आसनगाव येथे नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ यशस्वीरीत्या संपन्न !!
बातमीदार प्रतिनिधी : ता. १६, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा.उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दि. ०९ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत शिवाजीराव स. जोंधळे इंजिनीअरिंग काॅलेज, आसनगाव, जि. ठाणे येथे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ आयोजित करण्यात आला होता. हा प्रशिक्षण वर्ग दररोज सकाळी ०९.३० ते दुपारी १४.०० या वेळेत पार पडला.
या प्रशिक्षण वर्गात एकूण १४६ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या अंतिम व शेवटच्या दिवशी श्री. अनिल गावित (सहाय्यक उपनियंञक) व मानसेवी निदेशक श्री.रामबरन यादव यांनी प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. तसेच प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मा.वि,जय जाधव, उपनियंत्रक, नागरी सरक्षण यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन उपस्थित स्वयंसेवकांना नागरी संरक्षण सभासदत्वाची शपथ दिली व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
समारोपीय कार्यक्रमास, काॅलेजच्या प्राचार्य मॅडम, HoD मॅडम, उपप्राचार्य डायमा सर व समन्वयक प्रा.श्री,राठोड सर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.
सौजन्य - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment