Thursday 30 June 2022

आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून नवे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना शुभेच्छा.

आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून नवे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना शुभेच्छा.


भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
            महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ''आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा'' असे ट्विट त्यांनी केले आहे.
            बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
             शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली, उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता पण ते या शपथविधीला उपस्थित नव्हते पण शपथविधी झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी केल्यानंतरही मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवे सरकार शनिवारी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करणार आहेत.
          मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन

सातारकर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्याचा आनंद -शरद पवार

सातारकर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्याचा आनंद -शरद पवार.


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
            गेल्या ९ दिवसांपासून सुरत,आसाम -गोवाहाटी राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आज (दि.३०) पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.
            राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा श्री शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्या बद्दल मन:पूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नंतर आता एकनाथ शिंदे या सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
            शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्‍यमंत्री हाेतील, अशी घाेषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी हाेईल. लवकरच मंत्रिमंडळ विस्‍तार करु. या विस्‍तारामध्‍ये एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत असलेले आमदार, अपक्ष आणि भाजपचे लोक या मंत्रीमंडळात असतील. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही. मी स्‍वत: बाहेर असने; पण सरकार व्‍यवस्‍थित चालविण्‍याची जबाबदारी माझ्‍यावरही असेल, माझे पूर्ण पाठबळ या सरकारला असेल, असेही फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले.
            भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घाेषणा २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान माेदींनी केली होती. मात्र हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी शिवसेनेच्‍या नेतृत्त्‍वाने युती केली आणि भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला. आम्‍ही मुख्‍यमंत्रीपदासाठी लढत नाही. ही तत्त्‍वाची लढाई आहे, असेही फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे व २० वे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ !

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे व २० वे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ !


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
          महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.एकनाथ शिंदे हे नवे व महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली.


          मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन.
           देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र, राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले होते, मात्र, शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केले. त्यात देवेंद्र फडणवीस हे जे. पी. नड्डा यांचे म्हणणे मोठ्या मनाने मान्य करत उप मुख्यमंत्री म्हणून मंत्रि मंडळात सहभागी होणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा फोन केल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाल्याच्या बातम्याही आल्या.
               एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले. या घोषणेनंतर फडणवीसांनी मोठेपणा दाखवला, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्ममंत्रिपद दिले, अशी भावुक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
                शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. गेल्या दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येती होती. मात्र, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार शिंदेनीं आज गुरुवार (दिं,३०) सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली 
                शपथ विधीसाठी एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह उपस्थित होते .या आनंदी प्रसंगी एकनाथ शिंदेनीं आपल्या नातवाला कडेवर उचलून घेतले.
फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी भाजपच्या केंद्रीय टीमची इच्छा असल्याची माहिती पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डांनी माध्यमांना दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवरून देवेंद्र फडणवीस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती दिली होती.                  
                आपल्या ट्वीटमध्ये शहा म्हणाले की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रति असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
                पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. भाजपला १०५ जागा मिळाल्या. पंतप्रधानांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, तेव्हा निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि नेते यांनी शब्द फिरवला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा अजन्म विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता.
              देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीला मत दिले नव्हते. भाजप-शिवसेना युतीला दिले होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. आमच्याच मतदार संघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल, तर कशाच्या जोरावर लढायचा हा प्रश्न शिवसेना आमदारांसमोर होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची युती तोडा, असा निर्णय आमदारांनी घेतला. मात्र, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्राधान्य दिले.
             देवेंद्र फडणीस म्हणाले की, उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला अल्टरनेट गर्व्हमेंट देतोय. तसा शब्द आम्ही पूर्वीच दिला होता. शिवसेनेचा एक गट, अपक्ष आमच्या सोबत आहेत. तसे एक पत्र राज्यपालांना दिले आहे.देवेंद्र फडणीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. ही तत्त्वाची आणि हिंदुत्वाची लढाई आहे असेही पुढे सांगितले .

प्रियजन गुणगौरव समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका व शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2022 संपन्न !! "सुप्रिया सुळे यांना प्रमोद हिंदूराव यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा"

प्रियजन गुणगौरव समिती,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका व शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२२ संपन्न !

"सुप्रिया सुळे यांना प्रमोद हिंदूराव यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा"


कल्याण, बातमीदार : मुरबाड तालुक्यातील व मुरबाड शहरातील सुमारे ३८ शाळांचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी दहावी-बारावी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दि. २६ जून रोजी प्रियजन गुणगौरव समिती, मुरबाड शहर - तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये मुरबाड मॅन्युफॅक्चर असोसिएशन उपकब हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमावेळी मान्यवर, पदाधिकारी यांचे भाषणे न करता कोरोना काळापासून दोन वर्ष शाळेपासून दूर असलेले विद्यार्थी यांचे पुढील ध्येय धोरणे या संदर्भात मनोगत व समस्या मांडण्याची संधी व्यासपीठावर देण्यात आली, कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष राजाभाऊ सासे, मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे यांस कडून करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 


कार्यक्रमाप्रसंगी हिंदुराव साहेब यांचे शुभ हस्ते मुरबाड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी योगिताताई शिर्के व संतोष बाईत यांची मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय अध्यक्षपदी नियुक्ती पत्र नेमणूक करण्यात आली, 


यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेशजी हनुमंते, जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी देशमुख, सेवादल जिल्हा अध्यक्ष जगनजी गायकर, सौरभजी हिंदुराव, जिल्हा उपाध्यक्ष हर्षद शेळके, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष अजय देशमुख, सेवादल अध्यक्ष बापू मार्के, युवक अध्यक्ष बाळू भोईर, युवक कार्याध्यक्ष अविनाश भोईर, विजय मोहिते, युवक शहर अध्यक्ष अभिजित शिंदे, सेवादल अध्यक्ष शिवाजी नवले, युवती अध्यक्षा सुवर्णा व्यापारी, उपाध्यक्ष आरती तेलवणे, मुरबाड शहर कार्याध्यक्ष तेजस व्यापारी, सरचिटणीस आशिष तेलवणे,अध्यक्ष अभिषेक डुंकवाल, विलास जाधव, उपाध्यक्ष मनिष हिंदुराव, सुनील भांडे, गजानन घरत,विलास केंभारी, हेमंत कुलकर्णी, स्नेहल पाटील, भूषण गायकवाड, स्नेहल भालेराव, कार्याध्यक्ष विजय घायवट, संजय हिंदुराव, नामदेव दमाने, राहुल खोळंबे, संजय चिराटे, आकाश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी सर यांनी केले.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग, झेड सुरक्षेत एकनाथ शिंदे सागर बंगल्याकडे रवाना; मंगल प्रभात लोढा, अळवणी आणि चव्हाण सोबत ! " एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री " - देवेंद्र फडणवीस

सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग, झेड सुरक्षेत एकनाथ शिंदे सागर बंगल्याकडे रवाना; मंगल प्रभात लोढा, अळवणी आणि चव्हाण सोबत ! " एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री " - देवेंद्र फडणवीस 


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
          महाराष्ट्रात आज होणारी फ्लोअर टेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर टळलेली आहे. यानंतर नव्याने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे गटाचा मुक्काम गोव्यात आहे. तर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने सत्तास्थापनेच्या वाटाघाटींसाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे, भाजप नेतेही आज दुपारी ३ वाजता राजभवनावर पोहोचले आहेत.
            शिवसेनेचा गटनेता म्हणून ५० आमदारांनी माझी निवड केली आहे. मतदार संघातले काही प्रश्न होते. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊ या, अशी आमची मागणी होती. यावर त्वरित निर्णय घेतला असता, तर ही वेळ आली नसती. आमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कालही आदर होता. आजही आदर आहे. मी मुंबईला राज्यपालांना भेटण्यासाठी जातोय. त्यानंतर आमची पुढली रणनीती ठरवण्यात येईल, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
               एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ते आजच राज्यपालांना भेटणार आहेत. याशिवाय आजच ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
               एकनाथ शिंदे दुपारी अडीचच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
           शिंदे यांचे विमानतळावर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. मुंबई विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. एकनाथ शिंदे यांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केले, यावेळी शिंदे समर्थकांनीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
                सूत्रांच्या माहिती नुसार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे आज राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा दाखल करू शकतात.एकनाथ शिंदे सागर बंगल्याकडे जाताना त्यांच्यासोबत भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा, पराग अळवणी आणि रवींद्र चव्हाण सोबत होते.
                  भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच मतदार संघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे त्यांनी म्हटले. या संदर्भात त्यांनी सलग दोन ट्विट केले. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे सोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. 
             ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे.

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धर्मा पाटील याचा वाढदिवस उत्साहात साजरा !!

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धर्मा पाटील याचा वाढदिवस उत्साहात साजरा !!


डोंबिवली, बातमीदार : निळजे लोढा हेवणचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धर्मा पाटील याचा वाढदिवस त्याच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मित्र परिवार सर्व पक्षीय व बिजेपी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आलेल्या नागरिकांनी रविंद्र पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

मोरेश्वर तरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप !

मोरेश्वर तरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप !


टिटवाळा,बातमीदार : मांडा टिटवाळा राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 8, 9, 10 यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश वाडी टिटवाळा परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस टिटवाळा विभाग अध्यक्ष मोरेश्वर तरे, प्रभाग क्रमांक 6 अध्यक्ष सुहास कांबळे, कमलेश नांगरे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष अकबर शेख, मोहन तरे प्रभाग क्रमांक 9 अध्यक्षा तृप्ती गायकवाड, वैष्णवी शेळके, लावण्या कांबळे, गजानन किस्मतराव, तुषार वैद्य, योगेश देठे, श्रवण गौंड, किशोर लोंढे, किशोर राठोड, सागर साखरे, उमेश दुधाने, समाधान रोकडे, प्रदीप पाटील, संदीप गवारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

Wednesday 29 June 2022

कोकणच्या रानातील रोवणे,अळंबी शेतकऱ्यांच्या हंगामी भाज्या ! "निसर्गाचा वरदहस्त कोकणाला...कोकण म्हाणजे स्वर्गच"

कोकणच्या रानातील रोवणे,अळंबी शेतकऱ्यांच्या हंगामी भाज्या !

"निसर्गाचा वरदहस्त कोकणाला...कोकण म्हाणजे स्वर्गच"


कोकण, (शांत्ताराम गुडेकर) :

  कोकण हा प्रदेश भारत पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे.
                कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या-खाड्या आणि अथांग समुद्र ! कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे, हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच ! सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. गढूळ पाण्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पाश्वर्भूमीवर उनपावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं. सलग सुट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करीत आहे.
              कोकणात जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो व भर पावसातच अत्यंत चवदार, भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असलेले चार ते पाच अळंबीचे प्रकार  कोकणातील जंगलात रुजून येतात. विशेष म्हणजे सतत पाऊस पडला व तापमान २० ते २३°सें.ग्रे. पर्यंत खाली आले की हे अळंबीचे प्रकार रानातील जाळीत किंवा वाळवीच्या ठिकाणी रूजतात. यातील एक दोन प्रजातींच्या स्पाॅनचे कॅरीअर वाळवी आहे. स्थानिक गुराखी, शेतकरी यांना दरवर्षी अळंबी कुठे कुठे रूजते त्या जागा माहित असतात व ते न चुकता त्या ठिकाणी दोन तीन दिवस लक्ष ठेवून असतात. आदल्या दिवशी कळल्यावर दुस-या दिवशी लवकर जाऊन तेथील अळंबी काढून आणतात. शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारातील पाककृतीना चवीच्या बाबतीत सहज मागे टाकतील एवढी ही अळंबी चवदार असतात. त्यामुळे ज्यांना ही अळंबी मिळाली ते लोक नशीबवान समजतात. स्थानिक अळंबीची नावे १) रोवण २) चुडीये ३) कुरटे ४) कुंबळे ५)चितळे अशी आहेत.
          रोवण ही अळंबी एका जागी फार मोठ्या प्रमाणात येते. उंची साधारणपणे दोन इंच असते. कॅप सफेद रंगाची, व मध्ये जांभळ्या रंग असतो. दांडा (देठ) मातीतून खणून काढावा लागतो.  चवीला अप्रतिम असते. मटणाला उत्कृष्ट शाकाहारी पर्याय आहे. सूप, भाजी, सुकी भाजी, सर्वच प्रकार चवदार व स्वादिष्ट होतात.

          *चुडीये ही अळंबी लांब लांबीची असते. दांडी ६ ते १८ इंच असते. ही अळंबी काहीशी कमी आढळते. चवीला उत्तम असते. गरम मसाला वापरून भाजी छान होते.* 

          *कुरटे ही अळंबी एका ठिकाणी एखादीच सापडते. ब-याच ठिकाणी फिरल्यावर पाच सहा मिळतात. चव छान, कालवण उत्तम होते.*

          *कुंबळे ही अळंबी चुडीये  प्रकारासारखीच असते. मात्र लांबीला कमी असते. चव चांगली असते पण दुर्मिळ प्रजाती आहे.*

          *चितळे ही अळंबी नाकातील फुल्ली सारखी नाजूक व खूप लहान असते. वारूळावर रूजते. अलगद काढून चांगली सर्वत्रच धुवून घ्यावी लागते. याचे सूप, कालवण व भाजी छान होते. चवदार व स्वादिष्ट लागते.*

          रायगड जिल्ह्यात आदिवासी कातकरी बांधवांची वस्ती असलेल्या श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात यातील अळंबीचे प्रकार स्थानिक बाजारात आदिवासी बांधव विक्रीसाठी आणतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ही स्थानिक अळंबी बाजारात मिळत नाही.निसर्गाने कोकणाला ही मौल्यवान भेटी दिली असली तरी कोकणातील दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने त्यावर काही संशोधन केल्याचे व अळंबीचे स्पाॅन निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. हे कोकणाचे दुर्दैव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोजक्याच लोकांना या अळंबीची चव चाखता येते. अळंबी ही बुरशी वर्गीय असल्याने त्याचे आयुष्य खूप कमी म्हणजे एक दिवसच असते. त्यानंतर त्यात लहान लहान किटक निर्माण होतात. मात्र फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास ती दीर्घकाळ टिकू शकतात. अळंबीचे बी हे सूक्ष्म स्पॉन स्वरुपात असतात व ते अळंबीच्या कॅपमध्ये असतात. कोकणात उपरोक्त रान भाज्या खूपच प्रसिध्द असून पावसाळ्यात कोकण भुमिपुत्र असलेला सद्यस्थितीत नोकरी निमिताने चाकरमानी (मुंबईकर) झाला असला तरी या चुडिया, कुरटे, कुंबळे, चितळे, रोवने यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. फोटोत जरी या भाज्या बघितल्या तरी तोंडाला पाणी सुटते हे कोकण भुमिपुत्र चाकरमानी नाकारु शकत नाही.

मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे , बंडखोरांना मोठे करुन मी पापाची फळं भोगत आहे; - उद्धव ठाकरे

मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे , बंडखोरांना मोठे करुन मी पापाची फळं भोगत आहे; - उद्धव ठाकरे


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
            राज्यात उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हालतोय. त्यांच्यामध्ये येऊ नका. शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचल्याचे पुण्य त्यांना मिळू द्या, असे भावनिक आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री साडेनऊ वाजता फेसबुक लाइव्हवरून मी  मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आहे.तसेच विधान परिषद सदस्याचा देखील राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.बंडखोरांना मोठे करून मी पापाची फळे भोगत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 
              मला माझ्या शिवसैनिकांच्या रक्ताची होळी खेळायची नाही. मला मुख्यमंत्री पदच काय, आमदारकीही नको. उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे.
          सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांचा निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश महाविकास आघाडीला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी रात्री साडे नऊ वाजता संवाद साधल.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ज्यांनी आपल्याला मोठे केले असे लोक सत्ता आल्यावर आमच्यावरच नाराज होत आहेत. ज्यांना सगळे दिले ते नाराज झाले; मात्र ज्यांना काही दिले नाही ते सगळे आजही सोबत आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे न्याय देवतेचा निकाल आपन मान्य केला आहे.   
             काँग्रेसवाले बाहेरून पाठींबा द्यायला तयार आहेत, मात्र मी त्यांना तसे सांगितले नाही असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नामांतर करूनही मी हिंदुत्व सोडले असे त्यांना वाटत असेल तर आम्ही काय करावे, तुम्ही सगळे माझ्यासोबत समोर येऊन बोलायला हवे. आम्ही तुम्हाला आपले मानले होते.
              मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, चीन बॉर्डरवरील संरक्षण काढून घेत मुंबईत आणण्यात येईल, याच शिवसैनिकांना तुमचा गुलाल उधळला 
तुम्ही त्यांचा रक्त वाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. उद्या तुम्ही या आणि शपथविधी करून घ्या आमचे शिवसैनिक मध्ये येणार नाही. माझा माणूस माझ्या  विरोधात उभ्या राहिल्याचा लाज वाटते आहे.
              बहुमताचा खेळ मला खेळाचा नाही. तुम्हाला मोठे केले हे माझे पाप आहे. माझ्या पापाची फळ मला भोगवी लागत आहेत, असे म्हणत बंडखोरांना इशारा दिला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असेही ठाकरे म्हणाले.
               उद्धव  ठाकरे म्हणाले, उद्या एकाही शिवसैनिकांनी यांच्या अध्ये-मध्ये येऊ नका. कारण उद्या लोकशाहीचा नवा पाळणा हलतोय. मीही त्यांना सांगतोय, कुणीही तुमच्या मार्गात येणार नाही. या आणि घ्या शपथ. उद्या फ्लोअर टेस्ट आहे. कशालाही डोकी मोजत बसायची, डोक वापरण्यासाठी डोक्यांचा वापर व्हावा.
               उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या विरोधात कोण आहे? किती आहेत? यात मला अजिबात रस नाही. मला खेळ खेळायचे नाहीत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, ज्यांना शिवसेनेनं जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्य मंत्रिपदावरून खाली उतरवण्याचं पुण्य त्यांनाच लाभू द्या. त्यांचं हे पुण्य मला हिरावून घ्यायचं नाही. मला मुख्य मंत्रि पदाची ईच्छा अजिबात नाहीये. कारण मला पदाचा लालसा नव्हती.
                मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अनेक आव्हाने आली आपण ती पार केली, न्यायदेवतेचा आज निकाल आला. त्यांचा निकाल मान्य करायलाच हवा. त्यांनी सुद्धा तातडीने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालाचे आदेशाचे पालन करण्याचे सांगितले. राज्यपालाने लोकशाहीचा मान राखला. तातडीने चोवीस तासांच्या आत फ्लोअर टेस्ट करायला लावली. पण दिड पाऊने दोन वर्षे बारा आमदारांची यादी लटकवून ठेवली अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.                 
               मुख्यमंत्री जनतेला संबोधताना म्हणाले की, आता पुढची वाटचाल तुमच्या साथीने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला निधी देत कामाची सुरुवात केली. माझे आयुष्य सार्थकी लागले आहे. कारण शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले आहे.
               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, उस्मानाबादचे नाव धाराशीव केले आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्यांचे आभार मानतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठरावाला विरोध दिला नाही. मात्र पवार, गांधी यांनी मोठे सहकार्य केले. ज्यांचा विरोध त्यांनीच यासाठी साथ दिली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

शेतकरी शेतमजुरांचे थकीत मानधन साठी सोमवारी लालबावटा शेतक-यांचे आंदोलन चोपडा...

शेतकरी शेतमजुरांचे थकीत मानधन साठी सोमवारी लालबावटा शेतक-यांचे आंदोलन चोपडा... 


जळगाव, बातमीदार : महाराष्ट्रातील अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, भूमीहिन शेतकरी, शेतमजूर तसेच विधवा, दिव्यांग महिला / पुरुषांना महाराष्ट्र शासनातर्फे श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी योजना,  राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, अंतर्गत दरमहा हजार रुपये मानधन दिले जाते कुटुंब अर्थ साह्य योजने अंतर्गत मदत केली जाते परंतु गेल्या तीन महिन्यापासून या दुर्बल घटकांना सदर मानधनाचे वाटप न झाल्याने त्यांना आजारपण व उदरनिर्वाह साठी आर्थिक कुचंबणा सहन करावी लागत आहे. या लोकांना शासनाने दरमहा दिली जाणारे एक हजार रुपये थकीत मानधन अदा करावी, यासाठी व इतर मागण्यांसाठी लालबावटा युनियन- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा- भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे चोपडा तहसीलदार कार्यालयावर सोमवार दिनांक ४ जुलै सोमवार रोजी सकाळी ११ वा  धरणे आंदोलन केले जाणार आहे असा इशारा लालबावटा शेतमजूर युनियन नेते अमृत महाजन, वासुदेव कोळी, हिराबाई सोनवणे, शशिकला निंबाळकर, शीला बाविस्कर, संतोष कुंभार, शांताराम पाटील, नामदेव कोळी, छोटू पाटील, आरमान तडवी त्याचप्रमाणे जिजाबाई राणे, सरलाबाई देशमुख, आसाराम कोळी, गणेश धनगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिला आहे.

डॉक्टर दिन -संत राजिन्दर सिंह जी महाराज

डॉक्टर दिन
-संत राजिन्दर सिंह जी महाराज


आजचा दिवस पूर्ण भारतवर्षात 'डॉक्टर-दिवस' म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरांची भूमिका आपल्या जीवनात प्रमुख आहे, जेणेकरून समाजात राहणाऱ्या लोकांच्या स्वास्थ्याची काळजी व्हावी. जर आपण शारीरिक दृष्ट्या आजारी पडलो तर एकदम आपल्या डोक्यात डॉक्टरांचा विचार येतो, कारण की आपण चांगल्याप्रकारे जाणतो की तेच आपल्याला स्वस्थ करू शकतील. म्हणून डॉक्टरी पेशा सन्माननीय आहे कारण की, यामध्ये सेवा आणि त्याग याची भावना असते. 

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीशी संघर्ष करीत आहे. जगभरातील हजारो डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्वास्थ्य कर्मचारी आणि संशोधक अथक प्रयत्न करीत आहेत, यामुळे लोकांचे जीव वाचवता येतील. अनेक कठीण प्रसंगात सुद्धा डॉक्टर्स आपले कार्य प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक करीत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांना त्यांचे सहाय्य मिळत आहे. 

चला तर, आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की डॉक्टर होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांना अनेक वर्षे वैद्यकीय महाविद्यालयात चिकित्सा विज्ञान क्षेत्रासंबंधी प्रशिक्षण घ्यावे लागते. मानव शरीराचे प्रत्येक अंग, प्रत्येक औषधी अथवा प्रत्येक आजाराची लक्षणे लक्षात ठेवून, रुग्णावर योग्य प्रकारे उपचार करण्यासाठी, अनेक वर्षे कठोर अध्ययन करण्याची आवश्यकता असते, त्यासाठी तीव्र इच्छा असावी लागते. जो पर्यंत त्या क्षेत्रात निपुणता प्राप्त होत नाही तोपर्यंत आणि तदनंतर सुद्धा प्रशिक्षण इत्यादी मध्ये बराचसा कालावधी व्यतीत करावा लागतो. 

जर आपण डॉक्टरांच्या जीवनाकडे पाहिले तर ते निष्काम सेवेचे ज्वलंत उदाहरण ठरते. ते आपला जास्तीत जास्त वेळ लोकांना स्वस्थ करण्यासाठी घालवितात. स्वस्थ होण्याचा अर्थ म्हणजे आजारातून मुक्तता. आजारपण म्हणजे काय आहे? आजारपण म्हणजे बेचैनी असते. अनेक आजारांच्या कारणाने आपण स्वतःला शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ अनुभवतो. मानसिक दृष्ट्या आपण आपल्या व्यवसायातील समस्यां, घरगुती अडचणी तसेच सामाजिक दृष्ट्या त्रस्त होतो अथवा भावनिक पीडेमुळे सुद्धा आपण अस्वस्थ होतो. या सर्व कारणांमुळे बरेचसे लोक अध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला ओळखू शकत नाहीत. त्यामुळे, ते त्रस्त असतात कारण त्यांच्या अंतरी आत्मा-परमात्मा, जीवनाचे ध्येय किंवा मृत्युनंतरच्या जीवना संबंधी अनेक प्रश्न निर्माण होतात. जोपर्यंत, आपल्याला म्हणजेच आपल्या आत्म्याला त्याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत बेचैनी राहाते. अशाप्रकारे आपण स्वतःला स्वस्थ राखण्यासाठी आपणास आपल्या शारीरिक, मानसिक, भावनात्मक दृष्ट्या तसेच आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा स्वस्थ राहावे लागेल. 

भौतिक शरीर स्वास्थ्यासंबंधी एक मनोरंजक म्हण आहे, स्वास्थ्य बिघडण्याची चार कारणे असतात. पहिले ill (आजारी पडणे), दुसरे pill (औषध सेवन करणे), तिसरे bill (पैसे खर्च करणे) आणि चौथे काही बाबींमध्ये will (वारसा हक्क लिहिणे). या बाबतीत संत राजिन्दर सिंह जी महाराज म्हणतात की, मी एक पर्याय जोडू इच्छितो तो म्हणजे still (स्थिर राहणे). चला तर, आपण स्थिर राहण्याकरीता ध्यान-अभ्यासाची कला शिकूया. कोणत्या प्रकारे आपले शरीर, मन, आपले भावजीवन, आत्मा आणि पूर्ण विश्वाला स्वस्थ करण्याची शक्ति ठेवु शकते हे जाणून घेऊया. 

सध्याची चिकित्सा प्रणाली सुद्धा या निष्कर्षावर पोहोचली आहे की ध्यान-अभ्यास करण्याचे अनेक लाभ आहेत. याचा दररोज केला जाणारा अभ्यास अध्यात्मिक लाभ तर प्रदान करतोच त्याशिवाय या द्वारे आपल्याला शारीरिक, मानसिक व भावनात्मक रुपाने सुद्धा अनेक लाभ मिळतात. चिकित्सा क्षेत्रातील संशोधकांनी काही आजारांना आपल्या मानसिक आणि भावनात्मक अवस्थेशी जोडलेले आहे. खूप संशोधन केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत की जेव्हा आपण मानसिक तणाव, भावनात्मक पीडा अथवा उदासीनतेच्या परिस्थितीत असतो, तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति कमी होत जाते, या कारणाने आपण व्याधिग्रस्त होतो. डॉक्टर जॉन क्रेवन यांचे द्वारा केल्या गेलेल्या संशोधनानुसार, ध्यान-अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये तणावाचे प्रमाण फारच कमी दिसून आले. ध्यान-अभ्यासावर परीक्षण केले गेल्यानंतर आढळले आहे की, अशा तणावा संबंधीच्या व्याधी जसे की, उच्च रक्तचाप, अनिद्रा, दमा आणि छातीत धडधड होणे इत्यादींमध्ये सुधारणा होते. 

बहुतांश चिकित्सा केंद्रात तसेच इस्पितळात तणाव कमी करण्यासाठी, काही व्याधींवर उपचार करण्याकरिता, आज-काल ध्यान अभ्यासाचे वर्ग भरवले जातात. ध्यान-अभ्यास आपल्या मनाला आणि आपल्या भावनात्मक अवस्थेला स्वस्थ करून, आपल्या शरीराला सुद्धा स्वस्थ करतो. 

चिकित्सक आपल्या रुग्णावर उपचार करताना, त्यांना व्याधीमुक्त करण्यासाठी तसेच आपला उपचार प्रभावशाली करण्याकरिता ध्यान-अभ्यासाकरिता वेळ देण्याचा सल्ला देतात. ध्यान-अभ्यासाला दररोज काही वेळ दिल्याने त्यांचे रुग्ण एका अशा स्वास्थ्यदायक शक्ति च्या संपर्कात येतात, जी त्यांचे जीवन बदलून टाकते आणि त्यांना आराम आणि धैर्य प्रदान करते. 

चला तर, आज आपण 'वैश्विक डॉक्टर्स डे' च्या दिवशी त्या सर्व लोकांचे धन्यवाद व्यक्त करूया जे आपल्याला स्वस्थ ठेवण्याकरिता अहोरात्र प्रयत्नशील आहेत.

जनसंपर्क अधिकारी, सावन कृपाल रुहानी मिशन,

अमृता : +91 84510 93275


राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन !

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन !


बुलडाणा, बातमीदार, बातमीदार दि.29 : भारतीय कल्याण परिषदेमार्फत दरवर्षी 6 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना कठीण प्रसंगात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. सदर अर्ज हा ICCW या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज डाऊनलोड करून 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे सादर करावा.

 अर्जासोबत अर्जदार ज्या शाळेमध्ये शिकत आहे. त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा पंचायत/जिल्हा परिषद प्रमुख, राज्य बालकल्याण परिषदेचे अध्यक्ष किंवा सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समकक्ष पदाचे सरकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा समकक्ष पदाचे पोलीस अधिकारी यांपैकी दोन सक्षम अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. जन्माचा दाखला, वर्तमानपत्राचे कात्रण, किंवा प्रथम खबरी अहवाल, किंवा पोलीस डायरी नोंद, घटनेचा लेखा जोखा तसेच सहाय्यक दस्तऐवजसह प्रस्ताव तयार करावा.या पुरस्कारसाठी उल्लेखनिय कार्य केलेली घटना 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान घडलेली असावी. पुरस्कारासाठी निवड ही ICCW द्वारा निवड केलेल्या समितीमार्फत होणार आहे. कोणत्याही कारणास्तव नामंजुर केलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जाणार नाही. पुरस्काराचे वितरण देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे. 

                                                              पुरस्कार व स्वरूप -

भारत पुरस्कार 1 लक्ष रूपये, धृव पुरस्कार, मार्कडेय पुरस्कार, श्रवण पुरस्कार, एकलव्य पुरस्कार व अभिमन्यु पुरस्कार 75 हजार रूपये, सामान्य पुरस्कार 40 हजार रूपये असे आहे.

जिल्ह्यात 1 जुलैपासून ‘सिंगल युज’ प्लॅस्टीकच्या वस्तू वापरावर बंदी !

जिल्ह्यात 1 जुलैपासून ‘सिंगल युज’ प्लॅस्टीकच्या वस्तू वापरावर बंदी !


बुलडाणा, बातमीदार, दि.29 : केंद्रिय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने सिंगल युज प्लॅस्टिक वस्तुंच्या वापरावर बंदी घातली आहे. जिल्हयात 1 जुलैपासुन या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहीती निवासी उपजिल्हाधिकारी, दिनेश गिते यांनी दिली.

    निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत नुकतीच जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांच्यासह पालिका, नगरपंचयतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

  निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, प्लॅस्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॅस्टिकच्या काडया, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी कांडया, आईस्क्रीम कांडया, सजावटीसाठी पॉलिस्टीरीन (थर्माकोल), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे चमचे, बाउल, डबे, बरणी, चमचे, चाकु, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टरर्स), हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करुन देण्यासाठी डिश, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लॅस्टिक आवरणे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बनर्स, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लॅस्टिक इ. वापरावर 1 जुलै पासुन बंदी घालण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरीता विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर या पथकांमार्फत दंडनिय कारवाई केली जाणार आहे.

    प्लॅस्टिक कचऱ्याचे विलगीकरण, संकलन, साठवण, वाहतुक आणि विल्हेवाट यासाठी असणारी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. सविस्तर कृती आराखडयास शैक्षणिक संस्था, व एन.सी.सी. एन.एस.एस. स्कॉउटस, युवा क्लब, ईको क्लब आणि सयंसेवी संस्थाचा समावेश करुन, दवंडी पिटवून प्लॅस्टिक प्रदुषण कमी करण्यासाठी सक्षम चळवळ उभारुन प्लस्टीक वस्तुंचा वापर करण्यास परावृत करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य अजित गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन आपला वाढदिवस साजरा !

पंचायत समिती सदस्य अजित गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन आपला वाढदिवस साजरा !


जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार पंचायत समितीचे सदस्य अजित गायकवाड हे आपल्या आदिवासीं समाज्याबद्दलच्या कार्यामूळे नेहमीच दुसऱ्यांना प्रेरित करीत असतात,त्यातूनच हा एक नविन संकल्प आपल्या समाजा समोर ठेवला आहे म्हणून आज २८ जुन महिन्यात अजित गायकवाड यांच्या वाढदिवस होता, आपल्या आदिवासी समाजातील आदिवासी बांधवांची मुले आपल्या शाळेत शिकतात त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या आपल्या तळमळीतून त्यांनी त्यांचा वाढदिवस वैयक्तिक घरी साजरा न करता जि.प. शाळा, शिवाजीनगर, खोरीपाडा, आळेमेट, भरसटमेट शाळेतील १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यां बरोबर वह्या वाटप करुन साजरा केला, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती व्हावी म्हणून आपल्या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनचा शैक्षणिक विकास होण्या करिता हा स्व: खर्चात वाढिवसानिमित्त वह्या वाटप करुन आदिवासीं बांधवांनाच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन अल्पशी समाज सेवा केली आहे. आणि आज हा अनोखा उपक्रम करूण सामाजिक बांधीलकिचा शैक्षणिक पायदंडा वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. या वेळी पंचायत समिती सदस्य अजित गायकवाड, गोविंद गावित,सुभाष पवार, विशाल भोये, हेमंत भरसट, बाळाराम वझरे, रणजित पाडवी, दिनेश राऊत, अश्विन गायकवाड, शांताराम खिरारी, सखाराम, दिनेश गावित इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

हा अनोखा वाढदिवसाचा आनंद लहान चिमूकल्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता ज्याचे कोणत्याही शब्दात वर्णन करता येत नाही.

शेतकऱ्यांनी परांपर शेती बरोबर आधुनिक शेतीची कास धरावी- प्रदिप वाघ

शेतकऱ्यांनी परांपर शेती बरोबर आधुनिक शेतीची कास धरावी- प्रदिप वाघ


जव्हार, जितेंद्र मोरघा :

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,हरीत क्रांती प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात येत आहे, तालुक्यातील विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिर आयोजित करुन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज आडोशी येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की परंपरागत शेती बरोबर आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे, शासनाने विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा, तसेच गट शेती कडे लक्ष दिले पाहिजे, शिवाय फळबाग लागवड, मोगरा, स्टोबेरी, हळद लागवड करुन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी तालुआ कृषी अधिकारी पारधी यांनी विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली,

यावेळी प्रदीप वाघ पंचायत समिती सदस्य, सुनील पारधी तालुका कृषी अधिकारी, नंदकुमार वाघ चेअरमन, सुरेश तमखाने मंडळ कृषी अधिकारी,  विकास बोरसे पर्यवेक्षक, जे.आर.बालशी कृषी सहाय्यक, रामदास थाळेकर, भगवान पाटील,  अंनता पाटील, प्रकाश गांगुर्डे, मंगेश ठोमरे, बाळु घाटाळ, अनुसया पाटील, सदाशिव ठोमरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

नमन लोककला संस्थेने रचला इतिहास ! कोकणातील जेष्ठ लोककलावंत "लोककला गौरव पुरस्कार २०२२" ने सन्मानित !

नमन लोककला संस्थेने रचला इतिहास ! कोकणातील जेष्ठ लोककलावंत "लोककला गौरव पुरस्कार २०२२" ने सन्मानित !


*( निवोशी/गुहागर - उदय दणदणे)*

कोकण हे लोककलेचं माहेर घर आणि याच कोकणात आज विविध लोककला जोपासण्याचे कार्य अनेक मंडळ व लोककलावंत करत आहेत. त्यातीलच एक सर्वाधिक लोकप्रिय असलेली नमन या लोककलेचं संवर्धन जतन व्हावं त्याचबरोबर लोककलावंतानाही त्यांचे संविधानिक हक्क मिळावेत या साठी नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -भारत ) मध्यवर्ती मुबंई ही संस्था लोककलावंत यांच्या प्रति न्याय हक्कासाठी कार्यरत असून सदर संस्थेच्या वतीने व साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच  जागर नमन लोककलेचा सन्मान लोककलावंताचा हा भव्य दिव्य सोहळा दि.२७ जून २०२२ सोमवार रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. ५० वर्षे अधिक नमन लोकककलेच्या प्रवाहात आपलं योगदान देणाऱ्या कोकणातील ज्येष्ठ लोककलावंतांना *लोककला गौरव पुरस्कार २०२२* व नमन लोकलेतील मागील पिढीचा वारसा पुढे घेऊन चाललेल्या कलावंतांना *विशेष गौरव पुरस्कार२०२२* देऊन गौरविण्यात आले. 


लोककला गौरव पुरस्कार २०२२ ने गौरविण्यात आलेले लोककलावंत - बबन म.कांबळे (गुहागर), जगन्नाथ ग.शिंदे (गुहागर), दिनेश शं.बुदर (चिपळूण), रमेश दे.गुडेकर (चिपळूण), झराजी गं. वीर (रत्नागिरी), सदाशिव स.पाले (रत्नागिरी), अंकुश रा. गुरव (लांजा), धनाजी सु.तांबे (राजापूर), सुरेश कृ.मांडवकर (राजापूर), नारायण बा.खेडेकर (आबा)- (संगमेश्वर), कृष्णा गं. जोगले (संगमेश्वर), तर विशेष पुरस्कार २०२२ ने गौरविण्यात आलेले  लोककलावंत- शिवराम रांजाणे -गुहागर, जनार्दन आंबेकर -गुहागर, सुधीर टाणकर - गुहागर , भिकाजी चोगले- चिपळूण, एकनाथ गुडेकर -चिपळूण, दत्ताराम भेरे -संगमेश्वर, दिनेश बांडागळे-संगमेश्वर,  प्रदीप ( पिंट्या ) भालेकर -संगमेश्वर, सूर्यकांत धनावडे - रत्नागिरी, गणपत वीर - रत्नागिरी, सुहास साखरकर - लांजा, प्रदीप मिरजोळकर - राजापूर, संतोष बाईंग - राजापूर, या सर्व नमन लोककलेचे पाईक असणाऱ्या  लोककलावंतांना शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, सन्मानपत्र, देऊन गौरविण्यात आले. त्याच बरोबर नुकतच निधन झालेलं कानसे ग्रुपचा कलाकार स्वर्गीय.अनील  घवाळी यांच्या कुटुंबीयांच कृतीज्ञापूर्वक या सोहळ्याप्रति विशेष सन्मान करण्यात आला. निर्माते, लेखक /दिग्दर्शक : संदीप कानसे, शाहीर - रामचंद्र घाणेकर, सुरेश चिबडे, कवी- विकास लंबोरे, शाहीर -प्रकाश पांजणे, लोकशाहीर- मधुकर पंदेरे असे कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या अनेक कलाकारांचे यथोचित सत्कार करण्यात आला. 


सदर सोहळा नमन लोककला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्मा. रविंद्र मटकर यांच्या अध्यक्षतेखाली व गुहागर तालुक्याचे मा. आमदार सन्मा विनयजी नातू  साहेब, वंचीत बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष. विकास (अण्णा) जाधव, महासचिव नितीन जाधव, मा.रविंद्र बावकर , मा.प्रमोद गांधी,यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर सोहळ्याला कला-सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, शाहिरी वर्ग, कलाकार मंडळी आणि कोकण कलेवर प्रेम करणारे असंख्य रसिक प्रेक्षक उपस्थित राहून या ऐतिहासिक सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार बनले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना भविष्यात नमन लोककला संस्थेच्या न्यायीक लढयात आणि लोककलावंताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आश्वसित केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत आलेल्या मान्यवरांचे आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न. लो. संस्थेचे महासचिव.शाहिद खेरटकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेची सचिव -सुधाकर मास्कर , सतिश (दादा) जोशी, तुषार पंदेरे, उपाध्यक्ष रमाकांत जावळे, सदस्य-संदिप कानसे, उदय दणदणे, संगीता पांचाळ- बलेकर, शिवण्याताई मांडवकर, सुभाष बांबरकर, प्रवीण कुलये, अमित काताळे, तालुकानिहाय शाखा कार्यकर्ते आणि साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Tuesday 28 June 2022

रानभाज्या, खेकडे, चिंबोरी खरेदीला खवय्यांची झुबड ! "अदिवासी बांधवांना सुगीचे दिवस"

रानभाज्या, खेकडे, चिंबोरी खरेदीला खवय्यांची झुबड ! "अदिवासी बांधवांना सुगीचे दिवस"


विक्रोळी, (शांताराम गुडेकर) : 
      पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात येण्यास सुरूवात होते. जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. या भाज्यांबरोबरच चिंबोरी, खेकडेही बाजारात विकायला येतात. रानभाज्या आणि खेकडे या दिवसांमध्ये कमी किमतीत उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आवर्जुन त्यांची खरेदी करतात. रानभाज्या आणि खेकडे, चिंबोरी बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. त्यामुळे खवय्यांची  तेथे खरेदीसाठी झुंबड दिसते. जंगली भाज्या औषधी सुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापुर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात. वाडा शहरातील बाजारपेठेत मोखाडा येथील सुर्यमाल, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या डोंगराळ भागातील लोक शेवळी, लोत, कोळीभाजी, बाफली, दिंडे या सारख्या रानभाज्या व खेकडे बाजारात विकायला आणतात. एक जुडी २० ते २५ रूपयांत अशी रानभाजी विकली जाते. तर नदीचे खेकडे प्रती नग ५० ते ६० रुपयांना तर जंगलातील खेकडे २५ ते ३० रुपयांना विकले जातात.त्यामुळे आदिवाशी बांधवांना सुगीचे दिवस आले आहेत. आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्याची खरेदी करता यावी यासाठीच  या आदिवाशी बांधवांची रानभाज्या, खेकडे, चिंबोरी शोधून विकण्याची धडपड असते.

"पावसाळा सुरु होताच खेकडे, रानभाज्या, चिंबोरी व मासे पकडून आम्ही विकत असतो,त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुटतो. दोन पैसे जास्त हाती मिळत असल्याने आम्ही ते जमा करुन इतर सुखसोयी मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.

