Tuesday, 30 December 2025

उरण तालुक्यातील शिक्षकांचे तंबाखू मुक्त शाळा विषयी प्रशिक्षण संपन्न !!

उरण तालुक्यातील शिक्षकांचे तंबाखू मुक्त शाळा विषयी प्रशिक्षण संपन्न !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : ग्रामीण रुग्णालय उरण, शिक्षण विभाग पंचायत समिती उरण, सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण पंचायत समिती उरण येथे संपन्न झाले. सदर प्रशिक्षण साठी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालय उरणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बाबासो काळेल, गटशिक्षणाधिकारी श्रीमती निर्मला घरत तर प्रशिक्षण साठी मार्गदर्शक सलाम मुंबई फाउंडेशनच्या श्रीमती सारिका ब्राऊन,दंत शल्यचिकित्सक डॉ.संतोष झापकर अणि जिल्हा रुग्णालय अलिबाग च्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमचे  सुशील साईकर हे उपस्थित होते. 

तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याने बर्‍याचदा उपचार घेण्यासाठी रूग्णांना दूरवर जावे लागते त्यामुळे आर्थिक अणि मानसिक त्रास होतो. यासाठी या कार्यशाळेतून शिक्षकांनी मुलांना आयुष्यभर तंबाखू अणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्यासाठी निश्चिंतपणे मदत होईल तसेच समाजात जनजागृती होईल असे डॉ काळेल यांनी आपल्या मनोगतात सांगितले . तर तंबाखूचे दुष्परिणाम अणि त्यामुळे होणारे कॅन्सर तसेच कोटपा कायदा २००३ याविषयी सविस्तर माहिती डॉ झापकर यांनी दिली. तर तंबाखू मुक्त शाळा याचे महत्व अणि ९  निकष याच्या विषयी समर्पक माहिती सलाम मुंबईच्या श्रीमती सारिका मॅडम यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील साईकर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर अणि शिक्षकांचे आभार केंद्र प्रमुख म्हात्रे सर यांनी मानले.

वीज कंत्राटी कामगारांचा ऐतिहासिक विजय मेळावा पुण्यात उत्साहात संपन्न !;

वीज कंत्राटी कामगारांचा ऐतिहासिक विजय मेळावा पुण्यात उत्साहात संपन्न !;

** रायगड जिल्ह्यातील कर्मचारी विजय मेळाव्यात सहभागी.

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न : भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांचा भव्य विजय मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार २२८५ वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे ११६७ वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील कर्मचारी सुद्धा मोठया संख्येने उपस्थित होते.

या वेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा निकाल कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून संपूर्ण देशातील कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक ठरणारा आहे.वीज कंत्राटी कामगार संघाने रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने, पुणे–मुंबई पायी मोर्चा, मंत्रालयावर धडक मोर्चा, नागपूर येथे धडक मोर्चा तसेच संविधान चौकातील उपोषण या संघर्षांची त्यांनी विशेष दखल घेतली. यापुढे विविध उद्योगांतील कंत्राटी व असंघटित कामगारांना लेबर कोडमधील लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने अधिक प्रभावी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांनी वीज उद्योगातील दीर्घकालीन कामगार चळवळीचा आढावा घेत कंत्राटी कामगारांसाठी संघटनेने मिळवलेली २०% व १९% वेतनवाढ तसेच नोकरी सुरक्षा (जॉब सेक्युरिटी ) संदर्भातील प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले आणि शासनाकडून यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.या मेळाव्यास भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई व ज्येष्ठ वकील विजय वैद्य हे प्रमुख वक्ते होते.राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित राहून कामगारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कामगारांच्या उर्वरित प्रश्नांबाबत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला पदाधिकारी श्रीमती बेबी राणी डे व ज्योती कदम यांनी मेधाताईंचे स्वागत केले. संघटनेचे माजी अध्यक्ष व मान्यवर शरद संत, श्रीपाद कुटासकर, सुभाष सावजी, धनंजय इनामदार, विजय मुळगुंद, आप्पा जाधव, अनंतराव मोडक, अण्णासाहेब धुमाळ, बाळासाहेब कांबळे, अर्जुन चव्हाण तसेच सर्व साक्षीदारांचा संघटनेतर्फे सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या मेळाव्यात संघटनेचे , अध्यक्ष निलेश खरात, कार्याध्यक्ष अमर लोहार, सरचिटणीस  सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटनमंत्री उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार यांनी संघटनेची आगामी दिशा व भूमिका स्पष्ट केली. १३ वर्षांचा हा संघर्ष अत्यंत कठीण असला तरी जिद्द, चिकाटी व सातत्यामुळे हे सामूहिक यश मिळाले आहे. वीज कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात छेडण्याचा ठराव मेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे येथील संघटनेचे पदाधिकारी सुमीत कांबळे, निखिल टेकवडे,  मार्गदीप मस्के , प्रवीण पवार त्यांच्या पूर्ण टीम ने मोलाचे योगदान दिले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११/ब मधून आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निलम निलेश व्यवहारे यांनी भरला उमेदवारी अर्ज !!

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११/ब मधून आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निलम निलेश व्यवहारे यांनी भरला उमेदवारी अर्ज !!

कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आय आदमी पक्षाने प्रभाग क्रमांक ११/ब मधून निलम निलेश व्यवहारे यांना उमेदवारी देत एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला आहे. आम आदमी पक्षाचे कार्य करत असताना त्यांनी जनतेच्या अनेक प्रश्नांवर काम केले आहे. प्रभागातील कोणतीही समस्या व जनतेच्या अडीअडचणीला निलम व्यवहारे काम करत आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आमचा विजय नक्की असा विश्वास व्यक्त केला. 

तसेच जनतेला त्यांनी आवाहन केले की आज आमचा पक्ष स्वच्छ चारित्र्याचा असल्याने आवाहन केले की मी नीलम निलेश व्यवहारे तुम्हा सगळ्यांना विनंती करते की, येत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2025-2026 सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक या पदासाठी उमेदवार म्हणून आम आदमी पार्टी पक्ष तर्फे झाडू या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 11 (ब) म्हणून त्यासाठी आपल्या आशीर्वाद स्वरूपामध्ये आर्थिक देणगी धनराशी आवश्यक आहे. तरी आपण वरील स्कॅनर वर मला मनापासून, खुल्या दिलाने आर्थिक सहकार्य करावे. ही अपेक्षा करते. मी आपली आभारी राहीन. एक रुपया पासून तुमची यथाशक्ती रुपये पाठवला तरी चालेल. पण आशीर्वादाच्या रूपात पाठवा. 

आपली साथ हीच आमची ताकद बनत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार निलम निलेश व्यवहारे यांनी सांगितले.

Mobile number - +91 92211 25052

.




.

प्रभाग क्रमांक १२३ चे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल निर्मळे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज !

प्रभाग क्रमांक १२३ चे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल निर्मळे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज !

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२३ मध्ये ज्या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या मध्ये तिकीट वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला होता. त्या जागेसाठी अखेर सोमवारी रात्री (ता.२९) रोजी उशिरा भाजपचे इच्छुक उमेदवार अनिल निर्मळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर वर याठिकाणी सर्वत्र तरुणांनी, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत उत्साह साजरा केला. अनिल निर्मळे यांचे प्रभाग क्रमांक १२३ मधील मागील बऱ्याच वर्षाचे सामाजिक काम बघता आणि त्यांची स्थानिक तरुणांमध्ये असलेली छाप पहाता त्यांना उमेदवारी मिळणे याठिकाणी निश्चितच होते असे स्थानिक तरुणांनी सांगितले. प्रभाग क्रमांक १२३ मधून भाजप-शिवसेना -आर.पी.आय. (ए) महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल निर्मळे यांनी मंगळवार (ता.३०) रोजी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. 

या प्रचार रॅलीची सुरुवात घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे विद्यमान भाजपचे आमदार राम कदम तसेच भाजप ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री चंद्रकांत मालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. ही भव्य प्रचार रॅली निळकंठेश्वर -डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक वर्षानगर - शंकर मंदिर, पार्कसाईट- आनंदगड- सुजाता हॉटेल -रामनगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर याठिकाणी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास अनिल निर्मळे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ही प्रचार रॅली निवडणूक कार्यालय, पंतनगर इथपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर अनिल निर्मळे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज पंतनगर याठिकाणी असलेल्या निवडणूक कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. तसेच यावेळी काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा सक्रीय सहभाग आणि तरुणांची ऊर्जा पाहायला मिळाली असून हे पाहता आता हा विजय अटळ असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला असून,प्रभाग क्रमांक १२३ मधून जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळताना दिसत आहे.आपली साथ हीच आमची ताकद बनत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार अनिल निर्मळे यांनी सांगितले.

उरण तालुक्यातील नवघर गावचे डॉ. हेमंत रामचंद्र कडू यांना संमोहन रत्न २०२५ पुरस्कार प्रदान !!

उरण तालुक्यातील नवघर गावचे डॉ. हेमंत रामचंद्र कडू  यांना संमोहन रत्न २०२५ पुरस्कार प्रदान !!

बारामती येथे "अस्मिता हिप्नोथेरपी अ‌ॅंड आउन्सलिंग सेंटरच्या वतीने "ग्लाेरी अचीव्हमेंट पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न.

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यातील नवघर गावचे डॉ. हेमंत रामचंद्र कडू यांना "ग्लोरी अचीव्हमेंट पुरस्कार सोहळा २०२५", या गौरवपूर्ण कार्यक्रमात संमोहन रत्न २०२५ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.सामाजिक,राजकीय, शैक्षणिक त्याचप्रमाणे उत्तम असे कार्य करणा-या अनेक व्यक्तींना संमोहन तज्ञ डाॅ.विजय कुमार काळे आणि डाॅ.रविकुमार काळे यांनी पुरस्कार प्रदान केले. हा पुरस्कार नि:शुल्क होता. त्याच्या या कार्यातून डाॅ.विजयकुमार काळे, दिशा काळे आणि डा‌ॅ.रविकुमार काळे, अश्विनी काळे यांची सामाजिक प्रगतीसाठी धडपड दिसून येत असून ते सदैव इतरांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात हे प्रयत्न त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून आले .त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे हा पुरस्कार प्रत्येक व्यक्तीचा विचार करून त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी तसेच योग्य दिशा प्राप्त व्हावी हाच उद्देश त्या मागचा असून समाजाची प्रगती व्हावी हिच धडपड आहे. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे डाॅ.अरूण अडसूळ (माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (पोलिस इन्पेक्टर बारामती शहर), निलेश पांडूरंग माने (पोलिस निरीक्षर ट्राॅफिक ब्रांच (बारामती शहर), सुमित सुनावणे (पत्रकार lBN लोकमत), आरती ताई गव्हाळे (शेंडगे) (समाजसेविका), अ‌ॅड.राहूल सोनवणे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता) इत्यादि प्रमुख पाहूणे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डाॅ.विजयकुमार काळे आणि डाॅ.रविकुमार काळे यांनी भुषविले, आशा शिरतोडे, रूपाली झारगड, योगेश नालंदे, डाॅ.पुजा साळूंखे, प्रथमेश मिशाळ, डाॅ.हेमंत कडू , प्रताप वाघमोडे, पुजा शेंदरकर, दिपक काळे, रेणुका राठोर, अनिकेत इनामके, अक्षय माने, किरण पवार, दिपक जाधव, दिपाली निंबाळकर, रविंद्र चव्हाण, समीर बनकर, अक्षय मांडगे, संतोष जगदाडे, संगीता वाघ, डाॅ.स्नेहल निंबाळकर, डा‌ॅ.स्नेहल टेकाळे, मनिषा लहाने, मनोज वाबळे इत्यादींना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगीता वाघ यांनी तर  आभार अश्विनी जाधव यांनी केले. तसेच टीम मधील आम्रपाली धेंडे, समृध्दी भोरडे, रोशनी संत आणि कुमार शिवशरण यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

उमेदवारी अर्ज भरताना अलका गणेश भगत यांची भव्य प्रचार रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

उमेदवारी अर्ज भरताना अलका गणेश भगत यांची भव्य प्रचार रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२७ मधून भाजप-शिवसेना -आर.पी.आय.(ए) महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांनी मंगळवार (ता.३०) रोजी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. 

उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांनी सकाळी अमृत नगर येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठातील स्वामी समर्थ महाराजांची पूजाअर्चा करून स्वामींच्या दर्शनाने पुढे नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या भव्य प्रचार रॅलीची सुरुवात घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार राम कदम, भाजप ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री - चंद्रकांत मालकर तसेच गणेश भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानंतर ही भव्य प्रचार रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक - इंदिरा नगर- जगदूशा नगर - गोळीबार रोड मार्गे निवडणूक कार्यालय, पंतनगर इथपर्यंत काढण्यात आली. यावेळी या प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा सक्रीय सहभाग आणि तरुणांची ऊर्जा पाहायला मिळाली असून हे पाहता आता हा विजय अटळ असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला असून, प्रभाग क्रमांक १२७ मधून जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळताना दिसत आहे. आपली साथ हीच आमची ताकद बनत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज भरताना अर्चना संजय भालेराव यांची भव्य प्रचार रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

उमेदवारी अर्ज भरताना अर्चना संजय भालेराव यांची भव्य प्रचार रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२६ मधून भाजप-शिवसेना -आर.पी.आय.(ए) महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चना संजय भालेराव यांनी मंगळवार(ता.३०)रोजी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. 

सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या भव्य प्रचार रॅलीची सुरुवात घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार राम कदम, भाजप ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री - चंद्रकांत मालकर,भाजपच्या महिला मोर्चा घाटकोपर पश्चिम विधानसभा अध्यक्षा-सौ.पूनम बोराटे (नायर) तसेच शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानंतर ही भव्य प्रचार रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक - आनंद नगर - गणेश मैदान - के.वि.के शाळा, उडपी हॉटेल, श्रेयस या मार्गे निवडणूक कार्यालय, पंतनगर इथपर्यंत काढण्यात आली. यावेळी या प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा सक्रीय सहभाग आणि तरुणांची ऊर्जा पाहायला मिळाली असून हे पाहता आता हा विजय अटळ असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला असून, प्रभाग क्रमांक १२६ मधून जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळताना दिसत आहे. आपली साथ हीच आमची ताकद बनत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चना संजय भालेराव यांनी सांगितले.

Sunday, 28 December 2025

ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून ५% अनुदानातून दिव्यांग निधी वाटप !!

ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून ५% अनुदानातून दिव्यांग निधी वाटप !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : ग्रामपंचायत नवघर तर्फे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत निधीतून ५% अनुदानातून  दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत नवघर च्या सरपंच सविता नितीन मढवी, उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे, ग्रामसेवक अविनाश मधुकर पिंपलकर, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य विश्वास तांडेल, दिनेश बंडा, संध्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य आरती चौगुले, कुंदन कडू, अक्षरा जोशी, श्रीमती उषा बंडा, नयना बंडा, श्रीमती रंजना भोईर, कविता पाटील, रत्नाकर चौगुले, नम्रता पाटील, प्राची पाटील, जयमला पाटील, ग्रामपंचायत मधील स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते अविनाश म्हात्रे, नितिन मढवी, आतिश भोईर, कुंदन बंडा, महावीर पाटील,अरुण पाटील आणि ग्रामपंचायत मधील कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत नवघर तर्फे शासनाच्या विविध योजना, उपक्रम, सेवा सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सतत अविरतपणे सुरु असून जनतेच्या कल्याणासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ हे प्रयत्नशील असून ग्रामपंचायत तर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी योजना उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आले आहे.

Saturday, 27 December 2025

पत्रकार श्री युवराज बच्छे यांना दर्पणरत्न' पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

पत्रकार श्री युवराज बच्छे यांना दर्पणरत्न' पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

चाळीसगाव, प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रिय नामांकन ( आय एस ओ 9001-2015). प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित राज्यस्तरिय 'दर्पण रत्न' पुरस्कार २०२६ साठी कळमहू ता चाळीसगाव येथील पत्रकार व आदर्श समाज सेवक श्री युवराज नामदेव बच्छे यांची निवड करण्यात आली आहे. शोध पत्रकारीता व सामाजीक, शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी श्री युवराज बच्छे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना आता पर्यंत सामाजीक कार्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार तसेच शैक्षणीक कार्यासाठी सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षारत्न पुरस्कार तसेच भारत रत्न मा पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान पुरस्कार मिळाले आहेत: आहे वाम एसएस् इंडिया नुवी दिल्ली करून रिटायर्ड फौजीच्या संस्थेकडून राष्ट्रिय गौरव पुरस्कार मिळाला आहे.

हिन्दी मराठी पत्रकार संघ व दर्पण वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारीता, शिक्षण, साहित्य, सामाजीक, खेळ, राजकीय सौदर्श, डॉक्टर, वकिल, महीला, सहकार पतसंस्था, कला इ. क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानीत करण्यात येते. कळगडू येथील आदर्श समाज सेवक व पत्रकार भी युवराज नामदेव बच्छे यांना दि. ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंगल कार्यालय मलकापूर जि. बुलढाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पण रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Friday, 26 December 2025

रेल्वे कारशेड सुविधांसाठी कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आक्रमक !!

रेल्वे कारशेड सुविधांसाठी कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आक्रमक !!

 दि.२६, कळवा (ठाणे) :

अनधिकृत प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुढे करून मध्य रेल्वेने कळव्यातील गेली कित्तेक वर्षे सुरू असलेली कारशेड प्रवासी वाहतूक बंद करण्याचे ठरविले आहे. कारशेड मधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला आळा बसावा म्हणून कळव्यात रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधून कळवा पश्चिमेकडे कारशेडच्या वरून पादचारी पुल निर्माण होत आहे.

वास्तविक गेल्या काही वर्षात कळव्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने आणि अपुऱ्या सोयी सुविधांअभावी कळवा स्टेशन मधून सकाळच्या वेळी मुंबई कडे प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. तसेच यावेळी कल्याणकडून येणाऱ्या सर्वच लोकल खचाखच भरून येत असल्याने कळवेकरांना लोकल मि ळणे खूप कठीण जाते. दरवाजात लटकून प्रवास केल्याने कळवा ठाणे दरम्यान असलेल्या खाडीत पडून आजवर कित्तेक प्रवाशांचा मृत्यू देखील झालेला आहे. म्हणूनच नाईलाजाने स्वतः चा जीव धोक्यात घालून कळव्यातील बहुसंख्य नागरिक कारशेडमधून सुटणाऱ्या गाड्यांनी रोज मुंबईकडे प्रवास करतात. यात प्रामुख्याने, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

परंतु आता रेल्वे प्रशासनाने अनधिकृत प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुढे करून कळवेकरांची ही सुविधा बंद करण्याचा घाट घातला आहे.

दरम्यान मध्य रेल्वेचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता कळवा मुंब्रा प्रवासी संघर्ष समिती मैदानात उतरली असून रेल्वे प्रशासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात कळव्यात ठिकठिकाणी जनजागृती अभियान राबविले जात आहे. रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या या अभियानाला कळव्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने कळवेकर या अभियानात सामील होत असून मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आपला रोष प्रगट करीत आहेत.

दरम्यान या अभियानाला अधिक बळकटी मिळावी म्हणून रेल्वे प्रवासी सुरक्षा समितीने रेल्वे महाप्रबंधक यांची भेट घेऊन त्यांना कळवेकरांच्या कारशेड बाबतच्या मागणीसह इतरही काही मूलभूत मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच कळव्यातील बहुसंख्य नगरसेवकांना देखील रीतसर पत्र देऊन या अभियानात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कळव्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटील तथा समाजसेवक मंदार केणी यांनी याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून कारशेड सुविधा बंद करण्यापूर्वी कळवेकरांना आधी होम प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान दिवसेंदिवस कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या या कळवा कारशेड बाबतच्या अभियानाला नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत असून रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे समितीचे संयोजक प्रथमेश उपरकर यांनी सांगितले आहे.

यु .ई. एस. ज्युनिअर कॉलेज यांनी रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ मध्ये प्रथम क्रमांक तसेच निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस !!

यु .ई. एस. ज्युनिअर कॉलेज यांनी रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ मध्ये  प्रथम क्रमांक तसेच निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासनाच्या रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग - अलिबाग तर्फे दिनांक २३-१२-२०२५ ते २४-१२-२०२५ ह्या कालावधी मध्ये सेंट विल्फ्रेड स्कूल, शेडुंग, पनवेल येथे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ आयोजन केले होते. ह्या प्रर्दशनामध्ये एकूण ४५ शाळा व कॉलेजने सहभाग घेतला होता. ज्यात यु. ई. एस. ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला तर निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले.  तसेच आता हा यु. ई. एस. चा प्रकल्प, राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्पासाठी पात्र ठरला आहे. 

विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एसटीइएम ह्या विषयावर ज्यु. कॉलेजच्या  एकूण १५ विदयार्थ्यांनी प्रकल्प तयार करुन प्रदर्शनात सहभाग घेतला होता. ज्यास एकूण ४५ शाळा व कॉलेजमधून प्रथम क्रमांक मिळाला तर कु. भार्गवी मंदार जाधव हिस निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.  

ह्या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे ज्यु. कॉलेजचे  प्रतिक प्रशांत पाटील व कु. केतकी चंद्रविलास ठाकूर ह्यांचे व सर्व सहभागी विदयार्थ्यांचे यु .ई. एस. संस्थेचे कमिटी मेंबर्स व स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या व समन्वयक, माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका ह्यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. व आता थोड्याच दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातही यु. ई. एस. चे विदयार्थी व शिक्षक घवघवीत यश मिळवून कौतुकास पात्र ठरतील, ह्यात तिळमात्रही शंका नाही.

चिर्ले ही क्रिकेटची पंढरी आहे : महेंद्रशेठ घरत

चिर्ले ही क्रिकेटची पंढरी आहे : महेंद्रशेठ घरत

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
"उरण तालुक्यातील चिर्ले ही क्रिकेटची पंढरी आहे. रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम नाईट क्रिकेट स्पर्धा या चिर्लेच्या मैदानावर झाल्या होत्या. तो इतिहास चिर्लेच्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आजपर्यंत जपला आहे. या मैदानावरील व्यासपीठावर राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत.  त्यामुळे या भूमीला क्रिकेटचा उत्तम वारसा आहे. चिर्ले हे हुतात्म्यांचे गाव आहे. त्यामुळे या गावाला कायमस्वरूपी मैदानासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन," असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले. 

उरण तालुक्यातील चिर्ले येथे चॅलेंजर ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. प्रकाशझोतातील या ट्रॉफीचे बुधवारी (ता. २४) महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

यावेळी चॅलेंजर ट्रॉफीचे प्रमुख आयोजक माजी उपसरपंच समाधान माळी यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक रायगड जिल्हा अध्यक्ष अखलाक शिलोत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य डॉ. मनीष पाटील, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी, वैभव पाटील, मुरलीधर ठाकूर, विनोद पाटील, घनश्याम पाटील, अविनाश ठाकूर, रमेश पाटील, अश्वित थळी, तसेच असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि एमजी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी भव्य कार रॅलीने रसिकांचे लक्ष्य वेधले होते

उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वीकारला पदभार !!

उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वीकारला पदभार !!

आम्ही उरणच्या नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध राहू, आम्हाला भेटण्यासाठी कोणती अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही तसेच लोकांसाठी आमचा जनता दरबारही राहील - नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचे प्रतिपादन


** ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती आणि आज उरणच्या जनतेने जनशक्तीचा विजय करून दाखवला आहे.


उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी आम्ही उरणच्या नागरिकांसाठी २४×७ उपलब्ध राहू, आम्हाला भेटण्यासाठी कोणती अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही तसेच लोकांसाठी आमचा जनता दरबारही राहील अशी माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली. 

त्या म्हणाल्या की, उरणच्या सुज्ञ नागरिकांनी मला आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जे भरघोस मताधिक्य दिले, त्याबद्दल मी जनतेचे मनःपूर्वक आभार मानते. आज या खुर्चीवर बसताना माझ्यावर उरणच्या जनतेच्या विश्वासाचे दडपण नक्कीच आहे. पण ही खुर्ची केवळ एसीमध्ये बसून राहण्यासाठी नसून ती जनतेच्या सेवेसाठी आहे. जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मी दर १५ दिवसांनी एकदा 'जनता दरबार' घेणार आहे.

लोकांमध्ये उतरून त्यांची सेवा करणे हेच माझे ध्येय असेल. कोणत्याही नागरिकाला आपल्या कामासाठी किंवा भेटीसाठी माझी 'अपॉइंटमेंट' घेण्याची गरज पडणार नाही; आमची दारे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उघडी असतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

आज मिळालेले हे यश म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या गरजांकडे केलेले दुर्लक्ष आणि विकासकामांचा अभाव यांचाच परिणाम आहे. गेल्या १५ दिवसांत लोकांनी जे प्रेम आणि सहकार्य दिले ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. मी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसह सर्वच लोकप्रतिनिधींना हेच सांगू इच्छिते की, नगरपरिषदेत पाऊल ठेवताना सर्व पक्षांचे झेंडे बाहेर ठेवा आणि आपण केवळ 'जनतेचे सेवक' आहोत, याचे भान ठेवून काम करा असे आवाहन त्यांनी केले. 

प्रचारादरम्यान आमचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, बाळ्या मामा आणि स्वर्गीय प्रशांत पाटील साहेब यांच्याबद्दल विरोधकांनी अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरून त्यांचा अपमान केला. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा अपमान मी मुळीच सहन करणार नाही आणि यापुढे उरणच्या कोणत्याही सुपुत्राला बोलण्याचे धाडस कोणी करणार नाही, याची खात्री मी आज देते अशा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. 

या निवडणुकीत केवळ भूमिपुत्रांनीच नाही, तर सर्व समाजांनी आणि सर्वधर्मीयांनी मला साथ दिली आहे. मी 'सर्वधर्म समभाव' जपून सर्वांना समान सन्मान देण्याचे आणि कोणाबाबतही दुजाभाव न बाळगण्याचे आश्वासन देते तसेच आज आमची सत्ता राज्यात किंवा केंद्रात नसली, तरी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन उरणच्या विकासासाठी हक्काने निधी आणि मदत मागणार आहे. केंद्रातील प्रश्नांसाठी सुप्रिया ताई सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि बाळ्या मामा यांच्या माध्यमातून संसदेत आवाज उठवला जाईल असे त्यांनी सांगितले. विरोधकांनी कितीही वल्गना केल्या की आम्ही 'टाचणीभर' काम करू देणार नाही, तरी त्यांनी एक लक्षात ठेवावे की, आदरणीय शरद पवार साहेबांनी मला शब्द दिला आहे - "कोणाच्या बापालाही घाबरायची गरज नाही, तुम्ही जनतेसाठी काम करा, आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत." पवार साहेबांचा शब्द दिल्लीचे तख्तदेखील पाळते, त्यामुळे उरणकरांच्या हितासाठी मी शेवटपर्यंत निष्ठेने काम करत राहीन असे आश्वासन त्यांनी दिले.

Thursday, 25 December 2025

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डच्या ०५ संघांना सर्वोच्च पुरस्कार आणि ०३ संघांना उत्कृष्टता (रौप्य पदक) प्रदान !!

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डच्या  ०५ संघांना सर्वोच्च पुरस्कार  आणि ०३ संघांना उत्कृष्टता (रौप्य पदक) प्रदान !!


उरण दि २५(विठ्ठल ममताबादे)

गुणवत्ता संकल्पना -२०२५ वरील राष्ट्रीय अधिवेशन ग्रेटर नोएडा येथील जीएल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित करण्यात आले होते. या गुणवत्ता परिषदेत कॅप्टन राजा राम (डीजीएम क्यूए) यांच्या नेतृत्वाखाली एकूण ०८ क्यूसी संघांनी नेव्हल डॉकयार्ड, मुंबईचे प्रतिनिधित्व केले. पुरस्कारासह संघाने खालीलप्रमाणे यश संपादन केले आहे. :-

१) टीम अभिनव-सी. क्रमांक ५५/ WEA -- PAR EXCELLENCE
 
२) टीम दृष्टी- C. क्रमांक ४४/EPS -- PAR EXCELLENCE 

३) टीम SAHAS- C. क्रमांक २३/आउट -- PAR EXCELLENCE 

४) टीम SIKSHA - C क्रमांक ३२ DAG -- PAR EXCELLENCE 

५) टीम उज्ज्वल - C क्रमांक २७/GES

६) ASTRA- C. क्रमांक ५६/WEA--- EXCELLENCE 

७) टीम सुरक्षा- C. क्रमांक २५/ आउटफिट---- EXCELLENCE

८) टीम समर्थ - C क्रमांक ४६/ EPS -- EXCELLENCE संपूर्ण भारतातील १४०० + QC संघांनी या अधिवेशनात भाग घेतला.

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डच्या सर्व ०५ संघांना सर्वोच्च पुरस्कार " PAR उत्कृष्टता (सुवर्ण)" मिळाला आणि ०३ संघांना उत्कृष्टता (रौप्य पदक) प्रदान करण्यात आले. मॉडेल स्पर्धेत विजेता टीम शिक्षा (MDAG विभाग) आणि टीम उज्ज्वल (MGES विभाग) याशिवाय यार्डमधील एका कर्मचाऱ्याला QC स्पर्धा श्रेणींव्यतिरिक्त इतर श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.श्रीमती भाग्य (MWEA विभाग) कडून QC घोषवाक्य पुरस्कार विजेता सर्व QC संघांनी त्यांचे केस अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सादर केले आणि न्यायाधीशांनी त्यांचे कौतुक केले.

आगरी कोळी कॉमेडी जोडी भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत "द्रोणागिरी भूषण" पुरस्काराने सन्मानित..!

आगरी कोळी कॉमेडी जोडी भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत  "द्रोणागिरी भूषण" पुरस्काराने सन्मानित..!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : कला क्षेत्रामध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल आगरी कोळी कॉमेडी जोडी  भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत यांना २०२५ चा अतिशय प्रतिष्ठेचा "द्रोणागिरी भूषण" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री चा हात असतो असंच रोशन घरत यांच्या बाबतीत घडलं. रोशन घरत यांना वयाच्या १० व्या वर्षापासुन अभिनय क्षेत्रामध्ये काम करायची आवड, अभिनय हा त्यांचा आवडता विषय पण त्यांच्या पत्नीचा अभिनय हा विषय नव्हता. त्यांनी  आपल्या पत्नीला ५ वर्षापूर्वी तू माझ्यासोबत युट्यूब चॅनलवर काम करशील का अस म्हटलं पण पत्नीने त्यांना नकार नाही दिला त्या बोलल्या तुम्ही मला शिकवा मी काम करायला तयार आहे आणि आजतागत त्यांच्यासोबत २५ कॉमेडी  व्हिडिओ मार्फत सामाजिक संदेश देण्याच काम केलं तसेच इन्स्टाग्राम पेजवर पण  त्यांच्यासोबत कॉमेडी व्हिडिओ मध्ये काम करत आहेत.Roshan aanachi comedy या युट्युब चॅनलवर या दोघांनी आतापर्यंत २० व्हिडिओ मध्ये काम केलं आहे. सदर कला जोपासत असताना त्यांना बऱ्याच मंडळीने चांगले मार्गदर्शन केले अष्टगंध नाट्यमंडळाने "नाट्यकलाकार" म्हणून ओळख निर्माण करून दिली.बाबा लगीन, गावकज्या परक्यांची मज्जा,पैशाने तुटली नाती, आगरी पेठा या नाटकामध्ये काम करून प्रेक्षकांना पोटभरून हसवण्याचे काम रोशन घरत यांनी केले.

आगरी कोळी कॉमेडी कलाकार अमन वास्कर यांच्या सोबत जवळ पास ३५ कॉमेडी विडोओ मधे काम केले आहे. अमन वास्कर युट्युब चॅनल वर दोघांनी पण काम केलं आहे.बहिरानाथ कळाप्रेमी यु ट्यूब चॅनल, अष्टगंध कलामंच नाट्य मंडळ व युट्युब चॅनल वर पण काम केलं आहे तसेच पंकज ठाकूर विनायक माळी यांच्या चॅनल वर देखील काम करण्याची त्यांना संधी भेटली.रोशन घरत यांचा सुरुवातीचा प्रवास अतिशय खडतर होता, लोक नाव ठेवायची, तुला हे करता येईल का ? परंतु त्यांनी लोकांच्या निंदेला न लागता नाट्य क्षेत्रात आपल्या अभिनयाच्या जोरदार भरीव कामगिरी केली आहे. स्वतःच एक वलय निर्माण केलं आहे.आज यशाचा उत्तुंग शिखरावर नेवून ठेवलंय. हे सर्व काही काही असले तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.एक उत्कृष्ट नाट्य कलाकारासोबत एक उत्कृष्ट माणुसकीचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत यांना २०२५ चा अतिशय प्रतिष्ठेचा "द्रोणागिरी भूषण" पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

सरकारने भूमिपुत्रांचा केसाने गळा कापला : महेंद्रशेठ घरत

सरकारने भूमिपुत्रांचा केसाने गळा कापला : महेंद्रशेठ घरत

चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी काळ्या फिती लावून सरकारचा केला निषेध

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : "सरकार हे सत्तापिपासू झाले आहे. सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात दंग झालेत. त्यांना सत्तेची नशा चढलीय. १९३० च्या  जंगल सत्याग्रहाचा इतिहास उरणला आहे. १९८४ च्या लढ्याचे प्रणेते दि. बा. पाटील साहेब आहेत. त्या ऐतिसाहिक आंदोलनात पाच हुतात्मे झालेत.  साडेबारा टक्केचा कायदा देशभर लागू झाला तो दिबांमुळेच, ओबीसी-मंडल आयोग लढ्याचे ते शिलेदार आहेत. तरीही आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिले जात नाही. त्यांच्या नावाबाबत जो सरकारचा बोलघेवडेपणा सुरू आहे, त्याबाबत सरकारचा तीव्र निषेध. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भूमिपुत्रांनी सत्ताधाऱ्यांना पहिला झटका द्यायला हवा.विमानतळाचे उदघाटन झाले, आजही विमानही उडाले, तरीही सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे, याची जाण आता भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना झाली आहे. 

भूमिपुत्रांच्या छाताडावर वसलेल्या विमानतळाला दिबांच्या नावाची सरकारला कशामुळे ऍलर्जी आहे. तीन वेळा आश्वासन देऊनही भूमिपुत्रांची सरकार चक्क फसवणूक करीत आहे. त्यामुळे बीजेपी सरकारला दणका देणे गरजेचे आहे.जोपर्यंत दिबांचे विमानतळाला नाव दिले जात नाही तोपर्यंत तरी दिबांचे पुत्र अतुल पाटील यांनी भाजपला लाथ मारायला हवी होती, पण ते त्यांना जमले नाही. सरकारने एकप्रकारे भूमिपुत्रांचा आता केसाने गळा कापला आहे, पण सर्वसामान्य जनता कोणत्याही क्षणी पेटून उठेल आणि सरकारला नेस्तनाबूत करेल, हे सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे तातडीने दिबांचे नाव विमानतळाला द्या," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. दिबांचे नाव विमानतळाला न दिल्याने चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी आज काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला, त्यावेळी महेंद्रशेठ घरत बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, निलेश पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.

मोठीजुई गावाने नवीन पायंडा पाडला : महेंद्रशेठ घरत

मोठीजुई गावाने नवीन पायंडा पाडला : महेंद्रशेठ घरत 

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : "उरण तालुक्यातील मोठीजुई गाव हे एकेकाळी उरण तालुक्यातील दुर्लक्षित गाव समजले जात होते; परंतु या गावात ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखविले. नुकतेच एका तरुणाचे अपघात दुर्दैवी निधन झाले. गावातील तरुणांनी व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून त्या तरुणाला आर्थिक साह्य म्हणून प्रत्येकी १०० रुपये मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून चक्क साडेसात लाख रुपये जमा झाले. हा मोठीजुई गावाने उरण तालुक्यात नवीन पायंडा पाडला आणि आदर्शही घडवला आहे, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, विशेषतः तरुणांचे मनापासून अभिनंदन! तसेच टेनिस क्रिकेट सामने आज गावोगावी होत आहेत; परंतु वातानुकूलित व्यासपीठ, चांदीचा चषक, विजेत्यांना चांदीच्या अंगठ्या, क्रिकेट रसिकांना लकी ड्रा द्वारे बक्षीस देण्याचा आणखी एक नवीन पायंडा मोठीजुई गावाने क्रिकेटमध्ये पाडला आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांची चुरस आणखी वाढेल आणि रंगतही वाढेल,' असे मत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी बुधवारी (ता. २४) मोठीजुई गावच्या प्रीमियर लीगप्रसंगी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते यावेळी टेनिस स्पर्धांचे उद्घाटन झाले.

"मोठीजुई गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आता हक्काच्या मैदानासाठी कंबर कसली पाहिजे, मी त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे. मैदाने वाचविण्यासाठी गुरुचरण वा इतर जमीन असो, परंतु अडवा आणि मैदानाला प्राधान्य द्या," असेही महेंद्रशेठ घरत यांनी आश्वासित केले. यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी महेंद्रशेठ घरत यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी माजी सरपंच दीपक भोईर, मोठीजुई गावचे काँग्रेस अध्यक्ष रमेश पाटील, युवा कार्यकर्ते अमेय पितळे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले

नवी मुंबई विमानतळ सुरू, भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचे काय ?

