Monday, 16 March 2026

उरणच्या डाऊन नगर येथे आदिवासी महिलांसाठी आरोग्य जनजागृती व सॅनेटरी नॅपकिन वाटप !!

उरणच्या डाऊन नगर येथे आदिवासी महिलांसाठी आरोग्य जनजागृती व सॅनेटरी नॅपकिन वाटप !!


** श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था, शिवराज युवा प्रतिष्ठान व श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम.

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील डाऊन नगर येथे आदिवासी महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था, उरण , शिवराज युवा प्रतिष्ठान आणि श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्याचे महत्त्व, सॅनेटरी नॅपकिनचा योग्य वापर तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशन च्या अध्यक्षा रजनी  ताजने यांनी दिली.
तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित आदिवासी महिलांना डाबर कंपनीच्या वतीने शाम्पू, ज्यूस व सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थित महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यतेच्या अध्यक्षा  संगीता सचिन ढेरे यांनी देखील महिलांना बचत गट कसे स्थापन करावे व  त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आई माऊली ग्राम संघाच्या अध्यक्ष अनु पाटील यांनी देखील बचत गटाची माहिती देऊन  स्वतः त्या महिलांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सचिन ढेरे, सचिव कविता राकेश म्हात्रे, श्री लक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजने, महिला सक्षमीकरण प्रकल्प समन्वयक सुनेना चौधरी, आई माऊली ग्राम संघ अध्यक्ष अनुताई पाटील, वंदना म्हात्रे ( आंगणवाडी सेविका), सोनाली ठाकूर ( ग्रामपंचायत सदस्या) यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !!

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत,  न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य  ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !! ** १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथ...