Wednesday 31 March 2021

ठाणे जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागात भ्रष्टाचाराचा'विस्फोट'कर्मचा-यांने फोडले बिंग ?

ठाणे जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागात भ्रष्टाचाराचा'विस्फोट'कर्मचा-यांने फोडले बिंग ?
कल्याण, (संजय कांबळे) : राज्यात कोरोनाने भंयकर स्फोटक परिस्थिती निर्माण केली असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे हे पुराव्यासह, विस्फोटक, लेटरबाँम्ब जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग ठाणे यांना पाठवले असून हे सगळे काम याच विभागात कामकरित असलेल्या एका विस्तार अधिका-याने चालत असलेल्या 'पाकिट' संस्कृती उघड केली आहे, त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील या भ्रष्ट बालविकास अधिकारी व त्यांचा सहका-यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागले आहे.


ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या बालविकास कार्यालयातील हा भ्रष्टाचार असून याच विभाग काम करणारे एक विस्तार अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांनी सेवेतून निंलबन केल्या नंतर हा भ्रष्टाचार उघड झाला आहे,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी बालविकास विभाग ठाणे यांना पाठवलेल्या २४जानेवारी२०२१ च्या पत्रात या कर्मचा-यांनी म्हटले आहे की मी १ फेब्रुवारी २०१३ पासून येथे कार्यरत असून आँगस्ट २०२० मध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यानी अँडिट च्या नावाखाली प्रमिला खंडागळे, श्रीमती भांगरे, कल्पना पाटील, उषा देवरे व मला विनातक्रार काही रक्कम जमा करण्यास सांगितले. या व्यतिरिक्त बदलापूर बिटामधील मालती बडगुजर, वांगणी बिटातील अलका जाधव यांना फोन करुन प्रत्येक सेविकाकडून पैसे जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली शिवाय डीबीटी योजनेतील सर्व लाभार्थ्याना कार्यालयात लेखा परिक्षणासाठी पैसे जमा करण्याचा निरोप द्या असे सांगितले, हे तर काहीच नाही मांगरुळ बीटातील कुशीवली अंगणवाडी केंद्रातील लसीकरण सत्रास भेट दिली असता येथील सेविकांनी 'पाकिट' दिले तर वांगणी गटातील २२ सेविकांनी प्रभारी बालविकास अधिकारी निता खोटरे या पैसे मागत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. हा सर्व प्रकार जिल्हाचे या विभागाचे प्रमुख भोसले यांना सांगितल्याचे प्रत्रात म्हटले आहे.
सन २०१९/२० या वर्षात जि.प सेस फंडामधून वैयक्तिक लाभाच्या ९६ लाभाथ्यांना ५हजार५०० प्रमाणे,५ लाख २८ हजार, घरघंटी ८ लाभार्थ्याना १ लाख ४२ हजार ७६२, शिवणयंत्र १७ हजार ७३४ रुपयाच्या वस्तू प्रत्यक्ष खरेदी केल्या किंवा नाही याची खातरजमा न करता दबाव टाकून लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले, प्रत्यकक्षात एकाही लाभार्थ्याने साहित्य खरेदी केले नाही, तर एका स्थानिक ठेकेदाराकडून खरेदीची बिले सादर करुन एकूण ६ लाख ८८ हजार ४९६ ऐवढ्या रकमेतून काही हिस्सा स्वत कडे घेऊन शासनाची फसवणूक केल्यांचा गंभीर आरोप या कर्मचा-याने केला आहे,
याशिवाय चहाची व सँनिटायझरची खोटी बिले, खाजगी जागेत भरणा-या अंगणवाडी केंद्राचे भाडे २ लाख ७० हजार दिले नाही. फरकाची रक्कम ६०/७० हजार काढण्यासाठी १० हजार द्या, असे कनिष्ठ सहाय्यकाने मागितले ,प्रवासभत्यातील १७०० रुपये, ज्यडो कराटे प्रक्षिशणाचे १००० रुपये ही या बालविकास अधिका-याने घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे, पादरीपाडा येथील मदतनीस श्रीमती घोंडविंदे यांची सेविका म्हणून थेट नियुक्तीस या कर्मचा-याने विरोध केल्याने याला डोळ्यात बघत नाही असे सांगून याशिवाय मला अडचणीत आणन्यासाठी आस्थापणाची कामे, नोटीसा काढणे,ज्ञरिक्त पदांची माहिती, भरती प्रक्रिया, फिरती कार्यक्रम, दैनदिनी ,रजेचे अर्ज, लेटर ड्राफ्ट,ज्ञबीले टाकणे, झेराँक्स काढून आणने, उपकोषागार कार्यालयात बीले सादर करणे अशी कामे दिली जातात,‌ जेणेकरुन माझ्याकडून चुकी व्हावी यातून माझी बदली व्हावी व यांना कार्यालयातील आर्थिक व्यवहार सुलभ करता यावे याकरिता माझ्यावर दबाव टाकला जातोय .यातून भविष्यात माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी निता खोटरे व कनिष्ठ सहाय्यक दिलीप म्हसकरे हे जबाबदार धरणेत यावेत असे पत्रात शेवटी म्हटले आहे,
हा सर्व भ्रष्टाचार या कर्मचा-यावर निंलबनाची कार्यवाही केल्यामुळे समोर आला व तो अंबरनाथ तालुक्यातील आहे इतर कल्याण, मुरबाड, भिंवडी व शहापुर तालुक्यातील बालविकास विभागाचे काय?
याचा कोण विचार करणार तसेच काही महिन्यापूर्वी कल्याण विभागातील मुख्यसेविकाचा 'धान्यघोटाळा' पकडून तिच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, आता यांचे काय करायचे?लोकप्रतिनीधी पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी काय करतात हे पाहणे औचिक्याचे ठरणार आहे.

Tuesday 30 March 2021

मुरबाड स्टेट बँकेचे 45 लाखाचे एटीएम फोडून लंपास झालेले आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !! *पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली माहिती*

मुरबाड स्टेट बँकेचे 45 लाखाचे एटीएम फोडून लंपास झालेले आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !!
 
*पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली  माहिती*
 

मुरबाड, (मंगल डोंगरे) :
 
मुरबाड शहरातील कल्याण मुरबाड रोडला झुंजारराव कॉम्प्लेक्स जवळ भारतीय स्टेट बँकेचे शाखा असून दिनांक 24/ 3/ 2021 रोजी अज्ञात चोरट्यांनी एटीएम च्या रूम मध्ये घुसून एटीएम मशीन ला कोणत्याही प्रकारे नुकसान न करता 45 लाख रुपये लंपास केल्याची तक्रार बँकेचे मॅनेजर यांनी मुरबाड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल  करून  गुन्हा नोंद करताच पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते,  ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील  व मुरबाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे तसेच मुरबाड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी चारच दिवसात कोणतेही धागेदोरे हाती नसताना विशेष तपास पथके तयार करून गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून चार आरोपी व चोरीस गेलेल्या 45 लाख रुपयांपैकी 39 लाख,  69 हजार  700 रुपये  रोख रक्कम ताब्यात घेतली आहे 


यावेळी पत्रकार परिषद आयोजित केली असतात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ती आरोपी यांनी दोन-तीन बँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला तसेच आरोपी यांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 45 लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली असून एका आरोपीने त्याच्या कर्जाच्या पोटी 02 लाख रुपये बँकेत भरले असून दुसरा आरोपी याने 01लाख 10 हजार रुपये मोटरसायकल दुरुस्ती व बोलेरो कार दुरुस्ती साठी वापरून खर्च केले आहे अशी माहिती आरोपी यांनी दिली आहे याबाबत अधिक तपास सुरू असून उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
 
या तपासकामी मुरबाड पोलिस स्टेशनचे अनिल सोनवणे सहा पोलीस निरीक्षक ,पोलीस उपनिरीक्षक निकम, तोडकरी, निंबाळकर ,सहा फौजदार आर. तडवी. पोलीस हवालदार डोईफोडे ,चतुरे, आडबोल, नीचीते, पोलीस हवालदार मोरे ,शिंदे, खेडकर ,आर. के .भोसले, पोलीस शिपाई माळी, पारधी, चोरगे, कुळगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक संदीप निगडे व त्यांचे पथक तसेच टोकावडे पोलिस स्टेशनचे सुहास खरमाटे व त्यांचे पथक यांनी विशेष मेहनत घेऊन आरोपींना मुद्देमालासह गजाआड केले त्यामुळे त्यांचे संपूर्ण तालुक्यामधून अभिनंदन होत आहे.

उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात. घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू !!

उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात.  घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू !!


मुंबई : ‘कोरोना’ (Coronavirus) रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

खासगी रूग्णालये एकेका (Coronavirus) रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.

सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड (Coronavirus) रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती.

अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी  दिली.

या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.

या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.

*खासगी रूग्णालयांसाठी बंधनकारक केलेले दर*
सध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड ( Coronavirus ) रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

*एका दिवसांत आदेश जारी*
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांनी एका दिवसांत स्वतः टाईप करून या आदेशाचा तब्बल १८ पानांचा मसुदा तयार केला. वांद्र्यावरून स्वतः गाडी चालवत ते आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्याकडे गेले. त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर रात्री शिंदे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.

तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शासनाची मार्गदर्शक सूचना जारी !!

तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शासनाची मार्गदर्शक सूचना जारी !!


मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ३१ मार्चला साजरी केली जाणार आहे. कोविड-19 मुळे यावर्षी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

शिवजयंतीला अनेक शिवप्रेमी किलले शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन सरकारने केलं आहे.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

तसेच दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम व शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

Monday 29 March 2021

‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ, मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवासी संख्येत विषाणूभयाने घट.........

‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ, मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवासी संख्येत विषाणूभयाने घट.........


मुंबई : मुंबईसह पुण्यात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या एस.टी.च्या शिवनेरी सेवेला फटका बसत आहे. प्रवासी या सेवेकडे पाठ फिरवू लागले असून फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिन असणारी २,८०० पर्यंतची प्रवासी संख्या सध्या २,४०० पर्यंत घसरली आहे. तर उत्पन्नही कमी होऊ लागले आहे. 

मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान कामानिमित्त एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. 
या मार्गावर एस.टी. महामंडळाच्या धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांना तर शुक्रवार ते रविवार चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र करोनामुळे मार्च २०२० पासून एस.टी.च्या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली. टाळेबंदीमुळे तर एस.टी. सेवाही ठप्प राहिली होती. परिणामी एसटीचे उत्पन्न बुडाले. यात शिवनेरीलाही फटका बसला होता. 

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू एस.टी.ची सेवा पूर्ववत झाली होती. त्यात मुंबई व पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होताच या दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे प्रवासीही मिळू लागले. परंतु मार्च २०२१ पासून पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढताच प्रवासी कमी होऊ लागले आहेत. 

वाढती रुग्णसंख्या व प्रवासी कमी असतानाही त्या दृष्टीने एस.टी. नियोजन करताना मात्र दिसत नाही. 

त्यामुळे खर्चही वाढत आहे. तीन महिन्यांत… जानेवारी २०२१ मध्ये ७६ शिवनेरी मुंबई ते पुणे मार्गावर धावत होत्या. प्रत्येक दिवशी एकूण २ हजार ७३० प्रवासी प्रवास करत. त्यामुळे १३ लाख ३४ हजार रुपये उत्पन्न एस.टी.ला मिळत होते. फेब्रुवारीत ७८ शिवनेरीतून दिवसाला २ हजार ८७० प्रवासी मिळू लागले. परंतु मार्च महिन्यात हीच संख्या कमी झाली. पुन्हा ७६ शिवनेरींमागे प्रत्येक दिवशी २,४०० प्रवासी प्रवास करत आहेत.

अग्निसुरक्षेबाबत सगळीकडेच अनास्था, महाराष्ट्रातील बहुतांश आस्थापनांमध्ये अटींचा विसर ! **भंडारा आगीचा पूर्णपणे विसर.......

अग्निसुरक्षेबाबत सगळीकडेच अनास्था, महाराष्ट्रातील बहुतांश आस्थापनांमध्ये अटींचा विसर !


**भंडारा आगीचा पूर्णपणे विसर.......

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल येथे सनराइज रुग्णालयामध्ये आग लागून शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेबाबत राज्यभर सगळीकडेच अनास्था असल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील तब्बल ७६२ पेक्षा अधिक खासगी रुग्णालये व नर्सिंग होममध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना नसून कित्येक आस्थापनांना या सुरक्षेची जाणीव नाही. पुण्यामध्ये शुक्रवारी फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागून शेकडो गाळे भस्मसात झाले. प्रबळ अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे यात प्रचंड नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के जागा रिक्त आहेत. 

इतक्या मोठ्या शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी निम्म्याहून कमी मनुष्यबळावर असल्याने त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने काम कसे होईल ?, हा प्रश्न आहे. 

दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अग्निपरीक्षा व अग्निसुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले होते. दुर्दैवाने आरोग्य विभागाने अग्निपरीक्षण केलेल्या एकाही रुग्णालयात आजपर्यंत अग्निसुरक्षा व्यवस्था बसविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
 
या परिस्थितीत दररोज वेगवेगळ्या शहरांत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांत मनुष्य आणि वित्तहानी कमीत कमी करण्याचे आव्हान सर्वच पालिका यंत्रणांपुढे आहे. 
एखाद्या आंतरराष्ट्रीय शहराकडे असतात तशी सगळी यंत्रणा, अत्याधुनिक यंत्रसामग्री मुंबई अग्निशमन दलाकडे आहे.
 
मात्र एखाद्या ठिकाणी आग लागली की ती विझवायला वेळ लागला की त्याची चर्चा होते.

यंदा एप्रिल-मे अधिक दाहक, यंदाचा उन्हाळा धोकादायक !! "हवामान तज्ज्ञांचा इशारा".....

यंदा एप्रिल-मे अधिक दाहक, यंदाचा उन्हाळा धोकादायक !! 

"हवामान तज्ज्ञांचा इशारा".....


नागपूर : मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात उष्णतेच्या लाटेमध्ये वाढ होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक धोकादायक असून मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.
 
मार्च ते मे महिन्यात ओडिशा, झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसने अधिक किंवा अत्याधिक असेल. 

हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, मार्च ते मे २०२१ मध्ये दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान व उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढणार आहे. तसेच हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, अरुणाचल, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, बिहार या प्रदेशांतही तापमान वाढणार आहे. 

दक्षिण भारतात तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही भागांत तापमान ०.५ अंश सेल्सिअसने अधिक राहील. दक्षिण आशियात तापमान अधिक वाढेल आणि २०२१च्या अखेरीस स्थिती आणखी गंभीर होईल, असे भारतातीलच नाही तर जागतिक हवामान खात्यानेही म्हटले आहे. 

**थोडा इतिहास…..

उष्णतेच्या लाटांची सुरुवात २०१५ पासून झाली आणि भारत व पाकिस्तानात आतापर्यंत पाचवी सर्वाधिक उष्णतेची लाट आली होती. उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे तीन हजार ५०० लोक मृत्युमुखी पडले होते. 

२०२१च्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार जगातील अति धोकाग्रस्त देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. २००० ते २०२० या २० वर्षांच्या कालावधीत जगभरात सुमारे चार लाख ५७ हजार लोक हवामान बदलाला बळी पडले आहेत. 

२०२१ अति तापमानाचे. २०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक उष्णतेच्या लाटांची वर्षे ठरली आहेत.

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-या टोळीची कल्याण तालुका पोलिसांकडून 'धुळवड' !

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-या टोळीची कल्याण तालुका पोलिसांकडून 'धुळवड' !


कल्याण, (संजय कांबळे) : गाव आपल्या बापाचा असल्यावानी अगदी बिनधास्त पणे गावातील लोकांना जिवघेण्या शस्त्राचा धाक दाखवून लुटालूट,मारहाण करणा-या चोरांच्या टोळीच्या कल्याण तालुका पोलीस व ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच यांनी मुसक्या आवळल्या असून इतर तिंघांची होळीच्या दिवशी बेड्या ठोकून यांची चांगलीच 'धुळवड' पोलिसांनी साजरी केली,त्यामुळे या दरोड्यातील आरोपींची संख्या ६ वर पोहचली आहे.
मागिल आठवड्यात कांबा पावशेपाडा येथे शसत्र दरोडा, लुटालूट, मारहाण करण्यात आली होती, हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता. हे चोर गावातून बिनधास्त फिरताना, प्रत्येकाचे घर डोकावताना, एका व्यक्तिला मारतानाचे विडिओ व्हायरल झाले होते.चोरांना पोलिसांचा धाक उरला आहे का? पोलिस करतात तरी काय? असे अनेक प्रश्न पत्रकार संजय कांबळे व इतरांनी उपस्थित केले होते,
 अखेर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, डिवाय एसपी डाँ बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच व कल्याण तालुका पोलिसांनी विविध तपास पथके तयार करुन समातंर शोध सुरू केला, यामध्ये प्रथम अहमदनगर येथील पारनेर मधून किरन जांभडकर, अनिल पवार व अक्षय गायकवाड, यांना उचलले, यांना ३०मार्च पर्यत पोलीस कस्टडी सुनावल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून होळीच्या रात्री सागर केलास बर्डे, सागर बाळू माळी आणि राहुल श्रीरंग गायकवाड यांना पारनेर मधूनच ताब्यात घेतले, कल्याण तालुका पोलिसांनी यांना पोलिस ठाण्यात आणून यांचे सोबत चांगलीच 'धुळवड' साजरी केली,
  या घटनेचा तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस इन्पेक्टर संतोष दराडे हे करित असून या प्रकरणात तालुका पोलीसांची तपासाची गती पाहता वपोनी राजू वंजारी व त्यांच्या टिमचे कौतूक व्हायलाच हवे!