नवी मुंबई विमानतळ सुरू, भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचे काय ?


उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
नवी मुंबई विमानतळावरून नियमित उड्डाणे सुरू करण्याची घोषणा होत असताना, या विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे.नोकऱ्या नसल्याने प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आचारसंहितेचे कारण पुढे करून भूमिपुत्रांच्या अस्मितेच्या लक्ष्याला स्थगिती दिली जाते, मात्र विमान कंपन्यांचे उद्घाटन सोहळे, जाहिरातबाजी आणि उड्डाणांची तयारी यांना आचारसंहिता लागू होत नाही, हा सरळसरळ दुटप्पीपणा असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या असतील, तर त्या बदल्यात मिळणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायही कायमस्वरुपीच मिळाले पाहिजेत. 
खासगी एजन्सीमार्फत कंत्राटी कामगार भरती करून भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रकल्पग्रस्तांनी एक संतप्त सवाल उपस्थित केला आहे, "ज्यांच्या संघर्षांमुळे नवी मुंबई उभी राहिली, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव भूमिपुत्रांकडून प्रस्तावित आहे.  नवी मुंबई विमानतळाला कधी  लागणार?" उद्घाटन झाले, उड्डाणे सुरू होत आहेत. मात्र नामकरणाच्या बाबतीत शासन मुद्दाम टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

नामकरणासाठीची अस्मितेची लढाई आचारसंहिता संपल्यानंतर अधिक तीव्रतेने उभी राहीलच. मात्र किमान नवी मुंबई विमानतळावरील कामगार भरतीत तरी भूमिपुत्रांची फसवणूक होऊ नये, यासाठी  भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे" ही मोहीम तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता विमानतळ सुरु झाल्याने प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचा विश्वासघात झाला आहे.

बालमोहन शाळेतील स्वराली पाटील हिची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड !!

बालमोहन शाळेतील स्वराली पाटील हिची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी  द्वारा आयोजित राज्यस्तर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा 2025-26 स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. दिल्लीत पुढे ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर खेळवण्यात येणार असून बालमोहन विद्यालयची विद्यार्थी स्वराली संतोष पाटील हिची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
            महाराष्ट्राच्या कोल्हापुर जिल्हातील गगनबावडा तालुक्याचे व मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते, हॉटेल व्यवसाय उद्योजक संतोष पाटील यांची कन्या स्वराली संतोष पाटील हिची 69 व्या राज्यस्तर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा अंडर 14 साठी महाराष्ट्र संघासाठी मुंबई मधून निवड करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातुन एक खेळाडू अश्या प्रकारे निवड करण्यात आली आहे. ज्या मध्ये महाराष्ट्र संघाची सदस्य म्हणून स्वराली पाटील हीची निवड मुंबई जिल्हातून करण्यात आली आहे. सदर स्पर्धा दिनांक 10 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान दिल्ली येथे खेळवली जाणार आहे. स्वराली पाटील हीच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Wednesday, 24 December 2025

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत वर्षअखेरचा प्राथमिक नागरी संरक्षण प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्साहात संपन्न !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत वर्षअखेरचा प्राथमिक नागरी संरक्षण प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्साहात संपन्न !!

बातमीदार कल्याण प्रतिनिधी : ता. २४, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत वर्षअखेरीस आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक नागरी संरक्षण पाठ्यक्रम क्र. २८/२०२५ चा समारोप आनंदी व उत्साहात संपन्न झाला.

मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार दि. १८ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत दुपारी १२.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत लाईट हाऊस, स्किलिंग सेंटर, विराट रेसिडेंसी, आंबिवली (प.), ठाणे येथे सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणाच्या पाचव्या व अंतिम दिवशी (दि. २२/१२/२०२५) सहाय्यक उपनियंत्रक श्री. आननसिंग गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्याने तसेच विविध आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रात्यक्षिकांचा सराव व त्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सहभागी सामान्य नागरिकांमधील २७ प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

सांगता समारोप कार्यक्रमास लाईट हाऊसच्या अध्यक्षा मॅडम व सचिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षण संघटनेत भरती होण्याबाबत शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षण काळातील काही निवडक छायाचित्रे माननीय महोदयांच्या माहिती व अवलोकनार्थ सादर करण्यात आली. सदर प्रशिक्षणामुळे आपत्ती व्यवस्थापनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन समाजासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक तयार होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर यशस्वी !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर यशस्वी !!

बातमीदार कुर्ला (प.) प्रतिनिधी: ता. २४,
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.), मुंबई येथे आज विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सामान्य आरोग्य तपासणी व मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या शिबिरासाठी स्वराज्य सेवाभावी संस्था, करीरोड, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. रमेश शेळके, डॉ. फैजान सिद्दिकी व डॉ. श्री. आदित्य सोनवणे हे नेत्र तपासणीसाठी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ. अंजली तळवळकर मॅडम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वेळात वेळ काढून उपस्थित राहून विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली.

सदर शिबिरात इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ आरोग्य व दृष्टीविषयक समस्या आढळून त्यांना आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर मार्गदर्शन करताना सांगितले की, “शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने रात्र शाळांमध्ये दिवसभर काम करून धावपळीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून घेत आहोत.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर, शिक्षक श्री समाधान खैरनार, श्री योगेश वीरकर सर, श्री ओव्हाल सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रमोद गीते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मासूम संस्थेच्या निकिता पोळ मॅडम याही कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. 

आरोग्य तपासणी शिबिरामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचा यशस्वी सहभाग " !!

*" राजभवन आयोजित ;  **चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट...