ज्येष्ठ साहित्यिक कोकण सुपुत्र कवी अशोक लोटणकर यांना आशीर्वाद पुरस्काराने सन्मानित !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
ज्येष्ठ साहित्यिक कोकण सुपुत्र अशोक लोटणकर यांना नुकताच उत्कृष्ट वाङमय निर्मिती साठीचा रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार प्रदान करण्यात आला. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित साहित्य महोत्सव कार्यक्रमात हा पुरस्कार श्री लोटणकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॕ. रवींद्र शोभणे आणि प्रा.डाॕ. बीरेंद्र प्रतापसिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॕ. भालचंद्र मुणगेकर, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक डाॕ. राजीव श्रीखंडे, प्रा. रमेश कोटस्थाने, डाॕ. सुनील सावंत इ. मान्यवर उपस्थित होते.
श्री.लोटणकर यांची एकूण २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या साहित्य कृतींना अत्यंत मानाचे असे ३० हून अधिक साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पूर्वी त्यांना "कोकण साहित्य रत्न"या पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. शिवाय एकता कल्चरल अकादमी, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान, कै. नानासाहेब शेट्ये सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यांनी ७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले असून ते बी.ई.एस.टी. मधून डेपो मॕनेजर या पदावरून निवृत्त झालेले आहेत. श्री .लोटणकर हे अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावचे सुपुत्र लोटणकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक,ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment