मध्य रेल्वेची सुरक्षा आणि वेळबद्धता सुनिश्चित करा - खासदार संजय दिना पाटील
मुंबई, (केतन भोज) : गेल्या वर्षभरापासून मुंबई लोकल ट्रेन उशिराने धावत आहे.रेल्वे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत.त्यामुळे सरकारी कर्मचारी, विद्यार्थी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी याबाबत उत्तर पूर्व मुंबई लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदीय लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मध्य रेल्वेची सुरक्षा आणि वेळबद्धता संदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि मध्य रेल्वेच्या विलंबाच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी केली आणि यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तरी मध्य रेल्वेची सुरक्षा, वक्तशीरपणा सुनिश्चित करावी आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
No comments:
Post a Comment