Saturday, 21 December 2024

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान

मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे वार्ड क्रमांक 127 चे वार्ड अध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील शंभर तरुणांनी रक्तदान करत भगत यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. पश्चिम कातोडीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भटवाडी येथे पल्लवी ब्लड बँकच्या सहकार्यातून वार्ड अध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणेश भगत यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याना आदर्श रक्तदाता गौरव पत्र देत सन्मानित करण्यात आले. सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत हे शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे अनिल निर्मले , रमेश शिंदे, नुपूर सावंत, विशाखा घडशी, सूरज हनीफ, राजेश आहिरे, रवींद्र दाभाडे, तुषार साहिल, विनोद जाधव आदी उपस्थित होते.

महापुरुषांच्या स्मारकांच्या कामाला गती द्या आमदार दिलीप लांडे यांची विधानसभेत मागणी !!

महापुरुषांच्या स्मारकांच्या कामाला गती द्या आमदार दिलीप लांडे यांची विधानसभेत मागणी !!

** चांदिवलीतील विविध समस्यांवर अधिवेशनात उठवला आवाज 

मुंबई, (केतन भोज) : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमावादातून कर्नाटकात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात केंद्र सरकारने मराठी माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी करतानाच चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या कामाला गती द्यावी तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि संत ककय्या महाराज यांची स्मारके उभारण्यात यावीत, अशी विनंती राज्य सरकारला केली. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना दिलीप  लांडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.  पंतप्रधान आवास योजनेतून 4,475 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधून देण्यात येणार आहेत. पण त्याचवेळी एमएमआरडीएने 2008 - 09 मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारती राहण्यास योग्य नसल्याकडे लक्ष वेधून क्रांती नगर, संदेश नगर आणि जरीमरी या मिठी नदीच्या पात्रातील धोकादायक ठिकाणच्या प्रकल्पबाधितांना हक्काची घरे देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने ग्रामीण भागात घरगुती जोडणी देण्यात येत आहेत. पण चांदिवली मतदारसंघात अंबिका नगर, वाल्मिकी नगर, अशोक नगर, राजीव नगर या डोंगराळ भागात पाणी मिळत नसल्याने भूमिगत टाक्या देण्यात येऊन अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ही लांडे यांनी केली. नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन डोंगराळ भागातील धोकादायक वस्त्यांची पाहणी करून या लोकांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली.

मुंबईतील जयेश ट्रेनिंग अकॅडमी मध्ये पुमसे सेमिनारचे आयोजन !

मुंबईतील जयेश ट्रेनिंग अकॅडमी मध्ये पुमसे सेमिनारचे आयोजन !

मुंबई, (केतन भोज) : जयेश ट्रेनिंग अकॅडमी तर्फे प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान पवार पब्लिक स्कूल, कांदिवली येथे पुमसे सेमिनारचे आयोजन करण्यात आले. सेमिनारसाठी जागतिक मिस. इवा संदरसेन यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले. इवा संदरसन ही पुमसे या प्रकारात जगभरात 1 क्रमांकावर असून नुकत्याच हाँगकाँग येथे झालेल्या 2024 मधील जागतिक पुमसे स्पर्धे मध्ये वैयक्तिक प्रकारात रजत पदक आणि फ्री स्टाईल या प्रकारात रजत पदक पटकावले आहे, तसेच मागील 2022 या वर्षी गोयांग येथे झालेल्या जागतिक पुमसे स्पर्धे मध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक आणि फ्री स्टाईल या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. या सेमिनारचे आयोजन प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी केले. ह्या सेमिनार मध्ये प्रशिक्षक आणि खेळाडूंना पुमसे मधील आधुनिक बदल आणि उत्तम प्रतीचे प्रशिक्षण मिळाले.

घाटकोपर मधील विद्याभवन हायस्कूल मध्ये संपन्न झाली आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा !

घाटकोपर मधील विद्याभवन हायस्कूल मध्ये संपन्न झाली आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा !

मुंबई, (केतन भोज) : पुणे विद्यार्थी गृह, माजी विद्यार्थी मंडळ, मुंबई विभाग आयोजित मारूती लक्ष्मण मराठे आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा 2024-25 विद्याभवन संकुल घाटकोपरच्या सेमिनार हाॅल मध्ये दिनांक 19-12-2024 रोजी संप्पन झाली. सदर स्पर्धेत विविध शाळांचे 155 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन विदयाभवन नं.2 च्या समन्वयिका सरला नरेंद्रन यांनी केले. मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका योगिनी पोतदार व इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील हे या स्पर्धेसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाला क्रीडाशिक्षिका अस्मिता चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केतन पाटील व दिपंकर कांबळे या राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ खेळाडूनी आपला बहुमूल्य वेळ देऊन मोलाचे सहकार्य केले. सब ज्युनिअर गट मुले/मुली, ज्युनिअर गट मुले/मुली , सिनियर गट मुले/मुली या सर्व गटातून प्रत्येकी तीन तीन विजेत्यांची निवड करून विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.

मुंबईसह राज्यात पाचदिवशीय इन्स्टा हीलिंग रिट्रीट' उपचार शिबीर !

मुंबईसह राज्यात पाचदिवशीय इन्स्टा हीलिंग रिट्रीट' उपचार शिबीर !

मुंबई, (केतन भोज) : अनेक आजारांचा सामना करणाऱ्यांसाठी मुंबईसह राज्यभरात 'इंस्टा हीलिंग रिट्रीट' उपचार पद्धती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 23 ते 27 डिसेंबरदरम्यान डॉ. रवी वैरागडे यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम ही उपचार पद्धती समजून सांगणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. सर्व अशक्य रोग त्यांच्या मुळापासून बरे होऊ शकतात, हे प्रमाण मानून देशभरातील रुग्णांना सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि योग्य सल्ला देण्यासाठी डॉ. रवी वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित केले आहे. यावेळी 50 वर्षे वापरातील औषधीविरुद्ध 5 दिवसांचे हे शिबीर असून त्यात रुग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या प्रचलित औषधांच्या दुष्परिणामांमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे सर्व मानसिक तणाव आणि वेदनादायक गंभीर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी नागरिकांत यावेळी जागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अस्मिता महिला महाविद्यालयाचे राष्टीय सेवा योजनेचे निवासी शिबीर !

अस्मिता महिला महाविद्यालयाचे राष्टीय सेवा योजनेचे निवासी शिबीर !

मुंबई, (केतन भोज) : अस्मिता कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय विक्रोळी यांचे राष्टीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबीर भिन्नार, भिवंडी येथे 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 या काळात संपन्न झाले. शिबीराअंतर्गत भिन्नार आश्रमशाळा आणि पंचकोशीतील लोकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन इंडियन मेडिकल असोसियेशन आणि अस्मिता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले. या शिबिराचा 125 लोकांनी लाभ घेतला. शिबिरात आपली सेवा विक्रोळीतील नामवंत डॉ. हरीष पांचाळ, डॉ. जयश्री पांचाळ,  यांनी  दिली. तसेच भिनार आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि गावकऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ 179 लोकांनी घेतला. शिबिरामध्ये स्वच्छता अभियान, बेटी बचाव ,बेटी पढाव, महिला सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक बंदी या विषयावर पथनाट्य आणि पदयात्रा यांच्या आधारे जनजागृती करण्यात आली. भिन्नार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. चिंचवली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले चिंचवली जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नवनीत अपेक्षित प्रश्नसंच, आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा नायर, उपाध्यक्षा आणि सिग्मा कॉम्प्युटरच्या प्रमुख अस्मिता खोचरे, खजिनदार तृप्ती वाघमारे, संस्थेचे विश्वस्त प्रनील नायर, राहुल वाघधरे संजय रुमडे, संजीवनी रुमडे, अस्मिता महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी .ए .एस. एम. ओझा, पर्यवेक्षिका डॉ. नेहा दळवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आणि सहकारी प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनला 84 लाखांची देणगी !

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनला 84 लाखांची देणगी !

** एसबीआय सिक्युरिटीजचे 100 विद्यार्थांसाठी कौतुकास्पद कार्य

मुंबई, (केतन भोज) : एस बी आय सिक्युरिटीजने अल्पभूधारक ग्रामीण समुदायातील 100 विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्यातील रोजगारासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी स्वदेस फाऊंडेशनला 84,00,000 लाख रुपये देणगी देण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. रॉनी आणि जरीना स्क्रूवाला यांनी स्थापित केलेले, स्वदेस फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यांद्वारे ग्रामीण भारताला सशक्त बनविण्याच्या उद्देशाने कार्य करते. स्वदेस फाऊंडेशन चे कार्य सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत सुरू असून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांत फाऊंडेशन चे कार्य केंद्रित आहे. यावेळी, एसबीआय सिक्युरिटीज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ दीपक कुमार लल्ला म्हणाले, “एसबीआय सिक्युरिटीजमध्ये आम्ही व्यक्तींना शिक्षणाद्वारे त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम बनविण्यावर विश्वास ठेवतो. स्वदेस फाऊंडेशनसोबत भागीदारी केल्याबद्दल आणि ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात योगदान दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही आमच्या CSR उपक्रमांद्वारे अधिक समावेशक आणि न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आणि समर्पित आहोत. "मास स्कॉलरशिप प्रोग्राम पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक प्रवाहात इयत्ता 11 आणि 12 पूर्ण करण्यास समर्थन देतो. 300 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण वर्ग 10 च्या पुढे चालू ठेवण्यास सक्षम केल्याबद्दल आम्ही एसबीआय सिक्युरिटीजचे मनापासून आभारी आहोत, आर्थिक अडचणींमुळे त्यांना बाहेर पडण्याची गरज नाही याची खात्री करुन घेतली. आम्ही पुढील वर्षांमध्ये ही भागीदारी मजबूत करण्यासाठी, ग्रामीण महाराष्ट्रातील आणि त्यापुढील अधिक तरुण मुला-मुलींना मदत करण्यासाठी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग म्हणून उच्च शिक्षणात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत असे स्वदेस फाउंडेशनचे सीईओ मंगेश वांगे म्हणाले.

राधा कृष्ण हॉटेलचे मालक विजय शेट्टी वरिष्ठ हॉटेलियर पुरस्काराने सन्मानित !

राधा कृष्ण हॉटेलचे मालक विजय शेट्टी वरिष्ठ हॉटेलियर पुरस्काराने सन्मानित !

मुंबई, (केतन भोज) : हॉटेल उद्योगातील 42 वर्षांच्या सेवेबद्दल वरिष्ठ हॉटेलियर पुरस्कार घाटकोपर मधील राधा कृष्ण हॉटेलचे मालक, सुंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय शेट्टी यांना देण्यात आला. आहार तर्फे हयात हॉटेल येथे हा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचे चिरंजीव हितेश शेट्टी व कुटुंबिय उपस्थित होते.

मुंबईतील सामाजिक संस्थांचे मणिपूर मध्ये कर्करोग जागरूकता शिबिर !!

मुंबईतील सामाजिक संस्थांचे मणिपूर मध्ये कर्करोग जागरूकता शिबिर !!

मुंबई, (केतन भोज) : छबी सहयोग फाऊंडेशन (मणिपूर प्रांत ) यांच्या तर्फे मुंबईतील देव देश प्रतिष्ठान आणि साईधाम कॅन्सर हॉस्पिटल शिर्डी यांच्या सहकार्याने मणिपूर येथील अँड्रो गाव असलेल्या इंफाळ पूर्व येथे कर्करोग जागरूकता शिबिराचे आयोजन केले. मणिपूर मधील लोकांची आरोग्यसेवा सुधारावी तसेच त्यावर तातडीने उपचार व्हावे या उद्देशाने या तिन्ही सामाजिक संस्था कर्करोग संबंधी कार्य करत आहेत. अँड्रो गावी घेण्यात आलेल्या या शिबिरात महिला आणि वृद्धांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 50 पेक्षा जास्त महिला आणि 25 पुरुषांचा सहभाग दिसून आला. कर्करोगाची माहिती आणि त्याच्यावर तातडीने निदान करण्यासाठी छबी सहयोग फाऊंडेशन, देव देश प्रतिष्ठान यांचे देशभर कार्य सुरू आहे. महाराष्ट्र चे माजी राज्यपाल कोष्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संस्थेचे कौतुक केले आहे. मणिपूर येथे पार पडलेल्या कर्करोग शिबिराला आशा वर्करच्या एस संतीदेवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष छ कुंडमले, छ तोंबी उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पार्थो रॉय यांनी विशेष प्रयत्न केले.

Friday, 20 December 2024

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात "बहुरंगी भारूड" लोककलेच्या प्रयोगाचे टिम सचिन चाहते परिवार मुंबई तर्फे आयोजन !

दादरच्या छत्रपती  शिवाजी महाराज नाट्यगृहात "बहुरंगी भारूड" लोककलेच्या प्रयोगाचे टिम सचिन चाहते परिवार मुंबई तर्फे आयोजन !

मुंबई - (शांताराम गुडेकर/दिपक कारकर) 

              कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे-खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातील या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत. मग भजन, जाखडी नृत्य, भारुड असो किंवा नमन या कलेवर जिवापाड प्रेम करणारे रसिक नेहमीच या कलेचा आनंद लुटायला आतुर झालेले असतात.
             कोकणची पारंपारिक लोककला म्हणून "नमन" या कलेकडे पाहिले जाते. शिमगोत्सवात कोकणात बहुतांशी गावातल्या प्रत्येक वाडीत नमनाचा सुर चांगलाच गवसलेला असतो. श्री गणपती आराधना ( गण ) गवळण, पारंपारिक सोंगे, सामाजिक किंवा प्रबोधनाचा संदेश देणारी नाट्यकृती "फार्स" तर सोबत काल्पनिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित वगनाट्य सादर केले जाते. ढोलकी, मृदुंग, टाळ ही पारंपरिक वाद्य आणि विविध चालबद्ध गाणी यांचा मेळ नमनात असतो. नमन या लोककलेत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची ही  नमन लोककला वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.

            लोककलेच्या कलावंताना जन्म देणारी ही कोकणभूमी आणि ही कोकणभूमी म्हणजेच पृथ्वीवरचा स्वर्ग होय. योगायोग म्हणावा की, साक्षात परमेश्वराने घडवून आणलेली अनोखी भेट हेच उमगत नाही कारण, मैत्री कुठे आणि कधी होईल याची वेळ निश्चित नसते हे अगदी खरं आहे आणि या  निखळ मैत्रीचे तुम्ही - आम्ही साक्षीदार आहोत. आमच्याशी जीवापाड मैत्रीचा मानबिंदू असे सर्वांचे लाडके नामवंत कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, शाहीर सचिन धुमक (ढाकमोली, चिपळूण) यांच्या संकल्पनेतून टिम सचिन चाहते परिवाराची निर्मिती करुन कोकण क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढावा आणि त्यातून मिळणारी थोडी -थोडकी रक्कम ही नवोदित कलाकारांसाठी खर्च करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत क्रिकेट स्पर्धेची तब्बल तीन पर्व यशस्वीपणे पूर्ण करण्याचा बहुमान यांनी मिळवला आहे.
             कोकणभूमीतल्या नवोदीत कलाकारांना उत्तम रंगमंचावर आपल्या अभिनयाची छाप पाडता यावी त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत ,किर्तीवंत कलाकारांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीरातून हाती लागलेल्या हिऱ्यांना चकाकी देण्याचे काम सुरु केले आणि थेट बहुरंगी भारुडाची संकल्पना नवोदित कलाकारांसमोर ठेवली होती आणि याच कलाकारांना हाताशी धरुन ऐतिहासीक वगनाट्य इतिहासाच्या पानावरील अपरिचित योध्दा रामजी पांगेरा यांची अजरामर कहानी आपण सर्वांनी पाहीलीच आहे. तसेच स्वत: रामजी पांगेरा ही भूमिका साकारुन रसिकांना निःशब्द करणारा अवलिया म्हणजे शाहीर सचिन धुमक होय.
            नव्या वर्षात नवी अदाकारी, नवे ऐतिहासिक वगनाट्य "गर्जती तोफांचे चौघडे" मोठ्या रुबाबात सादर होणार आहे तर रसिकजनहो आपण नक्की यावे. चाहत्यांचे.....बहुरंगी भारुड...! याचे आयोजक  टिम सचिन चाहते परिवार मुंबई असून दिनांक :- ०४ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ०७:३० वाजता दादर पश्चिम येथील  छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (दादर) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. तिकीट किंवा अधिक माहितीसाठी ९०८२४ ८९६६३ या नंबरवर संपर्क साधावा.

धर्मासागर उपासना केंद्र श्रीसिध्देश्वर मित्र मंडळातर्फे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन !

धर्मासागर उपासना केंद्र श्रीसिध्देश्वर मित्र मंडळातर्फे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन !

मुंबई, (केतन भोज) : जय जवान क्रिडा मंडळाचे मैदान राम नगर(ब), सुजाता हॉटेलच्या वरील बाजूस, विक्रोळी पार्कसाईट, घाटकोपर (प.) मुंबई या ठिकाणी परमपुज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसेबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या धर्मासागर उपासना केंद्राच्या नवव्या वर्षपुर्ती निमित्त मार्गशीर्ष कृ.१२/१३/१४ शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०२४ ते रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ या कालावधीत भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ तद्नंतर रात्रौ ७.३० ते ९.३० हरिकिर्तन असा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दैनंदिन कार्यक्रमांसोबतच तीन दिवसांच्या या कालावधीमध्ये दि.२७ डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी १० वाजता ओम आदिनाथ विश्वेश्वर मंदिर ते कार्यक्रम स्थळ अशा प्रकारे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ३ ते ४ या वेळेत महाधर्मासागर उपासना, सायं. ७.३०ते ९.३० या दरम्यान ह.भ.प. कबीर म्हाराज अत्तार (राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते,झी टॉकीज मन मंदिरा फेम) यांचे हरिकीर्तन. तर दुसऱ्या दिवशी शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला असून सायं ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले (विनोदाचार्य, परभणी) यांचे हरिकीर्तन आयोजित केले आहे. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ज्ञानेश्र्वरी पारायण आणि दुपारी १२ वाजता गुरुपूजन, सायं ४ ते ५ या वेळेत दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा असून, नंतर सायंकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० यावेळेत ह.भ.प. गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसेबाबा (संस्थापक : स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. अशा विविध प्रकारच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन धर्मासागर उपासना केंद्र श्रीसिद्धेश्वर मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त अध्यात्मिक सेवेकऱ्यांनी सहभागी होऊन अध्यात्मिक सेवेचा व ज्ञानाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भेकरे व उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

अमित शहांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन !!

अमित शहांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन !!

घाटकोपर, (केतन भोज) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटकोपर पश्चिम विधानसभेच्या वतीने शुक्रवारी भीम नगर, सर्वोदय जंक्शन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शिवभक्त संजय भालेराव तसेच घाटकोपर पश्चिम विधानसभेतील सर्व महिला, पुरुष पदाधिकारी, अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 18 December 2024

जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय दाखले शिबिराचा लाभ घ्यावा - राजोल संजय पाटील

जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय दाखले शिबिराचा लाभ घ्यावा - राजोल संजय पाटील

मुंबई, (केतन भोज) : उत्तर पूर्व मुंबई लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासकीय दाखले शिबिराचे आयोजन दिना पाटील इस्टेट,स्टेशन रोड, भांडुप (प.) मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे.हे शासकीय दाखले शिबिर दि.१८ ते २४ डिसेंबर पर्यंत सुरू असणार आहे. नागरिकांना सर्व शासकीय दाखले एकाच छताखाली सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे. या मध्ये उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला यांचा समावेश असणार आहे. तरी या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय दाखले वेळेत आणि कुठल्याही एजंटशिवाय मिळवून घ्यावे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी केले आहे.

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.), आर.सी.एफ लि. चेंबूर तसेच सुराना सेठिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घाटला गांव येथे मोफत वैद्यकीय शिबीर संपन्न !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.), आर.सी.एफ लि. चेंबूर तसेच सुराना सेठिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घाटला गांव येथे मोफत वैद्यकीय शिबीर संपन्न !!
 
मुंबई (शांताराम गुडेकर) :
            मुंबई सह उपनगर, कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.), राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लिमिटेड चेंबूर तसेच सुराना सेठिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच "आपला घाटला गांव आपला विकास " यांच्या माध्यमातून घाटला गांव येथे मोफत वैद्यकीय शिबीर पार पडले. या वैद्यकीय शिबीरात २५० रहिवाशांनी सहभाग नोंदवून त्याचा लाभ घेतला. 
         शिबीरात रक्तदाब, शुगर, पीएफटी, एसिजी, ईएनटी टेस्ट तसेच डोळे तपासणी करून मोफत औषधे आणि गरजूंना १७५ चष्मे मोफत वाटण्यात आले.शिबीराला आर. सी.एफ च्या श्रीमती नजहत शेख (संचालिका, वित्त), श्री.निरंजन सोनक (कार्यकारी संचालक, वाणिज्य), श्रीमती रेखा देवाडिगा (उपमहाव्यवस्थापक, मेडिकल), सौ.भाग्यश्री कापुरे (समुपदेशिका ,आर.सी.एफ), श्री.हेमंत पाटील (समाजसेवक) हे मान्यवर उपस्थित होते. शिबीरात श्री.राजकुमार घाडी (वैद्यकीय समाजसेवक) यांची टीम तसेच तज्ञ डॉ.श्री.विनीत गायकवाड, डॉ. रजनीश कुमार, डॉ. निशिगंधा नेहते, डॉ. अविनाश सिंह उपस्थित होते. 
        शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर यांच्या सहित सचिव श्री.प्रदीप गावंड, उपाध्यक्ष रमेश पाटील, श्री.हनुमंता चव्हाण, सौ.निलम गावंड, श्री.वैभव घरत, श्री.प्रकाश शेजवळ, श्री.रहीम शेख, श्री.मंदार भोपी, श्री.डी.एम मिश्रा, श्री.सचिन राखाडे, श्री.पुरु पाटणसांगवीकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहा नानिवडेकर यांनी केले. तर कु.सुशिल मेस्त्री यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली.
        पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या १८ वर्षाहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत आहे. मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री.अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी, अंध विकलांग, वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते. गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प ,नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ  गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष - अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार -सचिन साळुंखे, सहसचिव वैभव घरत, सौ.स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सचिन डेरे, संदीप पाटील, सौ.नीलम गावंड, सतीश कुंभार, सुशील मेस्त्री, डी. निंबाळकर ,मंडळ छाया चित्रकार मॅथ्यू डिसोझा आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष परिश्रममुळेच गेली १८ वर्ष सातत्याने कार्यक्रम यशस्वी होतात असं मत यानिमित्ताने मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केले.

वारकरी संप्रदायातील ह. भ. प विठाबाई धनाजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन !

वारकरी संप्रदायातील ह. भ. प विठाबाई धनाजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन !
 
मुंबई, (प्रतिनिधी) :

             डोंबिवली नजीक असणाऱ्या काटई  गावातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे मृदूंगमनी स्व. ह. भ. प धनाजी चांगो पाटील यांच्या धर्मपत्नी ह. भ. प विठाबाई धनाजी पाटील यांचे मंगळवार १७ डिसेंबर रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी  वृद्धापकाळाने निधन  झाले. काटई येथील स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.
              ह. भ. प स्व. विठाबाई धनाजी पाटील यांच्या पश्चात मुलगा अनिरुद्ध धनाजी पाटील मुलगी निराबाई हरिश्चंद्र मढवी ( रोहिजण ) जनाबाई महादेव काळण (आजदे) व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया ( दहावा ) विधी दिनांक २६ डिसेम्बर रोजी  खिडकाळेश्वर महादेव मंदिर, कल्याण शीळ रोड येथे सकाळी ८ वाजता  तर उत्तरकार्य (तेरावा विधी) दिनांक २९  डिसेम्बर  रोजी सकाळी १० ते १२ वा. दरम्यान  विठाबाई सदन , काटई गाव, कल्याण शीळ रोड वैभवनगरी डोंबिवली (ई) या राहत्या घरी संपन्न होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Monday, 16 December 2024

कांचन नगरातील दत्त जयंती उत्साहात संपन्न !

कांचन नगरातील दत्त जयंती उत्साहात संपन्न !

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील कांचन नगरातील श्री. गुरुदत्त बहु. संस्था, जळगावमार्फत जागृत गुरुदत्त मंदिरात मोठ्या आनंदीमय उत्साहात दत्त जयंती सादर करण्यात आली दि. ०८/१२/२०२४ ते १५/१२/२०२४ पर्यंत श्रीमद भागवत कथा व गुरुचरित्र कथा, किर्तणी सप्ताहाचे आयोजित करण्यात आले होते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ५ वा काकड आरती, सकाळी ६:०० वा. दत्त मूर्तीचे अभिषेक मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी व सौ. आक्काबाई कोळी यांनी केले, सकाळी १० ते १२ वा. ह. भ. प. शालिकग्राम महाराज, जळगावकर यांचे काल्याचे किर्तन झाले, दुपारी १२:०० वा. गुरुदत्त सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

सदरहू पुरस्कार हा निलेश बोरा, डॉ. गोकुळ बिहाडे, उमेश सोनवणे, शशिकांत भालेराव, लक्ष्मण पाटील यांना सामाजिक व आरोग्य विषयी कार्य केल्या बद्दल देण्यात आले दुपारी १२:३० वा. महाआरती करण्यात आली. महाआरती प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री. बाळासाहेब प्रदिप पवार, नगरसेवक कै. कैलास सोनवणे, किशोर बाविस्कर, सौ. कांचनताई सोनवणे, सौ. गायत्रीताई शिंदे इ. गट विकास अधिकारी सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, रोहन सोनवणे, मुरलीधर कोळी, रतिलाल सपकाळे, पितांबर शिरसाठ, जीवन कोळी, मुरलीधर सोनार, चंद्रकांत पाटील, मनोज सोनवणे, योगेश बाविस्कर, डॉ. परिमित बाविस्कर, डॉ. विजय पवार, कामगार कल्याण मंडळाचे निरीक्षक भानुदास जोशी इत्यादी उपस्थित होते. दुपारी १२:३० ते ४:०० वा. पर्यंत महाप्रसाद (भंडारा) झाला. संध्याकाळी ६:०० वा. मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळी व सौ. सुरेखा कोळी यांच्या हस्ते आरती झाली संध्या ६ ते ७ हरिपाठ झाला. रात्री ९ ते ११:३० दात जन्मावर ह. भ. प. प्रल्हाद महाराज कलमसरेकर यांचे किर्तन झाले. रात्री. १२:०० वा. आरती व आभार प्रदर्शन मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिराचे दर्शन भाविकानी मोठ्या प्रमाणात घेतले.

कार्यक्रम यशस्वी साठी दिलीप सपकाळे, नामदेव पाटील, युवराज बाविस्कर, राजू ठाकूर, संतोष पाटील, गोपीचंद साळुंके, उमेश सोनवणे, सुभाष वास्कर, सोन्या सोनार, बापू ठाकरे, दिनेश सोनवणे, नरेंद्र सपकाळे, अशोक माळी, किरण बाविस्कर, रविंद्र सोनवणे, रितेश कोळी, गौरव कोळी, तेजस कोळी, तसेच गुरुदत्त मंदिराचे सेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नालासोपारा शहरात सायबर गुन्हे वाढताहेत; नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन दरोडे, !

नालासोपारा शहरात सायबर गुन्हे वाढताहेत; नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन दरोडे, !

**सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वराज अभियान संघटनेच्या पदाधिकारीनी घेतली भेट..

नालासोपारा ता, १६ :- नालासोपारा शहरात सायबर गुन्हे वाढले असुन याबाबत शहरात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा फसवणूक झालेले प्रकार जास्त आहेत. अनेक जणांची फसवणूक पन्नास हजार ते १लाख रूपये दरम्यान झालेली आहे. ही लोक सायबर क्राईम विभागाकडे तक्रार घाबरून देत नाही. बँक खात्यातून गायब झालेली ही रक्कमही लाखोंचा घरात आहे.

यासंदर्भात रोज महिला व उच्च शिक्षित विद्यार्थी यांच्या खात्यामधून हजारो रूपये गायब होत असल्याची तक्रार स्वराज अभियान संघटनेच्या रूचिता नाईक यांच्याकडे घेऊन येत असतात. वाढत्या इंटरनेटच्या वापरांमुळे लोकांचे आयुष्य तर अधिक सहज सोपे झाले आहे. पण, सोबतच यामुळे अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. अनेकदा नागरिकांना सायबर क्राईमसारख्या गोंष्टींबद्दल माहिती नसते. आणि त्याच्या नकळत ते सायबर क्राईमला बळी पडतात. यामुळे आतापर्यंत अनेकांना लाखो रूपयांचा  फटका सहन करावा लागला आहे. हॅकर्समुळे आणि कधी- कधी लोकांच्या निष्काळजीपणामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
ऑनलाईन फ्रॉड, ओटीपी घेऊन फसवणूक, एटीएम कार्डद्वारे फसवणूक, ऑनालाईन व्यवसायचे लालच देऊन फसवणूक, मल्टी लेव्हल मार्केटींग, सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, हॉकींग करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे.

याबाबत  सायबर क्राईम व  पोलीस विभागाच्या माध्यमातून सायबर गुन्हे रोखण्यासंबंधी प्रसार व  गुन्ह्यांविषयी जनजागृती झाली तरच नागरिक बळी पडणार नाहीत आणि गुन्ह्यांना आपोआपच पायबंद बसेल. त्यामुळेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती मोहिम करण्याबाबत स्वराज अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी नी आज नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वळवी यांची भेट निवेदन देण्यात आले. यावेळी स्वराज अभियान च्या रूचिता  नाईक, राजेंद्र रांजणे, श्रीकांत जाधव, महेश निकम, समीर गोलांबडे,शिवसेना विभागप्रमुख दानिश करारी, जया गुप्ता, वंदना ढगे, शगुन गुप्ता ,  वंदना गाडगिळ, उपस्थित होते.

किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम माॅल, यांच्यातर्फे मातीचा किल्ला बनवणे स्पर्धा !


किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम माॅल, यांच्यातर्फे मातीचा किल्ला बनवणे स्पर्धा !

ठाणे, प्रतिनिधी : किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम माॅल, यांच्या सौजन्यशील उपक्रम २७ नोव्हेबंर रोजी कोरम माॅल येथेच आयोजित करण्यात आले होते. मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानची सदस्य पल्लवी लंके हिने कळवा ब्रीज येथील साठे नगर येथे राहणाऱ्या वस्तीतील मुलींना एकत्रित करून त्यांना ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला व सिंधुदुर्ग किल्ला तयार करण्यात आला. 

अतिशय परिसर स्वच्छ व दिमाखात जे साहित्य उपल्ब्ध आहे त्यात त्यांनी अप्रतिम असा किल्ला उभा केला. ह्या किल्ल्याची माहिती संस्थेचे सदस्य राजेंद्र गोसावी सरांनी व्यवस्थित रित्या सांगितली व मुलींना वेळेत घरी पोहचणे देखील गरजेचे होते. याच वेळेस परिक्षणसाठी परिक्षक आले होते. त्यावेळेस परिक्षकांना माहीती दिली. कोरम माॅल येथे १५ डिसेंबर रोजी किल्लेकर या संस्थेच्या निकाल जाहिर झाला आणि श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या मुलींना सिंधुदूर्ग किल्ल्याला तिसरे पारितोषिक मिळाले.  हा पुरस्कार घेण्यासाठी संस्थेचे सदस्य पल्लवी लंके, निकिता कांबळे व इतर मुलीं उपस्थित होते. सहभागीना प्रमाणपत्र व मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशी माहिती संस्थेचे संस्थापक सदस्य अजय भोसले यांनी दिली.

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम "राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार-२०२४ आणि माणुसकी रत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम  "राज्यस्तरीय महाराष्ट्र  उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार-२०२४ आणि माणुसकी रत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील कासार कोळवण गावचे कोकण सुपुत्र मोहन जयराम कदम यांना " राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट समाज सेवक  पुरस्कार-२०२४ आणि राज्यस्तरीय  माणुसकी रत्न पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आले. रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी श्री बल्लाळेश्वर मंगल कार्यालय, भारत कॉलेज रोड, हेंद्रेपाडा, बदलापूर (प.) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.

           या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका/अध्यक्षा सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य तपासी अधिकारी अँटिपायरसी मुंबई सेलचे रामजीत (जीतू)  गुप्ता, मा.ऍड.मोहन शुक्ला (अध्यक्ष औदुंबर साहित्य मंच व अध्यक्ष रेक्रिशन टेनिस क्लब एरंडोल जळगाव), पुणे माळीण गाव उद्धारचे मच्छिन्द्रनाथ रामचंद्र झंजारे, सौ.दिपाली शिरापूरे, (सुप्रसिद्ध समाजसेविका), प्रशांत पेंधे (सी. ई.ओ.पार्थ गारमेंट), तंत्रस्नेही शिक्षक (शैक्षणिक क्रांती) ठाणे, सेवक नागवंशी (राष्ट्रीय सरपंच दक्षिण झोन अध्यक्ष, सुप्रसिद्ध समाजसेवक, उद्योजक), मोहन कदम (सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रसिद्ध पत्रकार), दिलीप नारकर (बृहमुंबई होमगार्ड विभाग), अविनाश म्हात्रे (अध्यक्ष दीनदयाल कुष्ठरोग संस्था, अध्यक्ष), सौ.प्रियंवंदा तांबोटकर (आर.एस.पी.ऑफिसर  नवी मुंबई), संजय हिरु घुडे (ठाणे ग्रामीण पोलीस दल 1998), राजेश भांगे (उद्योजक,समाजसेवक), लेखा तोरसकर (जाणता राजा अभिनेत्री, समाजसेविका), लोकेश पाटील ( सामाजिक कार्यकर्ता ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे कासार कोळवणचे  माजी पदाधिकारी व साई भक्त  ज्यांनी मंडळाच्या उन्नती कामासोबत अनेक विविध संस्था मध्ये कार्यरत असून महान समाजकार्याचा वसा घेतला. ज्यांनी हेच काम आयुष्यभर गावात राहून गावासाठी केले असे त्यांचे वडीलांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. याची पोच पावती  म्हणून आतापर्यंत त्यांना अनेक महत्वाच्या व मानाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. समाजात कुठल्याही फळाची अपेक्षा न करता  निःस्वार्थी पणे काम करून सर्वाना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव आज प्रसिद्ध  आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असा लौकीक असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन जयराम कदम यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या असून पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हिच , साई चरणी प्रार्थना केली आहे. मोहन कदम महाराष्ट्रात विविध संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, समाज शाखा मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी समाज प्रबोधन करत समाजातील ज्या आवश्यक नाहीत अशा काही अनिष्ठ प्रथा बंद करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.ज्याच्या पासून वेळ, पैसा वाचेल असे कार्य ते करत आहेत. लोकांना  जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि गरजेला घरच्या माणसासारखं धावायचं अशी ओळख मोहन कदम यांची आहे. त्यांना याकामी त्यांची पत्नी, मुले, भाऊ आणि मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभते. घरातून समाजसेवेचे मिळालेले बाळकडू आणि पत्नी, मुलांचे प्रेम या जोरावर मोहन कदम यशस्वी झाले आहेत.
            मला समाजसेवेचा वसा वडिलोपार्जित मिळाला आहे. लहानापासून आवड निर्माण झाली म्हणून जनसेवा ही ईश्वर सेवा असे समजून मी सतत काम करत असतो. लोकांचे आशीर्वाद हेच आमच्या साठी पुरस्कार आहेत असं मत मोहन कदम यांनी बोलताना व्यक्त केले. प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा  नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र पदाधिकारी, सदस्य, सभासद व त्यांच्या निवड समितीचे आणि त्यांच्या टीम वर्क ने कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन आणि नियोजन उत्तम केले होते. त्याबद्दल मोहन कदम यांनी त्यांचे मनापासून  हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन केले .

शिवसेना (उबाठा),शिव आरोग्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड टाउन लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा ३२३१ A१ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा काचूर्ली येथे शालेय साहित्य वाटप !!

शिवसेना (उबाठा),शिव आरोग्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड टाउन लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा ३२३१ A१ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा काचूर्ली येथे शालेय साहित्य वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिव आरोग्य सेना व लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड टाउन लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा ३२३१ A१ यांच्या संयुक्त विद्यमाने शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर व मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅ शनल डिस्ट्रिक्ट ३२३१ A१ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर २०२३-२०२४ चे लायन डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या आदेशानुसार आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व लायन्स क्लब ऑफ मिडटावूनचे फर्स्ट व्हि.पी. लायन जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार तसेच हिरकणी प्रतिष्ठान लेडीज सायकल क्लब व मानीनी म्हणजे महिला मंडळाचे अध्यक्ष सौ.सुलेखा गटकळ यांच्या विनंतीनुसार शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा व लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने मराठा विद्या प्रसारक समाज संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा काचूर्ली, तालुका त्रंबकेश्र्वर, जिल्हा नाशिक या आश्रम शाळेत गोरगरीब साडे तीनशे (३५०) मुलांना सिंगल लाइन बुक ५० डझन, स्क्वेअर लाईन बुक ६ डझन, पेन्सिलचा सेट, रबर, शार्पनर, स्केल वगैरे १५० बॉक्स, लांब सिंगल लाइन बुक ३० डझन, ३६० शार्प पेन, ३६० शार्पची लेखन पॅड, ५० टी-शर्ट आणि ५० ट्रॅक पँट व इतर सामान व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक व संस्थापक हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री.एकनाथ अहिरे, जिल्हा समन्वय सहसचिव श्री. सचिन त्रिवेदी, सह-समन्वयक कोपरी पाचपाखाडी श्री.अजय राणे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.गौतम कटारे,अधिक्षिका सौ.मिना साळवे, अधीक्षक श्री.भिसे सर, जेष्ठ शिवसैनिक श्री. विठठल भुईबर ,ॲड राहूल गांगुर्डे, लायन श्री.राजू रोकडे, श्री.भरत काळे, कु.सुशांत भुईबर, लायन श्री.परेश शिंदे, कु.अभिषेक कुमावत, कु.उदय गांगुर्डे आणि आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

मुंबई (शांताराम  गुडेकर) :
           प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा  नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र संस्थापिका अध्यक्ष प्रेरणा (दीप्ती) गावकर, वैभव कुलकर्णी व सर्व पदाधिकारी,सदस्य आणि सभासद यांच्या उपस्थित सन - २०२४ वर्षाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार-२०२४ सौ.दिप्ती वैभव कुलकर्णी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार समारंभात यशवंत खोपकर यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या त्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आले. 

रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी श्री बल्लाळेश्वर  मंगल कार्यालय, भारत कॉलेज रोड, हेंद्रेपाडा, बदलापूर (प.) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.या पुरस्कार साठी संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, वैद्यकीय, क्रीडा आदींचा समावेश केला आहे. सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना समाजभूषण तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दिला. गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत. तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या याच कार्याचे  कौतुक म्हणून त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४  देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, संदीप चादीवडे सचिव, दौलत बेल्हेकर संचालक, वसंत घडशी कार्यालय प्रमुख, मेघा सावंत, वनिता वायकर, राजेंद्र पेडणेकर, शरद धाडवे, सागर इंगळे यांचाही यानिमित्ताने प्रेरणा फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. यशवंत खोपकर यांना सन - २०२४ वर्षाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार-२०२४ आणि त्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आल्याबद्दल कोकणातील विविध मंडळ, सामाजिक संस्था, समाज मंडळ, विक्रोळी, घाटकोपर, ईशान्य मुंबई सह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर मधील अनेक मंडळ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांच्यातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Saturday, 14 December 2024

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे -- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे -- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

परभणी, प्रतिनिधी दि.14 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते.संविधानानुसार देश चालतो.ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी या देशातून चालते व्हावे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनास्थळाची पाहणी ना.रामदास आठवले यांनी केली.त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परभणीतील संविधान अवमान प्रकरणाची  माहिती घेतली 

यावेळी आरोपीची  नार्को टेस्ट करण्याची सर्व  चौकशी करण्याची सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची ही आरोपीची नार्को चाचणी करण्याची  मागणी  आहे.संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी मागे कोण सुत्रधार आहे ? कुणाचा हात आहे हे शोधण्या साठी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्यांना जमत नसेल तर  या प्रकरणी क्राईम ब्रांचने चौकशी करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.

10 डिसेंबर संविधान अवामनाचा प्रकार परभणीत घडल्या नंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त निषेध  आंदोलन परभणीत केले.संविधान अवमान प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो.त्यानंतर निषेध आंदोलनात आंबेडकरी जनतेने कुणाचेही मोठे नुकसान केलेले नाही .तुरळक ठिकाणी केवळ 2  गाड्यांच्या काचा आणि काही दुकानाच्या नाम फलकाचे नुकसान झाले आहे.या आंदोलनात विद्यार्थी महिला आणि निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत .ज्या पोलिसांनी महिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अतीप्रमनात मारहाण केली आहे; वस्तीमधील पार्किंग मधील गड्याफोडल्या आहेत.त्या पोलिसांची ही चौकशी व्हावी.काही समाजकंटक यांनी पोलिसांसोबत आंबेडकरी आंदोलकांवर हल्ले केले आहेत त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
अटक 42 आंदोलक पैकी 10  जणांना जामीन मिळाला आहे पोलीस किंबिंग ऑपरेशन करणार नाहीत निर्दोष व्यक्तींवर गोन्हे दाखल करणार नाहीत असे शांतता कमिटीत ठरले असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

याप्रकरणी आपण दिल्लीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो.परभणीत कोंबाइंग ऑपरेशन करू नये आणि निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत याबाबत आपण मागणी केल्याची बा रामदास आठवले यांनी आज परभणीत पत्रकारांना सांगितले.

भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाळ्या मामा यांच्या धरणे आंदोलनाला यश, मे.दोस्ती बिल्डरने मागण्या केल्या मान्य !!

भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाळ्या मामा यांच्या धरणे आंदोलनाला यश, मे.दोस्ती बिल्डरने मागण्या केल्या मान्य !!

भिवंडी (कोपर), दिं,१४, (अरुण पाटील) :
        भिवंडी तालुक्यातील कोपर, पूर्णा गाव येथे गेल्या पंधरा वर्षांपासून मे .दोस्ती बिल्डर्स (मे.आद्रिका बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) नावाची कंपनी गावच्या जमिनी विकत  घेत असून सद्या सदर जमिनीवर विकासकामे जोमाने सुरू आहे.मात्र येथील काही जमीन मालकांना जमिनीचा पूर्ण मोबदला दिला नाही तसेच तेथील भूमी पुत्रांना पाहिजे तसा रोजगार, व्यवसाय दिला नाही अशी माहिती मा.खासदार बाळ्या मामा यांना मिळाली. त्यामुळे तो मिळावा या मागणीसाठी आज शनिवार दिं, १३/१२/२०२४ रोजी सकाळीं भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सदर कंपनीच्या प्रवेश द्वाराजवळ जमिनीवर बसून धरणे आंदोलन केले. यावेळी काल्हेर, पूर्णा गावचे शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. तर कोपर गावचे वरिष्ठ नागरिक आत्माराम पाटील, कोपर गावचे  पत्रकार अरुण पाटील, मुकेश.पाटील, कुणाल घरत, देवराम पाटील, दत्तात्रेय पाटील, पारूनाथ पाटील, मंगेश पाटील, रमेश पाटील, अरविंद पाटील, राजन पाटील, सुहास पाटील, विनोद पाटील, हिरामण पाटील, केशव पाटील, चिंतामण घरत, भगवान भंडारी, लक्ष्मण पाटील, अनंता भामरे, जॉन्टी पाटील, रोहन पाटील, कुणाल पाटील, धीरज पाटील, आशिष मिटकर, विकी पाटील, हितेश पाटील, पंकज पाटील, रमाकांत ब.पाटील, महिला संगीता घरत, संगीता पाटील, कुंदा घरत, वासंती पाटील, ज्योती अ. पाटील, ज्योती सू.पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
         सुरवातीला कंपनीच्या शिष्ट मंडळाने मालक बाहेरगावी असल्याचे सांगत सात दिवसाची मुदत मागितली होती, मात्र मा. खासदार बाळ्या मामा यांनी मी तीन महिन्या पूर्वीच माहिती दिली असल्याचे सांगितले तेंव्हा कंपनीने या गंभीर गोष्टीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याचे सांगत आपले धरणे आंदोलन सुरू ठेवले. जस जशी माहिती परिसरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली तस तसे कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणीं पोहचू लागल्याने आंदोलनाने उग्ररुप धारण केल्याने अखेर कंपनीने शेतकऱ्यांच्या मगण्या मान्य केल्या.
        श  मा.खासदार श्री.बाळ्या मामा यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने काल्हेर, कोपर व पूर्णा गावच्या ग्रामस्थांनी मा.खासदार बाळ्या मामा व जमलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपल्याला अशी बरीच आंदोलने करून सर्व सामान्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे अशी माहिती खासदार श्री.बाळ्या मामा यांनी जमलेल्या ग्रामस्थांना व कार्यकर्त्यांना दिली आहे. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत हे आपल्या फौज फाट्यासह उपस्थित होते. सद्या या ठिकाणावरील कामे ही बाहेरील ठेकेदार व काल्हेर गावाचा गुंड सुजित तात्या करत आहे. ही कामे स्थानिक भूमिपुत्रांना मिळावीत अशी मागणी बाळ्या मामा यांनी धरणे अंदोलना दरम्यान केली होती. कारण की, सद्या मोठ्या प्रमाणावर कोपर व पूर्णा गावच्या हद्दीत कामे सुरू असल्याने या कामावर याच भूमी पुत्रांचा हक्क जास्त आहे. त्यामुळे जास्त कामे यांनाच मिळावीत अशी मागणी मा.खासादर बाळ्या मामा यांनी लावून धरली होती.

Friday, 13 December 2024

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

पुणे, प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा इच्छुक सुशिक्षित बेरोजगार व कारागीर व महिला बचतगटाने  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर. खरात यांनी केले आहे. 

या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगाकरीता ५० लाख रुपये तर सेवा उद्योगाकरीता २० लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचे किमान वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती ,जमाती , महिला,  इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त-जमाती, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि माजी सैनिकांकरीता वयोमर्यादा पाच वर्ष शिथील राहतील. 

अर्जदार यापुर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागिर, संस्था व बचत गट योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण व २५ लाख रुपयावरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. एका कुटुबांतील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.(कुटुंबाची व्याख्या ही पती पत्नी अशी राहील.) 

अर्ज करतावेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, लोकसंख्येबाबत ग्रामसेवकाचा दाखला, प्रकल्प अहवाल विहित नमुन्यातील इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुण् पत्रिका या कागदपत्रांसह छायाचित्र सोबत असावे. 
                          
इच्छुकांनी https://maha-cmegp.gov.in/homepage या संकेत स्थळावर अर्ज ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करतांना 'केव्हीआयबी' या एजन्सीची निवड करावी. अधिक माहितीकरीता जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४-ब पुणे मुंबई रस्ता, शासकीय दुध डेअरी समोर नवीन शिवाजी नगर. एस.टी. स्टॅन्ड शेजारी खडकी पुणे-४११००३ तसेच दु.क्र. ०२० २५८११८५९ आणि -dviopune@rediffmall.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.

त्रिदेवस्वरूप भगवान दत्तात्रय 🙏

त्रिदेवस्वरूप भगवान दत्तात्रय 🙏

     आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये भगवान दत्तात्रयांना खूप महत्व आहे. विशेष करून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भगवान दत्तात्रेयांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. भगवान दत्तात्रयांच्या अवतारांच्या शक्तीची जाणीव करून देणारी जागृत मंदिरे महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात आहेत.भगवान दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ, स्वामी नृसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ, अंश अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्भे महाराज, दत्त चिले महाराज तसेच सिध्द दत्तस्थान मंदिरे कुरवपूर, पिठापूर, कर्दळीवन, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, अक्कलकोट इत्यादी. 


      मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्त महाराजांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात. दत्तजयंतीचे महत्त्व असे की दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. यावेळी दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्तजन्म कथा दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा, श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली. श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. भगवान दत्तात्रयांचे तीन मुखी रूप सर्वच ठिकाणी प्रचलित आहे कारण त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे रूप मानले जाते. परंतु भरपूर ठिकाणी एक मुखी दत्तांची भक्ती केली जाते. महाराष्ट्रात नारायणपूर (पुणे) येथे एक मुखी दत्त आहेत. भगवान दत्तात्रयांनी दीन दुबळ्यांची सेवा करण्याचे अखंड कार्य केले. भारतीय हिंदू संस्कृतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी भारत भ्रमण केले आणि ठिकठिकाणी गादी स्थापन केली. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे.ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. गुजरात मधील गिरनार पर्वत हे भगवान दत्तात्रयांचे प्रमुख शक्ती स्थान मानले जाते. श्री दत्त अवलिये होते क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ  हा तिसरा अवतार आहे.
  
     सर्वांना दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा.!

      || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

                    || श्री गुरुदेव दत्त ||

- केतन दत्ताराम भोज
- कार्यकारिणी सदस्य -  मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाची निवड !!

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाची निवड !!

नालासोपारा/ पंकज चव्हाण : शिक्षण विभाग पंचायत समिती वसई तर्फे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत एस. के. सी शाळा आणि महाविद्यालय, नालासोपारा येथे आयोजित करण्यात आलेले होते. सदर विज्ञान प्रदर्शनात विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी उच्च प्राथमिक दिव्यांग विभाग( इयत्ता पाचवी ते आठवी) तसेच उच्च माध्यमिक दिव्यांग विभाग इयत्ता (नववी ते बारावी )या दोन्ही गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.

इयत्ता पाचवी ते आठवी या गटासाठी सागरी जलशुद्धीकरण प्रकल्पास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या प्रकल्पात अथक मेहनत करणारे विद्यार्थी कु.स्वरूप भूषण पाटील व कु.पल्लव पराग घरत आहेत.

इयत्ता नववी ते बारावी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा  'टेस्ला कॉइल द्वारे उच्च विद्युत निर्मिती' हा प्रकल्प आहे. सदर प्रकल्पासाठी अथक मेहनत करणारे विद्यार्थी कु. वेदांत संतोष गावठे व कु. हर्ष संजय मालप हे आहेत. 

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री महेंद्र पाटील सर व सर्व विज्ञान शिक्षक या सर्वांचे शाळेच्या सन्मा. मुख्याध्यापिका श्रीम. मुग्धा लेले,  सन्मा. उपमुख्याध्यापिका श्रीम. चित्रा ठाकूर, सन्मा. पर्यवेक्षिका श्रीम. किरण देशमुख  तसेच सहकारी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Thursday, 12 December 2024

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २७ गावं आणि १४ गावातील जटिल पाणीप्रश्न लवकरच सुटणार !!

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २७ गावं आणि १४ गावातील जटिल पाणीप्रश्न लवकरच सुटणार !!

डोंबिवली, प्रतिनिधी : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावं आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनियुक्त आमदार श्री. राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव श्री. पी. वेलारासू यांची भेट घेतली.

सदर बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिष्टमंडळात शिवसेना विधानसभा संघटक श्री. बंडूशेठ पाटील, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक श्री. दत्ता शेठ वझे, उपतालुकाप्रमुख श्री. गणेश जेपाल, उपतालुकाप्रमुख श्री. विकास देसले, विभाग प्रमुख श्री. किसन जाधव, विभागप्रमुख श्री. अनिल म्हात्रे, श्री. हितेश गांधी आदी मान्यवरांचा समावेश होता.

आमदार श्री. राजेश गोवर्धन मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावं आणि २७ गावांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

** समाजसेवेसाठी झपाटलेली माणसे पदमुक्त होतात..कार्यमुक्त नाही

रुग्णसेवेचा वटवृक्ष...आरोग्यदूत मंगेश चिवटे

** समाजसेवेसाठी झपाटलेली माणसे पदमुक्त होतात..कार्यमुक्त नाही

   महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन संवेदशील मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची पुन्हा निर्मिती करून नव्याने सुरुवात केली. कोरोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्यदूत म्हणत होते. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. या वैद्यकीय मदत कक्षाची धुरा आरोग्यदूत रुग्णसेवक मंगेश चिवटे यांच्यावर सोपविली. तेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षधिकरी मंगेश चिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे काम दोन वर्षाच्या कार्यकाळात राज्यभरात सर्वदूर पोहचविले. जात धर्म, पंथ न बघता रुग्णांना अडचणीच्या काळात काळ वेळ न बघता वेळेत वैद्यकीय उपचारासाठी मदत दिली. राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारांसाठी (कर्करोग, मेंदुरोग, हृदयविकार, किडणी / यकृत प्रत्यारोपण) तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असावा, अशी संकल्पना आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मांडली होती; त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी ११ मार्च २०१५ मध्ये या संकल्पनेस मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अस्तित्वात आला. जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्यानंतर शिवसेना- भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले. या महायुती सरकारच्या काळात राज्याचे तत्कालीन संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षामध्ये, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत, कक्ष प्रमुख मंगेश चिवटे कार्यरत असताना त्यांच्या निस्वार्थी टीमच्या साथीने एकूण ४१९ कोटी पेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. यामुळे ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले (रुग्णांच्या मदतीसाठी एकुण ३८१ कोटी २० लक्ष रुपये, तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणुन ३८ कोटी ६६ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले). गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कामकाज रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज सुमारे १२ तास सुरु असे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी देखील कामकाज सुरू असे. अगदी सण-उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केले. मंत्रालयाची वेळ बंद झाल्यावर देखील एकमेव मंत्रालयातील सातव्या मजल्यावर असलेले वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यालय रुग्णसेवेसाठी सुरू असल्याचे अनेकांनी बघितले असून अनेकदा अनेक वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल ही घेतली आहे. त्यामुळे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्यकाळात मंत्रालयात सुरू असलेले हे जरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असले तरीही आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी त्याला राज्यातील गोरगरीब रूग्णांचे आरोग्य मंदिरच बनवले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सर्वसामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध बदल करत १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये टोल फ्री क्रमांक ८६५०५६७५६७ सुरु केला. सोबतच रुग्णांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागु नये यासाठी Online Application प्रणाली सुरु केली गेली. (आता E-Mail व्दारे अर्ज स्विकारले जातात). मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये रुग्णालय अंगीकृत (Hospital Empanelment) प्रक्रिया तसेच या योजनेअंतर्गत रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपुर्णतः निःशुल्क/मोफत असल्याची जनजागृती केली गेली. ना वशिला, ना ओळख, थेट मिळते मदत हे ब्रिद वाक्य करुन हा कक्ष लोकाभिमुख बनवला. या योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यास आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या टीमला यश मिळाले. गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ऑनलाईन, पूर्णतः निःशुल्क आणि पारदर्शक केल्याने आता ही केवळ एक योजना राहिली नसून, ती लोकचळवळ करण्यात आरोग्यदूत मंगेश चिवटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना यश आले हे वास्तव आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याला मंत्रालयात नव्हे तर गावपातळीवरील रुग्णसेवकाशी केवळ संपर्क करावा लागत होता, ही सर्वात मोठी उपलब्धी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्यकाळात करण्यात आली. आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या निकषातील आजारांची संख्या वाढवणे, निधीची/मदतीची मर्यादा वाढवणे, उत्पन्नमर्यादेची अट शिथील करणे, योजनेच्या लाभासाठी सुलभता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाईन करणे, यांसारखे बदल करण्यात त्यांना यश आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अडीच वर्षात तब्बल ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ४१९ कोटी रुपयांची मदत वितरीत करता येणे, हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील हजारो निःस्वार्थ रुग्णसेवकांचे यश आहे असे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कक्षप्रमुख पदावरून मुक्त होताना प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची मदत केली आहे. यामध्ये आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात दौऱ्यावर असले किंवा कामात असले तरीही त्यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी कोणत्याही रुग्णाचा अर्ज गेला की ते लगेच सर्व काम बाजूला ठेऊन सर्वात प्रथम प्राधान्य ते रुग्णसेवेला देत असत, हे त्यांच्या कृतीमधून खूपवेळा दिसून आले आहे. तसेच अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. त्यावेळी आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. या सगळ्यामुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चेही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कालही अगदी आरोग्यदूत मंगेश चिवटे सर पदमुक्त होत असताना आपल्याकडील पदभार रामेश्र्वर नाईक यांना देत असताना चिवटे सरांमधील दिलदार मंगेश यावेळी दिसून आला. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्यदूत मंगेश चिवटे सर हे जरी त्या पदावरून पदमुक्त झाले असले तरीही त्यांच्यामधील रुग्णसेवक कालही जिवंत होता, आणि आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल यात काही शंका नाही. आज जरी आदरणीय आरोग्यदूत मंगेश चिवटे सर पदमुक्त झाले असले तरी समाजसेवेसाठी झपाटलेली माणसे पदमुक्त होतात.. कार्यमुक्त नाही. हेच त्यांच्या रुग्णसेवेतून दिसून येत आहे. आज महाराष्ट्रभरातून मंगेश सरांसाठी ज्या काही सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत यातून मंगेश चिवटे सरांच रुग्णसेवेच कार्य किती लोकाभिमुख होत असे सांगायची कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष अस नाव जेव्हा कधी भविष्यात वाचनात येईल तेव्हा-तेव्हा फक्त एकच नाव सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. ते म्हणजे आरोग्यदूत मंगेश चिवटे सर. महाराष्ट्राला या कक्षाची खरी ओळख मंगेश सरांनी करून दिली. याच सर्व श्रेय त्यांचच आहे.आरोग्यदूत मंगेश चिवटे सर यांच्या कार्याला सलाम.!

केतन दत्ताराम भोज
कार्यकारिणी सदस्य - मराठी वृत्तपत्र लेखक संघ,मुंबई 
भ्रमणध्वनी - ८८७९५४४५४०

Wednesday, 11 December 2024

५ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड तर्फे स्वराज्य चषक २०२५ चे भव्यदिव्ये आयोजन !

५ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड तर्फे स्वराज्य चषक २०२५ चे भव्यदिव्ये आयोजन !

मुंबई प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रिडा अशा अनेक क्षेत्रात कार्य करणारी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील नावाजलेली संघटना म्हणजेच "स्वराज्य प्रतिष्ठान रायगड". सन २०१४ रोजी संस्थापक श्री. भास्कर कारे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मुळात क्रिकेटच्या मैदानातच स्थापना  झाली. 

गेली १० वर्षांपासून  ह्या संघटने मार्फत अनेक उपक्रम राबविले जातात तसेच दरवर्षी स्वराज्य चषक नावाने क्रिकेट स्पर्धेचे आवर्जून आयोजन केले जाते. पुढील वर्षीचा  म्हणजेच २०२५ सालचे स्वराज्य चषक २०२५ हा उपक्रम एक महिन्या वर येवून ठेपला आहे. स्वराज्य प्रतिष्ठान रायगड तर्फे ह्या वेळी दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी गावदेवी मैदान वाशी ( जुहूगाव ) येथे मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. 

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण स्वराज्य चषक का घेतो? तर त्यांच्या मागे खूप मोठा हेतू आहे. सन २०१४ साली लावलेल्या ह्या वृक्षाचे आज त्याचे रूपांतर वटवृक्षामध्ये झाले.  पण हा वटवृक्ष जेव्हा रोपट होता तेव्हा त्यांची सुरवात ह्याच आपल्या स्वराज्य चषका पासून झाली आहे. म्हणून हे सामने दरवर्षी नित्यनियमाने  खेळवतो. तब्बल ४ वर्षांनी संघटनेच्या स्थापना दिनाच्या दिवशी आपल्याला चषक घेण्याची संधी मिळाली म्हणून सर्वांनी गरजेपेक्षा जास्त मेहनत घेवून आपले सामने यशस्वी पार पाडू या. 

ह्या ह्यावेळी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला पारितोषिक म्हणून रोख रक्कम आणि आकर्षक चषक असणार आहे आणि तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघाला त्याच बरोबर उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज क्षेत्ररक्षण, मालिकावीर ह्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. फक्त १६ संघ खेळवले जाणार आहेत आणि प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ आहे. तरी इच्छुक संघाने त्वरित सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सचिन आंबवणे, सचिव वैभव घाडगे,  खजिनदार अरुण उंडरे तसेच सर्व पदाधिकारी/ सदस्य यांच्या तर्फे प्रत्येक खेळाडूला करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नियम व अटी जाणून घेण्यासाठी सुनिल चाचले - ७५०६७५७१०९ आणि दर्शन ठमके - ८९७६५३५७४८ यांच्याशी संपर्क साधावा.  .

एन विभाग घाटकोपर पश्चिम मधील दत्तक वस्ती योजनांच्या कंत्राटांची चौकशी होणार ; मुख्य महानगरपालिका आयुक्तांचे आदेश !

एन विभाग घाटकोपर पश्चिम मधील दत्तक वस्ती योजनांच्या कंत्राटांची चौकशी होणार ; मुख्य महानगरपालिका आयुक्तांचे आदेश !

घाटकोपर, (केतन भोज) : मुंबई महानगर पालिकेने परिसरातील नालेसफाई आणि स्वच्छता गृहाच्या देखभालीसाठी दत्तक वस्ती योजना जाहीर केली. झोपडपट्टीत साफसफाई,घराघरांतून कचऱ्याचे संकलन, छोटी गटारे, सार्वजनिक शौचालये आदींची स्वच्छता करण्याकरिता पालिकेतर्फे ही योजना राबविली जाते. प्रत्येक महापालिकेच्या विभागा मध्ये लॉटरी पद्धतीच्या माध्यमातून दत्तक वस्ती योजनेसाठी संस्थांची निवड केली जाते आणि मग त्या संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते. यासाठी प्रत्येक सफाई कामगाराला पालिका वेतन अदा करते. त्यामध्ये संस्थांनी वस्तीच्या स्वच्छतेची सर्व कामे करून घ्यावी, असे या योजनेत अपेक्षित आहे. मात्र मुंबई महानगर पालिकेच्या एन विभागात घाटकोपर पश्चिम मधील दत्तक वस्ती योजनेत मोठा गैरकारभार चालू असून दत्तक वस्ती योजनेचे कंत्राटदार यांच्या माध्यमातून कामगार केवळ कागदावर दाखवून त्यांच्या वेतनाची रक्कम ठेकेदार खिशात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत, यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व प्रकारे चालू आहेत. तसेच दत्तक वस्ती योजना अस्तित्वात असून ही सर्वच वॉर्डात नाले सफाई, कचरा संकलन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. असा सर्व धक्कादायक प्रकार महानगर पालिकेच्या एन विभागाच्या घाटकोपर पश्चिम येथील सर्वच वॉर्डात सुरू आहे, तर एन विभागातील सर्वच वॉर्डातील स्वच्छतेची कामे होत नसल्याने ही योजना केवळ कागदावरच आहे. संस्थांच्या गैरप्रकारांमुळे या विभागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. तसेच या योजनेच्या नियमाप्रमाणे घरोघरी जाऊन कुठल्याच ठिकाणी कचरा संकलन होत नाही आणि विभागातील गटारांची ही सफाई होत नाही. त्यामुळे या योजनेचीचं आता स्वच्छता करावी अशी तेथील सर्व स्थानिक नागरिकांची मागणी आहे. तरी मुंबई महापालिकेच्या एन विभागातील घाटकोपर पश्चिम येथील दत्तक वस्ती योजनेच्या सर्वच कंत्राटांची योग्य प्रकारे चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांसह सामाजिक कार्यकर्ते यांनी मुंबई महानगपालिका मुख्य आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली होती. या तक्रारीची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून तत्काळ एन विभागातील घाटकोपर पश्चिम मधील सर्वच दत्तक वस्ती योजनांच्या कंत्राटांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Tuesday, 10 December 2024

त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड ; प्रचंड गर्दीमुळे दुरावला देव !

त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड ; प्रचंड गर्दीमुळे दुरावला देव !
त्र्यंबकेश्वर, (केतन भोज) : नाशिक जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या तसेच महाराष्ट्राच्या बाहेरूनही लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन करण्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचे नियोजनाअभावी हाल होत आहे. दर्शनासाठी भलीमोठी रांग लागत आहे. दर्शनरांगेत उभे राहून दर्शनासाठी तीन ते चार तासांची प्रतीक्षा भाविकांना करावी लागत आहे, पेड दर्शनासाठी दोनशे रुपये शुल्क देऊनही तीन तासांची लटकंती करावी लागते, यामुळे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक बाहेरूनच हात जोडून किंवा कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे भाविकांना देव दुरावल्याचे चित्र सद्या तरी दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी शनिवार, रविवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळत आहे. दर्शनबारीत चार ते पाच तास थांबावे लागत असल्याने भाविकांचे खूप हाल होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस प्रचंड वाढत्या गर्दीमुळे घुसमटणे, दम लागणे, चक्कर येणे असे प्रकार घडत आहेत, यात विशेषतः गर्भवती महिला, आजारी व्यक्ती तसेच लहान मुले यांना वाढत्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे मात्र, वाढत्या गर्दीमुळे भाविकांसाठी अद्यापपर्यंत मंदिर ट्रस्ट प्रशासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत त्र्यंबकेश्र्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना या सर्व प्रकरणाबाबत संपर्क साधून माहिती दिली असता, त्यांनी आपण यामध्ये आता स्वतः लक्ष देणार असल्याचे यावेळी सांगितले.

कुर्ला बस अपघात प्रकरण ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे घटनास्थळी जाऊन मदत कार्य !

कुर्ला बस अपघात प्रकरण ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे घटनास्थळी जाऊन मदत कार्य !

मुंबई, (केतन भोज) : मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बेस्ट बसने नागरिकांना चिरडल्याची दुर्देवी घटना घडली. या भीषण अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.अपघातानंतर तात्काळ तिघांचा मृत्यू झाला होता, तर उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी या घटनेची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी नागरिकांसाठी मदत कार्य सुरू केले, जखमींवर भाभा रुग्णालय, कुर्ला (प), हबीब रुग्णालय, कुर्ला (प), कोहिनूर रुग्णालय, कुर्ला (प) आणि सायन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. यावेळी रुग्णसेवक मंगेश चिवटे यांनी भाभा हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली व त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. सदर दुर्घटनेनंतर प्रसंगावधान दाखवून आमदार कुडाळकर आणि समस्त शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. तसेच या घटनेमध्ये जे कोणीही व्यक्ती जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या सर्व उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेणार असल्याची माहिती रुग्णसेवक मंगेश चिवटे यांनी दिली. सदर घटनेची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाचा मॅरेथॉन धमाल धाव मध्ये द्वितीय क्रमांक !!

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाचा मॅरेथॉन धमाल धाव मध्ये द्वितीय क्रमांक !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

न्याय हा मानवी समाज जीवनाचा आणि समाज सुरळीत कार्यरत राहील यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. जेव्हापासून मनुष्य समाज म्हणून एकमेकांसोबत राहू लागला आणि समाज व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हापासून न्यायाचा मुद्दा वेळोवेळी अधोरेखित केला गेला. अर्थात काळानुरुप न्यायदानाची प्रक्रिया आणि पद्धतही बदलत आली. कोणत्याही प्रांतामध्ये प्रशासनाचा वचक ठेवण्यासाठी न्याय हा फार महत्वाचा घटक असतो. 

हीच न्यायदेवता आणि विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार आणि आजची स्त्री सुरक्षित आहे का यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने नुकताच विरार येथे रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी झालेल्या १२व्या वसई विरार महापालिका आयोजित आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ वसई ह्यांच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये 
मुंबईच्या महाविद्यालयाच्या गर्दीत कायम आपले वेगळेपण जपत मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार पश्चिमेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय जे सर्वाधिक विद्यार्थीसंख्या सोबत  विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या  विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. हीच परंपरा जपत  महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या शिक्षिका प्रियांका नायर, प्रतीक्षा राऊत, रिद्धीमा जाधव, मनिता यादव, हितीक्षा राऊत ह्यांनी प्रातिनिधिक विविध क्षेत्रांतील महिलांवर होणारे अत्याचार ह्यावर प्रकाश टाकत त्या संदर्भातील विविध कायद्यांबद्दल  जनजागृती केली आणि द्वितीय पारितोषिक मिळविले.

विविध क्षेत्रातील मग ती सामान्य गृहिणी, डॉक्टर, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला किंवा अगदी शालेय विद्यार्थिनी असो त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार अधोरेखित करत त्या न्यायदेवतेकडे न्याय मागत आहेत असे दाखवत स्त्रीला सन्मान द्या घर सुखकर करा, हिंसा थांबवा हक्क जपा, रक्षक बना भक्षक नको, तिच्या कर्तुत्वाला ओळखा छळाला थांबवा, निरागसतेचा अपमान थांबवा आवाज उठवा अशा घोषणा करत मॅरेथॉन दरम्यान जनजागृती केली.

धमाल धाव मधील द्वितीय पारितोषिक विजेते शिक्षकांचे संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. मुग्धा लेले, उपमुख्याध्यापक श्री. सुभाष शिंदे, मार्गदर्शिका कल्पना राऊत यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

उत्कृष्ट पत्रकारिता पुस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन !!

उत्कृष्ट पत्रकारिता पुस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन !!


पालघर, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात वैविध्यपूर्ण वार्तांकन, लेखनासाठी विशेष योगदान दिलेल्या वृत्तपत्रीय/नियतकालिन (प्रिंट मीडिया) पत्रकारांना पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यासाठी समाजाभिमुख व प्रशासनाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या दखलपात्र लेखन केलेल्या पत्रकारांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील तीन पत्रकारांना पत्रकारिता पुरस्कारसाठी निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी पुरस्कारासाठी आपले अर्ज/प्रस्ताव "पालघर जिल्हा पत्रकार संघ" या नावाने पाठवायचे आहेत, :- जिल्हाधिकारी कार्यालय, पत्रकार कक्ष, दालन क्रमांक ०६, तळमजला, आवक जावक कक्षासमोर, कोळगाव जिल्हा मुख्यालय संकुल येथे शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरिता - ९५४५८२३२५५/९८९२८०५४०५ या क्रमांकावर संपर्क करावा.

आवेदन करणाऱ्या पत्रकाराने आपली माहिती असलेला परिपूर्ण अर्ज, नावासहित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची मूळ कात्रणे, वृत्तपत्रीय ओळखपत्र, पुरस्कार स्वीकारण्याचे स्वघोष्णपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पुरस्कार निवडीचा सर्वाधिकार पुरस्कार निवड समितीच्या अधीन राहील.

नियम व अटी
१) पत्रकाराचे कार्यक्षेत्र पालघर जिल्हा असावे.
२) पत्रकार हा शासनमान्य नोंदणीकृत वृत्तपत्राचा पत्रकार, वार्ताहर, प्रतिनिधी असावा.
३)किमान तीन वर्षापेक्षा जास्तचा अनुभव असावा.
४) पत्रकारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा.

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...