Monday, 16 March 2026

सुरगंगा मुसिक अकॅडेमि आयोजित “वूमेन्स कराओके सिंगिंग कट्टा ” ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

सुरगंगा मुसिक अकॅडेमि आयोजित “वूमेन्स कराओके सिंगिंग कट्टा ” ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरगंगा मुसिक अकॅडेमि तर्फे आयोजित वूमेन्स कराओके सिंगिंग कट्टा हा कार्यक्रम रविवार, १५ मार्च २०२६ रोजी माऊली मंगल कार्यालय, उरण येथे उत्साहात पार पडला. उरणमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उरण, जेएनपीटी, बोकडविरा, पनवेल, कोपरखैरणे आणि अंधेरी येथील गाण्याची आवड असलेल्या अनेक महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या संस्थापिका पूनम पाटेकर यांनी सर्व सहभागी महिलांचे मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात गणपती प्रार्थना आणि सरस्वती वंदना याने करण्यात आली. त्यानंतर सहभागी महिलांनी हिंदी आणि मराठीतील अनेक सुंदर गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या वेळी पूनम पाटेकर यांनी गाण्याशी संबंधित मार्गदर्शन करून महिलांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमात शर्वरी शिरोळकर (पनवेल), वंदना ठाकुर (जेएनपीटी), निर्मला पाटील (बोकडविरा), केतकी नीटसुरे (अंधेरी), मिनाक्षी वेदांत (कोपरखैरणे), श्वेता गार्डी (उरण), साजिरी कदम (उरण), नीता जांभळे (उरण), अनघा म्हात्रे (उरण) आणि वर्षा पाटील (उरण) स्वाती घरत उरण यांनी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

तसेच फ्रेलॅक्स ऑरगॅनिक कॉटन सॅनिटरी नॅपकिन्स च्या फाउंडर पूनम पाटेकर यांनी उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपली.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात गणेश पाटेकर, हेमा घरत आणि सानिका कदम यांचा मोलाचा हातभार लागला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !!

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत,  न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य  ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !! ** १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथ...