नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे अंतर्गत बॅच क्र. १०/२०२५ चा सांगता समारोह उत्साहात संपन्न !!!
अंबरनाथ प्रतिनिधी : ता. 23, नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे अंतर्गत बॅच क्र. १०/२०२५ चा सांगता समारोह उत्साहात पार पडला. उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार दि. १६ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी १०.०० ते सायं. ५.४० या वेळेत ऑपरेशन अभ्यास या उपक्रमांतर्गत नागरी संरक्षण कार्यालय प्रशिक्षण हॉल, सिद्धार्थनगर, अंबरनाथ (प.) येथे ७ दिवसीय नागरी संरक्षण क्षमता बांधणी व विकास पाठ्यक्रम (कोर्स क्र. १०/२०२५) आयोजित करण्यात आला होता.
दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित वेळापत्रकानुसार सहभागी वॉर्डन्सची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा श्रीम. दिपा घरत (स.उ.नि.), डॉ. राहुल घाटवळ तसेच अमृता राय, मास्टर ट्रेनर्स् यांनी घेतली.
सदर प्रशिक्षणासाठी एकूण २९ नागरी संरक्षण स्वयंसेवक व वॉर्डन्स उपस्थित होते. प्रशिक्षणा दरम्यान डाॅ,प्रकाश ठमके यांनीही ज्ञान दान कार्यात योगदान दिले आहे.
समारोपप्रसंगी मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव यांनी संघटना वृद्धिंगत होण्यासाठी, वैयक्तिक विकासासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्याबाबत उपस्थित सर्वांना मौलिक, उद्बोधक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या समारोपीय कार्यक्रमास क्षेत्र–३ चे उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. कमलेशजी श्रीवास्तव तसेच कल्याण (पूर्व) विभागाचे प्रभारी विभागीय क्षेत्ररक्षक श्री. सगीर खान यांची प्रमुख उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment