साक्ष फाउंडेशनकडून गरजू मुला-मुलींना नवीन ड्रेस वाटप
साजरी झाली माणुसकीची दिवाळी !!
कोल्हापूर, प्रतिनिधी : साक्ष फाउंडेशनकडून माणुसकीची दिवाळी हा उपक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, दिवाळी सण हा चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा सण आहे, म्हणून गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर देखील हा आनंद आणि चैतन्य निर्माण व्हावा यासाठी गोरगरीब भटक्या मुला मुलींना नवीन ड्रेस वाटप करण्यात आले.
साक्ष फाउंडेशन गेले सहा महिन्यांपासून समाजाच्या विविध प्रश्नावर काम करत आहे, महापुरुषांच्या जयंती निमित्त वक्तृत्त्व स्पर्धा, प्राथमिक, उच्च प्राथमिक विद्यालयासाठी शैक्षणिक वस्तुंचे वाटप, महिलांना रोजगार मार्गदर्शन, आरोग्य जागृती, अशा विविध विषयावर काम केले आहे.
यंदाच्या दिवाळीत माणुसकीची दिवाळी या उपक्रमाद्वारे, साक्ष फाउंडेशनच्या स्वरांजली आठवले यांनी शहराच्या विविध भागात जाऊन गोरगरीब, अपंग, आणि गरजूंसाठी त्यांच्या मापाचे नवीन ड्रेस आणि दिवाळीचा फराळ दिला. नवीन ड्रेस घालून या मुलांनी फाउंडेशनचे आभार मानले
या उपक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला, उपक्रमासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते, साक्ष फाउंडेशनच्या हाकेला साद देत अनेक दानशुरांनी सढळ हाताने मदत केली, यात श्रीकृष्ण गोसावी ( पुणे), आदित्य राजेंद्र व पौर्णिमा मोरे, प्रीतम पाटील, मिनाक्षी साळुंखे, जगन्नाथ खाटपे आणि फाउंडेशनचे सर्व सदस्य इत्यादी दानशूरांनी डोनेशन रुपात मदत केली. तर काहींनी नवीन ड्रेस संस्थेकडे पाठवून दिले.
युवा वर्गातील मित्रांनी एकत्र येऊन साक्ष फाउंडेशन स्थापन केले आहे त्या द्वारे विविध प्रश्नावर, समाज उन्नतीसाठी कार्य करण्याचे ध्येय या फाउंडेशनच्या सदस्याने ठेवले आहे.
God bless you dide
ReplyDeleteGood job 👏👍👏
ReplyDelete