युवा चित्रकार वरद यांचे चित्रकला विषयावर भानूबेन प्रवीण शहा विद्यालयात प्रात्यक्षिक !
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
युसुफ मेहर अली सेंटर संचलित भानूबेन प्रवीण शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तारा येथे विद्यार्थ्यांसाठी 'प्रवास चित्रकलेचा' या विशेष उपक्रमांतर्गत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उरणचे सुपुत्र,युवा चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर शाळेतील शिक्षिका रवीना म्हात्रे यांचे 'व्यक्तिचित्र' रेखाटण्याचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि रचनात्मक वैचारिक वृद्धी व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
चित्रकला ही केवळ कागदावरील रंगकाम नसून ती विचारांना दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. सृजनशीलतेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण एस कदम, कलाशिक्षक सहदेव बाविस्कर, शिक्षिका रवीना आनंद म्हात्रे यांच्या विशेष सहकार्यासह विद्यालयातील व महाविद्यालयातील आर एम म्हात्रे, एस.जी जोशी, एस आर म्हात्रे, आर डी पाटील, एस एल पाटील, एन के मोकल आदी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने चित्रकार वरद यांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला विषयाबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
No comments:
Post a Comment