Tuesday, 17 March 2026

उरण मध्ये जेएनपीटी परिसरात गंभीर स्वरूपी अपघात ; धडा पासून शीर अलग !!

उरण मध्ये जेएनपीटी परिसरात गंभीर स्वरूपी अपघात ; धडा पासून शीर अलग !!

** आरोपीचा न्हावा शेवा पोलिसांकडून शोध सुरु.

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील  न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेश बेंझोप्लास्ट कंपनीच्या समोरील रस्त्यावर जेएनपीटी कडून पीयूबी इमारतीकडे जाण्याच्या वाय जंक्शन रोडवर मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सुषिलकुमार भैय्यालाल यादव वय ३३ वर्षे  व्यवसायाने चालक, राहणार अहीरोली, कुथुपूर, मढीयाहूं, जि. जौनपूर, राज्य उत्तरप्रदेश  यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका भयंकर स्वरूपाचा होता कि सदरच्या अपघतामध्ये सुषिलकुमार यादव याचे शीर धडापासून वेगळे झाले होते. 

       अपघाताची माहिती पोलीस कर्मचारी गणेश बासरे यांनीं न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दिली असता  कोणताही विलंब न लावता न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकांत नायडू यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत   घटनास्थळाला भेट दिली. मृत व्यक्तीच्या अंगावर आधार कार्ड, अनुज्ञप्ती आणि वन प्लस कंपनीचा मोबाईल सापडला घटनेची प्राथमिक तपासणी  नायडू यांनी करून अज्ञात वहानाने सदरच्या इसमास जोरदारपणे ठोकर मारून कोणत्याही प्रकारची माहिती न देता पळून गेला असल्याचे नमूद करून उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरानी त्यास दाखलपूर्व मयत म्हणून घोषित केले. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या आपघाताची नोंद अ.मृ.रजी.क्र.03/2026 अशी कलम 194 BNSS अन्वये करण्यात आली असून न्हावाशेवा पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत .

No comments:

Post a Comment

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !!

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत,  न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य  ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !! ** १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथ...