Tuesday, 31 March 2026

ठाण्यात चहा देताना पेपर कपवर बंदीची कारवाई ; महापालिकेचा इशारा !!

ठाण्यात चहा देताना पेपर कपवर बंदीची कारवाई ; महापालिकेचा इशारा !!

पत्रकार विशाल कुरकुटे यांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेची हालचाल ; हॉटेल्स व चहा स्टॉल्सवर दंडात्मक कारवाईची तयारी

ठाणे, प्रतिनिधी :

ठाणे महानगरपालिका यांनी शहरातील हॉटेल्स व चहा स्टॉल्समध्ये चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपर कपविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. या संदर्भात वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे.

पत्रकार विशाल कुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. शहरातील अनेक ठिकाणी चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेपर कपचा वापर होत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अशा कपमधील रसायनांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व हॉटेल्स व चहा स्टॉल्सवर कारवाई करून दंड आकारला जाणार आहे. संबंधित विभागांना तात्काळ तपासणी करून नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निष्कर्ष :
ठाण्यातील चहा विक्रेत्यांनी आता नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महापालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय ठरत आहे.

आरपीआय दक्षिण मध्य मुंबईतर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा संपन्न !!

आरपीआय दक्षिण मध्य मुंबईतर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा संपन्न !!

धर्मगुरू भन्ते राहुल बोधी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २९ मार्च रोजी चेंबूर येथील फाईन आर्ट मध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या सोहळ्यात धर्मगुरू भन्ते राहुल बोधी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आरपीआय चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सुरेश बारसिंगे, शीला ताई गांगुर्डे, अनिल गांगुर्डे, बालासाहेब गरुड़, पूर्व नगर सेविका फूलाबाई सोनावणे, अनिस पठाण, महायुतीचे पदाधिकारी भाजपा जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे  प्रभाग समिति अध्यक्ष आशा सुभाष मराठे, नगरसेवक महादेव शिवगन, शिवसेना नगरसेविका समृद्धि काते, समाजसेवक सुभाष मराठे,  जयप्रकाश अग्रवाल आदिसह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष युवा कार्यकर्ते भीमसैनिक उपस्थित होते. 

सत्येचा सहभाग मला एकट्याला नको तर माझ्या कार्यकर्त्याला ही पाहिजे - रामदास आठवले 

या सत्कार कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सत्कार मूर्ती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले कि सत्येचा सहभाग मला एकट्याला नको तर माझ्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे अशी माजी भूमिका असते मात्र आपण निवडणुकीत कमी पडतो म्हणून राहून जाते. माझ्या भीमाच्या लोकशक्ती मुळे आज मी  तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार आणि मंत्री झालो. माझ्या भीमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार म्हणून चेंबूर मध्ये माझा होत आहे भव्य सत्कार, राजकारणात न मागता जे मिलते त्याला महत्व आहे देशभरात आपला पक्ष वाढला आहे बाबासाहेबांचे नाव त्यांचा पक्ष सर्वत्र पसरला आहे म्हणून मला तिसऱ्यांदा मोदीजींनी संधी दिली आहे. आपल्या लोकांची शक्ती माझ्या पाठीशी राहिली म्हणून मला पुढे जाता आले. बाबासाहेब आणखीन 10, 15 वर्षे राहिले असते तर एक दिवस देशाचे पंतप्रधान झाले असते त्यांचे लवकर जाणे हे आपले दुर्भाग्य आहे. आरपीआय चा उमेदवार आपल्या बहुल भागात निवडून येत नाही म्हणून मित्र पक्ष जागा सोडत नाही. मुंबईत आपली ताकत आहे यापूर्वी 12 नगरसेवक निवडून आले त्यानंतर कधी आले नाही ह्याचा कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे. आज चा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांचे मोठे योगदान आहे. धर्मगुरू भन्ते राहुल बोधी यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले कि संजय डोळसे यांनी आयोजित केलेला हा सोहळा अति महत्वाचा आहे  आपले लोक नेते रामदास आठवले रात्र दिवस काम करत असतात. भारताच्या काना कोपऱ्यात फिरून बाबासाहेबांचे विचार लोकात नेतात. सत्ता महत्वाची आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बाबासाहेबांनी सर्व समाज, पंथ, धर्मात बंधूभाव कसा निर्माण करावं हे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

Monday, 30 March 2026

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे.

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे.

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
 शिक्षकाचे काम देश घडविण्याचे आहे, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकाचे आहे, शिक्षक कधीच रिटायर होत नाही. आयुष्यात भरपूर कामे करायची असतात. मोरा सारख्या ठिकाणी शिक्षकाचे काम करणे कठीण आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगले काम केले आहे.अनेक  शिक्षण संस्था पैसे कमवण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीत. शिक्षणाचे व्यवसायिकरण वाढत चालले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले शिका मोठे व्हा. ग्रामीण भागात शाळा चालविणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांची कर्तव्ये व जबाबदारी खूपच महत्वाची आहे. आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर हे सेवानिवृत्त होत आहेत. सुधीर मुंबईकर हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या ज्ञानाचा शाळेला खूपच मोठा फायदा झाला. शाळेसाठी त्यांचे योगदान खूपच महत्वाचे आहे.असे गौरवोदगार जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा पनवेल महानगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी काढले.

 जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था,विद्या संकुल मोरा उरण येथील मुख्याध्यापक  सुधीर शांताराम मुंबईकर हे ३६ वर्षाच्या  प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले . त्यानिमित्त त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शाळा समितीचे चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मोरा येथे विद्या संकुलात मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी जे एम म्हात्रे बोलत होते.या कार्यक्रम प्रसंगी न्हावा ग्रामपंचायतचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे,शिक्षणाधिकारी निर्मला घरत,माध्यमिक मराठी माध्यम शाळेचे चेअरमन पी एम कोळी, प्राथमिक मराठी शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी, इंग्लिश मिडीयम स्कुल चे चेअरमन दिलीप मुंबईकर, शाळा कमिटीचे मेंबर - बी पी म्हात्रे, आर के पाटील, के एस शिंगटे, आर बी कोळी, राजश्री कोळी, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक साईनाथ गावंड, माध्यमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मनोज म्हात्रे, इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक संध्या ठाकूर, विलास मुंबईकर, अनिल मुंबईकर, मनोहर मुंबईकर , जयराम मुंबईकर, नितीन मुंबईकर , शिवदास पालकर, निळकंठ पाटील, हरेश म्हात्रे,सनी सर, विविध पदाधिकारी , तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक, विद्या संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी जे एम म्हात्रे यांनी सुधीर शांताराम मुंबईकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सेवानिवृत्त झाले तरी तुम्ही सारखे शाळेत येत चला. तुमच्या मार्गदर्शनाची शाळेला गरज आहे असेही त्यांनी यावेळी  आपले मनोगत व्यक्त करून सुधीर मुंबईकर यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी उपस्थित असलेले मुख्याध्यापक मनोज म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक मध्ये त्यांनी सुधीर मुंबईकर यांच्या बद्दल माहिती दिली.या नंतर मोठया स्क्रीन वर सुधीर मुंबईकर यांचे जीवनपट चलचित्रपटावर दाखविण्यात आले. प्रतिक मुंबईकर यांनी आपल्या वडिलांविषयी आदर व्यक्त करत एक आदर्श शिक्षक, आदर्श वडील कसे असतात हे सांगितले.माजी विद्यार्थीनी स्वप्नाली हळदणकर यांनी सुधीर मुंबईकर सर शाळेत असताना कशा पद्धतीने शिक्षण देत होते, कसे विद्यार्थ्यांवर संस्कार करत होते हे सांगत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माजी मुख्याध्यापक किरण शिंगटे, माजी मुख्याध्यापक बी पी म्हात्रे, मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनीही आपल्या मनोगतात सुधीर मुंबईकर यांच्या कार्याचे,शाळेला दिलेल्या योगदान बद्दल त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि सुधीर मुंबईकर यांनी आपल्या काळात शाळा चांगल्या पद्धतीने चालविली. शाळेकडे घरासारखे लक्ष दिले. कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. शाळेचे सुंदर असे सुशोभीकरण केले. त्यांचे योगदान शाळेतील शिक्षक, कर्मचारी, येथील ग्रामस्थ, विद्यार्थी कधीही विसरणार नाही. असे सांगत त्यांना सेवानिवृत्त बद्दल शुभेच्छा दिल्या. शेवटी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधीर शांताराम मुंबईकर यांनी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, युवा नेते प्रितम दादा म्हात्रे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. मनोगतात त्यांनी सुरवातीपासून कशा पद्धतीने काम केले याची माहिती दिली. आज माझा सेवानिवृत्तचा कार्यक्रम आहे. चिरनेरला ८ वर्षे, १ वर्षे व्ही के हायस्कूल, २८ वर्षे मोरा येथे सेवा केली. सर्वांचे मला सहकार्य मिळाले. जे एम म्हात्रे भाऊ तसेच चेअरमन, सोबत असणारे सर्व सहकारी यांचे मला नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले. सहकार्य लाभले, सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज येथे उभा आहे. जीवनात प्रगती करत आहे. या सर्वांचा तसेच माझे सर्व नातेवाईकांचा मला आशीर्वाद, पाठिंबा आहे, सहकार्य आहे म्हणूनच मी माझ्या आयुष्यात प्रगती करू शकलो.या सर्वांचे माझ्या जीवनात महत्वाचे योगदान आहे . विद्यार्थी हेच माझे दैवत आहेत. पण त्यांची आता उद्यापासून सेवा करायला मला मिळणार नाही असे भावनिक उदगार सुधीर मुंबईकर यांनी काढले. यावेळी सुधीर मुंबईकर सर भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.अतिशय भावनिक होत त्यांनी सर्वांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्या बद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुंदर व उत्तम असे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित सरांनी केले.मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांना २०१३ साली रायगड जिल्हा परिषदेचा माध्यमिक आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे आदर्श कोविड योद्धा पुरस्कार, द्रोणागिरी भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ तर्फे आदर्श मुख्याध्यापक असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सध्या सुधीर मुंबईकर हे उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघांचे उरण तालुकाध्यक्ष, उरण तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष,स्व. धर्मबाई शांताराम मुंबईकर चॅरिटेबल संस्था वेश्वी उरण अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सल्लागार असे वेगवेगळ्या संस्था संघटनेत वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. सुधीर मुंबईकर यांची सामाजिक बांधिलकी खूप मोठी असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे त्यांना सर्वच स्तरातून सेवानिवृत्ती बद्दल व पुढील वाटचालीसाठी मोठया प्रमाणात शुभेच्छा देण्यात आले.

शेलघर येथे एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद !!

शेलघर येथे एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :पनवेल तालुक्यातील शेलघर येथे प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विजेत्यांना २१ बाईक असलेली क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या स्पर्धेला भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी यांनी उपस्थित राहून एम जी ट्रॉफीला चार चांद लावले आहेत.

निलेश कुलकर्णी यांनी १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बळी (विकेट) घेणारे ते पहिले भारतीय गोलंदाज ठरले. मुंबई संघाकडून खेळताना, त्यांनी बडोदा संघाचे १० बळी अवघ्या १२० धावांत घेतले होते.आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी एम जी ट्रॉफीला आलेले निलेश कुलकर्णी यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने शनिवारी (ता. २८ ) स्वागत केले. त्यानंतर शाल आणि सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांनी निलेश कुलकर्णी यांचा सन्मान केला.
यावेळी निलेश कुलकर्णी म्हणाले, "खेळ कोणताही असो, त्यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने आयोजित एम जी ट्रॉफीचे सामने आणि भव्य मैदान पाहून मनापासून आनंद झाला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्राथमिक सुविधा नसतानाही मी त्याकाळी क्रिकेटवर जिवापाड प्रेम करून खेळलो. तहानभूक माहित नसायची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मी मात केली. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवू शकलो. त्यामुळे आजही मी क्रिकेटची सेवा करतोय. खेळाडूंना घडवतोय

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज :  डॉ. रागिणी नायक 

कर्जत, खोपोलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना महेंद्रशेठ घरत यांचे मार्गदर्शन

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू गांधी यांच्या विचारांची गरज आहे. सध्या प्रतिकूल परिस्थितीत कॉंग्रेसला साथ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केले. कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.   यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  प्रदेश काँग्रेसच्या संगठन सृजन अभियानानिमित्ताने कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन नेरळ येथील साने हॉल येथे करण्यात आले होते.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. 

पक्षाची विचारधारा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. सध्या रायगड जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत आपण कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले यश संपादन करीत आहोत. येत्या काळात पक्षाच्या वाढीसाठी आपणा सर्वांना हातात हात घालून काम करायचे आहे." यावेळी पक्षाच्या निरीक्षक राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक,पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव,मनीष गणोरे,पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,महिला जिल्हा अध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते

संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड !!

संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड !!

                     
 श्री संतोष महादेव पटकारे, रा पाचल, ता राजापूर जि रत्नागिरी. सध्या राहणार विलेपार्ले मुंबई यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे. ही निवड मुंबई येथे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद काॅलेज  पटांगणात कै भरत बोडेकर यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिले आहे...या प्रसंगी विजय कोकरे राज्य संघटक ऑल इंडिया धनगर गणेश गोरे सुनील गोरे परेश गोरे  मारुती झोरे पांडुरंग काळे मनोहर कोकरे पांडुरंग गोरे गणेश शेळके संतोष खुटेकर प्रकाश देसाई संजय झोरे संदीप झोरे इत्यादी उपस्थित होते समाज महासंघ महाराष्ट्र राज्य नवलराज काळे कोकण प्रदेश अध्यक्ष युवा आघाडीचे संतोष पटकारे हे प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महिलांना मदत क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत करत असतात गेले १० ते १२ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे धनगर समाजाचे प्रत्येक कार्यक्रम ला आवर्जून उपस्थित राहुन सहकार्य करत असतात अशा या सामाजिक नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा ३ आणि ४ एप्रिलला !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा ३ आणि ४ एप्रिलला !!

** गावक-यांकडून जय्यत तयारी;यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
            देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो, खरे पाहिले तर मनात भाव व देवापरी भक्ती मनापासून जोपासली तर मनुष्याच्या ह्दयातच देवाचे स्थान आहे. असे म्हटले जाते. या बाबी श्रद्धाळू माणसांना पटण्याजोगा नसतात. म्हणूनच ते जेथे देवाचे मंदिर आहे तेथेच देव दर्शनाला जातात. देशभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत.त्यातही महाराष्ट्रात तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे.न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
           या गावाधील गावदेवीची यात्रा चैत्र कृष्ण पक्ष-१  दि.३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळा दि.४ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी झाली आहे. ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे अध्यक्ष राजेश काळूराम घरत, उपाध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील, नितीन भरत भोईर, सतीष दत्ताराम भोईर, सुशांत बांद्रे, खजिनदार निलेश हरिश्चंद्ध भोईर, सहखजिनदार अनंत लहु म्हात्रे, चेतन लक्ष्मण कडू, समाधान सदानंद म्हात्रे, सरपंच विजेद्र गणेश पाटील, उपसरपंच शैलेश विठ्ठल पाटील आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पहावे. असे आवाहन पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक दामू भोईर यांनी केले आहे.

Sunday, 29 March 2026

ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे मौजे बोकडवीरा येथील जमीनीला मिळाला प्रति चौ.मी.१७२५ /- रू.भरघोस भाव !

ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे मौजे बोकडवीरा येथील जमीनीला मिळाला प्रति चौ.मी.१७२५ /- रू.भरघोस भाव !

** भरघोस भाव मिळवून दिल्याबद्दल ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार.


उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) :
सिडकोने २४/०९/१९८६ रोजी कवडीमोल भावाने उरण तालुक्यातील मौजे बोकडवीरा येथील जमीन संपादित केली होती.मात्र जमीन संपादन करतानाचा भाव, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नव्हता.त्यातील एक शेतकरी भालचंद्र म्हात्रे यांनी कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय घेत उरण मधील वकील ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे(फुंडे )यांच्याशी संपर्क साधला.व पुढील लढा लढण्याची तयारी दर्शविली.ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे (फुंडे) यांची मा.आलिबाग कोर्टात उपजिल्हाधिकारी,मेट्रो सेंटर उरण यांच्या विरोधात वाढीव भावासाठी केस कामी वकील म्हणून नेमणूक केली होती.परंतु दोनच महिन्यापूर्वी मौजे बोकडवीरा येथील काही शेतकऱ्यांना मा.अलिबाग कोर्टाने फक्त ७००/- रू.प्रति.चौ.मी.एवढाच अत्यल्प भाव मिळाला तसा निकाल लागला होता तशी बातमी वृत्तपत्रात, पेपरमधे शेतकऱ्यांनी वाचली त्यामुळे शेतकरी निराश झाले होते.परंतु ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांनी आपले कौशल्य पणाला लावून कायद्याच्या चौकटीत दोनच महिन्यात शेतकऱ्याची मौजे बोकडवीरा जमीनीला दिनांक २४/०३/२०२६ रोजी १७२५/- रू.प्रति.चौ.मी.असा भरघोस वाढीव भाव मिळवून दिला.तसा निकाल मा.अलिबाग कोर्टाने दिला. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व शेतकरी यांनी ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे ( फुंडे )यांचे जाहीर आभार व्यक्त केले.वकील कैलास भालचंद्र म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या अनेक शेतकऱ्यांच्या केसेसमधे जास्तीत जास्त भाव मिळवून सिडकोकडून पैसे तत्काळ मिळवून शेतकऱ्यांना दिले आहेत म्हणूनच आमचा वकिलसाहेबांवर संपूर्ण विश्वास होता आणि आहे. ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे  असे मत प्रकल्पग्रस्त शेतकरी भालचंद्र लक्ष्मण म्हात्रे व ईतर शेतकरी यांनी व्यक्त केली आहे.ऍड कैलास म्हात्रे यांनी आजपर्यंत आपल्या वकिलीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. उरण मधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रायगड ही शिवरायांची भूमी : डॉ. रागिणी नायक

रायगड ही शिवरायांची भूमी : डॉ. रागिणी नायक 

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याची शान राखली : महेंद्रशेठ घरत 

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : "कॉंग्रेस हा जनता जनार्दनाचा पक्ष आहे. सद्यःस्थितीत देशाचे नेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. प्रियांका गांधी मोदींना जशास तसे उत्तर देत आहेत. मोदीजी फक्त मन की बात करतात, जनतेला मात्र वार्यावर सोडतात. ही आजची सत्य परिस्थिती आहे. महागाई गगनाला भिडली आहे. मात्र मोदी सरकारला त्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनावर आणि जनतेच्या समस्यांवर काम करत आहे. यापुढे जिल्हाध्यक्षांना अधिकाधिक अधिकार असतील. कॉंग्रेसचे पदाधिकारी निवडीचे निर्णय वातानुकूलित दालनात बसून दिल्लीतून होणार नाहीत, तर जनतेशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेऊन होतील. रायगड ही शिवरायांची भूमी आहे. शिवाजी महाराज यांची ख्याती जगभर आहे. त्यामुळे रायगडमध्ये कॉंग्रेसचेच वर्चस्व राहील, यासाठी आम्ही काम करून कार्यकर्त्यांना बळ देऊ," असे प्रतिपादन कॉंग्रेसच्या दिल्लीतून आलेल्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि निरीक्षक डॉ. रागिणी नायक यांनी अलिबाग येथे केले आहे. त्या पुढे म्हणाल्या, "शिवरायांच्या भूमीत आल्याचा मला आनंद आहे. 'सृजन संघटन अभियान' जो देशभर राबविला त्याची वीट मजबूत करण्यासाठी मी आली आहे." असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (या. २९) अलिबाग येथील 'कॉंग्रेस भवन' येथे पार पडली. यावेळी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि निरीक्षक डॉ. रागिणी नायक, प्रदीप राव, मनोज गणोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "रायगडमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. वर्षांनुवर्षे जिल्हा परिषदेत शेकापचे वर्चस्व असायचे, यंदा त्यांना चक्क शून्य जागा मिळाल्या. मात्र कॉंग्रेसने तीन जागा लढवून दोन जिंकल्या. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याची शान राखली, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो."
यावेळी रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य डॉ. मनीष पाटील, अविनाश ठाकूर यांचा रागिणी नायक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. डॉ. रागिणी नायक आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षाविषयी भावना ऐकून घेतल्या.

यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड.श्रद्धा ठाकूर, नाना म्हात्रे, युवा अध्यक्ष निखिल ढवळे, अलिबाग कॉंग्रेसचे राजाभाऊ ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अलिबाग, मुरूड पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा : महेंद्रशेठ घरत

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा : महेंद्रशेठ घरत

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे दिघोडे हायस्कूलला २५ लाखांची देणगी

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : "माझे शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिकवण आहे की, आपल्या ताटातील अर्धी भाकरी दुसऱ्याला द्या, मी आज तेच करतोय. खरोखर गरजवंत आहेत त्यांना मदतीचा हात कायम देत आलो आहे. शैक्षणिक कार्य, वारकरी, मंदिरांसाठी मदत करताना मी मागेपुढे पाहत नाही. सढळ हाताने देणगी देतो. त्यामुळे दिघोडे येथील ग्रामीण भागातील हायस्कूलसाठी २५ लाख रुपये देणार! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सुविधा मिळणे आणि शिक्षण संकुल, ही काळाची गरज आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, विशेषतः जे पदाधिकारी आहेत, त्यांची दिघोडे हायस्कूलसाठी मदत करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मी पहिल्यांदाच दिघोडे हायस्कूलमध्ये आलो आहे. त्याचा विचार करून मी हायस्कूलसाठी कुठलेही आढेवेढे न घेता मदत जाहीर करीत आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत दिघोडे येथे म्हणाले. महात्मा गांधी विद्यालय व  दिवंगत रामदास ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालय दिघोडे यांच्या वतीने दिवंगत रामदास ठाकूर यांचा २६ वा स्मृतिदिन हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत बोलत होते. 

यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, सरपंच सुचिता ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, महेश कातकरी, संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, नारायण पाटील, गणेश पाटील, अविनाश पाटील, दीपक मढवी, चंद्रभागा पाटील, उज्वला थळी, परमानंद पाटील, ज्ञानप्रकाश पाटील, प्राचार्य संजय फल्ले आणि दिघोडे विभागीय शिक्षण संस्थेचे शिक्षकवृंद उपस्थित होते

शहरी भागा नंतर आता ग्रामीण भागात 'लव्ह मॅरेज'ची वाढती लाट ; संतुलित दृष्टिकोन आवश्यक !!

शहरी भागा नंतर आता ग्रामीण भागात 'लव्ह मॅरेज'ची वाढती लाट ; संतुलित दृष्टिकोन आवश्यक !!

उरण दि २९. (विठ्ठल ममताबादे) :
जिल्ह्यासह ग्रामीण भागात एक मोठे सामाजिक परिवर्तन वेगाने घडताना दिसत आहे. ते म्हणजे लव्ह मॅरेजची वाढती संस्कृती. अर्थातच प्रेम विवाहचे वाढती संस्कृती.ज्या समाजात एकेकाळी प्रेमविवाह हा गुन्हा किंवा कुटुंबावरील कलंक मानला जात होता, त्याच समाजात आज तो हळूहळू स्वीकारला जाऊ लागला आहे. बदलाची गती इतकी वेगवान आहे की, अनेक गावांमध्ये गेल्या पाच वर्षांत अशा विवाहांचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढल्याचे स्थानिक जाणकार, जुने बुजुर्ग सांगतात.

या बदलामागे अनेक कारणे दिसून येतात. ग्रामीण भागातील युवक युवतींचे शहरांकडे शिक्षणासाठी स्थलांतर, कॉलेजमधील मोकळे वातावरण, तसेच मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वाढलेली संवादाची सुलभता, या सगळ्यांनी ओळखींचे जाळे विस्तारले आहे. विशेषतः मोबाईल हा या परिवर्तनाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे. परिणामी, प्रेमविवाह केवळ दोन व्यक्तींचा निर्णय न राहता, ग्रामीण समाजात समता आणि स्वातंत्र्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. विविध जाती-धर्मातील तरुण एकत्र येत असल्याने सामाजिक भिंती हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र, या बदलासोबत काही गंभीर दुष्परिणामही पुढे येत आहेत. जितके फायदे तितके नुकसानहि दिसत आहेत.मोबाईलमुळे चुकीच्या नात्यांमध्ये अडकण्याचे प्रकार वाढले आहेत. अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाणे, तडकाफडकी घेतलेले विवाहाचे निर्णय, आर्थिक स्थैर्य नसताना घेतलेले निर्णय यामुळे अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होत आहे. काही वेळा हे प्रकरण कोर्ट-पोलिसांपर्यंत पोहोचते, तर अनेक ठिकाणी कुटुंबांतील नाती कायमची तुटण्याची वेळ येते. काही भागांत जातीय तणाव निर्माण झाल्याची उदाहरणेही समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, प्रेमविवाह हा केवळ विवाहपद्धतीतील बदल नसून ग्रामीण समाजाच्या मानसिकतेत होत असलेल्या मोठ्या परिवर्तनाचा संकेत मानला जात आहे. स्वातंत्र्य, समानता आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची क्षमता या मूल्यांकडे ग्रामीण पिढी झुकत असल्याचे स्पष्ट दिसते. एकूणच, ग्रामीण भागातील वाढती लव्ह मॅरेज संस्कृती ही बदलत्या काळाची निशाणी असली, तरी या बदलाला समजून घेत संतुलित दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.संतुलित दृष्टीकोण ठेवल्यास अनेक दुष्परिणाम पासून वाचता येते. त्यासाठी सर्वांनी संतुलित दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे

एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगडचा साडे बावीस टक्के योजनेला विरोध !!

एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगडचा साडे बावीस टक्के योजनेला विरोध !!

२२.५०% ची योजना स्वीकारू नका, २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्याचा आग्रह धरा, आपली घरे-गावे वाचवा ; समितीचे नागरिकांना आवाहन.

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) :
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगडचा साडे बावीस टक्के योजनेला विरोध केला असून २२.५०% ची योजना स्वीकारू नका, २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्याचा आग्रह धरा, आपली घरे-गावे वाचवा असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगडने नागरिकांना केले आहे.

समितीने प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे कि २२.५०% ची योजना स्वीकारू नका: सरकारने केएससी नवनगर, म्हणजेच तिसऱ्या मुंबईसाठी आपल्या जमिनी २२.५% योजनेअंतर्गत संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकार तुमच्या जमिनी संपादीत करून त्याबदल्यात जमिनीच्या २२.५% विकसित भूखंड देणार आहे. जमिनीच्या मोबदल्यापोटी तुम्हांला एक नवा पैसाही मिळणार नाही आणि २२.५% ऐवजी प्रत्यक्षात १५.७५% च भूखंड हाती पडणार आहेत. हे भूखंड किती वर्षांनी मिळतील याची शाश्वती नाही, त्यासाठी १५-२०-२५ वर्षेही लागतील. तोपर्यंत शेतकऱ्यांना हात हलवीत बसावे लागणार आहे. जेव्हा ते मिळतील तेव्हा आधी लाखो रुपयांचे विकास शुल्क भरावे लागेल, मगच भूखंडाचा ताबा मिळेल, भूखंड विकसित करण्याचे तांत्रिक, व्यवहारिक आणि प्रशासकीय ज्ञान शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे आणि हाती पैसा नसल्यामुळे बिल्डरकडे शरण जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, त्यामुळे ही योजना बिल्डर लॉबीच्या दावणीला बांधणारी आहे. सिडकोबाधित ९५ गावे आणि विमानतळबाधित गावे यांना अनुक्रमे १२.५% आणि २२.५% मिळाले. (प्रत्यक्षात ८.७५% आणि १५.७५%) परंतु त्यांना सदर भूखंडातील ५०% क्षेत्र बिल्डरला द्यावे लागले आहे. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना आज ३२ (बत्तीस) वर्षानंतरही १२.५% चे भूखंड मिळालेले नाहीत. शेवटी त्यांनाही बिल्डरला शरण जावे लागले आणि आपल्यालाही जावे लागेल. हे भूखंड वाटप करतानाही सिडको अधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांचे प्रचंड शोषण झालेले आहे. ही योजना स्वीकारली की, आपल्याला न्यायालयातही दाद मागता येणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत ही योजना स्वीकारू नका.आपल्याला २०१३ चा कायदा हवा आहे आम्हाला बाजारभावाच्या चारपट किमत देणारा २०१३ चा नवीन भूसंपादन कायदा लागू करा.अलीकडेच दोन प्रकरणांत न्यायालयाने २२.५% ची योजना बंधनकारक नसून २०१३ चा कायदा लागू करण्याचाबत सरकारला आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेल तालुक्यातील काही शेतकऱ्यांना एका गुंठ्याला अठ्ठावन्न लाख रुपये (५८ लाख) मंजूर केलेले आहेत, म्हणून दलाल आणि सरकारच्या आमिषाला बळी पडू नका. थोडा धीर धरा, आपल्या जमिनी एवढ्यात विकू नका.असे आवाहन समितीने केले आहे.

आपली घरे नियमीत करून घेऊ या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली सर्व घरे, गावे नियमित करण्यासाठी आग्रह धरू या. सिडको प्रकल्पग्रस्तांची हजारो घरे सरकारने आज ५५ वर्षानंतरही नियमित केली नाहीत, आता त्या घरांवर तोडक कारवाई केली जात आहे. म्हणून सावध रहा, 'आधी घरे नियमित करा, मग प्रकल्प' हे आपले घोषवाक्य असू द्या. तसेच आपले मच्छीमार पारंपरिक व्यावसायिक बांधव यांच्या नुकसान भरपाईसाठी आग्रह धरू या. असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगडचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर,सरचिटणीस रूपेश पाटील यांनी केले आहे.

Saturday, 28 March 2026

ग्रुप ग्रामपंचायत चाणजे व संत निरंकारी मंडल उरण सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उरण चारफाटा ते मुळेखंड फाटा या ठिकाणी स्वच्छता अभियान !!

ग्रुप ग्रामपंचायत चाणजे व संत निरंकारी मंडल उरण सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने  उरण चारफाटा ते मुळेखंड फाटा या ठिकाणी स्वच्छता अभियान !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशिवाऀदाने दि. २७/३/२०२६ रोजी ग्रुप ग्रामपंचायत चाणजे व संत निरंकारी मंडल उरण सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान उरण चारफाटा ते मुळेखंड फाटा या ठिकाणी राबविणेत आला. यावेळी ग्राम पंचायत चे सरपंच अजय म्हात्रे यांनी सागीतले कि संत निरंकारी मंडल हे फक्त अध्यात्मिक नसुन ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात तसेच या समाजाला, तरुण पिढीला वाईट मार्गावर जाण्यापासुन परावर्तित करतात, निरंकारी मिशनचे मुखी समिर पाटील यांनी मिशनची पुस्तकें वाटप केली. 

या स्वच्छता अभियानासाठी रुपाली कोळी, रोशन मेश्राम, विकास शर्मा, संजय पारदे, कैलाश नाखवा, संजिवन रावळे, निरंकारी सेवादल भाई, बहनजी, करंजा येथील ज्येष्ठ नागरिक मंडल, सर्व ग्राम पंचायत कर्मचारी, ग्राम पंचायत सदस्य, सदस्या व इतर सज्जन उपस्थित होते, शेवटी मुखी समीर पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.मोठया प्रमाणात कचरा साफसफाई झाल्याने परिसर सुंदर व स्वच्छ दिसण्यास मदत झाली आहे.या स्वच्छता अभियान मुळे रोगराईला आळा बसला असून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

लालपरी (एसटी) विषयी महाराष्ट्राची आस्था वर्षानुवर्षे टिकलीय - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

लालपरी (एसटी) विषयी महाराष्ट्राची आस्था वर्षानुवर्षे टिकलीय - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील
     
         उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : उरण एसटी डेपोमध्ये एसटी विषयी आस्था आणि एसटी महामंडळाची व्यवस्था याविषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपासून लहान खेड्यात लालपरी एसटीच्या भावनां आपुलकीच्या राहिल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक माणसात एसटी विषयी आस्था असून खेडोपाड्यात एसटी थांबून नात्याप्रमाणे व्यवस्था मंडळाने केली आहे.

       डेपोचे व्यवस्थापक गद्रे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.यावेळी जेएनपीए फायनान्सचे डेप्युटी मॅनेजर महादेव घरत यांच्या सामाजिक सेवेबद्दल डेपो तर्फे सत्कार करण्यात आला.धनंजय पाटील यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.यावेळी विषयानुरूप शासनमान्य नशाबंदी विरोधात प्रचारक लवेंद्र मोकल यांनी.       " माझी एसटी", आदर्श शिक्षक संजीव पाटील यांनी " घातक नशा तंबाखूची " ऍड.मच्छिंद्र घरत यांनी अभ्यासपूर्ण तंबाखूवर व्याख्यान दिले तर अनामिका राम या हिंदी भाषिक कवयित्रीची " लाल परी " ही कविता सादर करून एसटी कर्मचाऱ्यांना आनंद दिला.धनंजय पाटील यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याचे राजकीय आश्रयदाते यांना कठोर शिक्षा करा - अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची गांधी चौकात निदर्शने.

भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याचे राजकीय आश्रयदाते यांना कठोर शिक्षा करा 

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची गांधी चौकात निदर्शने.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांना दिले निवेदन ; निवेदनातून कठोर कारवाई करण्याची मागणी

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) :
अशोक खरात या नाशिक मधील स्वयंघोषीत भोंदू बाबाचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत आणि ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. अस्थिर आणि बेभरवशाची कारकीर्द, त्यातून सतत असलेली असुरक्षिततेची भावना यामुळे अशा बाबाबुवांच्या नादी लागणारे मोठमोठे राजकीय पुढारी, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि भविष्य चाचपडणा-या उच्चभ्रू व अन्याय अत्याचार झालेल्या महिला यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आयुष्य उध्वस्त करणा-या विकृत अशोक खरातला कठोर शासन झालेच पाहिजे.

या अशोक खरातनी निर्माण केलेल्या मंदिर व ट्रस्टच्या नावाखाली १०५ कोटी रुपयांचा निधी शासनाचे विविध विभागाने वळविला आहे. सोबतच ४८ कि.मी. लांबीची स्वतंत्र जलवाहिनी व एक लाख क्षमता असलेली पाण्याची टाकी बनवून दिली आहे. सुमारे ३०० हून अधिक व्हिडीओ काल परवापर्यत पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले आहेत. अशा या विकृत नराधमाला व त्याला सहाय्य करणा-या मंत्री, शासकीय अधिकारी व स्थानिक स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी करत  उरण शहरातील बाझारपेठेत असलेल्या महात्मा गांधी चौक येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने निदर्शने केले. निदर्शन करून त्यांनी या नराधमाचा जाहीर निषेध केला आहे.

आपल्या देशात आणि राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, संवैधानिक मुल्ये आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांना मुठमाती देवून धर्मांधता आणि त्यातून येणारे अज्ञान, बुवाबाजी आणि अंधभक्ती हि मोठ्या प्रमाणावर वाढीला लागली आहे हे समाजाचे अपयश तर आहेच पण सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत चुकीच्या मुल्यांना खतपाणी घालणा-या सत्ताधा-यांच्या वृत्तीचे हे फलित आहे. त्यामुळे या प्रकरणात जर आरोपींना वाचविण्याचे, चौकशीत त्रुटी ठेवण्याचे, दिरंगाई करण्याचे प्रयत्न आढळून आले तर अ.भा. जनवादी महिला संघटना सर्व समविचारी शक्तींना सोबत घेवून तिव्र आंदोलन उभे करेल असा इशारा संघटनेने या निवेदनामार्फत दिला आहे.सदर संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील,धनवंती भगत, सविता पाटील, लता पाटील, उषाताई म्हात्रे, कुसुम ठाकूर, शारदा ठाकूर, कुंदा पाटील, प्रणाली पाटील, गुलाब टावरी,मुमताज भाटिया,निराताई घरत,उरण पंचायत समिती सदस्य कविता म्हात्रे,ललिता पाटील, रजनी पाटील,अपर्णा म्हात्रे यांच्यासह कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड संजय ठाकूर, कॉम्रेड संतोष ठाकूर,किसान सभेचे पद्माकर पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


कोट (चौकट ):- 

मागण्या :- 

१) या संपूर्ण प्रकरणाची सखोल, उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबध्द चौकशी करुन यातील सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी.

२) विकृत अशोक खरात याच्याशी संबंधीत सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.

३) पिडीत नागरीकांना न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.

४) या प्रकरणात बळी पडलेल्या महिलांना अभय देवून त्यांना बोलते करावे व त्यांचे योग्य असे समुपदेशनाची व्यवस्था करावी.

५) या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येक राजकीय, प्रशासकीय व सामाजिक पुढा-यांची सर्व स्तरावरील नावे जाहीर करुन त्यांच्यावर सुध्दा कठोर कारवाई करावी.

६) सर्व सबंधितांवर लैंगिक, आर्थिक शोषण व फसवणूक तसेच अंधश्रध्दा निर्मूलन अशा सर्व कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (पश्चिम) तर्फे अमृत नगर सर्कल येथून ३८० बस क्रमांक सुरू करण्याबाबत निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (पश्चिम) तर्फे  अमृत नगर सर्कल येथून ३८० बस क्रमांक सुरू करण्याबाबत निवेदन !!

अमृत नगर येथून ही बस बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, चेंबूर विभागात जाणारे कामगार यांची गैरसोय

मुंबई (शांताराम गुडेकर) :

               शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव मा.श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पश्चिम येथील अमृत नगर सर्कल परिसरातून बस क्रमांक ३८० पूर्वी अमृत नगर सर्कल ते ट्रॉम्बे या मार्गावर धावत होती. मात्र कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान ही सेवा बंद करण्यात आली.कोरोना नंतर सदर बस सेवा ट्रॉम्बे ते घाटकोपर पूर्व स्टेशन या मर्यादित मार्गावर सुरू करण्यात आली आहे.
          यामुळे अमृत नगर सर्कल परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, बस क्रमांक ३८० पुन्हा अमृत नगर सर्कलपर्यंत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा यांच्या वतीने आज निवेदन पत्र देण्यात आले.अमृत नगर येथून ही बस बंद केल्यामुळे जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, चेंबूर विभागात जाणारे कामगार यांची गैरसोय होत असून त्यांना आता अमृत नगर ते घाटकोपर ला बस किंवा रिक्षाने नाही तर चालत जावे लागते.घाटकोपर पश्चिम वरून पुन्हा रेल्वे ब्रिज क्रॉस करून घाटकोपर पूर्व जाऊन पुन्हा दुसऱ्या बसचा आधार घ्यायला लागतो. त्यामुळे वेळ, पैसे जास्त वाया जातात.
          घाटकोपर बस डेपोचे निरीक्षक श्री.पी.एन. पांढरे, श्री.विकास विठ्ठल चौगुले व व्यवस्थापक श्री.बाळकृष्ण चौधरी तसेच देवनार बस डेपोचे बस कंट्रोलर श्री.कांतिलाल ठुंबरे आणि बस व्यवस्थापक श्री.राजेश मोहिते यांना निवेदन पत्रक सादर करण्यात आले.या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर, कक्ष उपसंघटक (१२३ /१२४), श्री.राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक (१२३), श्री.संतोष चांदे आणि कक्ष वार्ड संघटक (१२७) श्री.कल्पेश बुवा यांचा समावेश होता.

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

मुंबई, पी. डी. पाटील : नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व  येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व बालविकास केंद्र, (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने नागरी निवारा परिषद, प्लॉट नं. ६, गणेश मंदिर येथे, नवरात्री अष्टमी विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा मोठया उत्साहात संपन्न झाली. 

असंख्य महिलानी त्यांच्या कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती वर कुंकूमार्चन करून कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेतला. रामनवमी निमित्ताने समुहिक रामरक्षा व हनुमान चालीसा पठण विशेष सेवा करण्यात आली. 

ज्येष्ठ सेवेकरी सुनील पडवळ व श्रीधर कडू  यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सेवा खूप उत्साहात पार पडली.

Friday, 27 March 2026

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव मा.श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत मंडळ रेल्वे प्रबंधक श्री हिरेश मीना तसेच चीफ ओ.एस. श्री निरज मेंटल यांच्या उपस्थितीत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने निवेदन पत्र देण्यात आले. या वेळी विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,कक्ष प्रसार श्री.अनंत पवार, कक्ष उपसंघटक श्री.राजेंद्र पेडणेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.संबंधित रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
              दादर-रत्नागिरी पॅसेंजरमागील काही काळापासून राज्यांतर्गत रेल्वेगाड्या रद्द करून परराज्यातील रेल्वेगाड्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. करोना काळात मुंबई – कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई – मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, पुणे – भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.ज्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत. त्या वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येत आहेत. कायमची बंद करण्यात आली असून त्याजागी आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण मुंबई आणि कोकणवासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच !

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच !

कल्याण, प्रतिनिधी :

मोहन पॅराडाईज फेज-२, वायले नगर येथील रहिवाशांना मागील अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येबाबत सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्री. सुरेश आंबेकर यांनी महानगरपालिका तसेच पाणीपुरवठा कार्यकारी विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. स्थानिक नगरसेवकांकडेही याबाबत निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नव्हता.

या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत जाऊन प्रभाग ५ चे शिवसेनेचे नगरसेवक रुपेश केरू सकपाळ, डॉ. तनुजा अनिकेत वायले, किरण राजाराम भांगले तसेच सौं. प्रमिला भगवान पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अभिनय गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढत या समस्येचे तातडीने निराकरण करावे अशी ठाम मागणी केली.

नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत आणि योग्य पद्धतीने मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभागातील नागरिकांची कोणतीही तक्रार किंवा समस्या असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या समस्यांचा पाठपुरावा करत त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यांनी (प्रभाग ५ चे नगरसेवक) यांनी सांगितले.


Thursday, 26 March 2026

वालधुनी नदी संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस !!

वालधुनी नदी संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस !!

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय कल्याण यांच्या वालधुनी नदी संदर्भात गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर यांनी माहिती अधिकाराद्वारे मागील पाच वर्षांतील नोंदी मागविल्या असता खालील बाबी समोर आल्या मागील पाच वर्षांत वालधुनी नदी संदर्भात सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधींकडून अत्यल्प पत्रव्यवहार झाला आहे. उपलब्ध नोंदीनुसार केवळ श्री. सुनील उतेकर व श्री. निशांत कांबळे यांचीच दोन पत्रे आढळून आली.
*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शासनाकडे वालधुनी नदी संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याचे (निरंक) कळविण्यात आले.
वालधुनी नदी स्वच्छतेसाठी कोणताही निधी उपलब्ध झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नदीसाठी स्वतंत्र अकाउंट हेड किंवा खर्चासाठी खाते उघडण्यात आलेले नाही, असेही सांगण्यात आले. वरील सर्व बाबींमुळे संबंधित विभागाची निष्क्रियता स्पष्ट होत असून, हा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी केवळ कार्यालयात बसून कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेकडून करण्यात आला आहे. तसेच वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था लवकरच या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील सिताराम उतेकर यांनी दिली आहे. 

वृत्त - कल्याण (प्रतिनिधी)

उरण नगर परिषदेत भाडे आणि टेंडरच्या नावाखाली झाला कोट्यावधीचा घोटाळा !!

उरण नगर परिषदेत भाडे आणि टेंडरच्या नावाखाली झाला कोट्यावधीचा घोटाळा !!

** बनावट कागदपत्रच्या आधारे कंत्राटदाराची फसवणूक.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगर परिषदेत भ्रष्टाचार झाला असून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. यामुळे उरण मध्ये राजकीय वर्तुळात एकच खळ बळ माजली आहे. उरण नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक स्फोटक घोटाळा उघडकीस आला आहे. 'भाडे आणि टेंडर'च्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून एका जिवंत कंत्राटदाराच्या नावावर तब्बल दहा वर्षे व्यवहार चालवल्याचा धक्कादायक प्रकार उरण मध्ये समोर आला आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, खुद्द नगराध्यक्षांनीच या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत "श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल" येथील ठेक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, २०१३ पासून एका त्रयस्थ व्यक्तीला कोणतीही कल्पना न देता, त्याच्या नावाचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करून हे काम लाटण्यात आले. यामध्ये नवी मुंबईतील कंत्राटदार वासुदेव छगन पाटील यांच्या 'मे. वी.सी. पाटील इंटरप्रायजेस' या फर्मच्या नावाने बोगस पॅनकार्ड, रेशनकार्ड, आयकर विवरणपत्र आणि बनावट सह्यांचा वापर करुन टेंडर मिळवण्यात आले.


कोट (चौकट ):- 


१ कोटींहून अधिकची थकबाकी:- 

२०१५ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत क्रीडा संकुलातील विविध सुविधा चालवून नगरपरिषदेची तब्बल १ कोटी १ लाख ६३ हजार ४९८ रुपयांची थकबाकी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या वासुदेव पाटील यांच्या नावावर हे काम दाखवण्यात आले, त्यांनी "मी असे कोणतेही काम घेतलेले नाही," असे स्पष्ट करत आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.


======================================


माहिती अधिकारातही दिशाभूल  ?

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागवलेल्या माहितीवरून. पत्रकारांनी यापूर्वी या ठेक्याबाबत माहिती मागवली असता, नगरपरिषदेकडून चुकीची आणि बोगस माहिती पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे हा घोटाळा जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न झाला का, असा संशय व्यक्त केला आहे.


सध्या उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पदभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. उरण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या महाघोटाळ्याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.उरण नगर परिषदेत अनेक वर्षांपासून विविध कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.उरण नगर परिषदेत अनेक घोटाळे, भ्रष्टाचार झाले असून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सर्व प्रकरणे बाहेर काढावीत अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे

उरण नगर पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय ; अनेक ठिकाणी छोटे पाईप लाईन फुटून पाणी वाया !

उरण नगर पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय ; अनेक ठिकाणी छोटे पाईप लाईन फुटून पाणी वाया !

दररोज शेकडो लिटर पाणी वाया ; नागरिकांमध्ये संताप.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :

उरण नगर पालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय  होत असल्याचे अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे.शहरातील काही भागात पाण्याचे कारंजे उडत असून पाणी  वाया जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. उरण नगर पालिका क्षेत्रात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढली आहे, परंतु पाण्याचे स्रोत कमी आहेत. रानसई धरण आणि पुनाडे धरण हे दोन प्रमुख पाण्याचे स्रोत आहेत, परंतु त्यांची क्षमता दिवसे दिवस कमी कमी होत चालली आहे. 

       पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व पाण्याची बचत करण्यासाठी उरण नगर पालिकेने कडक व धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पाण्याची अपव्यय होत असल्याचे अनेक वेळा उरण नगर पालिकेला कळवले आहे, परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. उरण नगर पालिकेचे अधिकारी म्हणतात की, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी कारवाई केली जाईल. पाण्याचे कारंजे उडून पाणी फुकट वाया जात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

उरण पनवेल मार्गावर मोठी दुर्घटना टळली; पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने वाहतूक ठप्प, आता रस्ता मोकळा !

उरण  पनवेल मार्गावर मोठी दुर्घटना टळली; पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने वाहतूक ठप्प, आता रस्ता मोकळा ! 

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण-पनवेल महामार्गावरील चिर्ले जवळील नागाव फाटा येथे काल (बुधवारी) सकाळी १०:३० च्या सुमारास उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सपोर्ट स्ट्रक्चरला एका भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे पुलाचा जड लोखंडी सांगाडा थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी उरण परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

     चिर्ले (नागाव) येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्याला एका ट्रेलरने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की लोखंडी स्ट्रक्चर थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेलर चालकाने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गाडी उभी केली होती. परंतु हॅन्ड ब्रेक निसटल्याने अवजड ट्रेलर उतारावरून पुढे सरकला आणि थेट पुलाच्या लोखंडी बांधकामात शिरला चालकाचा ताबा नसलेला हा ट्रेलर वेगाने धडकल्याने हा अपघात घडला. या धडकेत ट्रेलर चा एक्सेल बार तुटून मोठे नुकसान झाले आहे, आणि पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

     महामार्ग प्राधिकरणाने क्रेनच्या साहाय्याने पडलेले लोखंडी खांब बाजूला केले असून, आता हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. उरण आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. या घटनेबाबत माहिती देताना उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच डी मुलाणी म्हणाले की, अपघात घडल्यानंतर तातडीने आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उरणच्या यशश्री शिंदे प्रकरणात न्यायाचा एक टप्पा; ८ लाख मदत व शासकीय नोकरी जाहीर !!

उरणच्या यशश्री शिंदे प्रकरणात न्यायाचा एक टप्पा; ८ लाख मदत व शासकीय नोकरी जाहीर !!

यशश्री शिंदे प्रकरणात आरोपीला लवकर शिक्षा द्या; उरण आरपीआय आक्रमक

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये यशश्री शिंदे हत्येनंतर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासमवेत आरपीआय नेते प्रकाश मोरे, नरेंद्र गायकवाड व रायगड जिल्यातील सर्व कार्यकर्ते व स्थानिक आरपीआय नेते संजय गायकवाड यांनी पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांनी शासकीय नोकरी व आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.

दिलेला शब्द पाळत पीडित कुटुंबाला सुमारे ८ लाखांची आर्थिक मदत तसेच शासकीय नोकरी लाभार्थी मानून अनुष्का शिंदे हिला देण्यात आली आहे. सदर नोकरीचे परिपत्रक रामदास आठवले यांच्या उपस्थितीत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० मार्च २०२६ रोजी ‘चवदार तळे सत्याग्रह दिना’च्या औचित्याने विजय स्तंभ येथे नोकरीचे परिपत्रक प्रदान करण्यात आले.

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड व स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने कुटुंबियांनी आभार व्यक्त केले.

या नोकरीसाठी  जिल्हाधिकारी व  जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच प्रकरणातील आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उरण आरपीआयने केली आहे

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न ! उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) प्रजापिता ब्रह्माकुमारीज माऊ...