Wednesday 8 February 2023

महाबळेश्वर तालुका रहिवाशी संघटना नालासोपारा संघटनेला आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार- २०२३ ने सन्मानित !

महाबळेश्वर तालुका रहिवाशी संघटना नालासोपारा संघटनेला आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार- २०२३ ने सन्मानित !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर/दिपक मांडवकर )
             आधार फाउंडेशन आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स फाऊंडेशनचा आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा- २०२३ नुकताच रवींद्रनाथ नाट्यमंदिर प्रभादेवी, दादर मुंबई या ठिकाणी पार पडला.या कार्यक्रमात संघटनेला  अल्पवाधितच आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार-२०२३ मिळाला.श्री. भानुदास निकम  (अध्यक्ष - आधार फाऊंडेशन ), श्री. सागर शेलार (अध्यक्ष -महाराष्ट्र स्पोर्ट्स फाउंडेशन,अंतर राष्ट्रीय कराटे चॅम्पियन ) यांच्या चाणक्ष नजरेने योग्य टीम निवडली.
               या संघटनेने कोरोना काळात देखील आपल्या नागरिकांना मोलाची साथ आणि मदतीचा हात दिला आहे. महारक्तदान शिबीर आयोजन केले.शिवाय सामाजिक कार्यात संघटनेचा नेहमीच खारीचा वाटा असतो.आजारी  रुग्णांना देखील शक्तीनुसार हे संघटक लोकवर्गीनीच्या माध्यमातून मदत करीत असतात. गरजू विद्यार्थी वर्गाला शालेय साहित्य वाटप. एकत्रित सणवार साजरे करून संस्कृती जपली जाते. महिलांना होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमातून एकत्र आणले जाते. स्नेह मेळाव्यानी सर्व लोकांना एकत्रित आणून आपसात ओळख वाढविली जाते.
               या संघटनेला त्यांची सामाजिक कार्यची धडपड पाहून अनेक सामाजिक लोक सहकार्य करीत असतात. कोणताही जाती धर्म, पक्ष भेद ठेवला जात नाही. भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष श्री.विश्वासजी सावंत आणि संघटनेचे हितचिंतक सभासद भाजपा जिल्हा सचिव श्री. रमेशजी शेलार यांचा खंबीर आधार संघटनेला लाभला आहे. महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रमुख मार्गदर्शक श्री. सुनिल जाधव ( पत्रकार, उद्योजक,१०५ गाव समाज व्यवस्थापन समिती सदस्य महाबळेश्वर मुंबई ), श्री. शांताराम कदम ( उद्योजक,१०५ गाव समाज व्यवस्थापान समिती सदस्य महाबळेश्वर मुंबई ), श्री.समीर कदम (क्षत्रिय समाज सोसायटी संचालक महाबळेश्वर ), श्री. प्रकाश सकपाळ(शाखा प्रमुख ), श्री. विठ्ठलदादा कदम ( अध्यक्ष - साम्राज्य ग्रामविकास संघटना महाबळेश्वर ), श्री.अनिल जाधव ( अध्यक्ष - बुद्धीष्ट प्रेरणा ग्रुप पालघर जिल्हा ), श्री.जगदीश उफाळे ( उद्योजक ), श्री. आनंद शिंदे ( उद्योजक ), श्री. रामदास उतेकर ( उद्योजक, १०५ गाव समाज व्यवस्थापन समिती सदस्य महाबळेश्वर मुंबई ) हे संघटनेच्या पाठी सह्याद्री सारखे उभे असतात.तसेच श्री.कल्पेश भाऊ सकपाळ ( अध्यक्ष - मराठा उद्योजक लॉबी पालघर जिल्हा ), श्री.राजेंद्र भगत ( उद्योजक ),श्री. प्रमोद पाटील ( युवा विभाग प्रमुख बहुजन विकास आघाडी मोरेगाव ), श्री. रमेश चव्हाण ( समाज सेवक ), श्री.पंढरीनाथ पाटील ( संचालक मोरेश्वर विद्यालय ) यांचे संघटनेला नेहमी मोलाचे सहकार्य असते. संघटनेचे कार्यकर्ते खुप चांगल्या प्रकारे जे हातात येईल ती जबादारी पार पाडत असतात. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष - श्री. विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष - श्री.शंकर  जंगम, श्री. राजाराम जाधव, कार्यध्यक्ष - अरुण जंगम, सचिव - श्री नितीन सकपाळ, उपसचिव - श्री संतोष कदम, खजिनदार - सुनिल जंगम, युवा अध्यक्ष - संतोष कदम, युवा उप अध्यक्ष - शिवाजी शेलार, युवा सचिव - नितीन जाधव, नालासोपारा शहर अध्यक्ष - श्री. अंकुश जाधव, शहर उपध्यक्ष -श्री. शैलेश शिंदे, शहर सचिव - श्री.गणेश शेलार, उप शहर सचिव - श्री.आनंद कदम तसेच दिपक जाधव, प्रदीप शिंदे, तानाजी सकपाळ, बाळासाहेब सकपाळ, विठ्ठल जंगम, लक्ष्मण कुंभार, विठ्ठल जाधव, अंकुश शेलार, बळवंत कदम, रामचंद्र जाधव, गणेश कदम, बाजीराव शिंदे, महेश पवार, श्याम सुतार, गणेश सकपाळ, हरी जंगम,विशाल शिंदे आदीसह प्रामुख्याने युवा कार्यकर्ता कु. विहान नितीन सकपाळ आणि  पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
             संघटनेला पुरस्कार मिळाल्या मुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.तसेच तेवढीच जिम्मेदारी आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.संघटनेला पुरस्काराने सन्मानित केल्या मुळे संघटनेच्या वतीने आधार फाउंडेशन आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स फाउंडेशनच मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या अशी माहिती संघटनेचे प्रमुख प्रवक्ते श्री.राजेश सु.कदम यांनी पत्रकारांना दिली.

No comments:

Post a Comment

येणा-या काळात संगमेश्वर येथे ९ गाड्यांच्या थांब्याबद्दल‌कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास येत्या १५ ऑगस्टला करणार उपोषण !!

येणा-या काळात संगमेश्वर येथे ९ गाड्यांच्या थांब्याबद्दल‌कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास येत्या १५ ऑगस्टला करणार उपोषण  ...