कोरोनाचे नियम पायळी तुडवणा-या हुलड्डबाज तरुणांची पोलिसांकडून, धुळवड ?

कोरोनाचे नियम पायळी तुडवणा-या हुलड्डबाज तरुणांची पोलिसांकडून, धुळवड ?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या वाढत्या धोक्याने संपुर्ण प्रशासन चिंतेत असताना कोरोनाचे कोणतेही नियम न पाळणा-या हुलड्डबाज तरुणांची रायते गावातील आदर्श मित्र मंडळाच्या मदतीने पोलीसांनी पळवून पळवून धुळ+वड साजरी केली.


सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे,राज्यातील अनेक जिल्हे हाँटस्पाँट घोषित होऊन लाँकडाऊन लागले आहे, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे ही शहरे धोकादायक बनू पाहत आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहून शासनाने होळी व धुळवड घरीच साजरी करा असे अवाहन करण्यात आला होता, एकट्या कल्याण डोंबिवली शहराचा विचार केला तर येथे दररोज हजारो पेशट आढळून येत आहेत. तर कल्याण ग्रामीण भागात देखील पेंशट वाढत आहेत, खोणी, म्हारळ, म्हसकळ, वरप, बापसई, जांभूळ, खडवली या ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण सापडत आहेत, सध्या तालुक्यात २ लाख ५५० हजार,५५९ इतके पेंशट असून ११७८ ऐवढे अँक्टीव केसेस आहेत, तर १४१ लोकांनी जीव गमावला आहे.त्यामुळे कोरोनाचे नियम पाळण्याचे अवाहन केले, तसेच होळी व धुळवड साधेपणाने साजरी करण्यास सांगितले, परतू आज रायते येथील उल्हास नदीवर उल्हासनगर व परिसरातील हुलड्डबाज तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे कोणाकडेही मास्क,सोशलडिस्टिग चे पालन केले जात नव्हते, अखेर रायते गावातील,सुदाम भोईर, रसीद शेख, आदींनी गोवेली पोलिस चौकीला कळवले, पोलिस घटनास्थळी दाखल होताच तरुणांची पळापळ झाली, वाट दिसेल तिकडे हे पळत होते. प्रशासन इतके जिव तोडून सांगत आहे, पोलीस उन्हातान्हात कामगिरी बजावत आहेत, आणि हे हुल्लडबाज कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत, अशांना शासन व्हायलाच हवे, अन्यथा ग्रामीण भागात देखील कोरोनाचा विस्पोट व्हायला वेळ लागणार नाही.

Sunday 28 March 2021

संचारबंदी आणि जमावबंदीमध्ये काय फरक असतो ? समजून घ्या ; दोषी ठरल्यास शिक्षा काय ?

संचारबंदी आणि जमावबंदीमध्ये काय फरक असतो ? समजून घ्या ; दोषी ठरल्यास शिक्षा काय ?


मुंबई : राज्यात करोना प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मॉल्स रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यात काही दिवसांपासून करोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य कृती दलाचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून करोनाची सद्य:स्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेतल्या. 

टाळेबंदी लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. परंतु टाळेबंदीमुळे सारे जीवनमान बदलते हा पूर्वानुभव लक्षात घेता सरसकट टाळेबंदी लागू केली जाणार नाही.

त्याऐवजी रविवारी रात्रीपासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिक बाहेर एकत्र फिरू किंवा जमू शकणार नाहीत. 
रात्रीच्या वेळी लोक अनावश्यक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र संचारबंदी, जमावबंदी, टाळेबंदी या तिघांमध्ये काय? फरक आहे हे अनेकांना कळत नाही.

अवैध धंद्यांवर कठोरकारवाई करा ; पोलीस अधिकाऱ्यांना सूचना.......

अवैध धंद्यांवर कठोरकारवाई करा ; पोलीस अधिकाऱ्यांना सूचना !! "पोलीस सह. आयुक्त विश्वाास नांगरे पाटील"


मुंबई : पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक, प्रभारी पोलीस अधिकारी यांना जबाबदार धरून निलंबन अथवा विभागीय चौकशीची कारवाई केली जाईल. तसेच परिमंडळाच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास पोलीस उपायुक्त आणि अपर पोलीस आयुक्त यांना जबाबदार धरले जाईल, 

अशा स्पष्ट सूचना पोलीस सह. आयुक्त विश्वाास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस सह. आयुक्त विश्वास नांगरे पाटील पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देतानाची एक ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. या ध्वनिफीतीत नांगरे पाटील अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवरती कडक कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश देत आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून विविध प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या पोलीसांना पुन्हा जोमाने कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 

एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपहारगृह, मद्यालय, पब, कुंटणखाने, हुक्का पार्लर, मसाज सेंटर, दारू, जुगार हे अवैधरित्या सुरू राहिल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर अवैध धंदे शंभर टक्के बंद करून त्यामध्ये गुंतलेल्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीत सामाविष्ट आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

तसेच रात्रीची गस्त सक्षमपणे झाली पाहिजे, अशी सूचना नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिल्याचे नांगरे पाटील अधिकाऱ्यांना सांगत आहेत.

वाहनधारकांनो लक्ष द्या ; ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट वैधतेबाबत झाली महत्त्वाची घोषणा.........

वाहनधारकांनो लक्ष द्या ; ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट वैधतेबाबत झाली महत्त्वाची घोषणा.........
 

दिल्ली : करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा मूदतवाढ दिली आहे. देशातील अनेक वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 

ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पी.यु.सि. (P.U.C.) किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे 
किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे. 

अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. 

गेल्या वर्षी करोनामुळे लॉकडाउन लागल्यापासून मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने अनेकदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाने ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पी.यू.सी. यांच्या नूतनीकरणाची चिंता भेडसावणाऱ्या अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

होळीच्या शुभ मुहूर्तावर बालकलाकार हिंमाशू कांबळे याचा सन्मान !!

होळीच्या शुभ मुहूर्तावर बालकलाकार हिंमाशू कांबळे याचा सन्मान !!


कल्याण, (संजय कांबळे) : एस के फिल्म प्रोड्क्शन हाऊस चा आघाडीचा बालकलाकार कु. हिंमाशू संजय कांबळे याचा सन्मान भरत दळवी युवा मंच मुरबाड व आदर्श मित्र मंडळ रायते यांच्या संयुक्त विद्यमाने खास होळीच्या शुभमुहूर्तावर केला, यावेळी परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.


जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संस्था चे अध्यक्ष पत्रकार संजय कांबळे यांनी कल्याण, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यातील ग्रामीण नवोदित कलाकारांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी एस के फिल्म प्रोड्क्शन हाऊस ही संस्था निर्माण केली. याच संस्थेचा आघाडीचा बालकलाकार कु. हिंमाशू संजय कांबळे हा आपल्या अंगभूत कला व डांन्स यामुळे संपुर्ण परिसरात परिचित झाला असून नुकतेच मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी त्याच्यासह पुर्ण टिमचा सत्कार केला होता.


त्यामुळे असाच सन्मान आपणकडून व्हावा असा मनोदय भरत दळवी युवा मंच चे अध्यक्ष भरत दळवीसर व शिवसेनेचे विभागप्रमुख सुदामभाई भोईर यांनी व्यक्त केला, त्यानुसार आज होळीच्या शुभ मुहूर्तावर बालकलाकार कु. हिंमाशू संजय कांबळे याचा शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भरत दळवी यांनी कु. हिंमाशू यांचे कौतूक करून आपल्या परिसरात कलाभवन असावे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
याप्रंसगी आदर्श मित्र मंडळांचे अध्यक्ष,शिवसेना विभागप्रमुख सुदामभाई भोईर, संतोष सुरोशे, विजय सुरोशे, राम सुरोशे, प्रवीण धुमाळ, हभप पाडुंरग सुरोशे, बालकृष्ण भोईर, दिनेश राउत, नरेश तारमळे, रसीद शेख, महेश गवाले, तसेच एस के फिल्म चे प्रमुख पत्रकार संजय कांबळे, कलाकार रुकसाना शेख, विजय शिसवे आदी मंडळी उपस्थित होते.
आजच्या होळीच्या शुभ दिनी बालकलाकार हिंमाशू यांचा सन्मान केल्याबद्दल टिमप्रमुख संजय कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Saturday 27 March 2021

समाजसेवक दत्तू सांगळे यांच्या सामिजिक कांमांचा धडाका सुरु !

समाजसेवक दत्तू सांगळे यांच्या सामिजिक कांमांचा धडाका सुरु !


कल्याण, (संजय कांबळे) : म्हारळ ग्रांमपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यकाळात मतदारांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यासाठी वार्ड क्रंमाक चार मधून भरघोस मतांनी निवडूण आलेल्या श्रीमती बेबी दत्तू सांगळे यांनी कांमाचा अगदी धडाका सुरु केला असून यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.


अगदी प्रांरभीच्या काळात रिक्षा चालवणारे दत्तू सांगळे हे सुरुवातीपासून सामाजिक कार्यात सहभागी होत होते, त्यांनी अनेक निवडणूका लढविल्या पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला, तरीही जिद्द चिकाटी न सोडता लोकांच्या अडचणी सोडविण्यात व्यस्त राहिले. सुदैवाने कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रांमपचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली आणि पुन्हा सांगळे यांनी पत्नी बेबीताई दत्तू सांगळे यांना निवडणूक मैदानात उतरविले. ४/५हजार मतदार असलेल्या चार नंबर वार्डात प्रचार देखील मतदारांच्या काळजाला भिडणारा असा केला यांचा परिणाम म्हणून नागरिकांनी विजयाची माळ सांगळे यांच्या गळ्यात घातली.
परतू विजयाने हुरळून न जाता लोकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी कांमाला सुरुवात केली. रस्ता क्राँक्टीकरण, गटारे, नालेसफाई, दिवाबत्ती पाणी या कामांना प्राधान्य देऊन प्रत्यक्ष जागेवर उभे राहून ग्रामपंचायत कर्मचा-यांकडून करुन घेतली, चांगल्या कामांत कोणी अडथळा निर्माण केल्यास तेथे कडक भूमिका घेऊन काम मार्गी लावणे ,यामुळे आपले मत योग्य उमेदवारांला दिले अशी भावना येथील लोकामध्ये निर्मान झाली आहे, त्यामुळे समाजसेवक दत्तू सांगळे हे इतरांपेक्षा हटके असल्याचे त्यांनी कामातून दाखवून दिले आहे, याबाबतीत त्यांना विचारले असता ते म्हणाले,माझ्या वार्डातील बुतेक अडचणी, समस्या, प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक पणे प्रयत्न करणार आहे,मला निवडून दिल्यांचा मतदांराना पश्चाताप होऊ देणार नाही,असे त्यांनी सांगितले.
खरेच असे जर लोकप्रतिनीधी असतील तर गावाचा, तालुक्याचा जिल्हाचा चेअरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही.

Friday 26 March 2021

कल्याण- डोंबिवलीत दर शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचे आदेश !

कल्याण- डोंबिवलीत दर शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचे आदेश !


कल्याण , दि.26 मार्च : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. उद्याच्या शनिवारपासून या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
या आठवड्यात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या आकड्यांनी दररोज नवनविन रेकॉर्ड केले आहेत. कोरोना संख्येत अचानक झालेली ही वाढ पाहता केडीएमसी प्रशासनानेही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह हॉटेल - बार आणि रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच मॉल्सलाही नियमांचे पालन करून सुरू  ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच वाढत्या कोरोना आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यालाही मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे आदेश आयक्त विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती पदी दिपक पवार यांची निवड !!

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती पदी दिपक पवार यांची निवड !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड पंचायत समितीचे सभापती पदी दिपक पवार यांची निवड झाली आहे 
मावळते सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणुक झाली मुरबाड पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे  एकूण 16 सदस्यांपैकी भाजपचे 10 सदस्य आहेत.

आज शुक्रवारी झालेल्या निवडणुकीचे वेळी सभापती पदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल कदम यांनी पवार यांची निवड झाल्याचे जाहिर केले गेल्या चार वर्षातील ते चौथे सभापती आहेत .

दिल्लीमधील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा मुरबाड मध्ये तीव्र आंदोलन करू - 'तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार'

दिल्लीमधील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा मुरबाड मध्ये तीव्र आंदोलन करू - 'तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार' 


मुरबाड, (मंगल डोंगरे) : शुक्रवार दि.२६ मार्च २०२१ रोजी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी काळे कायदे मागे घेण्याबाबतची मागणी महामहीम राष्ट्रपतींना 
मुरबाड तालुका तहसिलदार यांच्या मार्फत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संध्या कदम, शेतकरी प्रतिनिधी जयवंत पवार, अल्पसंख्यांकचे इम्रान पटेल, गणेश खारे, गुरूनाथ देशमुख, वसंत कराळे आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. 


केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन कृषीविषयक काळे कायदे पाशवी बहुमताचा फायदा घेवुन संसदेमध्ये पारित करुन घेतले व त्याकायद्यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी पिढ्यांपिढ्या जपलेली शेती ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे भाड्याने घेवुन त्यांच्यावर गुलामी करण्याचे षड्यंत्र काही भांडवलदारांनी व भारत सरकारने रचले आहे. त्यांच्या विरोधात दिल्ली येथील सिंगुर बॅार्डर वर देशभरातील शेतकरी ठिय्या आंदोलन मागील १०० दिवसापासुन करत आहे तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही आहे असे धनाजी बांगर यांनी व्यक्त केले. प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एकदिवसीय उपोषण, धरणे आंदोलन आदी सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणुन मुरबाड तालुक्यांतील शेतकरी, शेतमजुर, कामगार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी निवेदन देवुन तीव्र निषेध व्यक्त केला. जर भविष्यामध्ये तिन्ही काळे कायदे मागे घेतले नाहीत तर मुरबाड तालुक्यांतील शेतकऱ्यांवा घेवुन तीव्र आंदोलन करु असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केले.

Thursday 25 March 2021

होळी-धूलिवंदनावर करोनाचे सावट, सार्वजनिकरित्या सण साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाचे निर्बध !!

होळी-धूलिवंदनावर करोनाचे सावट, सार्वजनिकरित्या सण साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाचे निर्बध !!


"विक्रेत्यांना चिंता"........

ठाणे : आठवडाअखेरीस येणारा होळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होळी व धुळवडीचा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.
 
कोकणामध्ये होळी सणाला विशेष महत्त्व असून पाठोपाठ येणाऱ्या धुळवडीचा सण समाजात मोठय़ा उत्साहाने साजरा होत असतो. या सणासाठी वेगवेगळ्या गुलाल व रंगांची तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबरीने निरनिराळ्या प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध असून यंदाच्या सणाचे ते आकर्षण ठरणार आहे.
 
होळीचा सण २-३ दिवसांवर आला असला तरीसुद्धा सरकार कोणत्याही क्षणी टाळेबंदी जाहीर करेल या भीतीपोटी होळीच्या सणादरम्यान लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीकरिता नागरिक पुढे येऊ लागले आहेत. करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी युवकांनी सामाजिक अंतर पाळावे व इतर र्निबधांचे  पालन करावे यासाठी उपाययोजना आखली जात आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यतील गेल्या आठवडय़ात समूहांमध्ये वावरणाऱ्या नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात आजाराचा प्रसार झाला होता. होळीदरम्यान आजाराच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक उत्सवावर निर्बंध घातले आहेत. कार्यक्रमांस मनाई जिल्ह्य़ामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

चाचण्यांच्या प्रमाणात वाढ ; शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याचा परिणाम.......

चाचण्यांच्या प्रमाणात वाढ ; शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याचा परिणाम.......


ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा कहर वाढू लागताच प्रशासकीय यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे.

शिमगोत्सव जवळ येऊ लागल्याने कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोकणात जाणारे प्रवासी मोठय़ा संख्येने चाचण्यांसाठी पुढाकार घेऊ लागले असून फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्य़ांहून अधिक वाढले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही आर.टी.पी.सी.आर. चाचण्यांवर भर दिला जात असून प्रतिजन चाचण्यांच्या तुलनेत या चाचण्या अधिक केल्या जात आहेत, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. 

जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या तातडीने चाचण्या करण्यात येत आहेत. 

मुंबई, ठाणे तसेच उपनगरातून शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना शासनाने करोना चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोना चाचणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असून गेल्या महिन्याच्या तुलनेत ७० टक्के चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
 
जिल्ह्य़ात ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या हद्दीतील खासगी आणि शासकीय केंद्रांवर करोना चाचणी करण्यात येत आहे. 
त्यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसाला ४५०० ते ५००० चाचण्या होत असून दिवसाला १० टक्के करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण आहे.

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव !!

कांबा पावशेपाडा येथे दरोडा टाकणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागात कांबा पावशेपाडा,पाचवामैल,पांजरापोळ,आणि रायते आदी परिसरात तलवार,चाँपर,आदी जिवघेणी शस्त्रे दाखवून लुटालूट, मारहाण करणा-या शस्त्र टोळीतील तिंघांना कल्याण तालुका पोलीस आणि ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच पोलिसांनी अहमदनगर जिल्हातील पारनेर येथून मुसक्या आवळल्या असून यांना कार्टात हजर केले असता न्यायालयाने ३०तारखेपर्यत पोलिस कस्टडी सुनावली आहे, पोलिसांच्या या कामगिरी बद्दल कल्याण तालुक्या कतून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,
तीनच दिवसापूर्वी कल्याण तालुक्यातील पावशेपाडा गावात ८/१०जणांच्या शसत्र टोळीने धाडसी दरोडा घातला होता.यामध्ये सोने, पैसा लुटला होता यांनतर पाचवामैल, पांजरापोल आणि रायते येथील जो भेटेल त्याला मारहाण करुन लुटत होते, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता, हे चोर अगदी बिनधास्त गावात लुटालूट करीत असल्याचे दिसत होते, हा विडिओ व्हायरल झाल्याने तसेच तालुक्यातील पत्रकार रविद्र घोंडविदे, संजय कांबळे, सिध्दार्थ गायकवाड आदीनी पोलिसावर व त्यांच्या कर्तव्यावर जोरदार टिका केली होती, परंतू जराही विचलित न होता, संयम ढळू न देता नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी पोलीस अधीक्षक, विक्रम देशमाने, डिवाय एसपी शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच व कल्याण तालुका पोलीस ठाणे यांनी विविध पथके तयार करुन सीसीटिव्हीच्या आधारे व मिळालेल्या माहितीवरुन अहमदनगर येथील पारनेर मधून मोठ्या शिताफिने किरन जांभळकर, अनिल पवार आणि अक्षय गायकवाड यांच्या मुसक्या आवळल्या हे सर्व फोर व्हिलरने येथे आले होते अजूनही ८/१०जण असल्याचे पोलिसांनी सांगितले, या तिंघांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना ३० मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली असून इतरांनाही लवकरच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

*वाढदिवसांची भेट- आजच ठाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचा वाढदिवस आहे,आणि आजच इतका आव्हानात्मक गुन्हा ठाणे ग्रामीण क्राइम ब्रँच व कल्याण तालुका पोलिसांनी उघडकीस आणला असल्याने एसपी साहेबांना ही वाढदिवसांचीभेट असल्याचे कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वपोनी राजू वंजारी यांनी सांगितले .या अलोकिक कामगिरीमुळे कल्याण तालुक्यात आंनदांचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे तालुक्यातून अभिंनंदन होत आहे.

Wednesday 24 March 2021

शेतकर्यांची व सर्व सामान्य ग्राहकांची वीज तोडणी तात्काळ थांबवा अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल !!

शेतकर्यांची व सर्व सामान्य ग्राहकांची  वीज तोडणी तात्काळ थांबवा अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल !!


"महावितरणला संभाजी ब्रिगेड चा इशारा". 

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा च्या वतीने महावितरण कार्यालयाचे अभियंता यांना शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अश्या प्रकाराचे निवेदन संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम सिसोदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 
      सध्या सर्वत्र करोना संसर्गाचा काळ चालू आहे या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला नाही, जे पिकलं ते विकता आलेला नाही, त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे, मागील कित्येक वर्षे पाऊस नव्हता आणि पाणीही नव्हतं परंतु यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे थोडेफार पीक आले नाही. आणि आपण त्यांची लाईन कट करत आहात, सध्यास्थितीत २० ते २५ टक्के शेतकरी बांधव यांचे ओलित पीक आहेत.                   निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा प्रचंड ग्रासलेला आहे, त्यामध्ये करोणा रोगाचा संकट, पीक काढणीला आले की लॉकडाऊन लागते, हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असून शेतकरी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांची लाईट कट करु नये आणि तोडलेली लाईट परत सुरळीत चालू करून द्यावी, नाहीतर संभाजी ब्रिगेड तर्फे एकाचवेळी राज्यभर धरणे आंदोलन, टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची गंभीरतेने दखल घ्यावी. असा इशारा संभाजी ब्रिगेड रायगड जिल्याच्या  वतीने देण्यात आला आहे.
      लयावेळी संभाजी ब्रिगेड रायगड  जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम शिसोदे, शिवश्री पृथ्वीराज भास्करराव खाडे रायगड जिल्हा सचिव  शिवश्री  अश्रफ पठाण  रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री विनोद सुतार तालुका कार्याध्यक्ष शिवश्री सुरज भिंगारे शहराध्यक्ष शिवश्री सुयोग गायकवाड  शिवश्री अजित सुतार तालुकाध्यक्ष ईत्यादी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जोगेश्वरीतील सामाजिक कार्यकर्त्यानी केली हातावर पोट असणाऱ्या कुटूंबीयांना मदत !!

जोगेश्वरीतील सामाजिक कार्यकर्त्यानी केली हातावर पोट असणाऱ्या कुटूंबीयांना मदत !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

             जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते अजित वैद्य, प्रभा सोलंकी मॅडम, तिलोत्तमा मॅडम व गार्गी हिरवे यांनी नुकतीच गोर-गरीब,वंचित व हातावर पोट असणाऱ्या जवळपास पत्तीस कुटुंबियांना किराणा सामान (तांदूळ,डाळ,गहू,साखर,पोहे,रवा,कोलगेट,साबण,तेल व मास्क) देऊन मदत केली. लॉकडाउन मध्ये सर्वसामान्य बरोबर रोजंदारीवर काम करणाऱ्यांची कुटुंब उध्वस्त झाली व अनेकांवर उपासमारीची वेळ आली,आज जवळजवळ वर्ष होत आहे व अजूनही अनेकजण हलाखीचे जीवन जगत आहेत व अशाच काही कुटुंबाना थोडासा आधार मिळावा म्हणून या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पदरमोड करून एकत्र येत ही मदत केल्याचे जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सांगितले. याआधीही अनेकांच्या सहकार्यातून लॉकडाउन ते आजही अनलॉक पर्यंत जवळपास चार हजाराहून अधिक वंचित कुटुंबियांना किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तू व आरोग्य किट पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे हिरवे यांनी सांगितले. 

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

         चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. 


२९ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल समूहाला संबोधताना शिवसेना आमदार सौ. यामिनीताई जाधव यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधताना म्हटले की या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. सदर रक्तदान शिबिरास स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे, नायर रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी श्री. पवार तसेच महावीर इंटरनॅशनल, मुंबई चे अध्यक्ष श्री. पारसमल गोलेचा यांनी हजेरी लावली अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख श्री. दादासाहेब येंधे यांनी दिली असून सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील, सुनिकेत, शुभम स्वार, समृद्धी येंधे, तन्वी येंधे, समीक्षा, अमेय परब, श्री. बाळा परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विनायक येंधे, समीर नाईक आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Tuesday 23 March 2021

खा.सुप्रीयाजी सुळे यांची मागणी अंशतः मंजूर ! कोरोना लस : 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार लस - केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर

खा.सुप्रीयाजी सुळे यांची मागणी अंशतः मंजूर !

कोरोना लस : 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार लस - केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर 


पुणे : 1 एप्रिलपासून भारतातील 45 वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी केली आहे.सर्व 45 वर्षांवरील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी नोंदणी करावी असं जावडेकरजी म्हणाले. लशीच्या दोन डोसांमधील अंतर केंद्र सरकारने वाढवलं आहे. पूर्वी 28 दिवसानंतर लसीचा दुसरा डोस घ्यावा असे निर्देश होते आता 4 ते 6 आठवड्यांमध्ये लसीचा दुसरा डोस घ्यावा असे निर्देश सरकारने दिले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. या लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो.

चिंता वाढली, राज्यात करोनामुळे ; दिवसभरात १३२ रुग्णांचा मृत्यू; २८ हजार ६९९ नवे करोनाबाधित !!

चिंता वाढली, राज्यात करोनामुळे ; दिवसभरात १३२ रुग्णांचा मृत्यू; २८ हजार ६९९ नवे करोनाबाधित !!


मुंबई : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा कसा घालायचा? या प्रश्नावर राज्य सरकार आणि प्रशासन उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे करोना पुन्हा एकदा राज्यात उग्र रुप धारण करतोय की काय, अशी भिती आता आरोग्य यंत्रणांना वाटू लागली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

**“लॉकडाऊन हा अंतिम पर्याय!”

राज्य सरकारने नुकतीच करोनासंदर्भात नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी देखील अनेक वेळा नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. “नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने अंतिम उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय असेल”, असा इशारा देखील सरकारकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वाढती *करोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा नाईलाजाने पुन्हा एकदा राज्याला किमान दोन महीन्याच्या कडक लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे.

विक्रोळी येथील शुश्रूषाचे सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटल कोविड लसीकरण केंद्र !!

विक्रोळी येथील शुश्रूषाचे सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटल कोविड लसीकरण केंद्र !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/सौ.मणस्वी मणवे) :

           शुश्रूषा सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटल, विक्रोळी येथे कोवॅक्सिन कोविड वॅक्सिनेशन सुविधा सुरु करण्यात आली आहे. शुश्रूषा हॉस्पिटलचे ज्येष्ठ डॉक्टर ज्यांनी ४० वर्षे विक्रोळी येथील याच वास्तूतील शुश्रूषा हॉस्पिटलचे 'बाळंतपण व लहान मुलांचे हॉस्पिटल' यशस्वीरित्या सांभाळले ते डॉ. अविनाश म्हात्रे यांच्या शुभहस्ते फीत कापून लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.सौ. सुला अविनाश म्हात्रे, चेअरमन सौ. वैशाली धोटे, डीन डॉ. सचिन मंडलिक, संचालक रमेश धामणकर, सुरेश सरनोबत आणि कृष्णा काजरोळकर उपस्थित होते. तसेच विक्रोळीवासियांसाठी कोरोना काळातही अविरत सेवा देणारे कोरोना योद्धा सुपरिचित डॉ. हरिष पांचाळ उपस्थित होते.


     उदघाटनप्रसंगी लसीकरणाचा पहिला मान डॉ. अविनाश म्हात्रे, डॉ. सुला अ. म्हात्रे, शिक्षण महर्षी अस्मिता कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नार्वेकर आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी विक्रोळी केंद्राच्या प्रमुख निलीमा दीदी यांना देण्यात  आला. हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राचे  नियोजन अप्रतिम व शिस्तबद्ध असल्याचे जाणवत होते. पहिल्याच दिवशी १९० नागरिकांनी लाभ घेतला. प्रत्येक लाभार्थिने या उत्कृष्ठ नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना विक्रोळी परिसरातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.

      हॉस्पिटलचे अँडमिनिस्ट्रेटीव मॅनेजर श्री. निरंजन यमजाल, मेडिकल सुपरिंटेंडंट डॉ. कमलेश जोशी, पीआरओ आसावरी पारकर व त्यांचे सहकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदीनी उत्कृष्ठ नियोजनासाठी परिश्रम घेतल्याबद्दल हॉस्पिटलच्या चेअरमन, डीन व संचालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. या केंद्रात सकाळी ९ ते सायं. ४.३० (रविवार व सुट्टीचे दिवस सोडून) सेवा उपलब्ध आहे. येतेवेळी आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन येणे. शुल्क रु. २५०/- फक्त. ज्यांनी अँपद्वारे रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांचे करुन दिले जाईल असे यावेळी  केंद्रातर्फे सांगण्यात आले.

मुरबाड येथील हुतात्मा स्मारक स्तंभाच्या नवीन पाटीचे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते अनावरण !!

मुरबाड येथील हुतात्मा स्मारक स्तंभाच्या नवीन पाटीचे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते अनावरण !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : शहीद दिना निमित्त आज मंगळवार दिनांक  23  मार्च रोजी मुरबाड येथील हुतात्मा स्मारक स्तंभाच्या नवीन पाटीचे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते अनावरण  करण्यात आले .मुरबाड येथील शिवाजी चौकात तत्कालीन मुरबाड ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य संग्रामातील मुरबाड येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचा स्तंभ तयार केला होता. 


या स्तंभावरील फलकामध्ये काही नावात चूक झाल्याने ही नावे बदलण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिकानी माजी आमदार गोटीराम पवार यांचे कडे केली होती. त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी व मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांना पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी नवीन पाटी तयार केली. आणि आज शहीद दिना चा मुहूर्त साधून या पाटीचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय विजय शहा, संतोष पिसाट, हेरंब देहेरकर माजी नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर दै. सकाळचे प्रतिनिधी  जेष्ठ पत्रकार मुरळीधर आण्णा दळवी आदि मान्यवर उपस्थित होते.

कल्याण ग्रामाण भागातील गुन्हेगारी रोखायची असेल तर नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक !!

कल्याण ग्रामाण भागातील गुन्हेगारी रोखायची असेल तर नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुका पोलीस ठाणे अतंर्गत वाढत असलेली गुन्हेगारी रोखायची असेल तर पोलिसांचा नागरिकांशी समन्वय, तरुण मंडळी, जागृत नागरिक यांची मदत अपु-या कर्मचां-याच्या परिस्थितीत अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार मंडळी व्यक्त करित आहेत.                                     

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६७ गावांचा समावेश आहे, म्हारळ, गोवेली आणि खडवली अश्या बीट चौकीच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राखला जातो, परंतू म्हारळ पोलीस चौकीच्या हद्दीतील लोकसंख्य ४०/५० हजाराच्यावर गेली आहे, तर पोलीस ३ किंवा ४ अशीच अवस्था इतर बीट चौकींची आहे, त्यामुळे त्यातच म्हारळ चौकीच्या पोलिस अधिका-याकडे २/३ ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार ? यामुळे तर या अधिका-याला येथे बसायला वेळ नाही, किंवा आवडत नाही. याचाच फायदा काही भुरटे चोर, गल्ली दादा, भाई, घेऊ लागले आहेत ओळख व पैसा असला की आपले कोणीही काही करु शकत नाही. या फाजील आत्मविश्वासामुळे गुन्हेगारी वाढली आहे, दिवसाढवळ्या ज्यांना मिसरुड फुटले नाही अशी पोर जिवघेणी हत्यार काढून दहशत फसरवित आहेत व पोलीस दादा थोड्याश्या "आर्थिक" फायद्यापोटी यांना मोकाट सोडत आहेत, आजची परिस्थिती पाहिली तर म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, रायते, गोवेली ही गावे गुन्हेगारांचे हाँस्पाँट होऊ पाहत आहेत, नुकतेच कांबा गावाजवळील पावशेपाडा गावातील गुंडाची लुटालूट व बिनधास्त पणे गावातून फिरणे हे सीसीटीव्हीत पाहिले की यांना पोलिसांचा धाक आहे का ? असा प्रश्न  निर्माण होतो, याबतीत पोलीसांना विचारले असता पोलिस सांगतात, आम्ही दोघं तिघ काय करणार ? खरे आहे, पण यावर उपाय देखील आहेच ना !                  

मागील पोलीस निरिक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, राजेद्र नाईक, संजय धुमाळ, गोडबोले यांच्याही कार्यकाळात पोलीस तेवढेच होते. पण यांनी जनतेचा सहभाग घेतला. जिथे पोलीस कमी पडतात तेथे नागरिकांची मदत घेतली.                                       

म्हारळ पोलिस चौकीचे इन्पेक्टर बंजरग रजपूत यांनी म्हारळ चौकीचा चार्ज घेताच, प्रथम म्हारळ, वरप, कांबा आदी गावातील चांगले तरुण,सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, यांची बैठक घेऊन आपले गाव शांत कसे राहिल, गुन्हेगारांना आळा कसा बसेल? यांचा विचार करुन या मंडळीचा एक ग्रुप बनवून कामाला लावले,याचा इतका चांगला परिणाम झाला की, रात्रीच्या गस्तीला देखील पोलीसांची गरज लागली नाही, यामुळे रात्रभर फिरणारे गर्दुले,चरशी,भुरटे चोर, टपोरी पोर, गल्लीबोळातील भाई  याच्यांवर नित्यत्रंण आले,यामुळे गुन्हेगारी थांबली व पोलिसांना थोडा 'आराम' ही मिळू लागला. पर्यायाने चो-यामा-या, हाणामा-या, कमी झाल्या.                                 
मात्र आताची परिस्थिती उलटी झाली आहे, ठाणे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने हे पत्रकांराचे फोन उचलत नाहीत, तालुक्याचे पोलिस निरिक्षक माहिती देत नाहीत, त्यामुळे पोलिसांनी काही चांगले कामे केली असतील किंवा लोकांना काही संदेश द्यायचा असेल तर तो पोहचत नाही. पर्यायाने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी सहानुभूती राहत नाही.                   
म्हारळ पोलिस चोकीच्या हद्दीत वाढलेली गुन्हेगारी, कालपरवाच अगदी तरुण चोरांनी पोलिसांना दिलेले अव्हाहन, गुरवली येथील फाटका जवळील मर्डर, मुसरुड न फुटलेले 'भाई' त्यांच्याजवळ असणारी जिवघेणी शस्त्रे, पोलिसांच्या समोर होणा-या हाणामा-या, अश्या सर्व घटनांवरून या परिसरात पोलिसांचा धाक राहिला आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे हे रोखायचे असेल तर अपुरे पोलीस बळ हे तुणतूणे न वाजवता चांगल्या  नागरिकांचा "पोलिस मित्र" म्हणून सहभाग घेणे, ही काळाची गरज असल्याचे मत जाणकांर व्यक्त करतात.

Monday 22 March 2021

बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी येथे "आदर्श माता" सन्मान सोहळा संपन्न !!

बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी येथे "आदर्श माता" सन्मान सोहळा संपन्न !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/ सौ.मणस्वी मणवे) :

          रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई. संचालित बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व) येथे नुकताच "आदर्श माता सन्मान " सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाल विकास विद्या मंदिर शाळेच्या माध्यमिक विभागात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता १० वी पर्यंत १२३९ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे. त्यापैकी इयत्ता ५ वी ते १० पर्यंत शिकत असलेल्या ८५७ विद्यार्थ्यांच्या महिला पालकांमधून एकूण ३० महिला पालकांना व सेविका श्रीमती सोनाली कांबळे यांना शाळेच्या सभागृहात आदर्श माता हे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी व आपलं महानगर वृत्तपत्रकाचे संपादक माननीय श्री.संजय सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपकार्याध्याक्ष आणि आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे  अध्यक्ष माननीय श्री.सहदेव सावंत, संस्थेचे सरचिटणीस  माननीय श्री. विश्वनाथ सावंत हे मान्यवर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुशिला पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे श्री.संजय सावंत, सरचिटणीस श्री.विश्वनाथ सावंत व समारंभाचे अध्यक्ष श्री. सहदेव सावंत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सौ.स्मिता रावराणे व श्री.जगदीश सुर्यवंशी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. आणि पर्यवेक्षक श्री.सिध्दार्थ इंगळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमात अधिवेशन प्रमुख आणि सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संगणक शिक्षक उपस्थित होते.

फोटो- ओळ

आदर्श माता श्रीमती सोनाली कांबळे हिचा सत्कार करताना आरजेएमडीएस ईग्लिंश स्कूल चे चेअरमन श्री. सहदेव सावंत. सरचिटणीस श्री. विश्वनाथ सावंत व प्रमुख पाहुणे संपादक संजय सावंत.

अविनाश सकुंडे यांच्या नेतृत्व खाली महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल महामहिम मा.भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट !!

अविनाश सकुंडे यांच्या नेतृत्व खाली महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल महामहिम मा.भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट !!

"भारतीय महाक्रांती सेना व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल व माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षक सेना पदाधिकारी यांची उपस्थिती"


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर / सौ,मणस्वी मणवे) :

           भारतीय महाक्रांती सेना व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल व माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षक सेना यांच्या शिष्ट मंडळाने मा. अविनाशजी सकुंडे यांच्या नेतृत्व खाली महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल महामहिम मा. भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी सामाजिक, राजकीय, तसेच देशातील चालू घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी कोविड च्या काळात बेरोजगारी निर्माण झाली आहे तरी रोजगार संदर्भात केंद्र सरकारने मदत करावी,तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळावी,चालू शैक्षणिक वर्षांची फी संदर्भात हस्तक्षेप करून  माफ करावी यांच्या विषयांवर चर्चा झाली.या वेळी संघटनेच्या  संकेतस्थळचे www.ihumanrightsa.org उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे मा. अफसर भाई कुरेशी, मा. मयंक मेहता, मा. यतीन देवधर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Sunday 21 March 2021

व्हॉट्सअॅपला रोखण्याची केंद्राची मे.न्यायालयात मागणी......

व्हॉट्सअॅपला रोखण्याची केंद्राची मे.न्यायालयात मागणी......
 

दिल्ली : व्हॉट्सअॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण आणि सेवाशर्तींच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केंद्र सरकारने मे. दिल्ली उच्च न्यायालयास केली. नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मे पासून केली जाणार आहे. 

व्हॉट्सअॅप या समाज माध्यम व्यासपीठाच्या व्यक्तिगतता धोरणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही विनंती करण्यात आली आहे. 
सीमा सिंह आणि मेघन यांनी ही यचिका दाखल केली आहे. 

नव्या धोरणानुसार वापरकत्यांनी त्याचा स्वीकार करावयाचा आहे किंवा त्या अ‍ॅपमधून बाहेर पडावयाचे आहे, आपली माहिती त्रयस्थ अ‍ॅपला देऊ नये असा पर्याय वापरकर्त्यांना निवडता येऊ शकत नाही. मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. जसमितसिंग यांच्या पीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. 

सरकारचा युक्तिवाद गोपनीयता आणि माहितीचे संरक्षण या बाबत नियमावली तयार करण्याची जबाबदारी मे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर सोपविली असल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक २०१९ लोकसभेत मांडून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

मे. उच्च न्यायालयाने ३ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार आणि व्हॉट्सअॅपवर नोटीस बजावली आणि त्यांना समाज माध्यम व्यासपीठाच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर म्हणणे मांडण्यास सांगितले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, "डॉ शशांक जोशी"...... महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, "डॉ शशांक जोशी"......
 
महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.

 
मुंबई : महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असतानाही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ठोस मदत दिली जात नाही. केंद्रीय पथके राज्यात पाहणीसाठी येतात आणि ‘मास्तरां’प्रमाणे केवळ उपदेशाचे डोस पाजून निघून जातात. 

महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज असताना पुरेशा प्रमाणात लसही पाठवली जात नाही आणि केंद्राच्या निर्बंधांमुळे सर्वांना लस देताही येत नाही, असे राज्य कृती दलाचे सदस्य, ‘कॉलेज ऑफ फिजिशियन चे डिन व ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.
 
“देशातील कोणत्याही अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. 
याला राज्यातील प्रमुख शहरातील लोकसंख्येच्या घनतेपासून वेगवेगळ्या राज्यातून कामासाठी येणारी लोक तसेच अनेक घटक जबाबदार आहेत. मधल्या काळात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांची रणधुमाळी तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रम यातून सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजणे तसेच मास्क न वापरणे आदी अनेक कारणे आहेत. 

हे सर्व लक्षात घेऊन केंद्राने महाराष्ट्रात व्यापक लसीकरण कार्यक्रम राबवायला मदत करणे अपेक्षित आहे. लस देण्याबाबतचे निर्बंध शिथिल करणे आवश्यक असल्याचे,” डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. 

“महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल पासून लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येत असतात. यात मुंबईसारख्या शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून अन्य राज्यातील लोकांच्या आरोग्याच्या उपचाराचा भारही राज्य सरकार व संबंधित महापालिकांनाच उचलावा लागतो.

विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकात तपासणी......

विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकात तपासणी......

 
मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आता विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या  रेल्वे स्थानकात केल्या जाणार आहेत. 

पालिकेने चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचे ठरविले असून दिवसाला ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टीने शहरात गर्दीची रेल्वे स्थानके, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत. शहरात सध्या दरदिवशी सुमारे २० हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात असून सुमारे अडीच हजारांहून अधिक रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. बाधितांचे प्रमाणही आठवडाभरात पाच टक्क्यांहून सुमारे १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 

विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यामध्ये संसर्ग प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून येथून अनेक प्रवासी दरदिवशी मुंबईत दाखल होत आहेत. तेव्हा यांच्यामार्फतही संसर्गप्रसार वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा याला प्रतिबंध करण्यासाठी विदर्भातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानकावर प्रतिजन चाचण्या करण्यात येतील. यात बाधित आढळलेल्यांचे नियमावलीनुसार विलगीकरण केले जाईल.
 
चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दादर, वांद्रे अशी गर्दीची रेल्वे स्थानके, बाजार इत्यादी ठिकाणी पालिकेकडून मोफत चाचण्या उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली.

गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त !! "दोषींना १० वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी"

गैरव्यवहार प्रकरणी  जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त !!
 
"दोषींना १० वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी" 


नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रशासक नियुक्तीला तीन वर्षांपूर्वी दिलेली स्थगिती उठवत मे.उच्च न्यायालयाने संचालक मंडळ बरखास्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात दाखल याचिका फेटाळून मे.उच्च न्यायालयाने अपील करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली.
 
सहकार कायद्यातील दुरूस्तीनंतरचा हा पहिलाच निर्णय आहे. त्यामुळे दोषी संचालकांना पुढील १० वर्ष कोणत्याही बँकेची निवडणूक लढविता येणार नाही. 
यामध्ये शिवसेना, भा.ज.पा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आमदारांचाही समावेश आहे. 

भा.ज.पा.-सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मंडळात समावेश जिल्हा बँकेतील अनियमितता, नियमबाह्य कामांमुळे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नाबार्डने डिसेंबर २०१७ मध्ये विद्यामान संचालक मंडळ बरखास्त करीत प्रशासकाची नियुक्ती केली होती. 

तत्कालीन भा.ज.पा.-सेना सरकारच्या पाठबळावर बँकेवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ताबा मिळवला होता. अध्यक्षपदी भा.ज.पा.चे केदा अाहेर तर, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची वर्णी लागली. 
मात्र, नाबार्डच्या निर्णयानंतर बँक अध्यक्षांनी प्रशासक नियुक्तीला  मे.उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा शासनाने विरोध न केल्यामुळे मे.न्यायालयाने प्रशासक नियुक्तीला स्थगिती दिली.

संचालक मंडळाला काम करण्याचा मार्ग खुला झाला. या प्रकरणाची तीन वर्ष सुनावणी सुरू होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकारी बँकांना शिस्त लावण्यासाठी आदेश दिले होते. 
त्यामुळे सहकार विभागाने मे.न्यायालयात ठामपणे बाजू मांडून प्रशासक नियुक्तीचे समर्थन देखील केले.

रेमडेसिवीर’च्या किमतीत घट..... "४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांत"

‘रेमडेसिवीर’च्या किमतीत घट.....
 
"४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांत"


मुंबई : राज्यात करोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफ.डी.ए.) करोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या किमती कमी केल्या आहेत. 

४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांत उपलब्ध होत आहे. मुंबईतील रुग्णालये अजूनही ‘एफ.डी.ए.’च्या ‘विनंती’बाबत आडमुठे धोरण अवलंबत असली तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किमती कमी करतील, असा विश्वास ‘एफ.डी.ए.’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला. 

राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यापासून रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व उपचारांतील ‘रेमडेसिवीर’चा वापर लक्षात घेऊन ‘एफ.डी.ए.’ने रुग्णहितासाठी रेमडेसिवीरची किंमत रुग्णांना परवडणारी कशी ठरेल याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किमती नियंत्रण आदेश २०१३’ अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. 

अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनीही रेमडेसिवीरच्या किमती नियंत्रित करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय औषध किमती नियंत्रण प्राधिकरणा’कडे पाठवला आहे. आयुक्त काळे यांनी रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या सहा प्रमुख कंपन्या, रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट व घाऊक औषध विक्रेता संघटनांच्या प्रतिनिधींची ७ मार्चला बैठक घेऊन किमती कमी करण्याची ‘विनंती’ केली. 

पुणे विभाग, औरंगाबाद, नाशिक, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील बहुतेक सर्व रुग्णालयांतून रेमडेसिवीर कमी किमतीत उपलब्ध होत आहे. 
रुग्णालये, औषध विक्रेते संघटना व कंपन्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.

भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांवर गुन्हा...... "महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे झाला हा गुन्हा दाखल"

भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांवर गुन्हा......

"महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे झाला हा गुन्हा दाखल"


ठाणे : महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी भा.ज.पा.च्या नगरसेवकांनी पाच महिन्यांपूर्वी पालिका मुख्यालय इमारतीत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला असला तरी सत्ताधारी शिवसेनेनेच ही खेळी खेळून भा.ज.पा.ला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. 

ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर आक्षेप घेत भा.ज.पा. नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. 
यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पालिकेतील डुम्बरे यांच्या कार्यालयात शिरून त्यांना घेराव घालून जाब विचारला होता. 

याप्रकरणी भा.ज.पा.ने केलेल्या मागणीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्यावर गुन्हा दाखल केला होता. करोना नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

तर आता पालिकेचे सुरक्षारक्षक सूर्यकांत पौळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी आता भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान या नगरसेवकांनी सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. 

मात्र, या आंदोलनामुळे करोना नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.

करोना वाढताच निर्बंध वाढले ; ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर.......

करोना वाढताच निर्बंध वाढले ; ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर.......

"दररोज वाढणाऱ्या आकडेवारीने वाढवली महाराष्ट्राची चिंता"
 

मुंबई : महाराष्ट्राच्या चिंतेत मोठी भर पडली. करोना संकट गडद झाल्याची जाणीव दररोज सायंकाळी येत असलेली आकडेवारी सरकारला आणि जनतेला करून देत आहे.

करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. 

राज्य सरकारकडून यासंदर्भातील नियमावली  जाहीर करण्यात आली. राज्यात करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन राज्य सरकारने करोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. 
१) यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीही संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
२) तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. 

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी करोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील ५० टक्के करण्यात आली आहे. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये.

Saturday 20 March 2021

तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या जन्मदिनानिम्मिताने आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न !

तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या जन्मदिनानिम्मिताने आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न ! 


मुरबाड (मंगल डोंगरे ) :
शनिवार दि.२० मार्च २०२१ रोजी काँग्रेस पक्षाचे मुरबाडचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या जन्मदिनानिम्मित्त SMBT हॅास्पिटल, धामणगाव(घोटी) च्या माध्यमातुन ग्रामीण रुग्णालय, मुरबाड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन इंजि.चेतनसिंह पवार युवा मंच, मुरबाड तालुकाच्या माध्यमातुन करण्यात आले होते. 


सदरील महाआरोग्य शिबिरामध्ये जनरल मेडिसीन, स्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, मेंदु व मनके आजार, मुतखडा व किडनी विकार, मधुमेह व उच्च रक्तदाब आदींचे स्पेशालिट डॅाक्टर उपस्थित होते व पुढील कार्यवाहीसाठी SMBT हॅास्पिटल, धामणगाव (घोटी) येथे रुग्णांना शिफारस देण्यात आली. सदरील कार्यक्रमासाठी काँग्रेसचे शहापुर जेष्ठ नेते प्रकाश भांगरथ, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कपिल ढोके, रिपाई सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, ओ.बी.सी.चे जिल्हाध्यक्ष दिनेश सासे, शिवसेना शहरप्रमुख राम दुधाळे, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष दिपक वाघचौडे, जेष्ठ नेते आत्माराम सासे, पुंडलिक चहाड सर, संजय शेलार, संध्या कदम, रमेश कुर्ले, अनिल चिराटे, अमोल सुरोशी, गणेश खारे, इम्रान पटेल, शुभांगी भराडे, उमेश चौधरी तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी जन्मदिनानिम्मित्ताने विविध समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात पंरतु ह्या वर्षी कोविड मुळे इतर आजारांचे रुग्ण हे घरामध्ये अडकून होते त्यांच्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन यावेळी केले.

कांबा गावाजवळील पावशेपाड्यात नऊ जंणाच्या हत्यारबंद चोराच्या टोळीचा धुडगूस, रायते पर्यंत मनसोक्तपणे लुटालूट मारहाण, पोलिस निष्क्रिय?

कांबा गावाजवळील पावशेपाड्यात नऊ जंणाच्या हत्यारबंद चोराच्या टोळीचा धुडगूस, रायते पर्यंत मनसोक्तपणे लुटालूट मारहाण, पोलिस निष्क्रिय? 


कल्याण, (संजय कांबळे) : कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पावशेपाडा गावात रात्री दिड ते अडीच च्या सुमारास ९ जणांची हत्यारबंद टोळी अगदी बिनधास्त पणे संपूर्ण गावात फिरुन जो भेटेल त्याच्या मानेवर तलवार ठेवून चैन अंगठी, मोबाईल, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गाठी, कानातील नेतात, त्यांच्या रस्त्यात जो येईल त्याला जबरदस्त मारहाण करून लुटलं असे रायते गावापर्यंत सुरू राहुनही दोन्ही टोकाला दोन पोलीस चौक्या असूनही या चोरांची ही हिंमत होते याला पोलिसांची निष्क्रियता म्हणायची का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पावशेपाडा हे गाव उल्हास नदीच्या काठावर वसले आहे. रात्री दिड ते अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण मुरबाड या मुख्य रस्त्यापासून गावात येणाऱ्या अतर्गत रस्त्याने सुमारे ९ जणांनी हत्यारा सह गावात प्रवेश केला. प्रथम गावाच्या बाहेर असलेल्या चंदकांत भगत यांच्या घराभोवतीच्या फिरले परंतु येथे काही सापडले नाही म्हणून गावात घुसले गावातील सुभाष भगत, प्रकाश भगत आणि हरिभाऊ भोईर यांच्या घरांना लक्ष केले. महेंद्र भगत यांच्या बेडरूमला बाहेरुन कडी लावून घरातील महिलांना शस्त्रांचा धाक दाखवून मंगळसूत्र, चैन, गाठी मोबाईल आदी वस्तू लांबल्या. असेच प्रकाश भगत व हरिभाऊ भोईर यांना देखील लुटले. यांनतर गावातील तरुणमंडळी जागी झाली असता हे नदीच्या काठावरुन पाचवामैल मंदिराकडे निघाले. असे भगत यांनी सांगितले. पुढे पाचवामैल येथील शिवसेनेचे दता भोईर यांचे आॅफिस फोडले. विशेष म्हणजे हे सगळे रस्त्याने पायी जात होते, पुढे पांजरपोळ येथे या चोरट्यांनी एका भैय्याला बेदम मारहाण केली. व त्याच्याकडील पैसे लुटले. येथून ही गॅग रायते येथे पोहचली. कल्याण मुरबाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या कडबा कुट्टी येथे पशुखाद्य घेण्यासाठी आलेल्या वाहोली येथील एका शेतकऱ्याला यांनी बेदम मारहाण केली व त्याला ही लुटले. यावेळी पहाटेचे ४:३० ते ५ वाजले होते.
महत्त्वाचे म्हणजे या घटनेच्या एका बाजूला म्हारळ पोलीस चौकी तर दुसरीकडे गोवेली पोलीस चोकी असताना या दरम्यान पोलिसांची नाईट पेट्रोलींग झाली नाही. ती झाली असती तर कदाचित आज हे बिनधास्त फिरणारे चोर लाॅकआफ मध्ये दिसले असते.
त्यामुळे कल्याण तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत वाढलेली गुन्हेगारी, बिनधास्त होणाऱ्या चो-या मा-या, हाणामारी, जिवघेण्या शस्त्रांचा धाक, पोलिसांचा न राहिलेला वचक यावरून पोलिसांची निष्क्रियता दिसून येते. एके काळी याच पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, आदींनी कर्तव्य बजावले होते तेव्हा अशा गुन्हेगारांची हिंमत होत नव्हती. परंतु सध्याच्या परिस्थिती पुर्ण पणे उलटी दिसू येते. यासंदर्भात ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना फोन केला असतो त्यांनी उचलला नाही. तर मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शिवपूजे यांना विचारले असता ते म्हणाले मी स्वत याकडे लक्ष देतो, परिस्थिती सुधारेल.

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !!

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !! पुणे, प्रतिनिधी : भारतीय शालेय खेळ महास...