राजीव गांधी हत्त्या कांडातील आरोपीचा राजीव गांधी रुग्णालयात मृत्यू !!
भिवंडी, (कोपर), दिं,२८, अरुण पाटील :
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींची सुटका करण्यात आली होती, त्यापैकी एक असलेला आरोपी टी. सुथेंद्रनाथ ऊर्फ संथन याचा बुधवारी मृत्यू झाला. या आरोपीवर चेन्नईच्या स्व.राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली आहे.
श्रीलंकन नागरिक असलेल्या संथनवर काही दिवसांपासून स्व.राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयाचे जीन डॉ. वी. थेरानीराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ७.५० वाजता सेंथनचा अचानक मृत्यू झाला. डॉ. वी. थेरानीराजन यांनी संथन याचं यकृत खराब झालं होतं, अशी माहिती दिली. यावर राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी त्याला कार्डियाक अरेस्ट धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला.
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १९९९ मध्ये संथनसह तीन आरोपींची शिक्षा कायम ठेवलं होती. यात संथन, मुरुगन आणि पेरारिवलन या आरोपींचा समावेश होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये या तिघांचीही सुटका करण्यात आली.
सुटकेनंतर परदेशी नागरिकांसाठी असलेल्य भारतीय नियमानुसार संथनला त्रिचीतल्या एक शिबिरात ठेवण्यात आलं होतं. श्रीलंकेनं नुकतंच त्याची मायदेशात परतण्याची कागदपत्र तयार केली होती.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ मध्ये एका निवडणूक रॅलीत बॉम्ब स्फोटाने हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटनेने याची जबाबदारी घेतली. एलटीटीईला तत्कालीन सरकारची धोरणे पसंत नव्हती. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्यांनी आपली काही माणसं पेरली. त्या काळी दक्षिण भारतात निवडणूक प्रचार सुरु होता. या प्रचारात कलैवानी राजरत्नम उर्फ धुन नावाची महिला रात्री साधारण १०.१० मिनिटांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ गेली. तिच्या कपड्यांच्या आत आरडीएक्स स्फोटक होती.
पाया पडताना तीने स्फोट घडवून आणला आणि यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते .
No comments:
Post a Comment