Friday 1 November 2024

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ वाटप !!

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.), "बंध आपुलकीचे / मायेचे" या संस्थाच्या माध्यमातून 
पालघर जिल्ह्यातील /तालुक्यातील दिवेकरपाडा  या पाड्यात संस्थेच्या माध्यमातून दिवाळी सणाचे औचित्य साधून बंध आपुलकीचा /मायेचा  हा उपक्रम आपण दिवेकरपाडा या आदिवासी पाड्यात  उत्साहात  साजरा करणात आला.दिवाळी निमित्त कपडे, दिवाळी फराळ, लहान मुलांना खाऊ देऊन दिवाळीचा सण आदिवासी बांधवांसोबत आनंदात साजरा करण्यात आला.

             या संपूर्ण प्रवाहात ज्यानी संस्थेला  सहकार्य केले ते तेथील शाळेचे मुख्याध्यापक आदेश भोईर त्याचे सहकारी मंगेश पाटील, दिवेकर पाड्यातील शालेय शिक्षण समिती, दिवेकर पाड्यातील सर्व ग्रामस्थ मंडळी, कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अनंत जोशी, स्वाती गावडे, गौतम बनसोडे, विष्णू रांबाडे, सुदर्शन कांबळी ,दया कांबळी, नरेश कांबळे, राजेंद्र बेंद्रे, प्रसाद मांडवकर यांचे मन पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम सुखकर होण्याकरीता ज्यानी सहकार्य केले संस्थेचे सर्व हितचिंतक, देणगीदार आणि कार्यकर्ते यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था ( रजि.) तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमचे सर्वत्र कौतुक होत असून आदिवासी भागात येऊन त्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले आणि पुढील उपक्रमना मनःपूर्वक शुभेच्छा सह आशीर्वाद दिले.

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ वाटप !!

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ...