Wednesday, 4 December 2024

रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई तर्फे श्रीराम वैद्य यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका- २०२५ चे अतिशय उत्साहात प्रकाशन !!

रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई तर्फे श्रीराम वैद्य यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका- २०२५ चे अतिशय उत्साहात प्रकाशन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई तर्फे श्रीराम वैद्य यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका- २०२५ चे प्रकाशन नुकतेच अतिशय उत्साहात पार पडले. मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री जिव्हेश्वर व माता अंकिनी माता दशांकिनी पुष्पमाला वाढवून दीपप्रज्वलन करण्यात आले.तद्नंतर दिवंगत समाज बांधवांना ( ज्ञात- अज्ञात ) व्यक्तीना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले. मा.श्री. श्रीराम विष्णू वैद्य (रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते व विशेष अतिथी मा.श्री. चंद्रकांत आत्माराम हावरे ( रायगड जिल्हा मुख्यसल्लागार ) यांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा पार पडला. सर्वश्री अध्यक्ष,श्रीराम वैद्य, चंद्रकांत हावरे, मंगेश हावरे, विजय वाऊळ, सौं.संजना अत्रे यांनी विशेष मनोगत व्यक्त केले. सदर विषयात दिनदर्षिका बनवतेवेळी जे काय अडचणी येतात त्याविषयीं थोडक्यात माहिती देण्यात आली. या वर्षापासून प्रत्येक महिना पेज वर वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुण्यस्मरण, लग्न वाढदिवस शुभेच्छा आदी जाहिरात त्या-त्या तारखेला देण्यासाठी यावर्षी पासून एक एक व्यक्तीने जबाबदारी घेतली आहे. याची नोंद जरूर सर्वांनी घ्यावी. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबियांकडून पुढील वर्षी एक तरी वाढदिवस शुभेच्छा दयावी असे आवाहन करण्यात आले. कमीत- कमी २०० जाहिरात मिळाव्यात अशी संकल्पना ठेवण्यात आलीआहे. त्याच प्रमाणे प्रत्येक विभागीयी सदस्यांनी या वर्षीची दिनदर्शिका लवकरात लवकर प्रत्येक (रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई ) कुटुंबियांना देण्यात यावे. ज्यांना कोणाला दिनदर्शिका मिळाली नाही.ज्यांना पाहिजे असल्यास श्री.सुरेश तिगडे यांना  +91 98926 70901 या नंबरवर संपर्क करून सहकार्य करावे.

         रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष श्री.अजित साळी यांनी सर्व जाहिरातदार यांचे आभार मानले. या वर्षी बऱ्यापैकी जाहिरात, देणगी प्रकाशन पूर्वी समाज बांधवांनी देणगी देऊन सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करत यापुढेही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या. विशेष अतिथी मा.श्री. चंद्रकांतजी हावरे यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की,आपली पहिली दिनदर्शिका सन २०१३ प्रकाशित झाली. तेव्हापासून आजपर्यंत रंगीबेरंगी पेजची दिनदर्शिका आपल्या सर्वांच्या सहकार्यने प्रकाशन होत आहे.याचा  खूप अभिमान वाटतो. त्याच प्रमाणे जाहिरातदारांचे तर गोड शब्दात कौतुक करण्यात आले. आज दिनदर्षिका आपण चालू केली तेव्हा पासून आपल्या रायगड जिल्हा समाज व्यतिरिक्त कोणाची जाहिरात आपण घेतली नाही आणि घेतही नाही याबद्दल कार्यकारणीचे विशेष आभार मानले. त्याच प्रमाणे दिनदर्शिकामध्ये वर्षानुवर्षे आमच्या महिला भगिनींनचे कार्यक्रम क्षणचित्र पाहूनच दमदार असा कार्यक्रम असल्याचे वाखाण्यात आले.
       श्री.राम वैद्य  यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, दिनदर्शिका ही  प्रति वर्षी व्हावी.यासाठी माझी संकल्पना होती. तिची दखल संस्थेने घेतली आणि या वर्षी माझ्याच हस्ते प्रकाशन  करण्यात आले. याचा मला खूप अभिमान वाटतो. अशीच वर्षनू वर्ष हि संकल्पना माझी राहावी ही श्री वरदविनायक व भगवान श्री जिव्हेश्वर चरणी प्रार्थना करतो व सर्वांचे आभार मानतो. त्याच प्रमाणे श्री.अविनाश साळी, संदेश वैद्य, राजेंद्र तांबडे यांनी दिनदर्षिका बद्दल खूप कौतुक करून अजितदादा साळी, महादेव साळी व त्याचे सर्व सहकारी, कर्मचारी या सर्वांचे आभार मानले. प्रसिद्धी प्रमुख श्री.विजय वाऊळ यांनीही आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पडली त्याबद्दल त्यांचेही यानिमित्ताने आभार व्यक्त करत कार्यक्रमची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित ! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :         आधुनिक...