हंसाबाई तवटे
विक्रेती- विक्रोळी पार्क साईट

*विषारी सापासोबत खेळ बेतला जीवावर* *सापाने गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू.*

*विषारी सापासोबत खेळ बेतला जीवावर* 
*सापाने गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू.*


भिवंडी, मनीलाल शिंपी : विषारी सापासोबत २१ वर्षीय तरुण खेळ करत असतानाच त्या सापाने तरुणाच्या गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात असलेल्या गावदेवी मंदिरात घडली आहे. शिवा हाटेकर (२१) असे विषारी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विषारी सापासोबत २१ वर्षीय तरुण खेळ करत असतानाच त्या सापाने तरुणाच्या गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घडल्याने भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात असलेल्या गावदेवी मंदिरात घडली आहे. शिवा हाटेकर वय २१ असे विषारी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत शिवा हाटेकर हा तरुण भिवंडीतील कोंबडपाडा भागात कुटूंबासह राहत होता. शिवा हा रविवारी रात्रीच्या सुमारास मद्यधूंद अवस्थेत परिसरातील गावदेवी मंदिरात गेला होता. त्यावेळी त्याला मंदिरात विषारी साप दिसला असता त्याने सापाला दारूच्या नशेत पकडले. त्यानंतर तो पकडलेल्या विषारी सापासोबत खेळू करू लागला. दरम्यान खेळ करत असतानाच चवताळलेल्या सापाने त्याला गुप्तांगाला दोन वेळा दंश केल्याने तो बेशुद्ध पडला. शिवाला उपचारासाठी सुरवातीला भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खलावल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने तो राहत असलेल्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे ! "कृषि विभागाचे आवाहन"

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे ! "कृषि विभागाचे आवाहन"


बुलडाणा, दि.28 : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रीय शेती, वसंतराव नाईक शेती मित्र, उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपाल यांच्याहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते. तसेच सन 2020 पासून राज्यात कृषि क्षेत्रात उल्लेखनिय व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेती व पुरक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याची माहिती आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावातील कृषि सहायक यांच्याकडे 15 जुलै पर्यंत सादर करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक व्ही. आर बेतीवार यांनी केले आहे.

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी ‘जिल्ह्यांचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल’ प्रकाशित

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी 
                ‘जिल्ह्यांचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल’ प्रकाशित


नवी दिल्ली, दि. 28 : केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात’ महाराष्ट्राने एका  श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेवटच्या क्रमांकाहून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेत सातारा जिल्ह्याने या निर्देशाकांत ‘अती उत्तम श्रेणी’  गाठली आहे.


               केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने सोमवारी शैक्षणिक वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठीचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल असून याद्वारे शालेय शिक्षणाच्या प्रगतीचा राज्यांतर्गत तुलनात्मक आलेख मांडण्यात आला आहे. 
                
            केंद्राच्या शालेय आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ (PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2019-20 हे धरून अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वर्ष 2018-19 साठी 725 जिल्ह्यांची तर वर्ष 2019-20साठी 733 जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली आहे. 

            महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला.....

         देशातील सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधून प्राप्त माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या राज्यांच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने वर्ष 2018-19 मधील ‘श्रेणी 1’ वरून वर्ष 2019-20 मध्ये ‘श्रेणी 1+’ अशी प्रगती केली आहे. या अहवालांतर्गत देशातील राज्यांना प्रगतीच्या आधारे एकूण 1000 गुणांकानुसार एकूण 10 श्रेणीत  विभागण्‍यात आले आहे. वर्ष 2018-19 मध्ये महाराष्ट्राने 801 ते 850 गुणांच्या ‘श्रेणी 1’ मध्ये स्थान मिळविलेल्या दोन राज्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  वर्ष 2019-20 मध्ये राज्याने या अहवालात 869 गुण मिळवून ‘श्रेणी 1+’ मध्ये स्थान मिळविले आहे.याच श्रेणीत देशातील एकूण 7 राज्यांचा समावेश आहे.
 
             सातारा जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी.....  
      
        ‘जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांका’त महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत सातारा जिल्ह्याने उत्तम कामगिरी करत वर्ष 2018-19 मधील शेवटच्या स्थानाहून (प्रचेष्टा-३) वर्ष 2019-20मध्ये थेट ‘अती उत्तम श्रेणीत’ स्थान मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.    

          जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या–(PGI-D) रचनेत, ‘परिणाम, वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव,शाळेतील  पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रिया’अशा 6 श्रेणींमध्ये एकूण 83 निर्देशकांआधारे 600 गुण देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त गुणांची प्रतवारी 9 श्रेणीत केली असून यात 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्याची प्रतवारी ‘दक्ष’ श्रेणीत केली आहे. 81 ते 90 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्कर्ष’, 71 ते 80 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘अतीउत्तम’,  61 ते 70 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्तम’, 51 ते 60 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा 1’, 41 ते 50 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा 2’ आणि 31 ते 40 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना  ‘प्रचेष्टा3’ अशा श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.
 
             वर्ष 2019-20मध्ये राज्यातील 25 जिल्हे ‘उत्तम श्रेणी’त 

       वर्ष 2019-20मध्ये ‘अती उत्तम श्रेणी’त देशातील 20 जिल्ह्यांनी स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून सातारा या एकमेव जिल्ह्याने 423 गुणांसह या श्रेणीत स्थान मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले आहे. याच वर्षी उत्तम श्रेणीत राज्यातील 25 जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे, या श्रेणीत देशातील 95 जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा 1’ तर एका जिल्ह्याचा समावेश प्रचेष्टा 2 मध्ये आहे.

        वर्ष 2018-19 मध्ये ‘उत्तम श्रेणी’त देशातील 89 जिल्ह्यांनी  स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून 12 जिल्ह्यांनी  या  श्रेणीत स्थान मिळविले आहे. याच वर्षी ‘प्रचेष्टा 1’ श्रेणीत राज्यातील 15 जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे तर 4 जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा 2’ आणि 5 जिल्ह्यांचा समावेश प्रचेष्टा 3 मध्ये करण्यात आला आहे.

कोकणातील चढणीचे मासे...... (मुंबई, ठाणे- भिवंडीत या माश्यांच्या प्रवासाला 'वलगन' तर नवी मुंबई, अलिबाग, उरण, पेण येथे 'उधवन' )

कोकणातील चढणीचे मासे......

(मुंबई, ठाणे- भिवंडीत या माश्यांच्या प्रवासाला 'वलगन' तर नवी मुंबई, अलिबाग, उरण, पेण येथे 'उधवन' )


कोकण, (शांताराम गुडेकर) :
               कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
            समुद्रात पावसाळ्यात मोठी भरती येते त्यावेळी काही मासे समुद्राच्या प्रवाहा विरुध्द प्रवास करीत प्रजननासाठी खाडी, ओहोळ या ठिकाणी अगदी झुंडाच्या झुंडीने जातात. या झुंडीला 'वलगन' म्हणतात. मुंबई,ठाणे- भिवंडीत या मास्यांच्या प्रवासाला 'वलगन' तर नवी मुंबई, अलिबाग, उरण, पेण येथे 'उधवन' म्हणतात. त्याला कारण म्हणजे दर्याच्या येणाऱ्या उधाणामुळे उध्दभवलेल्या या माशांच्या क्रियेला उधवन म्हटले जाते. 'वलगन' आणि 'उधवन' दोन्ही आगरी-कोळी बोली भाषेतील शब्द आहेत.या वलगनीत प्रामुख्याने 'चिमणी, कोळंबी आणि शिवरा' हे व इतर मासे आढळुन येतात. परंतु वलगनीत प्रसिध्द असलेला तसेच खवय्यांना आवडणारा मास्यांचा प्रकार म्हणजे 'चिमणी मासा'. स्थानिक आगरी-कोळी बांधव यालाच 'वलगनीची चिवनी' म्हणुन संबोधतात. 'देणे वाला जब भी देता,देता छप्पर फाड के' या उक्ती प्रमाणे वा एखादी लाॅटरी लागावी तशी हजारो- लाखो मास्यांची पलटन मासेमारी करणाऱ्याच्या जाळ्यात ही वलगन देते. समुद्रात मासेमारी बंद असल्याने मासळी बाजारात मास्यांचा तुटवडा असतो त्यामुळेच या वेळेस बाजारात 'वलगनीची चिवनीला' खुप मागणी असते. त्याला अजुन एक कारण देखील आहे ते म्हणजे खवय्यांना या काळात चिमणी मास्यातील गाबोळी (मास्यांची अंडी) खावयास मिळते. संध्या बाजारभाव २०० रूपयाना ६/७ चिमण्या (चिवण्या) असल्या तरी देखील खवये विकत घेतात. 

ही वलगन खाडीतुन शेतात, डोंगराळ भागात, ओहोळात वा तलावातही प्रवास करीत असल्याने अनेक स्थानिक बांधव मौज म्हणुन एखादा सण साजरा करावा तसे वलगनीचे मासे पकडण्यासाठी जातात. कारण ही वलगन वर्षातुन एकदाच येते आणि तेही पावसाळा सुरु झाला की किमान १५ ते ३० दिवस असते.ही वलगन पकडण्याच्या अनेक पध्दती आहेत. वलगनीची चिमणी पकडण्यासाठी खाडीच्या बंधाऱ्यावर वा शेताच्या बांधावर जाळं लावले जाते त्याला छोटी डोली किंवा बोली भाषेत बोक्शी बोलतात. या बोक्शीत वलगन पाण्याच्या चढणीवर आपोआप येऊन अडकते. 

पावसाचे पडलेले खाडीतील पाणी ओहोळात जाते तिथेही हे मासे पेर (अंडी) टाकायला येतात मग काही जण २चा गाळा (जाळ) फेकुन म्हणजेच पाग टाकुन पकडतात. पाग टाकायला फार कौशल्य लागते आणि ही पारंपारिक पध्दत आहे. गाबोळी टाकायला आलेले असल्याने हे मासे या काळात इतके चपळ नसतात म्हणुन काही सहज गळानेही हे चिमणी मासे पकडतात. खरं तर अनेक तरुण, वयस्कर मंडळी पावसाचा मनसोक्त आनंद घेत आपल्या गृपने ही वलगन पकडण्यासाठी शेतावर वा खाडीवर जाळं, आसु, पाग, टोपली, भुसा, हे मासे पकडण्याचे साधने घेऊन जात असतात. मासे साठवणी साठी डोबला (टोपली) याचा वापर करतात. काही खवय्यांचा हे मासे पकडुन त्याच ठिकाणी पावसाची लज्जत घेत मस्त गरम-गरम खाण्यासाठी पार्टीचा बेत असतो. परंतु वलगनीची चिमणी पकडणे सोप्पे असले तरी तितकी खबरदारी घ्यावी लागते कारण या माशाच्या काट्यात विषारी घटक असल्याने काटा लागल्यास सुज येऊ शकते. थोडीशी खबरदारी घेत आपल्याला या वलगनीची मौज सहज लुटता येते कारण ही वलगन वर्षातुन एकदाच येते. 

पावसाळा सुरु झाला की कोकणी माणसाची शेतीच्या कामाची लगबग सुरु होते मात्र या शेतीच्या कामातुनही वेळात वेळ काढुन चढणीचे मासे पकडण्याची मज्जा तो दिवसा किंवा रात्री घेत असतो. पावसाळा सुरु होण्यापुर्वी कोकणातल्या बहुतांशी नदया या प्रवाहीत असल्या तरी डोंगरद-यातील पाण्यातील झरे लुप्त झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी काही नदयांत तो कोरडा असतो. नद्यांमधील मोठमोठे डोह व कोंडी या पाण्याने भरलेल्या असतात. उन्हाळ्यात पाणी जसे कमी कमी होत जाते तसे या नदयांमधील मासे या डोहात जमु लागतात. 

पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात, छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात. 

चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो. 

चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते. 

काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात. रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. 

कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा, सुतेरी, शिंगटी, दांडकी, वाळव, पानकी, काडी इ. मासे मिळतात. आत्ता या पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या झणझणीत माशांवर ताव मारायचा असेल तर कोकणाला नक्की भेट दया. काय मग येताय ना कोकणात चढणीचे मासे खायला.....!

मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंचं गुवाहाटीतील आमदारांना आवाहन !

मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंचं गुवाहाटीतील आमदारांना आवाहन !


भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
        आपल्यातील बरेच जण संपर्कातही आहेत
उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना परतण्याचं आवाहन
कोणत्याही भूल थापांना बळी न पडण्याची विनंती.
मी नको असेल तर समोर या आणि बोला, आत्ता राजीनामा लिहून देतो  उद्धव ठाकरे.
         शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना परत फिरण्याचं आवाहन केलं आहे. मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
         एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला एक आठवडा होत आला, मात्र बंडखोरांसोबत कुठलीही सकारात्मक चर्चा झाल्याचं वृत्त आलेलं नाही. त्यानंतर ठाकरे सरकारकडून त्यांचे परतीचे दोर कापण्यास सुरुवात झाली होती. काल ठाकरे सरकारकडून नऊ मंत्र्यांकडील खाती काढून घेण्यात आली. तर त्याआधीच १६ बंडखोर आमदारांना कारवाईबाबत नोटीस पाठवण्यात आली होती.
         एकीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी नावं घेऊन आमदार-मंत्र्यांवर हल्ला चढवला आहे. तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी सामोपचाराने बोलत पुन्हा एकदा हात पुढे केल्याचं चित्र आहे.

      उद्धव ठाकरेंनी  शिव सैनिक आमदारांना पत्रात म्हटले आहे....

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.
             माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Monday 27 June 2022

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा बडगा !! * 10 गुन्हे नोंदवून 20 आरोपींना अटक * 9 लाख 16 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त * पहिल्यांदाच ढाब्यांवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा बडगा !!

* 10 गुन्हे नोंदवून 20 आरोपींना अटक

* 9 लाख 16 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

* पहिल्यांदाच ढाब्यांवर कारवाई


बुलडाणा,  बातमीदार, दि. 27 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतूक तसेच अवैध ढाबेविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. विभागीय उप-आयुक्त व्ही. पी चिंचाळकर व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 24 व 25 जून रोजी धडक मोहिम राबविण्यात आली. या दोन्ही दिवशीच्या कारवाईत एकूण 10 वारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 9 लक्ष 16 हजार 527 रूपये किंमतीचा दारू बंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

   धडक मोहिमेदरम्यान 24 जून रोजी भानखेड ता. चिखली येथील मेहकर फाट्यावर सापळा रचीत एक चार चाकी महिंद्रा बोलेरो पिकअप मद्यासह जप्त करण्यात आली. सदर कारवाईमध्ये देशी दारु 529.2 लिटर, विदेशी दारु 105.29 लिटर व एक चार चाकी वाहनासह 8 लक्ष 88 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या कारवाईत अक्षय पांडुरंग भोजने रा. तिंत्रव ता. शेगांव याला अटक करून  कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच 25 जून रोजी बुलडाणा शहरातील  भिलवाडा, कैकाडीपूरा व सुंदरखेड येथील कारवाईत अवैध हात भट्टी निर्मिती एकूण 6 गुन्हे नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी गावठी दारू 72 लीटर, सडवा 591 लीटर सह एकूण 19 हजार 64 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा व लोणार येथील अवैध ढाबेवर तीन गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये लोणार शहरातील राजधानी ढाबा व हॉटेल सुजर, हॉटेल भारत यांचा समावेश आहे. यातील ढाबामालक बाबाराव बाजीराव बकाळ, पंढरी रामकिसन मुळे, शंकर मारोती बाजड, शिवानंद लक्ष्मण कायंदे यांच्यावर दारू पिण्याची सोय केल्याबद्दल दारू बंदी कायदा कलम 68 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच या ढाब्यावर दारू पित असताना सुदाम देवराम खारोड, भास्कर रामकिसन तळेकर, आत्माराम अर्जुन गिरी, सुनील साहेबराव मापारी, कृष्णा मोतीराम मोरे, विजय सदाशिव गरूडकर यांच्यावर कलम 84 नुसार गुन्हा नोंदविण्यात आले.  या ग्राहकांची वैद्यकीय तपासणी केली असता दारू नशेत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत तीनही ढाब्यावरील देशी विदेशी दारूसह 28 हजार 817 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

   या मोहिमेत चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे, मलकापूर चे दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, बुलडाणा येथील ए. आर आडळकर, मेहकरचे एस. डी. चव्हाण, खामगांवचे एन. के मावळे,भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर.आर उरकुडे, दुय्यम निरीक्षक चिखली येथील हरी सोनवणे, मलकापूरचे पी. व्ही मुंगडे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री. पहाडे, एन.ए देशमुख, जवान परमेश्वर चव्हाण, अमोल तिवाने, राजु कुसळकर, अमोल सोळंके, नितीन सोळंकी, प्रदीप देशमुख, अमोल अवचार, संजु जाधव, मोहन जाधव, शरद निकाळजे, विशाल पाटील, रामेश्वर सोभागे, गणेश मोरे, अमोल सुसरे, प्रफुल्ल साखरे, कु. सोनाली उबरहंडे यांनी सहभाग घेतला.   

   बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी  किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यसेवन करणाऱ्या नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. ढाबा, हॉटेल व रेस्टॉरंट किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पिवू नये आढळल्यास संबंधितांविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदाचे 68 अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर गुन्ह्यात 3 ते 5 वर्षाचा कारावास किंवा 25 ते 50 हजार रूपये पर्यंत दंडाची शिक्षा होणार आहे, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या निर्णयाचे मुरबाड करांकडुन स्वागत !! **मालमत्ता करात जेष्ठ नागरीक व दिव्यांगाना 50 % सवलत **

नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या निर्णयाचे मुरबाड करांकडुन स्वागत !!

**मालमत्ता करात जेष्ठ नागरीक व दिव्यांगाना 50 % सवलत **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : गेल्या पाच-सहा महिण्यांपुर्वी मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, आणि भाजपाने बहुमताची आघाडी घेत सत्ता मिळवली. आणि मुरबाड करांना रामभाऊ दुधाळे यांच्या रुपाने हक्काचा नगराध्यक्ष मिळाला. नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यावर रामभाऊनी कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या स्वप्नातील मुरबाड घडविण्यासाठी सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आगेकूच केली. आणि एक एक धाडसी निर्णय ते घेऊ लागले.त्यात आज घेतलेला निर्णय म्हणजे मुरबाड करांना दिलासा देणारा असाच आहे. ज्यामध्ये शहरातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना व दिव्यांग नागरिकांना मालमत्ता करात 50 ℅ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

आजपर्यंत अल्पावधीतच घेतलेल्या निर्णयामध्ये व केलेल्या कामांमध्ये मुरबाड शहरातील स्वच्छता, वाहतूक कोंडी, विद्युत रोषणाई, नालेसफाई, नागरिकांना व विद्यार्थ्यांना हवे असणारे दाखले तात्काळ उपलब्धता. यांसारख्या कामाकडे जाणिवपूर्वक लक्ष देण्यात आले. 

भविष्यातील रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी व स्वच्छ सुंदर "आपलं मुरबाड" यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड करांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

जनहीताची कामे अडकून न रहावी या साठी बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग --मुख्यमंत्री

जनहीताची कामे अडकून न रहावी या साठी बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग --मुख्यमंत्री 


भिवंडी, दिं,२७, अरुण पाटील (कोपर) :
           महाराष्ट्रात उद्भवलेल्या राजकीय संकटाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळात फेरबदल करून बंडखोर मंत्र्यांची खाती काढून अन्य मंत्र्यांकडे दिली आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
           महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्याना इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे.
           त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आले आहे. या नियमानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल केले आहेत.
            एकनाथ शिंदेंचे खाते सुभाष देसाईंकडे - एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
              राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल - शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.), राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे देण्यात आले आहे.

प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखले वाटप शिबिराचे आयोजन !

प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखले वाटप शिबिराचे आयोजन !


कल्याण, बातमीदार : कल्याण पूर्व मॉडेल कॉलेज चिंचपाडा रोड येथे शासकीय दाखले नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, तसेच शासकीय दाखले वाटप करण्यात आले. 

या शिबिरात 1365 जणांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये  849 जणांना आपले दाखले जागीच उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिराचे आयोजन विधानसभा संघटक प्रशांत काळे, माजी नगरसेविका माधुरी काळे, मनोज बेळमकर उपविभाग प्रमुख यांनी केले होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तथा माजी उल्हासनगर महानगरपालिका सभागृह नेता धनंजय बोडारे, सहसंपर्कप्रमुख कल्याण पूर्व व शिवसेना शरद पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे, मॉडेल कॉलेज उपप्राचार्य ब्रह्मा वल्ले सर, गणपत घुगे, विभाग प्रमुख दीपक आजगावकर, उपविभाग प्रमुख आनंद तांबे, उपविभाग प्रमुख वासुदेव कदम, उपविभाग प्रमुख विजय भोले, सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष संतोष साळवी, शाखा प्रमुख विवेक बर्वे, शाखाप्रमुख संतोष चव्हाण, उपविभाग प्रमुख सुरेखा बनसोडे, उपशहर संघटन स्मिता कदम, विभाग संघटक भारती उपविभाग संघटक शाखा संघटक संगीता गोष्टे, अश्विनी दवंडे, मंगला तांबे आणि राहुल शुभांगी मुतकेकर मकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कल्याण तहसीलदार कार्यालयातील सेतू प्रमुख दिनेश वाळुंज, तलाठी तानाजी कुंभार, किरण कदम, जुगरे सखाराम यांच्यासह 15 कल्याण तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. एकाच दिवसात शासकीय दाखले मिळाल्यानंतर विद्यार्थ्यी व पालक वर्गाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

आ. राजू पाटील व आ. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न !!

आ. राजू पाटील व आ. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न !!


डोंबिवली, बातमीदार : आमदार राजू पाटील व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काटई गावचे माजी उपसरपंच काशिनाथ कान्हा पाटील, संदीप माळी, सचिन म्हात्रे यांच्या स्वखर्चाने रविवार दि. 26 जून 2022 रोजी लोढा हेरिटेज, देसले पाडा डोंबिवली मधील वास्तू ए आणि बी विंग, चंद्रेश वास्तू मधील  एफ विंग, वास्तू सृश्टी सोसायटी, गणेश कृपा को.ऑप.हौ. सो. या सर्व सोसायटीमध्ये कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 


आमदार रविद्र चव्हाण आणि आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तु ए आणि बी विंग को.ऑप. हौसिंग सो सोसायटी च्या मोकळ्या जागेवर कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व काटई गावचे माजी उपसरपंच काशिनाथ पाटील यांच्या प्रयत्नातून व स्वखर्चाने कामाचा  भूमिपूजन सोहळा दिनांक 26 जून रोजी करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती समाजसेवक ग्रामीण क्रिकेट संघाचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. 

लोढा हेरिटेज, देसले पाडा येथे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व काटई चे माजी उपसरपंच काशिनाथ पाटील हे नेहमी आपल्या प्रभागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात. नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागातील सोसायटीच्या कॉंक्रिटीकरणाचे काम स्वखर्चाने करत आहेत. यावेळी संदीप माळी म्हणाले की, आम्ही राजकारण करत नाही आम्ही समाज कार्य करतो. लाडके आमदार राजू पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, ग्रामीण क्रिकेट संघाचे अध्यक्ष विनोद पाटील, काशिनाथ पाटील व मित्र परिवार या सर्वांनी मिळून या कामासाठी आम्हाला मदत केली आहे. आता पर्यंत 60 ते 70 लाख  खर्च झाला आहे. आणि आम्ही  नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय.आम्हाला कोणताही निधी उपलब्ध झाला नाही.आम्ही मिळून हे काम करत आहेत. आमच्या कडून जेवढं होईल तेवढ आम्ही काम  करत राहू. असे यावेळी संदीप माळी यांनी सांगितले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली. महिलांनी संदीप माळी, काशिनाथ पाटील यांचे खूप कौतुक व आभार व्यक्त करतांना म्हणाले की आम्ही कधी पण संदीप माळी, काशिनाथ पाटील यांच्याकडे रस्त्याची मागणी केली. त्यावर त्यांनी त्या कामाचा लगेच पाठपुरावा केला. यावेळी ग्रामीण क्रिकेट संघाचे अध्यक्ष विनोद पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप माळी, काटई चे माजी उपसरपंच काशिनाथ पाटील,जिल्हा उपसचिव सचिन म्हात्रे ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष भाजपा दिलीप देसले, माजी उपसरपंच कुंदन माळी, परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी, माजी नगरसेविका रवीना अमर माळी, समाजसेवक अमर माळी, वास्तु ए आणि बी विगचे संचालक मंडळ अध्यक्ष विजयसिंह, सचिव जतिंदर मोरे, खजिनदार नरेश जांभळे, उप खजिनदार यशवंत पावसकर, सदस्य गणपत सकपाळ, अरविंद पवार, मनोज कुमार वर्मा, गजानन परुळेकर, राजू गुप्ता, विजय डीचवळकर, हरशा जेमीन, ठक्कर, संगीता शिंदे आणि सर्व सभासद व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...