शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या मागणीला यश....
**सोपारा सामान्य रूग्णालयात नविन एक्स रे मशिन सुरु
नालासोपारा, प्रतिनिधी ता,३ :- नालासोपारा (प) मधिल वसई विरार महापालिकेचे एकमेव सोपारा सामान्य रूग्णालय आहे.
गेल्या दोन वर्षापासुन सोपारा सामान्य रूग्णालयात एक्स रे मशिनची सुविधा नसल्याने रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. ज्या रूग्णांना तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते अशाना नाईलाजाने खाजगी रूग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत होते. यामुळे रूग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने रुग्णालयातील रूग्णांना उदभवणारया समस्यांवर उपाययोजना करून रूग्णालयात एक्स रे मशिन सुरू करण्याबाबत शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या कडे मागणी लावुन धरत रूग्णालयात नविन एक्स रे मशिन बसवुन घेतली.
सोपारा सामान्य रुग्णालयात शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक व उपशहरप्रमुख महेश निकम, शिवसेना पदाधिकारी यांनी भेट देऊन आरोग्य सेवा-सुविधा नियमितपणे सुरु ठेवाव्यात व डॉक्टरांनीही आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून रुग्णांना मनापासून औषधोपचार सेवा-सुविधा पुरवाव्यात, व जनतेनेही मोफत उपचार सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केले.
No comments:
Post a Comment