Thursday 29 February 2024

'सारथी' संस्थेमार्फत ४७ गड-किल्यांची स्वच्छता !!

'सारथी' संस्थेमार्फत ४७ गड-किल्यांची स्वच्छता !!

पुणे, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत राज्यातील ४७ गड किल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व मान्यवरांच्या उपस्थित लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

स्वच्छता मोहिमेत संस्थेचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथी, कौशल्य विकास अंतर्गत एमकेसीएल मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी,  सातारा व कोल्हापूर येथील शालेय विद्यार्थी अशा ८ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सारथी संस्थेमार्फत प्राधिकृत १५ प्रशिक्षण संस्थांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. किल्ले स्वच्छता उपक्रमात विद्यार्थ्यांनी  ११ हजार ९९८ प्लास्टीकच्या बाटल्या, ६४५ काचेच्या बाटल्या व ६ हजार ९२३ प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या. हा सर्व कचरा २१२ गोण्यांमध्ये भरुन नगरपालिकेकडे व प्लास्टीक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडे देण्यात आला. 

रायगड, रायरेश्वर, शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, राजगड, लालमहल, शनिवारवाडा, बालापूर, बदूर, खर्डा, देवगिरी, गाविलगड, किल्ले धारुर, माणिकगड, गोंडराजा, माहूरगड, प्रतापगड, वसंतगड, कल्याणगड (नंदगिरी), मल्हारगड, सिंधुदूर्ग, भोईकोट, मच्छिंद्रगड, बाणूरगड, रामपूर, सिंदखेडराजा, रत्नदुर्ग, लिंगाणा, पन्हाळा, भुदरगड, विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन, वंदन, रामशेज, नगरधनगड, तोरणा इत्यादी गड किल्यांवर ‘सप्तपदी स्वच्छतेची’ व ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 

सारथी प्रायोजित एच.व्ही.देसाई कॉलेजच्या ३७० विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ रथोत्सव मार्गावर स्वच्छता मोहिम राबविली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वछता करण्यात आली. या किल्ले संवर्धन उपक्रमातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत सहभाग प्रमाणपत्र व स्वच्छता करत असताना बनविलेल्या उत्कृष्ट रिल्स, शॉर्ट व्हिडीओ इत्यादी  बक्षीस म्हणून देण्यात येणार असून यानिमित्तने एच.व्ही.देसाई कॉलेज येथे मान्यवरांच्या उपस्थित राजगडावरील माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

उपक्रमास सारथी संस्थेचे संचालक उमाकांत दांगट,  नवनाथ पासलकर, मधूकर कोकाटे, नानासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व सारथीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाविषयी बोलताना संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे यांनी सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमामध्ये गड किल्ले परिसरात स्वच्छतेसोबतच लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांसाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण सारथी मार्फत देण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.

Wednesday 28 February 2024

युवा उद्योजक मा.श्री.अथर्व बुटाला यांना नुकताच जाहीर झाला बिझनेस एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०२४ ..

युवा उद्योजक मा.श्री.अथर्व बुटाला यांना नुकताच जाहीर झाला बिझनेस एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०२४ ..

प्रतिनिधी : समीर सकपाळ (पोलादपूर) -
        श्री. प्रसन्न शरद बुटाला हे देखील उत्तम उद्योजक व थोर समाजसेवक हाच वारसा पुढे श्री. अथर्व प्रसन्न बुटाला यांनी चालू ठेवलाय आणि त्यांच्या उत्तम कामगिरी बदल रिसील या संस्थेने सन्मा. प्रार्थना बेहेरे अभिनेत्री यांच्या हस्ते बिझनेस एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०२४ ह्या पुरस्कारासाठी निवड केली आहे .    
    अथर्व बुटाला यांना लहान वया पासूनच व्यवसायची आवड होती आजोबा, काका ,वडील यांच्या पासून व्यवसाय कसा असतो, कसा करायचं ह्याची पूर्ण माहिती घेत होते, हळू हळू आवड निर्माण झाली अन त्यांनी ठरवलं आपण ह्या व्यवसाय जो आपण शिकलो तर शिक्षण पण त्यात करूयात त्यांनी डिप्लोमा इन ऍग्रीकलचर पदवी प्राप्त केली. स्वतः शेतावर जाऊन पिकांची पाहणी करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, एकाद्या पिकावर रोग पडला तर हे औषध फवारा, असे अनेक त्यांना शासनाच्या योजनाची माहिती देणे, प्रॉडक्ट डेमो व मार्गदर्शन करणे, आणि ह्याच यशाचं फळ आज मिळालं अभिमानाची भाब आहे .
         सदर पुरस्कार सोहळा १८ मार्च २०२४ ला नाशिक येथे होणार आहे. सर्वत्र अथर्व बुटाला यांचं कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

राजीव गांधी हत्त्या कांडातील आरोपीचा राजीव गांधी रुग्णालयात मृत्यू !!

राजीव गांधी हत्त्या कांडातील आरोपीचा राजीव गांधी रुग्णालयात मृत्यू !!

भिवंडी, (कोपर), दिं,२८, अरुण पाटील :

          माजी पंतप्रधान राजीव गांधी  यांच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींची सुटका करण्यात आली होती, त्यापैकी एक असलेला आरोपी टी. सुथेंद्रनाथ ऊर्फ संथन याचा बुधवारी मृत्यू झाला. या आरोपीवर चेन्नईच्या स्व.राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली आहे.
         श्रीलंकन नागरिक असलेल्या संथनवर काही दिवसांपासून स्व.राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयाचे जीन डॉ. वी. थेरानीराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ७.५० वाजता सेंथनचा अचानक मृत्यू झाला. डॉ. वी. थेरानीराजन यांनी संथन याचं यकृत खराब झालं होतं, अशी माहिती दिली. यावर राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी त्याला कार्डियाक अरेस्ट धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला.
         राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १९९९ मध्ये संथनसह तीन आरोपींची शिक्षा कायम ठेवलं होती. यात संथन, मुरुगन आणि पेरारिवलन या आरोपींचा समावेश होता. नोव्हेंबर २०२२  मध्ये या तिघांचीही सुटका करण्यात आली. 
         सुटकेनंतर परदेशी नागरिकांसाठी असलेल्य भारतीय नियमानुसार संथनला त्रिचीतल्या एक शिबिरात ठेवण्यात आलं होतं. श्रीलंकेनं नुकतंच त्याची मायदेशात परतण्याची कागदपत्र तयार केली होती. 
          माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१  मध्ये एका निवडणूक रॅलीत बॉम्ब स्फोटाने हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम  या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटनेने याची जबाबदारी घेतली. एलटीटीईला तत्कालीन सरकारची धोरणे पसंत नव्हती. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्यांनी आपली काही माणसं पेरली. त्या काळी दक्षिण भारतात निवडणूक प्रचार सुरु होता. या प्रचारात कलैवानी राजरत्नम उर्फ धुन नावाची महिला रात्री साधारण  १०.१० मिनिटांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ गेली. तिच्या कपड्यांच्या आत आरडीएक्स स्फोटक होती. 
           पाया पडताना तीने स्फोट घडवून आणला आणि यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात एकूण  १४ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते .

सावकारीच्या विळख्यात अडकले ६३ हजार शेतकरी !!

सावकारीच्या विळख्यात अडकले ६३ हजार शेतकरी !!


अमरावती, प्रतिनिधी ::बॅंकांचे कर्ज भरण्यास अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेण्याची वेळ येत आहे. जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत परवानाधारक ६०२ सावकारांनी ६३,०६३ कर्जदारांना ६७.४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

अनियमित पाऊसमान व इतर कारणांमुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. परिणामी उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याची स्थिती आहे. त्याच कारणामुळे कौटुंबिक गरजांसह मुलांचे शिक्षण, आरोग्य यावर होणाऱ्या खर्चासाठी पैशाची सोय करणे आव्हानात्मक ठरत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते.

खासगी सावकारांकडील कर्जाचा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे. दागिने, प्लॉट, घर, शेती तारण ठेवून हे कर्ज घेतले जाते. त्यातच अवैध सावकारी सुध्दा जोरात सुरू आहे. त्यासाठी पाच टक्‍के ते दहा टक्के महिना दराने व त्यावर देखील चक्रवाढ व्याजाची आकारणी करून पैसे उकळले जातात.  त्यामुळे जिल्हाभरात शेतकरी सावकारी विळख्यात अडकले आहेत.

सहकार विभागाकडे किंवा पोलिस प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केल्यास अशा सावकारांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र शेतकरी कर्जापायी पिचलेला असल्याने त्यांच्याकडून अशी हिंमत होत नाही. परिणामी खासगी सावकारांचे फावते व त्यांच्याकडून दामदुप्पट दराने वसुली होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !!

** अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे, प्रतिनिधी : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या दोन महिन्यात २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ वारस गुन्ह्यांची नोंद व ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने असा २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून ९७ लाख ७१ हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर ४१ प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले. 

१ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले. त्यामधील ४६८ आरोपीना अटक करुन  न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना ५ लाख ८३ हजार १०० रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.

अवैध मद्य व्यवसायात गुंतल्याबद्दल वारंवार गुन्हे नोंदविलेले तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरूद्ध एम.पी.डी.ए कायदा १९८१ अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल ४८ प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून १० आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परवानाकक्षा नमुना एफएल-३ अनुज्ञप्तीविरुद्ध एकूण २४९ नियमभंग प्रकरणे, त्यापैकी ३ निलंबन संख्या व ४४ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

बिअर/वाईन शॉपी (एफएलबीआर-२) अनुज्ञप्तीविरुध्द ४४ नियमभंग प्रकरणे, १५ निलंबन संख्या,  ७ लाख ३० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ४ आरोपींचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. किरकोळ अनुज्ञप्ती कक्षाबाहेरील तसेच रूफ टॉप विरूद्ध ३४ नियमबाह्य प्रकरणात कारवाई केलेली असून १७ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 
 
*कारवाईसाठी १४ नियमित व ३ विशेष पथके तयार*
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकुण १४ नियमित व ३ विशेष पथके तयार केली ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र. १८००२३३९९९ व दूरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी केले आहे.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल !!

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल !!

पुणे, : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. 

नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी. 

या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन !!

महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन !!

*** 'वारसा संस्कृतीचा' कार्यक्रमाने ग्रामीण संस्कृती उभी करत आणली बहार

पुणे, प्रतिनिधी : 'रामाच्या पारी घरी येणारा ग्रामीण संस्कृतीतील वासुदेव', 'भलगरी दादा भलगरी म्हणत बैलजोडीसह पेरणीला, लावणीला निघालेला शेतकरी दादा', पश्चिम महाराष्ट्रातील डोक्यावर समई ठेवून नृत्याची 'दिवली' कला, विठुरायाच्या भक्तीरसात नाहून निघालेले अभंग आणि वारी आदी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत वारसा संस्कृतीचा कार्यक्रमाने महासंस्कृती महोत्सवात बहार आणली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे - देवकाते, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. मोरे म्हणाले, स्थानिक कलाकारांच्या कलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कर्तुत्वाची मांडणी सादर करणारे कार्यक्रम आयोजित करणे, लुप्त होणाऱ्या कलांना प्रोत्साहन मिळावे, त्या जीवंत रहाव्यात व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागील आहे.

ते पुढे म्हणाले, आपली संस्कृती आपण कशी जोपासतो आणि पुढच्या पिढीला कशी हस्तांतरित करतो याला महत्व आहे. म्हणूनच पुणे जिल्ह्यात येरवडा, बारामती आणि सासवड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात १५ वर्षापासून कथ्थक शिकत असलेल्या केंद्र शासनाकडून शिष्यवृत्ती मिळविलेल्या कथ्थक नृत्यांगना अलापिनी अमोल यांनी सादर केलेल्या आकर्षक गणेश वंदनेने झाली. 

अमित भारत यांच्या संकल्पनेतून 'वारसा संस्कृती'चा या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच पुरातत्व विभागाकडून जतनकार्य असलेल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, महिला स्वयंसहायता बचत गटांचे विविध हस्तकला, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. 

रसिकांना ३ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी

या महोत्सवात ३ मार्चपर्यंत अभंग, भजन, कीर्तन, नाटक, बालनाट्य, एकांकिका आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा येथे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते संय. ५ वा. भजनी मंडळ स्पर्धा व त्यानंतर रात्री ८ ते ११ वा. राहुल देशपांडे यांचे अभंग गायन होणार आहे. बारामती विद्यानगरी येथील गदिमा सभागृहात रात्री ८ ते ११ या वेळेत 'यदा कदाचित रिटर्न्स' नाटक आणि आचार्य अत्रे नाट्यगृह सासवड येथे सायं. ४ ते ७ वा. नेकी, मजार, बी अ मॅन या एकांकिका, रात्री ८ ते ११ या वेळेत सोबतीचा करार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात - ॲड श्रीमती सुनीता जोशी

ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात - ॲड श्रीमती सुनीता जोशी

** ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाटन

रायगड, प्रतिनिधी -  ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे व समाजाला सुधारण्याचे  काम करतात, असे प्रतिपादन ॲड. सुनीता जोशी यांनी केले. सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे ग्रंथोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, डॉ.हेमंत पवार, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलाताई पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, श्री.वणगे, रायगड जिल्हा ग्रंथालय सदस्य नागेश कुलकर्णी, श्री.रमेश धनावडे आदि उपस्थित होते.

यावेळी मागदर्शन करताना ॲड.जोशी म्हणाल्या की, ग्रंथ हे गुरु, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावत असतात. काय वाचावं, किती वाचावं यामुळे वाचक भरकटतो आहे, त्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. स्वतःला अद्यावत ठेवणे, स्पर्धेत टिकून रहाणे यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. नवे विचार मांडून समाजाला दिशा देणे हे ग्रंथाचे काम आहे. मोठ्यांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. ग्रंथ स्वीकारणे किंवा नाकारणे हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून आहे. गावातली माणसे कोणते ग्रंथ वाचतात, तेथील ग्रंथालये किती समृद्ध आहेत यावरून गावाची समृद्धी मोजली जाते. वाचनातून व्यापक जीवनदर्शन होत राहते. सर्वकष वाचन हे आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करते. आपल्या ज्ञानाचा आवाका विस्तारते, तर संतसाहित्य निरामय आनंदाचा मार्ग दाखवते असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व  राज्यगीताने झाली.

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर !!

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर !!

रायगड, प्रतिनिधी -  महाराष्ट्र शासन-कृषी विभाग यांच्यामार्फत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, पत्रकार, संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रतिवर्षी कृषी पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2020, 2021, 2022 वर्षासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे. 

कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, पत्रकार, संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/ आदिवासी गट), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. 

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत__

सन-2020- वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, डॉ.श्री.मकरंद अरविंद आठवले, मु.पो.नागांव ता.अलिबाग जि.रायगड. युवा शेतकरी पुरस्कार- कुमारी रसिका अनिल फाटक, मु.कोलाथरे पो.दहिगाव ता.सुधागड पाली, जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार- श्री.धनंजय मधुकर जोशी, मु.नारळी जोशीबाग, पो.घोसाळे, ता.रोहा जि.रायगड.

सन -2021- वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, श्री. प्रकाश शांताराम ठाकूर, मु.पो.नागाव, ता.उरण जि.रायगड. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, श्री.संतोष काशिनाथ दिवकर, मु.पो.यशवंतखार, ता.रोहा जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, श्री.सज्जन गोवर्धन पवार, मु.कानपोली, पो.पडघे, ता.पनवेल, जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार श्री.धाया हिरा भला, मु.शेडाशी, पो.रानसई, ता.पेण, जि.रायगड.

सन-2022- जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, श्रीमती प्राची विजय शेपूंडे, मु.कुडली, पो.जामगाव, ता.रोहा, जि.रायगड. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, श्री.अनंत दत्तात्रेय भोईर, मु.टेमघर पो.चणेरा ता.रोहा जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, प्रफुल्ल काळुराम खारपाटील, मु.पो.चिरनेर ता.उरण जि.रायगड

महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच -१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात साजरे !!

महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच -१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात साजरे !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच-१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी (२५फेब्रुवारी) चिंचपोकळी निर्मल हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विद्यार्थी आवर्जू उपस्थित होता. यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यानी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी पण गाणी आणि नृत्य सादर केली. यामध्ये हरी मरतल, प्रकाश जाधव, किरण तळेकर, आदेश म्हात्रे, तनिष्क तळेकर, सुहास सावंत, मिलिंद शेट्ये यांनी सदाबहार गीते सादर केली.तर तनया गावडे हिने राम जन्म भूमीवर आधारित भरत नाट्य चे सुंदर नृत्य सादर केले.कविता मिठे हिने देखील हिंदी गीतावर तिच्या सासूसह बहारदार नृत्य केले. यानिमित्ताने अनेकांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी शेअर केल्या.आलेल्या विद्यार्थीमध्ये काही व्यावसायिक, पेशाने वकील, तर काही पोलिस अधिकारी तर काही सरकारी सेवेत होते. सर्वात शेवटी सगळ्यांनी सैराट या  गीतावर नृत्य करून मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भाटकर, आदेश म्हात्रे आणि वंदना गावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप अडमिंन सुनील पांचाळ, मिलिंद गावडे, किरण तळेकर, नंदू कदम यांनी विशेष मेहनत घेतली. मनीषा फाळके आणि रंजना बिरमुळे यांनी सर्वात शेवटी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थी वर्गाचे आभार मानले. सर्वात शेवटी स्नेहभोजन करून सर्वांनी आठवणींची शिदोरी सोबत घेऊन पुन्हा एकदा भेटू असा निरोप घेऊन कार्यक्रमची सांगता केली.

मराठी राजभाषा दिनी विद्यार्थांना देण्यात आली मराठी साहित्यिकांची ओळख !!

मराठी राजभाषा दिनी विद्यार्थांना देण्यात आली मराठी साहित्यिकांची ओळख !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            मराठी राजभाषा गौरव दिवस आज विद्याभवनच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे मराठीचे निवृत्त प्राध्यापक आणि आचार्य कॉलेजचे उप प्राचार्य गिरीश जोशी आणि पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गिरीश जोशी व त्यांच्या पत्नी यांचे शाल  पुष्पगुच्छ देऊन बोऱ्हाडे यांनी सत्कार आणि स्वागत केले. विद्यार्थ्यांना मराठी साहित्यातील  साहित्यिकांची माहिती जमा करण्यास दिली होती. यामध्ये कवयित्री, लेखक, संत आणि अजरामर गाणी यांचा समावेश होता. यानिमित्त विद्यार्थ्यांना दिग्गज साहित्य व साहित्यिकांची ओळख करून देण्यात आली. यामध्ये मुक्ताबाई, संत तुकाराम, कवियत्री शांताबाई शेळके, बहिणाबाई, बालकवी आणि पु ल देशपांडे, व पु काळे याची माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी मराठीतील गाणी आणि एकपात्री प्रयोग सादर केले. प्राध्यापक जोशी सरांनी अतिशय सोप्या व सहज मुलांना समजतील अशी मराठीतील  उदाहरणे दिली. तसेच सर्वांना आपल्या मातृभाषेचा आणि इतर भाषांचा आदर राखता आला पाहिजे. उत्तम भाषा बोलता व लिहता यावी असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. राजेंद्र बोऱ्हाडे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मराठी राजभाषा दिनाचा शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नववीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. मातृभाषा असल्यामुळे मुलांनी गाण्यावर ठेका धरला व कार्यक्रमाचा आनंद घेतला
या वेळी शाळेच्या दोन्ही माध्यमांचे मुख्याध्यापक सुनील पाटील आणि योगिनी पोतदार आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

राज्यातील एकूण अठ्ठावीस अधिका-या बदल्या, कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डहाणू च्या बीडिओची नियुक्ती !

राज्यातील एकूण अठ्ठावीस अधिका-या बदल्या, कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डहाणू च्या बीडिओची नियुक्ती !

कल्याण, (संजय कांबळे) : लोकसभा निवडणूका २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विकास सेवा, गट अ संवर्गातील गटविकास अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या असून कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पालघर जिल्हातील डहाणू पंचायत समितीच्या बीडिओ श्रीमती पल्लवी हिंदूराव सस्ते यांची नियुक्ती करण्यात आली असून तत्कालीन गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी राबविलेली कार्यप्रणाली, यामुळे निर्माण झालेली शिस्त, कार्य तत्परता, जिल्ह्यातील अग्रक्रम कायम टिकवता येईल का? या बाबतीत साशंकता निर्माण झाली आहे.

कल्याण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी अशोक भवारी हे त्यांच्या कार्यनिष्ठ पध्दतीमुळे ठाणे जिल्हा परिषदेत परिचित आहेत, शासनाचा आपण काम करण्यासाठी पगार घेतो, त्यामुळे काम हे करावेच लागेल अशा त्यांचा दंडक होता, माझ्या टेबलावर कागद दिसता कामा नये, असा त्यांचा नियम असल्याने जे योग्य, कायदेशीर आहे, त्यावर ताबडतोब स्वाक्षऱ्या करण्यात ते अजिबात कुचराई करत नव्हते, चे चुकीचे आहे, गैर आहे, बेकायदेशीर आहे, मग कितीही जवळच्या व्यक्ती,कर्मचारी, अथवा अधिका-याचे असलेतरी त्यावर सही ते करणार नाहीत.अशा सरळमार्गी स्वभावामुळे अनेकाची अडचण होत होती.

याशिवाय नागरिकांच्या तक्रारी, मोर्चे, प्रश्न, अडचणी, समस्या, उपोषण आदी बाबतीत जे शक्य आहे ते तात्काळ करण्याचे ते आदेश देत होते, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात कल्याण पंचायत समिती वर मोर्चे, उपोषण, घेराव, अशी अंदोलने झाली नाहीत, यामुळे त्यांची प्रशासनावर किती मजबूत पक्कड, ग्रामसेवक, कर्मचारी यांच्या कडून काम करून घेण्याची हातोटी, कामचुकार व बेशिस्त कर्मचाऱ्यांना नोटीस, प्रंसगी निंलबनाचा प्रस्ताव पाठविण्यात त्यांनी कधी चालढकल केली नाही. त्यामुळे कल्याण पंचायत समितीचे अधिकारी, व कर्मचारी यांच्या मनात बीडिओ चा दबदबा होता.

या सर्वाचा परिणाम म्हणून कल्याण पंचायत समिती, स्वच्छता अभियान, जलजीवन मिशन, रमाई, शबरी, मोदी, आवास योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, याशिवाय शासनाचे विविध उपक्रम, अहवाल, त्यांची अमंलबजावणी,यामध्ये पंचायत समिती जिल्ह्यात नेहमीच आघाडीवर राहिली होती.
हे करत असताना त्यांनी कधीही कौटुंबिक अडचणी, आजारपण, अथवा तत्सम बाबींचा बाहू केला नाही. त्याचाच परिणाम आज कल्याण पंचायत समिती एक आदर्श पंचायत समिती म्हणजे नावारूपाला आली आहे. अशातच त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पंचायत समिती येथे झाली आहे, त्यांच्या रिक्त पदी पालघर जिल्ह्यातील डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीम, पल्लवी हिंदूराव सस्ते यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय राज्यातील एकूण २८ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये डहाणू,  वाडा, तलासरी, कोपरगाव, जुन्नर, माण, वाई, खंडाळा, खटाव, अक्कलकोट, हातकणंगले, कडेगाव, शेगाव, खामगाव, वरुड, वैजापूर, आदी पंचायत समित्याचा समावेश आहे.

त्यामुळे नवीन गटविकास अधिकारी श्रीमती सस्ते मँडम या कल्याण पंचायत समितीचा  हा शिस्तबद्ध डोलारा कश्या सांभाळतात हे लवकर कळेल.

Tuesday 27 February 2024

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर !!

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर !!

*** पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद


मुंबई, प्रतिनिधी : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपयेम हसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.


अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा__

* जुलै 2022 पासून शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 12 हजार 769 कोटी रूपये मदत देण्यात आली.

* शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौरकृषी पंप

* 25 वर्षांपेक्षा जुन्या 155 प्रकल्पांची दुरूस्ती आणि 75 अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येतील यातून 3 लाख 55 हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि 23.37 टीएमसी पाणीसाठा निर्माण होईल.

* श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 ला कार्यान्वित होईल.

* राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे भरण्यात आली आहेत. इतर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

* कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

* महिला सक्षमीकरणासाठी दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा योजना प्रस्तावित आहे.

* मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवी योजना 1 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. यात 18 वर्षांपर्यंत टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रूपये मिळतील.

* वाशिम, जालना, हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

* महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी मंडळांना अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोवा, दिल्ली, बेळगाव, कर्नाटक याठिकाणी मराठी भाषा उपकेंद्र स्थापन केले जाईल.

* राज्यात नवीन 10 अतिरिक्त कुटुंब न्यायालये, 5 जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये आणि 5 दिवाणी न्यायालयांना स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

* महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे केली जातील.

* वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा ठाणे शहरापर्यंत विस्तार केला जाणार आहे.

* छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल.

* कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन केले जाणार. पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखलं जाईल.

* कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल.

* संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे "लेदर पार्क", कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाईल.

* प्रत्येक महसुली विभागात 'उत्कृष्टता केंद्रांची' स्थापना, गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येईल.

* मातंग समाजासाठी "अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना करण्यात आली.

* वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपये, अनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये

* सर्व जिल्ह्यांमध्‍ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करणार, 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र सुरू करणार त्याचबरोबर रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका सुरू केली जाणार.

कणकवली एस्.एम्.हायस्कूल १९७६ बॅचच्या एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासातून मिळाला नवचैतन्याचा अविष्कार, जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळा उत्साहात संपन्न...!

कणकवली एस्.एम्.हायस्कूल १९७६ बॅचच्या एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासातून मिळाला नवचैतन्याचा अविष्कार, जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळा उत्साहात संपन्न...!
 
कर्जत, (प्रतिनिधी) - गुरुनाथ तिरपणकर
क्षण कृतज्ञतेचा, क्षण आनंदाचा, क्षण एक मैत्रिचा, जुन्या आठवणींना पुन्हा जागवुया!चला मग मित्र-मैत्रिणींच्या गलक्यात पुन्हा हरवुया ! याच उद्देशाने कणकवली येथील एस्.एम्. हायस्कुलच्या दहावीच्या १९७६ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा (गेट टु गेदर) कर्जत तालुक्यातील जामरुंग या गावातील डोंगर पायथ्याशी असलेल्या 'सह्याद्री हिल्स रीसाॅर्टवर, आयोजित करण्यात आला होता. मित्रांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि बालपणीचे मित्र एकत्रित आल्यानंतर कोणती नवऊर्जा देऊन जातात व नवचैतन्याचा अविष्कार कसा होतो याचा प्रत्यय एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींना झाला. मित्र हे आजच्या धकाधकीच्या जीवनात एक समाधानकारक सहवास देण्याची संधी उपलब्ध करून देतात, तेव्हा म्हणावस वाटत" दोस्ती खून से भी काफी गहरी होती है" याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अशोक चिंदरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील व आयुष्यातील घडामोडींचा अनुभव सर्वांसमोर मांडला.तसेच उन्मेश शिर्के, भरत तोरसकर यांनी मजेशीर कीस्से सांगितले. आता सर्वच मित्र-मैत्रिणींनी वयाची ६२ ठी ओलंडली आहे, त्यामुळे काहींना थोड्याफार प्रमाणात अल्पशा का होईनात शारीरीक तक्रारी आहेत, या कशा दुर होतील या दृष्टिकोनातून डाॅ. सुनिता शेख यांनी  फिटनेस करता शारीरिकदृष्या काही टिप्स दिल्या. काॅमिडी कींग मंगेश चिंदरकर याने थट्टा-मस्करीतुन काही कीस्से सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. म्युझिक सिस्टीम वरून सादर करण्यात आलेल्या गाण्यांच्या तालावर सर्वांनी नाचण्याचा आनंद घेतला. तसेच सौ. गोखले मॅडम यांनी चांद्रयान व श्रीरामवर कविता सादर करुन सुखद धक्का दिला. या गेट टु गेदर साठी कणकवली, महाड, देवरुख, रत्नागिरी, चिपळूण, ठाणे, बोरीवली, जोगश्वरी, मिरा रोड, कळवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर येथून माजी विद्यार्थी आले होते. शेवटी प्रसाद देसाई यांनी स्वतःकडुन प्रेमाची भेट म्हणून गावकडील काजूगर दिले. स्नेह मेळा यशस्वी करण्यासाठी संजय पाध्ये व नंदु आळवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

वरप येथे जांभूळ बिटाचा महिला मेळावा संपन्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिडिंने सुरुवात, मदतनीसांच्या लेझीम ने रंगत वाढली !

वरप येथे जांभूळ बिटाचा महिला मेळावा संपन्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिडिंने सुरुवात, मदतनीसांच्या लेझीम ने रंगत वाढली !

कल्याण, (संजय कांबळे) : महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ठाणे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कल्याण आयोजित, पंचायत राज संस्था मधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण महिला मेळावा प्रशिक्षण केंद्र जांभूळ बिटाचा मेळावा वरप येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती, यामध्ये अंगणवाडी च्या मदतनीस यांनी लेझीम सादर केल्याने कार्यक्रमात रंगत वाढली होती.

आजच्या या महिला मेळाव्याला वरप ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती छाया महेंद्र भोईर, उपसरपंच मीना कुर्ले, म्हारळ ग्रामपंचायतीच्या माझी उपसरपंच अश्विनी देशमुख, सदस्यां विदेका गंभीरराव, लक्ष्मण कोंगिरे तसेच आणे भिसोळ, जांभूळ वसत, येथील सरपंच, सदस्य, डॉ श्रीमती इंगळे मँडम, अँडव्होकेट, तसेच कल्याण पंचायत समितीच्या बालविकास विभागाच्या श्रीमती उषा लांडगे, घरत मँडम, तसेच या बिटाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक या बिटाच्या प्रमुख निपुर्ते मँडम यांनी केले, या मेळावा घेण्यामाचा उद्देश, हेतू त्यांनी सांगितला, प्रारंभी आज मराठी भाषा गौरव दिन असल्याने ग्रंथ दिंडी काढण्यात आली, यावेळी अंगणवाडी मदतनीस यांनी लेझीम सादर केले, यामध्ये शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थितीत पाहुण्याकडून सेविका व मदतनीस यांनी बनवलेल्या विविध रेसीपी व साहित्य, कलाकृती याची पाहणी करून त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात येवून पाहण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या मध्यावर महिला मेळावा असे लिहिलेला केक कापण्यात आला.

या मेळाव्यात महिलांना कायदेविषयक, आरोग्याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच काही सेविका यांनी लेख वाचवा, शासनाच्या विविध योजना याची माहिती नाट्यमय रुपात दिली.

