuesday, 10 December 2024

त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड ; प्रचंड गर्दीमुळे दुरावला देव !

त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड ; प्रचंड गर्दीमुळे दुरावला देव !
त्र्यंबकेश्वर, (केतन भोज) : नाशिक जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या तसेच महाराष्ट्राच्या बाहेरूनही लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन करण्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचे नियोजनाअभावी हाल होत आहे. दर्शनासाठी भलीमोठी रांग लागत आहे. दर्शनरांगेत उभे राहून दर्शनासाठी तीन ते चार तासांची प्रतीक्षा भाविकांना करावी लागत आहे, पेड दर्शनासाठी दोनशे रुपये शुल्क देऊनही तीन तासांची लटकंती करावी लागते, यामुळे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक बाहेरूनच हात जोडून किंवा कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे भाविकांना देव दुरावल्याचे चित्र सद्या तरी दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी शनिवार, रविवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळत आहे. दर्शनबारीत चार ते पाच तास थांबावे लागत असल्याने भाविकांचे खूप हाल होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस प्रचंड वाढत्या गर्दीमुळे घुसमटणे, दम लागणे, चक्कर येणे असे प्रकार घडत आहेत, यात विशेषतः गर्भवती महिला, आजारी व्यक्ती तसेच लहान मुले यांना वाढत्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे मात्र, वाढत्या गर्दीमुळे भाविकांसाठी अद्यापपर्यंत मंदिर ट्रस्ट प्रशासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत त्र्यंबकेश्र्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना या सर्व प्रकरणाबाबत संपर्क साधून माहिती दिली असता, त्यांनी आपण यामध्ये आता स्वतः लक्ष देणार असल्याचे यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...