खडवली येथील जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला पहिला क्रमांक !
मुंबई (शांताराम गुडेकर)
बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ इंडिया अँड बॉक्स लंगडी फेडरेशन ऑफ इंडिया यांनी शिर्डी येथे आयोजित केलेल्या बॉक्स लंगडी स्पर्धेत(१६ जानेवारी २०२६) जी. के. एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली चे विद्यार्थी कु.रोहित ठाकरे, कु. कौस्तुभ शेवाळे, कु. जीत गुरव, कु.सुजल फुलमाळी, कु.देवांस तिवारी, कु.पारस चेखलिया, कु.प्रणव डहाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे काठमांडू नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.कविता शिकतोडे मॅडम यांनी घवघवीत यशाबद्दल कौतुक करत यशस्वी विद्यार्थी वर्गाला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी. सागर सर उपप्राचार्य श्री. प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक सौ.हर्षला विशे मॅडम व सहाय्यक क्रीडा शिक्षक श्री.बाळाराम चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment