Wednesday, 11 December 2024

५ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड तर्फे स्वराज्य चषक २०२५ चे भव्यदिव्ये आयोजन !

५ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड तर्फे स्वराज्य चषक २०२५ चे भव्यदिव्ये आयोजन !

मुंबई प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रिडा अशा अनेक क्षेत्रात कार्य करणारी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील नावाजलेली संघटना म्हणजेच "स्वराज्य प्रतिष्ठान रायगड". सन २०१४ रोजी संस्थापक श्री. भास्कर कारे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मुळात क्रिकेटच्या मैदानातच स्थापना  झाली. 

गेली १० वर्षांपासून  ह्या संघटने मार्फत अनेक उपक्रम राबविले जातात तसेच दरवर्षी स्वराज्य चषक नावाने क्रिकेट स्पर्धेचे आवर्जून आयोजन केले जाते. पुढील वर्षीचा  म्हणजेच २०२५ सालचे स्वराज्य चषक २०२५ हा उपक्रम एक महिन्या वर येवून ठेपला आहे. स्वराज्य प्रतिष्ठान रायगड तर्फे ह्या वेळी दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी गावदेवी मैदान वाशी ( जुहूगाव ) येथे मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. 

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण स्वराज्य चषक का घेतो? तर त्यांच्या मागे खूप मोठा हेतू आहे. सन २०१४ साली लावलेल्या ह्या वृक्षाचे आज त्याचे रूपांतर वटवृक्षामध्ये झाले.  पण हा वटवृक्ष जेव्हा रोपट होता तेव्हा त्यांची सुरवात ह्याच आपल्या स्वराज्य चषका पासून झाली आहे. म्हणून हे सामने दरवर्षी नित्यनियमाने  खेळवतो. तब्बल ४ वर्षांनी संघटनेच्या स्थापना दिनाच्या दिवशी आपल्याला चषक घेण्याची संधी मिळाली म्हणून सर्वांनी गरजेपेक्षा जास्त मेहनत घेवून आपले सामने यशस्वी पार पाडू या. 

ह्या ह्यावेळी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला पारितोषिक म्हणून रोख रक्कम आणि आकर्षक चषक असणार आहे आणि तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघाला त्याच बरोबर उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज क्षेत्ररक्षण, मालिकावीर ह्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. फक्त १६ संघ खेळवले जाणार आहेत आणि प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ आहे. तरी इच्छुक संघाने त्वरित सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सचिन आंबवणे, सचिव वैभव घाडगे,  खजिनदार अरुण उंडरे तसेच सर्व पदाधिकारी/ सदस्य यांच्या तर्फे प्रत्येक खेळाडूला करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नियम व अटी जाणून घेण्यासाठी सुनिल चाचले - ७५०६७५७१०९ आणि दर्शन ठमके - ८९७६५३५७४८ यांच्याशी संपर्क साधावा.  .

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...