अखेरीस आलेल्या सर्व सेविका, मदतनीस तसेच पाहुणे, ग्रामस्थ यांना चविष्ट भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जांभूळ बिटातील विशेष करून वरप, कांबा, म्हारळ येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूप मेहनत घेतली.

Monday 26 February 2024

रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे श्री. किशन जावळे यांनी स्वीकारली !!

रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे श्री. किशन जावळे यांनी स्वीकारली !!

रायगड, प्रतिनिधी - रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे गुरुवार रोजी श्री.किशन जावळे यांनी हाती घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्क, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, अलिबाग प्रांत मुकेश चव्हाण यांनी श्री. जावळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यापूर्वी जावळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, अप्पर आयुक्त म्हणून काम केले आहे. लोकसभा, विधानसभा या निवडणूकांचा त्यांचा प्रदिर्घ अनुभव आहे.

“शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे -- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

“शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे -- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

*ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे 3 मार्च रोजी "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे होणार भव्य आयोजन*

ठाणे, प्रतिनिधी - खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
      जिल्ह्यात प्रीमियर मैदान, इरा ग्लोबल शाळेजवळ, कल्याण शिळफाटा मार्ग, कोळे, कल्याण येथे दि.3 मार्च रोजी "शासन आपल्या दारी" हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमाचे पूर्वनियोजन व स्थळपाहणी करण्याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कल्याण येथे भेट दिली, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
      अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यानी कल्याण येथे नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आज भेट देवून स्थळ पाहणी केली.
      सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
       या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केला आहे.
       या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत.या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू,असा विश्वास जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी व्यक्त केला आहे.
      या उपक्रमाच्या नियोजनाकरिता विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी घेण्यात येत आहे. त्यांनी महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या  आकडेवारीची तालुकानिहाय माहिती घेवून या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका, परिवहन, महामंडळे तसेच इतरही विभांगाना दिल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलीस विभागालाही सूचित केले आहे.
    जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

महाड तालुका कुणबी समाज रहिवाशी संघाचा नालासोपारा येथे हळदीकुंकू व स्नेहसंमेलन संपन्न !!

महाड तालुका कुणबी समाज रहिवाशी संघाचा नालासोपारा येथे हळदीकुंकू व स्नेहसंमेलन संपन्न !!

मुंबई, (दीपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
              महाड तालुका कुणबी समाज रहिवाशी संघाचा नालासोपारा येथे हळदीकुंकू व स्नेहसंमेलन कार्यक्रम साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा पूर्व येथे रविवारी (२५ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून दीपक मांडवकर (पत्रकार) व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तर मंडळाचे अध्यक्ष चौधरी यांनी प्रथम देणगीदार, महिला मंडळ, सर्व सदस्य व मान्यवर यासर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील हॉल कमी पडला तर या मंडळात २१ गावातील कुणाबी बांधव उपस्थित होते. या साठी प्रामुख्याने प्रमुख पाहुण्यांनी मंडळाचे कौतुक केले.

             सर्व महिला मंडळीसाठी मंडळाच्या वतीने वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सर्वांनी आनंदात स्नेहभोजन केले. हे मंडळ प्रामुख्याने दर वर्षी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. विद्यार्थी गुणगौरव सोहळा असो वा विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा, आरोग्य शिबीर, सामाजिक उपक्रम व खास करून वैद्यकीय उपचार सहकार्य असी मंडळाच्या वतीने समाजसेवा घडत असल्याने खास करून या मंडळाच्या कार्यकारणी  संघटना प्रमुख संजय गोलांबडे, अध्यक्ष दत्ताराम चौधरी, कार्याध्यक्ष विनायक तांबे, सचिव संजय दवंडे, खजिनदार राजेश खिडबीडे आणि सहकारी संतोष अडखळे, सचिन तांबे, राजेश पिचूर्ले, संतोष रेवाळे, नितीन पेंढारी, संतोष राक्षे, संतोष पारदुले, अनंत चिबडे, आत्माराम शेंडल, शरद शिगवण, मुकुंद शिंदे, रोहित राणे, संदीप देवळे, दीपक शिंदे, सुरेश अडखळे, परेश बटावेले, संदेश खिडबीडे, सुनील दोरकर, विकास पातेरे, देवदास चिबडे, शेखर पिचूर्ले, आणि रवी घरटकर या सर्वानी या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली. व शेवटी अध्यक्ष दत्ताराम चौधरी यांनी सर्व रहिवासी बांधवांचे आभार मानले व कोणताही प्रसंग आला तरी हे मंडळ प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल अशी ग्वाही दिली.

कासार कोळवण बावनदी पूल व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन !!

कासार कोळवण बावनदी पूल व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन !!

*सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण व पालकमंत्री मा. उदय सामंत यांची भेट घेऊन दिला विनंती प्रस्ताव*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. कासार कोळवण गाव हे दुर्गम भागात असून सर्व पंचक्रोशीतील लोकांना हा अगदी मोक्याचा मार्ग सुरळीत होईल म्हणून गेली अनेक वर्ष सर्वजण प्रयत्न करीत असलेल्या बावनदीवरील कासार कोळवण येथे आवश्यकता असलेल्या पूलासाठी आज (दि.२६ फेब्रुवारी) विधान भवन मध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ. मानशी महेंद्र करंबेळे, पो.पाटील महेंद्र रामचंद करंबेळे व उपसरपंच प्रकाश धोंडू तोरस्कर यांनी चिपळूण संगमेश्वर मतदार संघांचे आमदार शेखर निकम यांचे समवेत पूलाचे काम मार्गी लागावे यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. 

            सदर भेटीमध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही हा ग्रामस्थचा गंभीर व ज्वलंत प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन दिले आहे. सोबतच मा. मंत्री सार्वजनीक बांधकाम श्री. रविंद्रजी चव्हाण व उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री मा. उदय सामंत यांनाही निवेदने दिली असून लवकरच पूलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे सांगण्यात आले. 

           हा पूल झाला तर कासार कोळवण गावासह वांझोळे, सुतारवाडी, सनगलेवाडी आदी गाव, वाड्या यांना फायदा होणार आहे. कासारकोळवण या गावातील लोकांना देवरुख येथे जाणाऱ्या एस.टी साठी किंवा मुंबईला येण्यासाठी कासारकोळवण एस.टी स्टाँप वर याच पुलाचा वापर करावा लागतो. तसेच शेती कामाला किंवा एखाद्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे/आणणे शिवाय जनता विद्यालय आंगवली या शाळेत इ.८ वी १० पर्यंत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी वर्गालाही याच पूलाचा वापर करावा लागत असल्यामुळे येथे पूल होणे आवश्यक आहे. याठिकाणी पूल झाल्यास कासार कोळवण सह पंचक्रोशीतील नव्हे तर तालुक्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल. पर्यायाने गाव व तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. उद्योगांना चालना मिळेल. तरी हा पूल त्वरीत बांधावा अशीच मागणी स्थानिकांसह पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.

म्हारळ ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ मेघा मोरे हिचा सत्कार, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यूनंतरही मिळवले यश !

म्हारळ ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ मेघा मोरे हिचा सत्कार, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यूनंतरही मिळवले यश !

कल्याण, (संजय कांबळे) : ऐन परीक्षा काळात वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, एकुलती एक असलेली मुलगी व आईवर दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती, भयंकर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व परिस्थितीची जाणीव या गुणांच्या जोरावर म्हारळ गावातील मोहन नगरी येथे राहणाऱ्या कु मेघा राजू मोरे हिने वैद्यकीय पदवी प्राप्त करून उज्ज्वल यश प्राप्त केल्यामुळे म्हारळ ग्रामपंचायतीच्या उच्च शिक्षित सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे यांनी आज तिचा कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पगुष्ष देऊन तिचा सत्कार केला, यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ मेघा मोरे हिने सर्वाचे आभार मानले. 

म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील मोहन नगरी येथे राहणारे राजू मोरे हे पालघर येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते, मात्र कर्तव्यावर असतानाच १३ आँगस्ट २०२० रोजी त्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. आई सरिता मोरे यांच्या वरतर दु:खाचा डोंगर कोसळला, कारण त्यांना मेघा ही एकुलती एक मुलगीच होती, त्यातच तिचा धुळे जिल्ह्यातील दादासाहेब स्वरुपसिंह नाईक आयुर्वेदिक कॉलेजला नंबर लागला होता, नेमके परिक्षाच्या काळात अशी दु:खद घटना घडल्यामुळे मेघाला खूप मोठा धक्का बसला होता. पण दुसऱ्याच क्षणी तिला तिच्या बापाला दिलेले वचन आठवले, तिने तिच्या वडिलांना मी डाँक्टर होणार असे वचन दिले होते, आणि ते पुर्ण करण्यासाठी तिथे अशा बिकट परिस्थितीत बीए एम एस ची परीक्षा दिली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली,
तिला या काळात काही कागदपत्रांची अंत्यंत आवश्यकता असतानाच म्हारळ ग्रामपंचायतीच्या सदस्यां श्रीमती मंगला सिध्दार्थ इंगळे यांनी मेघाला सरपंच सौ निलिमा म्हात्रे यांच्या कडे आणले, सरपंच स्वतः उच्चशिक्षित असल्याने मेघाच्या कागदपत्रांची तत्परतेने पुर्तता करून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या, याचा फायदा तिला कल्याण येथील प्रसिद्ध सिटी केअर हास्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली.

त्यामुळे म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील मुलगी डॉक्टर झाली व हे गावासाठी अभिमानाची बाब आहे म्हणून डॉ मेघा मोरे हिचा सरपंच निलिमा नंदू म्हात्रे, यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, याप्रसंगी सदस्यां मंगला इंगळे, ग्रामसेवक नितीन चव्हाण, डॉ मेघाची आई सरिता मोरे, सामाजिक कार्यकर्ते नंदू म्हात्रे, वसत शेलवलीचे माजी सरपंच मधू राणे, पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी आपल्याला अडचणीच्या काळात सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी सहकार्य केल्याबद्दल डॉ मेघा मोरे हिने सर्वाचे आभार मानले.

श्री देव केदारलिंग युवा स्पोर्ट्स क्लब मारळ आयोजित मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित केदारलिंग चषक -२०२४ चे राजकोजी क्रिकेट संघ रेवाळेवाडी आंगवली ठरला मानकरी !!

श्री देव केदारलिंग युवा स्पोर्ट्स  क्लब मारळ आयोजित मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित केदारलिंग चषक -२०२४ चे  राजकोजी क्रिकेट संघ रेवाळेवाडी आंगवली ठरला मानकरी !!

*एन्जॉय आंगवली  संघ ठरला उपविजेता*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         श्री केदारलिंग चषक -२०२४ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी नालासोपारा पश्चिम डम्पिंग मैदान येथे पार पडली. स्पर्धा उद्घाटन मारळ गावचे सुपुत्र विरार भागात शिवसेनेचे शाखाप्रमुख असलेले श्री.नितेश पांडुरंग गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन शुभ क्षणी मारळ गावातील जवळजवळ ५० मुलांनी आपली उपस्थिती दाखवली. या स्पर्धेसाठी काही संघ आणि काही खेळाडू गालावरून देखील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत लढत एंजॉय आंगवली आणि राजकोजी क्रिकेट संघामध्ये झाली. तत्पूर्वी अंतिम सामन्याची लॉटरी एन्जॉय संघाला लागली आणि दुसऱ्या सेमी फायनल मध्ये संघर्ष हातीव विरुद्ध झालेल्या सामन्यात राजकोजी संघाने विजयश्री खेचून आणला. अंतिम सामन्यात देखील राजकोजी संघाने जबरदस्त कामगिरी करत केदारलिंग चषक -२०२४ वर आपले नाव कोरले. एन्जॉय आंगवली  संघाला उपविजेतेपदावर आणि संघर्ष हातीव संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. मालिकावीर विशाल जाधव तर उत्कृष्ट गोलंदाज संकेत रेवाळे (दोन्ही राजकोजी संघांचे ) उत्कृष्ट फलंदाज प्रणित मांडवकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले दरम्यान या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती श्री. निलेश सुरेश कदम यांच्यातर्फे तिन्ही चषक देण्यात आले. 

मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री नितेश पांडुरंग गुरव यांच्यातर्फे देण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी संघांसाठी विशेष सन्मानचिन्ह प्रमोद रमाकांत धावडे यांच्यातर्फे देण्यात आले. आर्थिक सहकार्य सढळ हस्ते करणारे श्री. प्रशांतजी यादव अध्यक्ष वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. नेते राष्ट्रवादी काँग्रेस, विकास झंजाड, भाजपा नगरसेवक श्री.मंगेश शंकर धावडे, विश्वास शामराव सावंत, संतोष अनंत गुरव, प्रशांत खानविलकर यांचे देखील आभार सूत्रसंचालन करते वेळी मानले गेले. चेंडूची व्यवस्था ओमकार शिवाजी गुरव यांचे मामाश्री यांनी केले त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे  विशेष आभार या स्पर्धेमध्ये सर्वात लहान खेळाडू कु. जय दिनेश गुरव याने सहभाग घेऊन भविष्यातील क्रिकेटचा वारसा आम्ही नक्की चालवू असा संकेत दिला. स्पर्धेसाठी विशेष चित्रीकरण सह्याद्री कोकण युट्युब चॅनेलचे ब्लॉगर दिनेश गुरव यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार, स्पर्धेतील फोटोग्राफी जबाबदारी रितिक रवींद्र गोरुले यांनी पार पाडली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या सर्व पंच स्कोरर आणि मैदानातील आणि मैदानाबाहेरील व्यवस्थापन करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.कोणताही कार्यक्रम म्हटलं कि स्वयंसेवक यांना अल्पोपहार महत्वाचा परंतु अल्पोपहार न देता कमिटी साठी पोटभर जेवणाची सोय रुपेश रवींद्र सुवारे यांनी केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

श्री देव केदारलिंग युवा स्पोर्ट्स  क्लब मारळ आयोजित मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित केदारलिंग चषक -२०२४ चे  राजकोजी क्रिकेट संघ रेवाळेवाडी आंगवली मानकरी ठरल्याबद्दल संघाचे अनेकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या देवदुतांचा सन्मान !!

रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या देवदुतांचा सन्मान !!

*वैद्यकीय मदत कक्षाच्या तिसऱ्या वर्धापन दिनी गौरव*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          ग्रामीण भागातील अपघात ग्रस्त रुग्णांना शहरातील रुग्णालयात तातडीने मदत व्हावी यासाठी तीन वर्षापूर्वी मुंबईत स्थापित केलेल्या वैद्यकीय मदत कक्षातील देवदूतांचा सन्मान आज दादर येथील कल्चरल सेंटर हॉल येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वैद्यकीय मदत कक्षाच्या संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुती कदम यांच्या वतीने  आयोजित तिसऱ्या वर्धापन दिनाच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात उद्योजक किसन भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप, धनंजय पवार, संजय कदम, नायर रुग्णालयाचे डॉ सुधीर मेढेकर, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मानवतेचे देवदूत - डॉ सुधीर मेढेकर

वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देवदुतांच्या सन्मान कार्यक्रमात नायर रुग्णालयचे अधिष्ठाता डॉ सुधीर मेढेकर यांनी कक्षाच्या कार्यकर्त्यांना मानवतेचे देवदूत अशी उपमा देत त्यांचा शाब्दिक गौरव केला. ते म्हणाले की नायर रुग्णालय हे अव्वल दर्जाचं रुग्णालय असून आतापर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा अधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्याचा आम्ही लाभ दिला आहे. कोकणच्या महामार्गावर अपघात होतात तिथेही आम्ही प्राथमिक उपचार रुग्णाला कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न सुरू करत असल्याचे डॉ. सुधीर मेढेकर म्हणाले. 

प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटल असणे आवश्यक - राजन भिसे, अभिनेते

मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता एकदा मोठा झाला की रस्त्यावर अपघात घडण्याचे प्रकार वाढत आहे. मुंबई गोवा महामार्गावर हे प्रमाण खूप आहे. मी देखील मुरुड जंजिरा मधला.. कोकणात काय परिस्थिती आहे आम्ही डोळ्यांनी पाहतो आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या ग्रुप ची मागणी रास्त आहे. रुग्णाला प्राथमिक उपचार मिळण्यासाठी त्या मार्गावर हॉस्पिटल असणे आवश्यक असल्याचे अभिनेते राजन भिसे यांनी मत व्यक्त करताना केले. 

दोन वर्षात हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रयत्न करणार - उद्योजक किसन भोसले

गेली तीन वर्ष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कोकणातील तरुण मंडळी एकत्र येईल वैद्यकीय क्षेत्रासाठी कार्य करत आहे. मुंबई गोवा महामार्गावर प्राथमिक उपचार करिता हॉस्पिटल असावं अशी मागणी होत आहे . दोन वर्षात आम्ही हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास किसन भोसले यांनी व्यक्त केला. तर यावेळी शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांनी देखील हॉस्पिटल साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले तर त्यांचे वडील दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले.

Sunday 25 February 2024

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा G4S सेक्युरिटी ला दणका !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा G4S सेक्युरिटी ला दणका !!

*राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, शिवसेना प्रवक्ते सचिव आणि मा. आमदार सन्मा. श्री. किरणजी पावसकर यांचे मनापासून मानले आभार*

मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
            राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा G4S सेक्युरिटी ला दणका देत मंगेश तेली ( G4S कामगार ) यांना राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, शिवसेना प्रवक्ते सचिव आणि मा. आमदार सन्मा.श्री. किरणजी पावसकर  यांच्या पुढाकारणे पुन्हा कामावर रुजू केल्याबद्दल तेली यांनी सन्मा. पावसकरसाहेब यांचे मनापासून आभार मानले आहेत.
         याबाबत अधिक माहिती अशी की, मंगेश तेली ( G4S कामगार ) यांना कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी ड्युटी स्टॉप केली होती. दहा-बारा दिवस ते  घरी होते. तेली यांच्या  रिटायरमेंटला (सेवा निवृत्ती) अजून तीन महिने बाकी असून कंपनीच्या चुकीमुळे त्यांना घरी बसविण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे, युनियनचे अध्यक्ष श्री.किरण पावसकर, चिटणीस श्री.महेंद्र जाधव आणि G4S युनिट अध्यक्ष मनोज काळे आणि त्यांची पूर्ण कमिटी मेंबर्स यांनी प्रयत्न करून त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले. त्याबद्दल या सर्वांचे तेली यांनी मनापासून आभार व्यक्त केले. माझी नोकरी परत मिळवून दिली आणि उद्यापासून मला ड्युटीला बोलावले असल्यामुळे मी समाधानी आहे असे बोलताना मत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. एकनाथजी शिंदेसाहेब, युनियनचे अध्यक्ष किरण पावसकर, युनियनचे चिटणीस महेंद्र जाधव, आणि त्यांची पूर्ण टीम यांचेही तेली यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

अपना बाजारच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपना जय हो पॅनलचा प्रचंड मतांनी विजय..

अपना बाजारच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपना जय हो पॅनलचा प्रचंड मतांनी विजय..

मुंबई, (शांताराम गुडेकर/प्रसाद महाडिक) :
             मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या अपना बाजारची पंचवार्षिक निवडणूक मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी सोशल सर्विस लीग हायस्कूल परेल, मुंबई येथे झाली. या निवडणुकीत "अपना जय हो" आणि "अपना परिवार" असे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले होते. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष श्रीपादजी फाटक आणि उपाध्यक्ष अनिल गंगर यांच्या नेतृत्वाखालील "अपना जय हो" पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. त्यांचे सर्वच्या सर्व म्हणजे २० उमेदवार निवडून आले.
            सामाजिक चळवळीच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वर्गीय दादासाहेब सरफरे यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने अपना बाजार ही संस्था त्या काळी सुरू केली. नुकताच अपना बाजारने अमृत महोत्सव साजरा केला. विद्यमान संचालक मंडळ आज खूप चांगलं काम करत आहे. गेल्या काही वर्षात नवनवीन स्वमालकीच्या जागा अपना बाजारने विकत घेतल्या आणि जवळजवळ सर्वच जागांचे नूतनीकरणही केलेले आहे. गेली दहा वर्ष अपना बाजार ग्राहकांना नियमितपणे १५ टक्के डिव्हीडंट, १० टक्के गिफ्ट कुपन आणि ५ टक्के रिबीट कूपन देत आहे. गेल्या १५ वर्षात ४ वेळा जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कार मिळवणारी अपना बाजार ही एकमेव संस्था आहे.
          निवडणुकीनंतर अध्यक्ष म्हणून श्री. अनिल गंगर आणि उपाध्यक्ष म्हणून श्रीपाद फाटक यांची निवड करण्यात आली. माजी महापौर महादेव देवळे यांनी अपना बाजार नायगावला भेट देऊन नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. गिरणगावातील सर्वच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून नवनिर्वाचित संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संजय सिताराम भोसले यांचे निधन !!

संजय सिताराम भोसले यांचे निधन !!

मुंबई, (प्रतिनिधी) :

          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.कासार कोळवण (मावळती वाडी) गावच्या श्री कांडकरी विकास मंडळ सदस्य, रहिवाशी संजय सिताराम भोसले (वय- ४५ वर्ष) यांचे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

         ही दुःखद घटना त्यांच्या परिवारावर खूपच दुःखद आहे. संजय भोसले हे नोकरी करून टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करत होते. कधी कोणाला कोकणात गावी जायला तिकीट संदर्भात शब्द दिली की ते खाली पडू देत नव्हते. त्यांची ऐनवेळी लोकांना खूप मदत मिळत होती. त्यामुळे ते पंचक्रोशीत चांगले परिचित होते.साधी राहणीमान, उच्च विचार असे एक चांगले व्यक्तिमहत्व, ट्रॅव्हल्स आणि प्रवाशी यामधील दुवा आपल्यामधून निघून गेला आहे.याचे दुःख गावासह पंचक्रोशीत व्यक्त केले जात आहे. संजय भोसले यांच्या अकाली मृत्यूची बातमी वाचून खूप दुःख झाले. ऐन उमेदीच्या काळात असे अचानक आयुष्य संपल्याने भोसले कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यांना या दु:खातून सावरण्याची कुटुंबियांना शक्ती मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना यामित्ताने कासार कोळवण गावचे समाजसेवक मोहन कदम, श्री कांडकरी विकास मंडळ पदाधिकारी, सदस्य यांनी केली असून त्यांनी मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.संजय भोसले यांच्या पश्चात आई -वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे. संजय भोसले यांच्यावर कासार कोळवण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Saturday 24 February 2024

28 फेब्रुवारी रोजी जामनेर येथे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मोर्चा गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा ! यशस्वी करा !!

28 फेब्रुवारी रोजी  जामनेर येथे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मोर्चा  गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा ! यशस्वी करा !!

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने 16/17 जानेवारी रोजी जळगाव येथे राज्यव्यापी आंदोलन केले होते त्यावेळी आपल्या स् स्वीय मार्फत आश्वासन नामदार मंत्री महोदय यांनी पाळले नाही  म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे
मागण्या __

१) महाराष्ट्रभर गेल्या तीन महिन्याचे पगार देण्यात आले त्यात पूर्वीपेक्षा कमी पगार देण्यात आले याबाबत चौकशी करा  
२) मा.अभय यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करा
३) नवीन किमान वेतन  परिपत्रक काढा  
४) मागील मार्च2018 ते  31 मार्च  2022  पर्यंतच्या 57 महिन्याचा फरक  अदा करा  ५)कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी  लागणारी उत्पन्न व वसुलीची अट रद्द करा 
६) दहा टक्के आरक्षणाचा लाभ द्या  त्यासाठी आकृतीबंध रद्द करा 
७)भविष्य निर्वाह निधी खाते अद्यावत करा 
८) दरवर्षी दहा टक्के आरक्षणाची भरती करा  
९)शासन मान्य राहणीमान भत्ता शासनाच्या तिजोरी मधून मिळावा आदी 

मोर्चाचे नेतृत्व... ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य महासचिव कॉ नामदेवराव चव्हाण संघटन सचिव कॉ सखाराम दुर्गुडे सचिव कॉम्रेड अमृतराव महाजन


मोर्चासाठी जमण्याचे ठिकाण..। मार्केट कमिटी जामनेर  28 फेब्रुवारी बुधवारी रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे

आपले नम्र महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष संतोष खरे, उपाध्यक्ष.. शिवशंकर महाजन किशोरजी कंडारे सचिव.. राजेंद्र खरे अमोल महाजन नागो नाईक, रतिलाल पाटील अशोक जाधव, उखा ढिवर राजू पाटील मधुकर जंगले रतिराम राठोड दिलीप इंगळे अशोक गायकवाड रमेश दिगंबर पाटील राजेंद्र पाटील मुकेश पावरा सुभाष सोनवणे शंकर दरी संजय कंडारे भास्कर सपकाळे पांडुरंग कोळी मुरलीधर जाधव निलेश पाटील जळगाव कौरव सिंग पाटील ज्ञानदेव शिरसागर पुरुषोत्तम पाटील निवृत्ती डोळसे देवानंद कोळी यांनी आवाहन केले.

रत्नागिरी सावकारी कर्जाच्या विळख्यात ! अनेक सावकार रडारवर !!

रत्नागिरी सावकारी कर्जाच्या विळख्यात ! अनेक सावकार रडारवर !!


रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात सावकारी कर्जाच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. सावकारी कर्जात अनेकांची पिळवणूकही झाली असून काहीजणांनी आत्महत्येपर्यंतचे पाऊल उचल्याची माहिती पुढे येत आहे. आतापर्यंत सावकारी कर्ज देणाऱ्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. रत्नागिरीत सुरू असलेल्या सावकारीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष दिले असून लवकरच या सावकारीचा बिमोड केला जाणार आहे.

एक लाख रूपये सावकारी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचे 40 लाख रूपये कर्ज झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वैभव राजाराम सावंत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाळीस जणांनी कर्जाची नोटरी केल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. पत्रकारांशी शुक्रवारी बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या सावकारी कर्जाच्या विषयावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अनेक जण त्या सावकारी कर्जाला बळी पडले आहेत. काहींनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. परवा उघडकीस आलेल्या प्रकारात त्याने 1 लाख 20 हजाराचे कर्ज घेतले. त्याला दर महिना 20 टक्के व्याज म्हणजे वर्षाला 240 टक्के व्याज लावले. चक्रवाढ पध्दतीने व्याज लावून त्याची रक्कम 40 लाख रूपये केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

पोलिसांनी सावकारी कर्जाबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केल्यानंतर सावकारी करणाऱ्या 10 जणांविरूद्द तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सावकारी सुरू असून कामगार व सर्वसामान्य त्याला बळी ठरले आहेत.जिल्ह्यात सावकारी कर्ज देणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

अवैध सावकारी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ ईमेल/अर्ज अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करू शकता. अवैध सावकारी व त्यातून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दल कठोर पाऊले उचलेल. कर्ज घेण्याच्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा.
- धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरीअवैध सावकारावर उपनिबंधकाची कारवाई !!

अवैध सावकारावर उपनिबंधकाची कारवाई !!


उमरखेड, प्रतिनिधी : घराचे प्लॉटचे कागदपत्र गहाण ठेवून अवैध सावकारी व्यवसाय करणारा सावकार व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत असल्याने तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दाखल केली. त्यामुळे उपनिबंधक पथकाने अवैध सावकाराच्या घरावर धाड टाकून घरातील संशयास्पद 161 कागदपत्रे जप्त केली. या कारवाईने अवैध सावकारी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नारायण बाळा निमजवार (चिरडे नगर, महागाव रोड, उमरखेड) असे अवैध सावकारी करणार्‍या सावकाराचे नाव आहे. त्याने उमरखेडमधील शिवाजी वॉर्डातील रहिवासी श्याम तुकाराम गोसावी यांच्या घराचे कागदपत्रे ठेवून व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाचा व्याजापोटी हा सावकार तगादा लावत असल्याने श्याम गोसावी यांनी 15 जानेवारी 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दिली होती.

त्यावर गुरवार, २३ फेब्रुवारी अर्जाच्या अनुषंगाने पडताळणीसाठी उपनिबंधक सावकारी पथकाने नारायण निमजवार याच्या चिरडे नगर येथील घरावर धाड टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान निमजवार याच्या घरातून संशयास्पद कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपर, खरेदी खत, नोंदी असलेल्या डायर्‍या व हिशोबाच्या चिठ्ठ्या असे एकूण 161 कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे

१ जुलै पासुन ३ नवीन फौजदारी कायदे लागू होणार !!

१ जुलै पासुन ३ नवीन फौजदारी कायदे लागू होणार !!

भिवंडी, दिं,२४, अरुण पाटील (कोपर) :
        संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली ३ फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहेत. आयपीसी, सीआरपीसी, पुरावा कायद्याच्या जागी ३ नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत. अशी माहिती गृह मंत्र्यालयाने दिली आहे,  या मध्ये भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ या अधिनियमांचा समावेश आहे. 
         नवीन कायद्यांचा उद्देश ब्रिटीश काळातील कायद्यांचे संपूर्ण फेरबदल करणे, दहशतवादाची स्पष्ट व्याख्या देणे, देशद्रोह हा गुन्हा म्हणून रद्द करणे आणि “राज्या विरुद्धचे गुन्हे” नावाचा एक नवीन विभाग सादर करणे – इतर अनेक बदलांसह समाविष्ट आहे. ही तिन्ही विधेयके पहिल्यांदा ऑगस्ट २०२३ मध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती.
          गृह व्यवहार स्थायी समितीने अनेक शिफारसी केल्यानंतर, हिवाळी अधिवेशनात पुन्हा तयार केलेल्या आवृत्त्या मांडण्यात आल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, विस्तृत विचारविनिमयानंतर विधेयकांचा मसुदा तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर तो लोकसभेत मंजूर करण्यात आला होता. 
         या मध्ये भारतीय दंड संहिता, 1860 ची जागा भारतीय न्याय संहिता, २०२३ ने, CrPC, १९७३ ची जागा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तर भारतीय पुरावा कायदा, १८७२ ची जागा भारतीय साक्ष्य, २०२३ ने घेतली आहे. 
        “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३, भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ मंजूर होणे हा आपल्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण आहे. या विधेयकांमुळे वसाहतवाद कालीन कायदे नामशेष झाले आहेत. सार्वजनिक सेवा आणि कल्याण केंद्रीत कायद्यांसह एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. 
          ही परिवर्तनकारी विधेयके म्हणजे सुधारणा घडवण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेची साक्ष आहेत. ही विधेयके तंत्रज्ञान तसेच न्यायवैद्यक शास्त्रावर लक्ष केंद्रित करून आपल्या कायद्यांच्या, पोलिसांच्या आणि तपासणीच्या यंत्रणांना आधुनिक युगात घेऊन येणार आहेत, असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले होते.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...