Monday, 22 December 2025

पर्यावरण रक्षा –मानव सुरक्षा" या विषयावर फॉन संस्थेतर्फे जनजागृती !!

पर्यावरण रक्षा –मानव सुरक्षा" या विषयावर फॉन संस्थेतर्फे जनजागृती !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ कला व वाणिज्य  महाविद्यालय , उरणच्या एनएसएस विभागाच्या श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे फ्रेंड्स ऑफ नेचर ( फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर-उरण, रायगड ( महाराष्ट्र ) तर्फे "पर्यावरण रक्षा –मानव सुरक्षा" या विषयावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत रामदास ठाकूर व सदस्य राकेश सुरेश शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

पर्यावरण व मानव–वन्यजीव  संघर्ष तसेच सर्प ओळख, सर्पदंश कसे टाळावे व सर्पदंश झाल्यास काय करावे ? संस्थेच्या शून्य सर्पदंश मृत्यू अभियान आणि स्नेक बाईट ऍकशन टीम (S.A.T) प्रकल्पाबद्दल जनजागृती केली. तसेच संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मानव –बिबट संघर्ष ,बिबटयाचे हल्ले वाढत आहेत त्याची कारणे व त्यावरील उपाययोजना याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दत्ता हिंगमिरे यांचीही यावेळी उपस्थिती लाभली होती

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...