कल्याण तालुका पोलीस ठाण्यात "ॲट्रॉसिटी" कायद्यांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल !!
टिटवाळा, प्रतिनिधी : उंभर्णी गावातील अनुसूचित जातीचे रहिवासी *एकनाथ पवार* यांनी मानिवली येथील त्यांच्या जमीन विक्रीचा व्यवहार रद्द केल्याचा राग मनात धरून गावातील गावगुंडांनी रस्ता आडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता त्यांना मारझोड करण्यात आली.मोटारसायकलची चावी काढून घेवुन कमरेला रिव्हॉल्वर लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची माहिती अजंठा फाऊंडेशन चे अजय सावंत यांच्या कडुन मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा श्रमिक मु पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष,अण्णा पंडीत, यांनी अजय सावंत, बीआरएसपी चे राज्य सचिव सतिश बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते सुशिल आरके, यांचे सह स्थानिक कार्यकर्त्यांसोबत जावुन पिडीताची भेट घेतली. त्यांचेवर झालेल्या अन्यायाची माहिती घेतल्यानंतर अण्णा पंडीत यांच्या कायदेशीर मार्गदर्शन व मदतीने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांवर रात्रौ उशिरा ॲट्रॉसिटी व इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
No comments:
Post a Comment